Home Blog Page 43

पर्पल जल्लोष महाउत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्हा नियोजन समितीद्वारे दिव्यांगांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येणार*

पुणे, दिनांक १७:- ‘दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटक असून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल. त्यासाठी विविध घटकांच्या सहकार्याने प्रभावी उपायोजना करण्यात येतील.’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणून त्‍यांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीने १७ ते १९ जानेवारी, २०२५ या कालावधीत मोरवाडी येथील ऑटो क्लस्टर मैदानावर ‘पर्पल जल्‍लोष’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. उमा खापरे, आ. अण्णा बनसोडे, आ. अमित गोरखे, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख उपस्थित होते.‌

उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, राज्याच्या लोकसंख्येच्या साधारणपणे पाच टक्के लोकसंख्या दिव्यांग बांधवांची आहे. दिव्यांग बांधवांसाठीच्या योजना राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ठराविक निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करण्याबाबतचा निर्णय शासन पातळीवर घेण्यात येईल. यासंबंधीचे आदेश देखील आदेश लवकर काढले जातील. राज्याचा अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी तरतूद केली जाईल. दिव्यांग व्यक्तींची संख्या किती आहे, यासाठी जिल्हानुसार दिव्यांगांचा आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे अशी माहिती श्री. पवार यांनी दिली. महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांना मिळकत करात सवलत द्यावी आणि अतिक्रमणविरोधी कारवाई करताना दिव्यांगाना मानवतेच्या दृष्टिकोनातून सहकार्य करण्याची सूचना श्री.पवार यांनी केली.

दिव्यांग भवनच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेने दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम सुरू केले आहे. दिव्यांगांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, रोजगार कार्यक्रम घेणे, आरोग्य उपाययोजना करणे यावर भर देण्यात येईल आणि दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांतील पदे लवकरच भरण्यात येतील. दिव्यांगांना योग्य मार्गदर्शन केले तर ते कर्तृत्वाचे शिखर गाठू शकतात, हे पर्पल जल्लोष सारख्या कार्यक्रमातून दिसून येते. दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचे, त्यांना प्रेरणा देण्याचे काम समाज म्हणून आपल्या सर्वांचे आहे असे श्री. पवार म्हणाले.

पर्पल जल्लोष कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा मला आनंद झाला आहे असून पर्पल जल्लोष कार्यक्रम समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी, सामाजिक क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्यांनी पाहावा असा उत्सव आहे. या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

*ससून रुग्णालयात दिव्यांगांचे प्रमाणपत्र मिळणार*

पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात दिव्यागांना प्रमाणपत्र दिले जात आहे त्याच धर्तीवर ससून रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात देखील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येतील, यासाठी आवश्यक ते निर्देश देण्यात येतील अशी घोषणा श्री. पवार यांनी यावेळी केली.

*प्रदर्शनातील स्टॉलला उपमुख्यमंत्र्यांनी दिली भेट*

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनातील दिव्यांगांच्या उपयोगाच्या स्वयंसेवी संस्थांच्या स्टॉलला भेट दिली. प्रदर्शनात ४० पेक्षा जास्त स्टार्टअप्स,कार्पोरेट कंपन्यानी दिव्यांगांसाठीच्या निर्मिती केलेल्या नवनवीन वस्तू पाहण्यास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनास सर्वांनी भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्पल जल्लोष कार्यक्रमास दिल्या शुभेच्छा*

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे दिव्यांगांसाठी पर्पल जल्लोष – दिव्यांगांचा महाउत्सव या अभिनव उपक्रमाद्वारे दिव्यांगांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी आवश्यक असणारी माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना, कायदे, अधिनियम आणि हक्क याबाबत माहिती मिळेल. यामुळे दिव्यांगांचे सक्षमीकरण होण्यास मदत होईल.

महाउत्सवात साहित्य संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामुळे दिव्यांगाना आपल्या सुप्त गुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. दिव्यांगांचे जीवन सुकर करण्यासाठी महाउत्सव एक आदर्श ठरेल, असा मला विश्वास आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

सचिव राजेश अग्रवाल यांनी केंद्र सरकारकडून दिव्यांगांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.

