Home Blog Page 330

नमस्कार व नमस्काराचे महत्व

म्हणून पाया पडायची पध्दत आहे.
चागंली पध्दत‌आहे, पण कलियुगात वाईट घडते?

नमस्काराचे महत्व

● *महाभारताचे युद्ध सुरु होते.*
*दररोज कौरवसेनेचे मोठमोठे योद्धे*
*मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे*
*ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून*
*देखील त्यांच्या सेनेची सतत हानी*
*होत होती..*

● *एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर*
*व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन*
*भीष्म पितामह घोषणा करतात की..*

● *”मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन..”*

● *त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या*
*शिबिरात पोहोचताच पांडवांची*
*अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या*
*क्षमते बाबत सर्वांनाच कल्पना होती..*

● *तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल*
*झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या*
*लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले..*

● *”माझ्या सोबत चल..”*

● *द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण*
*पितामहांच्या कक्षात पोहोचले.*
*ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर*
*उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की,*
*आत जाऊन पितामहांना प्रणाम कर..*

● *सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत*
*जाऊन पितामहांना प्रणाम करताच,*
*”अखंड सौभाग्यवती भव” असा*
*आशीर्वाद त्यांनी तिला दिला..*

● *त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की,*
*”वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी*
*काय आलीस..??”*

● *”माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे*
*आले आहे आणि ते बाहेर थांबले*
*आहेत” असे द्रौपदीने सांगताच*
*श्रीकृष्णाला भेटायला पितामह*
*बाहेर आले आणि त्या दोघांनी*
*एकमेकांना प्रणाम केला..*

● *भीष्म पितामह म्हणाले..*
*”माझ्या एका वचनाला दुसऱ्या*
*वचनाने मात देण्याचे काम फक्त*
*श्रीकृष्णच करु शकतात..”*

● *शिबिरात परतताना श्रीकृष्ण*
*द्रौपदीला म्हणाले की, “बघ,*
*तुझ्या फक्त एक वेळ जाऊन*
*पितामहांना नमस्कार करण्यामुळे*
*तुझ्या पतींना जीवनदान मिळाले,*
*हे तुझ्या लक्षात आले का..??*

● *जर तू दररोज नित्यनेमाने पितामह*
*भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य ह्या*
*मान्यवरांना नमस्कार केला असतास*
*आणि दुर्योधन, दु:शासन ह्यांच्या*
*पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू*
*पांडवांना नमस्कार केला असता तर*
*हि युद्धाची वेळच आली नसती..*

● *अशी असते नमस्कार*
*आणि आशीर्वादाची शक्ती..!!*

●● *तात्पर्य..*

● *वर्तमानकाळात आपल्या घरी ज्या*
*समस्या आहेत, त्यांचे मूळ कारण हेच*
*आहे की, कळत नकळत आपल्या*
*हातून वडिलधाऱ्या मंडळीची उपेक्षा*
*केली जाते..*

● *जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या*
*मंडळीना दररोज नमस्कार करुन*
*त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार*
*असतील, तर त्या घराघरात वितंडवाद*
*सहज टाळता येऊ शकतात..*
*असे घर स्वर्ग बनू शकते..*

● *मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे*
*कवच आहे की, ज्याला कुठलेही*
*शस्त्र भेदू शकत नाही..*

● *कारण..*

● *नमस्कारात प्रेम आहे..*
*नमस्कारात विनय आहे..*
*नमस्कारात अनुशासन आहे..*
*नमस्कार आदर शिकवतो..*
*नमस्कारामुळे मनात सुविचार येतात..*
*नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो..*
*नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो..*
*नमस्कारात शीतलता आहे..*
*नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो..*
*नमस्कार आपली संस्कृती आहे..*
*ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे..*

 

इंदापूर नगरीच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा साै . अंकीताताई शहा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक -: रामवर्मा आसबे

*इंदापूर नगरीच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा साै* . *अंकीताताई शहा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*…! 🙏🏻🎂🎂

