Home Blog Page 45

मेडिकल क्षेत्रामध्ये फार्मसी हे खूप महत्त्वाचे क्षेत्र: डॉ. सचिन माळी व डॉ. अभिनंदन पाटील

इंदापूर- चेतना फाउंडेशन इंदापूर येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने फार्मसी मधील व्यवसायांच्या संधी या विषयाचे एक दिवसीय व्याख्यान आयोजित केले होते, या साठी डॉ. सचिन माळी विभाग प्रमुख अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी, पेठवडगाव, कोल्हापूर तसेच डॉ. अभिनंदन पाटील असोसिएट प्रोफेसर डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना संबोधित केले. आपल्या व्याख्यानामध्ये डॉ. माळी म्हणाले मेडिकल क्षेत्रामध्ये फार्मसी हे खूप महत्त्वाचे क्षेत्र आहे. बदलत्या मानवी जीवन शैली मध्ये मनुष्याला विविध आजार होत आहेत. यामुळे औषध निर्मिती व सवशोधण करणे काळाची गरज बनत आहे.

डी फार्मसी व बी फार्मसी उत्तीर्ण झाल्या नंतर विद्यार्थी विविध फारमासुटिकल कंपनीनं मध्ये नोकरी मिळवतात. त्या बरोबरच ते पुढील शिक्षण ही घेऊ शकतात जसे बी फार्मसी , एम फार्मसी. या कार्यक्रमासाठी
संस्थेचे अध्यक्ष मा. उदय काका देशपांडे, सचिव श्री विलास भोसले व खजिनदार श्री सोमनाथ माने, प्राचार्य. सुजित देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. संयोजन ट्रेनिंग आणि प्लेसमेट अधिकारी प्रा. मेघराज पाटील तसेच प्रा. प्रियंका पारेकर, प्रा. नम्रता मोरे प्रा. वैष्णवी डोईफोडे, श्री प्रवीण सुर्वे व श्री महेश खबाले यांचे सहकार्य मिळाले.

चीनमध्ये नव्या व्हायरसमुळे विध्वंस; स्मशानभूमीत जागा नाही, रुग्णालयांत मोठी गर्दी

चीनमध्ये नव्या व्हायरसमुळे विध्वंस;

स्मशानभूमीत जागा नाही, रुग्णालयांत मोठी गर्दी

https://x.com/AdvBarrryRoux/status/1873718371071734211?t=Hcwy9OTnkNwMKMIfwU6SoA&s=19

*👉🅾️🅾️👉२०२० मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) वेगाने पसरत आहे, ज्यामुळे रुग्णालयांमध्ये खूप गर्दी होत आहे आणि चीनमधील स्मशानभूमीत जागा नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.या व्हायरसने चीनमध्ये कोरोनासारखा कहर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वृत्तानुसार, HMPV मुळे मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडत आहेत.*

*👉🅾️🅾️👉चीनी सोशल मीडियावर दावा केला जात आहे की HMPV, इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि COVID-19 सारखे अनेक व्हायरस एकाच वेळी रुग्णालयात पसरत आहेत. चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे आणि लोक चिंतेत आहे की, चीन सरकार या नवीन व्हायरसबद्दल योग्य माहिती देत नाही. एनडीटीव्ही आणि रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनमधील आरोग्य अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.*

*👉🔴🔴👉HMPV व्हायरस म्हणजे काय?*

*ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. 2001 मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो आणि हिवाळ्यामध्ये हे सर्वात सामान्य आहे.*

*👉🟪🟪👉HMPV चे मुख्य सॉफ्ट टार्गेट मुलं आणि वृद्ध आहेत. याच लोकांना कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक फटका बसला होता. व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना मास्क घालण्याचा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा आणि वारंवार हात स्वच्छ करण्याचा सल्ला दिला आहे.*

*👉🅾️🅾️👉चीनच्या अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, हिवाळ्यात श्वासोच्छवासाच्या आजारांची प्रकरणं देशात झपाट्याने वाढू शकतात. चीनच्या रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं की, ते या आजारावर लक्ष ठेवत आहेत. चीनी सरकार व्हायरसशी संबंधित वास्तविक डेटा आणि परिस्थिती पूर्णपणे उघड करत नसल्याने चिंता वाढली आहे.*

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस मोठा उत्साहाने साजरा करण्यात आला.