परांजपे स्किमचे व्यवस्थापकीय संचालक शंशाक परांजपे, युनिसेफचे संजय सिंह, अभिनेते दर्शिल सफारी यांचा दिव्यांगांसाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी करताना दिव्यांगांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची तसेच दिव्यांग भवनाची माहिती दिली. दिव्यांगांचे प्रतिनिधी म्हणून मानव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मानले.

कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, दिव्यांग बांधव, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा

पुणे, दि. १७: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला. राज्य शासनाच्या सर्व योजना गतीने राबवाव्यात, प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे ते यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सूर्यकांत मोरे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधान मंत्री जन मन योजनेंतर्गत घरकुलांचा पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नसल्याने लाभ देण्यास अडचण असल्याच्या बाबतीत शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबत गटविकास अधिकारी यांनी महसूल अधिकाऱ्यांशी समन्वयाने काम करावे. उपलब्ध शासकीय जागांचे प्रस्ताव उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावेत.

अग्रीस्टॅक पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नोंदणी करणे, त्यांची माहिती भरण्याचे काम प्राधान्याने करावे जेणेकरून शेतकऱ्यांना भविष्यात गतीने कृषीच्या योजनांचा लाभ देता देता येईल. शेतकरी नोंदणीसाठी सामान्य सुविधा केंद्राचाही उपयोग करा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीबाबत आलेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने तालुकानिहाय किती ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या. उपलब्ध जागेवर प्रकल्प उभारण्याची व्यवहार्य तपासणी करून तात्काळ कामे सुरू होतील, असे पाहावे, असेही ते म्हणाले.

अनोंदणीकृत फेरफार नोंदीसाठी ई-हक्क प्रणालीचा वापर तात्काळ सुरू करावा. ई-पीक पाहणीचे १०० टक्के काम गतीने होईल हे पाहावे. जमीन महसूल कर वसुलीच्या अनुषंगाने ई- चावडी प्रणालीचा प्रभावी उपयोग करावा, डिजिटल पंचनामा प्रणालीद्वारे पंचनामे करावेत. सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी डॅशबोर्डचा वापर करावा. राज्य शासनाने दिलेल्या सात सूत्री कार्यक्रमाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करावी, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील म्हणाले, घरकुलांसाठी जागा उपलब्धता तसेच निधी उपलब्ध असलेल्या परंतु जागेअभावी काम सुरू न झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना जागा उपलब्ध करण्याबाबत महसूल आणि गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. जल जीवन मिशनच्या कामांसाठी जागेबाबत प्रश्न त्वरित सोडवावेत, असेही ते म्हणाले.

यावेळी ई मोजणी, विविध प्रकल्पांसाठी भूमी संपादन, स्वामित्व योजना, ई क्यूजे कोर्ट, सेवा हक्क अधिनियमानुसार उपलब्ध करून देण्याच्या योजना आदीबाबत आढावा घेण्यात आला.

लाडक्या बहिणींना जानेवारीचा हफ्ता २६ जानेवारीच्या आधी मिळणार महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई:- लाडकी बहीण योजना सुरूच रहाणार असून, वाढीव रकमेबाबत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाणार आहे. जानेवारीचा हप्ता हा 1500 रुपयांचा असणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारी २०२५ चा हफ्ता मिळण्याची तारीख सरकारने सांगितली आहे. २६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.*

*👉🔴🔴👉लाडक्या बहिणींना २६ जानेवारीच्या आधीच या महिन्याचा हफ्ता मिळणार असल्याचं राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलं आहे.या संबंधी माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या की,२६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी ३,६९० कोटींचा निधी विभागाला मिळणार आहे. अर्थसंकल्पातही महिलांना अधिक लाभ देण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. आदिती तटकरे यांनी सांगितले की, सरकारकडून फेब्रुवारी महिन्याचेही नियोजन केले जात आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही २कोटी ४६लाख महिलांना दिला जात आहे. काही महिलांबाबत तक्रार आली होती. बनावट केसेस फारच कमी होत्या त्यांना लाभ देणे बंद केले जाईल. त्यामुळे योजनेत कोणता फरक पडेल असे मला वाटत नाही.*