*शुभेच्छुक -: रामवर्मा आसबे

नमोन्युजनेशन

जेनेरिक औषधांमुळे ३ हजार कोटींची बचत : केंद्रीय मंत्री सदानंद गौडा

संपादकीय,

जेनेरिक औषधांमुळे ३ हजार कोटींची बचत : केंद्रीय मंत्री सदानंद गौडा नवी दिल्ली : सर्वसामान्यांना माफक दरात औषधे उपलब्ध करून देण्याकरिता देशभरात ७ हजार ६४ प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे स्थापन केली आहेत . कोरोना काळात चालू आर्थिक वर्षात या केंद्रांतून ४८४ कोटी रुपयांच्या गुणवत्तापूर्ण जेनेरिक औषधांची विक्री केली . गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत ६० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली . सर्वसामान्य नागरिकांची त्यामुळे ३ हजार कोटींची बचत झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी गुरुवारी केला . २०१ ९ २०२० या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने जनऔषधी केंद्रांसाठी ३५.५१ कोटींचा निधी दिला होता . नागरिकांची २ हजार ६०० कोटींची बचत झाली . सरकारने खर्च केलेल्या दर एका रुपयामागे नागरिकांचे प्रत्येकी ७४ रुपये वाचले , असेही गौडा म्हणाले .

प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान के राष्ट्रीय महामंत्री मा.डॉक्टर मुकेश शर्मा जि को जन्म दिन कि बहुत बहुत शुभकामनाये शुभेच्छुक:-रामवर्मा आसबे

प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान के राष्ट्रीय महामंत्री मा.डॉक्टर मुकेश शर्मा जि को जन्म दिन कि बहुत बहुत शुभकामनाये
शुभेच्छुक:-रामवर्मा आसबे

बाभुळगाव ग्रामपंचायत मतदान पोलीस अधिकाऱ्यांच्या व इलेकशन आधिकारी यांच्या सुंदर आशा मार्गदर्शनाने झाले पुर्ण

बाभुळगाव ग्रामपंचायत मतदान पोलीस अधिकाऱ्यांच्या व इलेकशन आधिकारी यांच्या सुंदर आशा मार्गदर्शनाने झाले पुर्ण
बाभुळगाव
प्रभाग क्रमांक 1
मतदान पुरुष:-418
महिला:-335
एकुण=679
टक्केवारी=90.77
प्रभाग क्रमांक 2
महिला:-244
पुरुष:-263
एकुण=507
टक्केवारी=85.32
प्रभाग क्रमांक 3
महिला:-280
पुरुष:-321
एकुण=601
टक्केवारी=85.86
एकुण सरासरि

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

मकर संक्रमणाच्या या मंगलमय पर्वावर सूर्यनारायणाची प्रभा, तिळगुळाची स्निग्धता व परस्परातील स्नेहाचा गोडवा आपल्या जीवनात साकारण्याचा संकल्प करूया…

सर्वांना सुख, समृद्धी व आरोग्य लाभो हीच सूर्यनारायणाच्या चरणी प्रार्थना !

नमोन्युजनेशन :- रामवर्मा  आसबे

प्रतीक्षा संपली कोरोना लस सर्वत्र भारतभर पोहचली

🈹🈹 *नमोन्युजनेशन *🈹🈹
*👉👉प्रतीक्षा संपली; 👉लस घेऊन विमाने झेपावली*

*नवी दिल्ली :-काेराेनाच्या लसीसाठी अखेर प्रतीक्षा संपली आहे. आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ‘काेविशिल्ड’ लसीचे ५४ लाखांहून अधिक डोस पुण्यातून १३ राज्यांमध्ये पाेहाेचले आहेत, तर १४ जानेवारीपर्यंत सर्व १.६५ काेटी डोस इतर राज्यांमध्ये पाेहाेचविले जाणार आहेत.देशभरात १६ जानेवारीला काेराेना लसीकरणाचा शुभारंभ हाेणार असून, पुणे विमानतळ लस वाहतुकीचे हब बनले आहे.सीरम इन्स्टिट्यूटच्या लसीचे वितरण मंगळवारपासून सुरू झाले. केंद्र सरकारने ‘सीरम’ला १ काेटी १० लाख लसींची ऑर्डर दिली आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ४.५ काेटी लसींची ऑर्डर देण्यात येणार आहे.*