आज दिनांक 3/1/2025 वार शुक्रवार रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे ,सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य निकिता माने , चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्रिन्सिपल डॉ.सुजित देसाई सर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धेमध्ये सहभागी होऊन सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल माहिती सांगितली . चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे यांनी विद्यार्थी त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच शिक्षिका प्रांजली सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मेघना जगताप यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम घेण्यात आले.

मंत्रालयात सर्वसामान्यांच्या प्रवेशावर कठोर निर्बंध!

मुंबई :- मंत्रालयात प्रवेशासाठीची सुरक्षाव्यवस्था अधिक कडेकोट करण्यात येणार असून अभ्यागतांच्या प्रवेशावर कठोर निर्बंध येणार आहेत. अभ्यागतांना ज्या खात्यामध्ये काम आहे, त्याच मजल्यावर प्रवेश मिळणार असून अन्य मजल्यांवर जाता येणार नाही. मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्थेतील बदलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. मंत्रालयात येणारे नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुलभपणे प्रवेश मिळावा आणि सुरक्षा भक्कम राहावी, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यात यावा, असे निर्देश श्री. फडणवीस यांनी दिले.*

*👉🔴🔴👉महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रालयाच्या सुरक्षेचा नव्याने आढावा घेतला जात असून फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. त्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. इक्बालसिंग चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती आदी उपस्थित होते. राज्यभरातून कामे घेऊन नागरिक मंत्रालयात येतात आणि खूप गर्दी होते. या वाढत्या गर्दीचा सुरक्षा व्यवस्थेवर ताण पडतो. त्यामुळे अभ्यागतांसह कर्मचाऱ्यांचा प्रवेश सुलभ होऊन सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात येणार आहे.*

*👉🛑🛑👉अत्याधुनिक यंत्रणा*

*मंत्रालयात प्रवेश करण्यासाठीचा पास देताना अभ्यागताचे छायाचित्र काढले जाते. आता इमारतीच्या प्रवेशद्वारातही सुरक्षा अडथळे लावण्यात आले असून प्रत्येक व्यक्ती कॅमेरामध्ये दिसेल आणि त्याची ओळख, छायाचित्र व नाव बाजूला असलेल्या मॉनिटरवर येईल व ओळख पटल्यावरच त्याला प्रवेश खुला होईल अशी व्यवस्था प्रत्येक मजल्यावर उभारण्यात येणार असून ज्या मजल्यावर नागरिकांचे काम आहे, त्याला त्या खात्यासाठीच पास दिला जाईल व अन्य मजल्यांवर जाता येणार नाही, अशी यंत्रणा उभारण्यात येत आहे, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.*

*👉🛑🛑👉मुख्यमंत्र्यांच्या सूचना*

*🔺🔺नागरिकांच्या मंत्रालय प्रवेश ते बाहेर पडण्याची व्यवस्था यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा.*

*🔺🔺मंत्रालयातून विधान भवनात कार्यालयीन कामकाजासाठी अधिकारी व कर्मचारी ये-जा करतात. अधिवेशन काळात ही वर्दळ वाढते. या सर्व ठिकाणी कर्मचाऱ्यांना सुरक्षा पास द्यावेत.*

*🔺🔺मंत्रालय ते विधान भवन भुयारी मार्गाचे काम सुरू असून कर्मचाऱ्यांना तेथून प्रवेशाची सोय उपलब्ध करावी.*

*👉🟥🛑🟥👉मंत्रालयातून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे काही प्रकार झाल्यावर काही वर्षांपूर्वी दुसऱ्या मजल्यावर दोरखंडाची जाळी लावण्यात आली. तरीही त्यात उड्या मारण्याचे प्रसंग घडल्याने सहाव्या मजल्यासह काही मजल्यांवर लोखंडी जाळी बसविण्याचे काम सुरू झाले. हे काम तातडीने पूर्ण करावे. हे काम झाल्यावर दोरखंडाची जाळी काढून टाकण्यात यावी.*

*👉🅾️🛑🅾️👉मंत्रालय प्रवेशद्वारावर सामानाची चोख तपासणी करण्यात यावी. कुठलीही आक्षेपार्ह वस्तू मंत्रालयात येणार नाही, याची दक्षता घ्यावी.*

पुणे जिल्हाधिकारी पदी जितेंद्र डूडी रुजू

पुणे, दि. २: पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला.

जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी यापूर्वी सन २०१९ मध्ये सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा, नंदूरबार, सन २०१९ ते २०२० या कालावधीत सहायक जिल्हाधिकारी मंचर तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव, पुणे तर सांगली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सातारा जिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे.

श्री. डूडी यांच्या सेवा कालावधीत पोषण अभियानातंर्गत ५ व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात अधिकाधिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यात तृतीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय मतदान दिन २०२४ च्यावेळी पुणे विभागात उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून प्रथम पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
0000

महाराष्ट्र आता थांबणार नाही असा संकल्प करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

मुंबई:-आज नवीन वर्षाची अर्थात २०२५ या नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. २०२४ या वर्षाला निरोप देत २०२५ या नव्या वर्षाची सुरुवात जगभरात जल्लोषात झाली आहे. देशभरातील विविध ठिकाणी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. याबरोबरच अनेकांनी या नव्या वर्षांत वेगवेगळे संकल्पही केले आहेत. राजकीय नेतेमंडळींकडून देखील २०२५ या नव्या वर्षासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. तसेच नववर्षाच्या शुभेच्छांसाठी सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज्यातील जनतेला नव्या वर्षासाठी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.*

*👉🔴🔴👉मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देताना ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असा संकल्प केला. तसेच राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि प्रत्येक नागरिकाच्या योगदानाने महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शांतता-सलोखा वाढवत, पर्यावरण जपत आणि विकासासोबत आधुनिकीकरणाच्या दिशेने महाराष्ट्राला अग्रगण्य बनवण्याचे उद्दिष्ट ठेऊन सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या या संकल्पांची नववर्षात पूर्तता होईल, अशी मनोकामना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच २०२५ मध्ये पाऊल ठेवताना एकता आणि दृढनिश्चयाने नवीन संधींचे स्वागत करूया. हे वर्ष सर्वांना उत्तम आरोग्य, आनंद आणि भरभराटीचे जावो. २०२५ या नव्या वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक आणि आरोग्यदायी शुभेच्छा, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.*

*👉🅾️🅾️👉राज्यातील तमाम बंधू-भगिनींनो,गोड आणि कटू अशा अनेक संमिश्र क्षणांनी एकवटलेले २०२४ हे वर्ष आता सरलं, तर दुसरीकडे नव्याने उभारी घेण्याची उत्तुंग स्वप्नं दाखवत येणारे #२०२५ साल आपल्याला खुणावत आहे. आपण सर्वजण येणाऱ्या नवीन वर्षात नवी स्वप्नं, नवी आशा, नव्या आकांक्षा, नवे संकल्प, नवी दिशा उरात बाळगून आहोत. परंतु, नववर्षाचे स्वागत करताना आपल्या उत्साहाचा, कृतीचा, आचाराचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणालाही त्रास होणार नाही याची एक सुज्ञ व सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे. पोलीस तसेच इतर सरकारी यंत्रणा त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारे बजावतील यात मला तीळमात्र शंका नाही. आपण सर्वांनी सुद्धा त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. चला तर मग, आपण सर्वजण मिळून सरणाऱ्या २०२४ सालास निरोप देत येणाऱ्या २०२५ या नववर्षाचे आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करूया, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.*

*👉🔴🔴👉उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अजित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत म्हटलं आहे की, राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, असा विश्वास व्यक्त करतो. नवीन २०२५ वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा देतो. नववर्षाचं स्वागत उत्साहानं मात्र, आरोग्यभान राखत संयमानं करा, असं देखील आवाहन करतो. महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण आतापर्यंत राज्यावर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे. कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचं हे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करूया. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर सुरू असलेली आपली वाटचाल कायम ठेवून महाराष्ट्राला, देशाला विकासाच्या दृष्टिकोनातून आणखी गतिमान करूया, अशा शब्दांत अजित पवारांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.*

error: Content is protected !!