*👉🅾️🅾️👉जुलै महिन्यात सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात डिसेंबरपर्यंत ६ हप्ते जमा झाले आहेत. जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार, याबद्दल काहीच माहिती समोर येत नव्हती. संक्रातीच्या मुहूर्तावर हा हप्ता जमा होणार, अशी चर्चा होती. यामुळे लाडक्या बहिणींची संक्रात गोड होणार असे बोलले जात होते. मात्र संक्रातीला महिलांच्या खात्यात पैसे आलेच नाही. आता २६ जानेवारीच्या आधी महिलांना पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात असून त्यासाठी महिलांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. हा हफ्ताही मागील हफ्त्याप्रमाणे १५०० रुपयांचा असणार आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये महिलांच्या सातव्या हफ्त्याचे वितरण सुरू केले जाईल, असेही अदिती तटकरे यांनी सांगितले.*

राज्यातील विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम राबविण्यात येईल- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

पुणे, दि. १२: राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम तयार करण्यासह सर्व विद्यापीठात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. हे अभ्यासक्रम राबविल्यामुळे सायबर योद्ध्यांची एक नवीन पिढी तयार होईल, असेही ते म्हणाले.

‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, महाराष्ट्र सायबरचे उप महानिरीक्षक संजय शिंत्रे, क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, क्विक हील टेक्नॉलॉजीस लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास काटकर, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

स्वामी विवेकानंदांना जयंतीनिमित्त अभिवादन करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, स्वामी विवेकानंदांची शिकवण लाखो लोकांना, विशेषतः तरुणांना, धैर्याने, शहाणपणाने आणि उद्देशाने नेतृत्व करण्यासाठी प्रेरणा देत आहे. त्यामुळे क्विक हील फाउंडेशनने आयोजित केलेल्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा पुरस्कारांमध्ये युवकांसोबत सामील होताना आनंद होत आहे.

२०१६ पासून हा कार्यक्रम सुरू करून आतापर्यंत ५४ लाख लोकांपर्यंत सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता केल्याबद्दल फाउंडेशन आणि क्विक हील टेक्नॉलॉजीसचे अभिनंदन करून राज्यपाल म्हणाले, फाउंडेशनने समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यावर आणि सायबर-सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या फाउंडेशन बरोबर जोडले जाऊन तळागाळापर्यंत काम केलेले सर्व ‘सायबर वॉरियर्स’ कौतुकास पात्र आहेत.

ते पुढे म्हणाले, सायबर सुरक्षा ही भारतासह जगभरातील सर्वात गंभीर चिंतांपैकी एक म्हणून उदयास आली आहे, आज आपण पेमेंट स्वीकारण्यासाठी आणि करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानावर अधिकाधिक अवलंबून आहोत. अगदी अशिक्षित छोटा विक्रेता देखील डिजिटल पेमेंट स्वीकारतो. हे प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या तंत्रज्ञानाचे यश आहे.

तंत्रज्ञान पुढे जात असताना चुकीचे काम करणारे लोकदेखील वाढत आहेत. तथापि, त्यांची साखळी तोडणे आणि त्यांना पकडण्याचे कामदेखील आपल्याला करावे लागणार आहे. आज सायबर गुन्हेगारीत स्थिर गतीने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकाला सायबर गुन्हेगारीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिक त्याचा पैसा गमावणार नाही अशी यंत्रणा आपल्याला विकसित करावी लागेल. नुकसानीनंतर उपाययोजना करण्यापेक्षा नुकसानीला प्रतिबंध करण्याच्या आवश्यकतेवर राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी भर दिला.