*भारत बायोटेककडून ५५ लाख लसी विकत घेण्यात येणार आहेत. त्यापैकी १६.५ लाख लसी मोफत देण्यात येणार आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, चेन्नई, काेलकाता, गुवाहाटी, हैदराबाद, शिलाँग, अहमदाबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा, बंगळुरू, लखनाै आणि चंदीगड या १३ शहरांमध्ये लस पाठविण्यात आली आहे.*

*👉१६ जानेवारीपासून लसीकरण आणखी ४ लसी हाेणार उपलब्ध*

*काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन या दाेन लसींनंतर भारतात लवकरच आणखी ४ कंपन्या काेराेना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज करणार आहेत. त्यामुळे भारतात एकूण ६ लसींचा पर्याय उपलब्ध हाेणार असल्याची माहिती आराेग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.*

*👉झायडस-कॅडीला, स्पुटनिक व्ही, बायाेलाॅजिकल इव्हांस आणि जिनाेव्हा या कंपन्या भारतात लस आणणार आहेत. इतर काेणत्याही देशांमध्ये एवढे पर्याय उपलब्ध नाहीत, असे भूषण म्हणाले.*

*👉लसीच्या दाेन मात्रांमध्ये २८ दिवसांचे अंतर राहणार आहे. पहिली मात्रा दिल्यानंतर १४ दिवसांनी प्रतिकार शक्ती तयार हाेण्यास सुरुवात हाेते. त्यामुळे लस घेतल्यानंतर लगेचच आपण सुरक्षित झालाे, असे मानू नये.*

*👉काेलकात्यात १० लाख*

*सर्वाधिक सुमारे १० लाख लसी काेलकातामध्ये पाठविण्यात आल्या आहेत. त्यानंतर दिल्ली, बंगळुरू आणि पाटणा या शहरांमध्ये लसी पाठविण्यात आल्या आहेत. स्पाइसजेट, इंडिगाे आणि गाे एअरच्या विमानांमधून लसीची वाहतूक करण्यात येत आहे.*

*केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला काल भीषण अपघात झाला. त्यात त्यांच्या पत्नी सौ. विजया नाईक यांचे निधन झाले.

*केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला काल भीषण अपघात झाला. त्यात त्यांच्या पत्नी सौ. विजया नाईक यांचे निधन झाले.*
त्याच वाहनात जे अन्य होते त्यात *संघ प्रचारक डॉ. दीपक घुमे यांचेही दुर्दैवी निधन झाले.*

आयुर्वेद व्यासपीठ, ओक वनौषधी संशोधन संस्था, आरोग्य भारती या संघटनांमध्ये त्यांनी प्रदीर्घ , पूर्णवेळ काम केले . ओक वनौषधी संशोधन केंद्रामार्फत दुर्गम , क्षेत्रामधे विज्ञान मंडळे, बचत गट तसेच तेथील ‘राजमाची ‘मधाचे ब्रँडींग करुन विक्रीची व्यवस्था उभी करण्यामध्ये त्यांचे योगदान खूपच मोठे होते .

जनजाती क्षेत्रापासून ते उच्चभ्रू शहरी वर्तुळापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचा सहज वावर आणि थेट संपर्क होता . प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख दुःखामध्ये व अडी अडचणीच्या प्रसंगांमधे ठामपणे ते सोबत उभे राहून समस्यांचे निराकरण करत असत.

प्रवासाचा वादळी वेग, अध्यात्मिक प्रवृत्ती, तहान भूक इ शरीराचे भान हरपून कामामधे अखंड झोकून देण्याचा स्वभाव,प्रश्न सोडवण्याची विशिष्ट आणि आग्रही पद्धती, सर्वस्पर्शी सपर्क ही त्यांची गुणसंपदा सर्वांसाठी प्रेरणादायी राहिल .

खूप मेहनती, परिश्रमी, सतत कार्यमग्न.. ओक वनौषधी म्हणजे राजमाची मध हे समीकरण त्यांच्या मुळेच तयार झाले….

 

error: Content is protected !!