Home Blog Page 44

‘एचएमपीव्ही’ विषाणूबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये- जिल्हाधिकारी जितेन्द्र डुडी

पुणे दि. ९: ‘एचएमपीव्ही’ हा विषाणू नवीन नाही. त्याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तथापि, सतर्कता बाळगावी, काळजी घ्यावी तसेच आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेन्द्र डुडी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ‘एचएमपीव्ही’ विषाणूच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. ८) आढावा घेतला. बैठकीस ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामतीचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यम्पल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, तसेच सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

‘एचएमपीव्ही’ विषाणूच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणांनी सज्ज रहावे असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, हा विषाणू २००१ पासून माहितीमध्ये आहे. तथापि, वैद्यकीय यंत्रणांनी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या विषाणूबाबत कसे उपचार करता येतील यासाठी अवगत ( ओरीएंटेशन ) करावे. सर्व आरोग्य संस्थेमध्ये किमान पुढील तीन महिने पुरेल इतका पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा. व्हेन्टींलेटर्स, ऑक्सिजन प्लँट तसेच अन्य साधनसामुग्री सुस्थितीत असल्याबाबत खात्री करावी. आवश्यक तेथे त्वरीत दुरुस्ती करुन घ्यावी. दैनंदिन आएलआय/सारी (एसएआरआय) सर्वेक्षण गुणवत्तापूर्ण व नियमित सुरु ठेवावे. दैनंदिन गृहभेटी मध्ये जनजागुती करावी. आवश्यकतेनुसार साबण व पाणी यांचा वापर करावा. सॅनेटायझरचा वापर करावा. 

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. यम्पल्ले यांनी आरोग्य विभागाच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच पुणे जिल्ह्यात यंत्रणा दक्ष असल्याचे सांगितले. 

रस्ते अपघातातील जखमींवर ७ दिवस मोफत उपचार; कॅशलेस ट्रिटमेंट योजना काय? जाणून घ्या

नवी दिल्ली – देशभरात गेल्या वर्षभरात रस्ते अपघातात १ लाख ८० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १८ ते ३४ वयोगटातील ६६ टक्के लोकांचा समावेश आहे. जर या अपघातग्रस्त लोकांना वेळीच उपचार मिळाले असते तर त्यातील काहींचे प्राण वाचले असले.रस्ते अपघातातील हीच बाब लक्षात घेऊन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कॅशलेस ट्रिटमेंट योजनेची घोषणा केली. ही योजना रस्ते अपघातातील जखमींसाठी लागू असेल.
जे पेशंट रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतील त्यांच्यावर ७ दिवसापर्यंत उपचाराचा खर्च किंवा १.५ लाख रुपये तातडीने दिले जातील. ही कॅशलेस ट्रिटमेंट योजना काय आहे, ती केव्हा लॉन्च होणार, त्याचा कोणाला फायदा मिळणार आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊया केंद्र सरकारची कॅशलेस उपचार योजना काय आहे?

१४ मार्च २०२४ रोजी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने चंदीगडमध्ये रस्ते अपघातातील पीडितांना कॅशलेस उपचार देण्यासाठी एक पायलट प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पांतर्गत रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांना वेळेवर वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार होत्या. चंदीगडमध्ये हा प्रकल्प यशस्वी झाला. चंदीगडनंतर या योजनेचा आणखी ५ राज्यांमध्ये विस्तार करण्यात आला. यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे. ७ जानेवारी २०२५ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात या योजनेच्या अधिकृत सुरुवातीची घोषणा केली.

अपघात झाल्यास या योजनेचा लाभ कसा मिळेल?

कॅशलेस उपचार योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने ३ टप्पे सांगितले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात अपघातानंतर जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. केंद्र सरकार या सरकारी हॉस्पिटलची यादी जारी करेल. दुसऱ्या टप्प्यात अपघातानंतर २४ तासांत पोलिसांनाकळवणे, अपघाताची संपूर्ण माहिती, जखमींची परिस्थिती पोलिसांना माहिती देणे. तिसऱ्या टप्प्यात सुरुवातीचे दोन्ही टप्पे पार केल्यानंतर जखमींची फाईल तयार होईल त्यात पोलीस रिपोर्ट,जखमीचं ओळख पत्र जमा करावे लागेल.

१.५ लाख रुपये कसे मिळतील आणि त्यातून कोणते उपचार करता येतील?

कॅशलेस ट्रिटमेंट योजनेच्या तिन्ही टप्प्याचे पालन केल्यानंतर जखमी व्यक्तीला १.५ लाख रुपये दिले जातील. ज्यामुळे अपघाताच्या दिवसापासून पुढील ७ दिवसांसाठी १.५ लाख रुपयांचे मोफत उपचार दिले जातील. जखमींना प्रवेशावेळी कुठलेही शुल्क नाही. प्राथमिक उपचार मोफत मिळतील. गंभीर रित्या जखमी झाल्यास सर्जरीची सुविधा मिळेल. एक्स रे, सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या सुविधा मोफत मिळतील. उपचारावेळी दिली जाणारी औषधे मोफत असतील

पत्रकार हा समाजमनाचा आरसा : कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे.

भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारिता ओळखली जात असून यामध्ये पत्रकार हे समाजमनाचा आरसा आहेत. पत्रकारांनी जिथे चूक किंवा अन्याय होतो, तिथे जरूर लिहिले पाहिजे. मात्र जिथे चांगले काम होते तिथे कौतुक देखील केले पाहिजे. अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे प्रथम भाग्य मला लाभले, याचा मला खूप आनंद होत आहे मात्र पत्रकार भवन होण्या साठी तालुक्यातील पत्रकारांनी एक होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा, अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त इंदापूर पंचायत समितीच्या लोकनेते शंकररावजी पाटील सभागृहात आयोजित पत्रकार दिन विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाच्या दैनंदिन कामा साठी इंदापूर बस स्थानकासमोरील सार्वजनिक बांधकाम विभागाची जुनी इमारत भाडे तत्त्वावर द्यावी असे निवेदन मंत्री भरणे यांना देण्यात आले. यावेळी मंत्री भरणे यांच्या हस्ते पत्रकार धनंजय कळमकर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.

मंत्री भरणे पुढे म्हणाले, मला मिळालेले कॅबिनेट मंत्रीपदाचे श्रेय सर्वसामान्य जनता, पत्रकार व पक्षश्रेष्ठी यांना असून आता तुम्हाला देण्यासाठी माझ्या हातात खूप काही आहे. त्यामुळे पत्रकारांनी पत्रकार भवन होण्यासाठी एक होणे गरजेचे आहे. सध्या इंदापूर शहर व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलत आहे. भीमा नदीवरील शिरसोडी ते कुगाव पुलाचे काम जोरात सुरू असून त्यामुळे व्यापार वाढणार आहे. इंदापूर शहरात २०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. त्यामुळे पत्रकारांनी चांगल्या कामाचे कौतुक तर जिथे चुकेल तिथे ते निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. मी बोलण्यापेक्षा काम करणारा कार्यकर्ता आहे. या पत्रकार संघात जुन्या बरोबरच तरुण पत्रकार देखील असून या पत्रकार संघाचे काम चांगले आहे असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष भरत शहा म्हणाले, पत्रकारांचे शहर विकासासाठी महत्वपूर्ण योगदान असून नगरपरिषदेच्या मालकीचे सुसज्ज पत्रकार भवन बांधून दिले जाईल.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील म्हणाले, पत्रकार भवन साठी नगरपरिषदेने जागा दिल्यास खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पत्रकार भवन साठी संपूर्ण निधी दिला जाईल.

आयएमए चे इंदापूर तालुकाध्यक्ष डॉ. अनिल शिर्के म्हणाले, सर्व पत्रकारांच्या आरोग्या च्या तपासण्या मोफत करून पत्रकारांना योग्य आरोग्य विषयक मार्गदर्शन उपलब्ध केले जाईल.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी सर्व पत्रकारांच्या अडचणी जाणून घेवून सदर अडचणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सोडविल्या जातील अशी ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विधीज्ञ राहुल मखरे, छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, विधीज्ञ शुभम निंबाळकर, किरण गानबोटे, पांडुरंग शिंदे, गफुर सय्यद, शकील सय्यद, नंदकुमार गुजर, धरमचंद लोढा, विधीज्ञ गिरीष शहा, अमोलराजे इंगळे यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तर युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सिताप यांनी पत्रकारांना पेढे भरविले.

यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा, जेष्ठ पत्रकार तानाजी काळे, महेश स्वामी, विधीज्ञ नारायण ढावरे, कैलास पवार यांनी पत्रकारांच्या विविध अडचणी कडे सर्वांचे लक्ष वेधले.

पत्रकार संघाचे जिल्हा निरीक्षक शौकत तांबोळी, संघटक काकासाहेब मांढरे, सुरेश जकाते, शैलेश काटे, दीपक शिंदे, अंगद तावरे, विजय शिंदे, निलेश भोंग, आदित्य बोराटे, श्रेयश नलावडे, नाना घळकी, रामवर्मा आसबे, दीपक खिलारे, अमोल गुरगुडे, भीमसेन उबाळे, अशोक घोडके, शिवाजी शिंदे, संतोष जामदार, डॉ. सिद्धार्थ सरोदे, मोहंमद कैफ तांबोळी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, इंदापूर येथे वाचन संकल्प पंधरवडा अभिनव उपक्रमाचा प्रारंभ……

इंदापूर….

महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 अखेर वाचन पंधरवडा या कालावधीत “*वाचन संकल्प महाराष्ट्राचा*” अभिनव कार्यक्रमाचा एक भाग म्हणून चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, इंदापूर येथे शनिवार दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी ग्रंथालय अभियान स्वच्छता आणि पुस्तक प्रदर्शन उपक्रमाद्वारे उत्साहात प्रारंभ झाला.
उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित देसाई तसेच डॉ. अभिनंदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य देसाई म्हणाले वाचनाने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पोषण होण्यास असे सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. परंतु अलीकडच्या काळात देशातील बहुतांश वाचक वर्ग वाचन संस्कृती पासून दूर होत चाललेला दिसून येत आहे. म्हणून सध्याच्या पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. महाविद्यालयातील वाचक व विद्यार्थी वर्ग यांना वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात करत प्रदर्शन सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा इत्यादी कार्यक्रम महाविद्यालयाच्या ग्रंथालयामार्फत 1 ते 15 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभागी होऊन वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यात आपले योगदान द्यावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले. महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक ग्रंथालय विभाग प्रमुख ग्रंथपाल श्री विकास हुबाले हे काम पाहणार आहेत. या कार्यक्रमासाठी चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष मा. उदय काका देशपांडे सचिव मा. विलास भोसले आणि खजिनदार मा. सोमनाथ माने यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोरोनानंतर चीनमध्ये पुन्हा नवीन व्हायरसचा धुमाकूळ जगभरात भीती तर भारत पूर्णपणे तयार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले स्पष्ट

नवी दिल्ली:-चीनमध्ये झपाट्याने पसरणाऱ्या एचएमपीव्ही व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. कोरोनासारखी महामारी पसरू नये, यासाठी जगभरातील देश सतर्क झाले आहेत. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत देखील सतर्क झाला आहे. भारताचीही या व्हायरसच्या रुग्णावर नजर आहे. भारत सरकार या व्हायरसचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.*

*👉🔴🔴👉केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी म्हटले की, चीनमध्ये श्वसनाच्या आजारांच्या प्रकरणांमध्ये अलीकडे वाढ होत आहे. त्यामुळे काळजी करण्याची परिस्थिती आहे. यामध्ये मानवी मेटापन्यूमोव्हायरसमुळे होणारे रोगदेखील समाविष्ट आहेत. भारताच्या आरोग्य मंत्रालयाने त्यानंतर एका निवेदनात मंत्रालयाने जोर दिला की चीनमध्ये सर्व काही ठीक आहे. भारत श्वसन संक्रमणाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.*

*👉🅾️🅾️👉आरोग्य मंत्रालयाने चीनमधील परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने म्हटले कि, कोणत्याही संभाव्य धोक्यांबद्दल जागरूक राहण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थासोबत सहकार्य सुरु आहे. एचएमपीव्हीसारखे विषाणू भारतात आधीपासूनच प्रचलित आहेत आणि विद्यमान आरोग्य पायाभूत सुविधा कोणत्याही संभाव्य प्रकरणांना हाताळण्यास सक्षम आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, भारताकडे यंत्रणा तयार आहे. देशातील आरोग्य सेवा संसाधने श्वसनाच्या आजारांना तोंड देण्यासाठी सुसज्ज आहेत. तसेच नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे.*

मेडिकल क्षेत्रामध्ये फार्मसी हे खूप महत्त्वाचे क्षेत्र: डॉ. सचिन माळी व डॉ. अभिनंदन पाटील

इंदापूर- चेतना फाउंडेशन इंदापूर येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने फार्मसी मधील व्यवसायांच्या संधी या विषयाचे एक दिवसीय व्याख्यान आयोजित केले होते, या साठी डॉ. सचिन माळी विभाग प्रमुख अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी, पेठवडगाव, कोल्हापूर तसेच डॉ. अभिनंदन पाटील असोसिएट प्रोफेसर डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना संबोधित केले. आपल्या व्याख्यानामध्ये डॉ. माळी म्हणाले मेडिकल क्षेत्रामध्ये फार्मसी हे खूप महत्त्वाचे क्षेत्र आहे. बदलत्या मानवी जीवन शैली मध्ये मनुष्याला विविध आजार होत आहेत. यामुळे औषध निर्मिती व सवशोधण करणे काळाची गरज बनत आहे.

डी फार्मसी व बी फार्मसी उत्तीर्ण झाल्या नंतर विद्यार्थी विविध फारमासुटिकल कंपनीनं मध्ये नोकरी मिळवतात. त्या बरोबरच ते पुढील शिक्षण ही घेऊ शकतात जसे बी फार्मसी , एम फार्मसी. या कार्यक्रमासाठी
संस्थेचे अध्यक्ष मा. उदय काका देशपांडे, सचिव श्री विलास भोसले व खजिनदार श्री सोमनाथ माने, प्राचार्य. सुजित देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. संयोजन ट्रेनिंग आणि प्लेसमेट अधिकारी प्रा. मेघराज पाटील तसेच प्रा. प्रियंका पारेकर, प्रा. नम्रता मोरे प्रा. वैष्णवी डोईफोडे, श्री प्रवीण सुर्वे व श्री महेश खबाले यांचे सहकार्य मिळाले.

error: Content is protected !!