शासनाच्या सायबर शाखेतील पोलीसांनाही अशा फाउंडेशनद्वारे सायबर गुन्हेगारीच्या विरोधात कसे काम करता येईल यासाठी संगणक यंत्रणेचे पुरेसे ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगार अनेकदा इतर देशातून काम करत असल्यामुळे या आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. त्यामध्ये नवीन कायदे करण्यासह असलेली धोरणे अधिक मजबूत करणे, सायबरसुरक्षेत अधिक गुंतवणूक करणे, यासह जागरूकता पसरवण्यावर अर्थात तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना आणि विशेषत: विद्यार्थ्यांना सुरक्षित ऑनलाइन पद्धतींबद्दल शिक्षित करणे यावर भर द्यावा लागेल, असेही ते म्हणाले.

अनुपमा काटकर म्हणाल्या, सायबर शिक्षा हा उपक्रम विद्यार्थ्यांना सक्षम करणे, आणि सर्वांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी त्यांना पुढे आणण्यासाठी राबविला आहे. हा उपक्रम केवळ सायबर सुरक्षेबाबत जागृती करण्यासाठीच नसून छोट्या शहरातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना एक आवाज देण्याचा, तेथील समाजघटकामध्ये या क्षेत्रात त्यांचे नेतृत्त्व तयार करण्याचा उपक्रम आहे.

यावेळी सायबर शिक्षा फॉर सायबर सेक्युरिटी उपक्रमात उत्कृष्ट काम केलेले प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी यांना सायबर वॉरियर्स पुरस्कार वितरीत करण्यात आले.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष पदी बंटी सोनवणे यांची निवड

मा. बंटीभाऊ सोनवणे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल मन : पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप – खूप शुभेच्छा ..

शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी चेतना इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सदिच्छा भेट

मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी चेतना इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सदिच्छा भेट दिली भेटी दरम्यान सरांनी क्लास रूम, लॉब, लायब्ररी , होस्टेल सर्वांची पाहणी केली चांगल्या सुविधा चेतना फाउंडेशन तर्फे विद्यार्थीना दिले जातात असे सर म्हटले व संस्थेचे कौतुक केले त्यावेळी संस्थेचे सचिव विलास भोसले यांनी शाळेमध्ये होणारे विविध उपक्रम , स्पार्धा परीक्षा मार्गदर्शन, विद्यार्थींचा गुणात्मक विकास संस्थेतर्फे घेतले जाणारे विविध कार्यक्रम यांची माहिती सरांना दिले व सरांचा सत्कार केला

मोठी स्वप्न पहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि ध्येय निश्चित करा

चेतना फाउंडेशन इंदापूर येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मधील प्रथम वर्ष बी फार्मसी आणि डी फार्मसी च्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात *आरंभ* 2025 हा स्वागत समारंभ आयोजित केलेला होता.

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. सचिन जाधव यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रात असणारे विविध नोकरीच्या संधी तसेच परदेशातील शिक्षणासाठी असणारी विविध संधी काय आहे याची सखोल माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना कॉलेज आणि संस्थेबद्दल माहिती दिली विद्यार्थ्यांना मोठ्या स्वप्नांपर्यंत पोहचायचेअसेल तर ध्येय पण मोठे ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चेतना फाउंडेशन चे खजिनदार माननीय सोमनाथ माने सर यांनीही फार्मसी मधील नवीन विद्यार्थ्यांना संबोधित करताना कष्टाशिवाय पर्याय नाही प्रामाणिक कष्ट केले तर त्याचे फळ हे नक्की मिळते असे सांगितले.

दुपारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव विलास भोसले यांनी केले. माननीय भोसले सरांनी सुद्धा विद्यार्थ्यांना संबोधित करताना संस्थेने आणि कॉलेजने विद्यार्थ्यांना ज्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा पुरेपूर वापर करावा असे आव्हान केले.

कार्यक्रमाचे संयोजनासाठी प्राध्यापिका नम्रता मोरे व वैष्णवी डोईफोडे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुजित देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय काका देशपांडे सचिव विलास भोसले खजिनदार सोमनाथ माने संचालक बोराटे साहेब यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.

error: Content is protected !!