Home Blog Page 311

राज्याच्या ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या आहे,👉👉त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा विचार करावा👉 उच्च न्यायालय*

*मुंबई :-पुणे तसेच राज्यातील इतर ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे, त्या ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊनचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयात राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन सुनावणी सुरु आहे. यावेळी हा सल्ला देत मुंबईचा आदर्श राज्यातील इतर महापालिकांनीही घ्यायलाच हवा, असे मतही न्यायालयाने नोंदवले आहे.*

*👉राज्यात सध्या लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती बरी आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने निर्बंध अधिक कठोर करत थेट लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा. पुण्यासारख्या ठिकाणी जिथे कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहेत तिथे संपूर्ण लॉकडाऊनचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा, असे उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले.*

*👉महाधिवक्त्यांनी राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या परिस्थितीबाबत माहिती देताना सांगितले की, सध्या राज्याला दिवसाला 51 हजार रेमडेसिवीरची गरज आहे. पण केंद्र सरकारकडून केवळ 35 हजार डोस उपलब्ध होत आहेत. आम्ही केंद्र सरकारची तक्रार करत नाही, पण आमची परिस्थिती सांगत आहोत. यानंतर पुण्याला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रेमडेसिवीरचा पुरवठा का होत आहे? सध्या रेमडेसिवीरचा पुरवठा करणाऱ्या किती कंपन्यांची यादी नोडल अधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे? असे सवाल उच्च न्यायालयाने विचारले. यावर पुण्यात मुंबईपेक्षा सुरुवातीपासूनच अधिक केसेस असल्याचे उत्तर महाधिवक्त्यांनी दिली.*

*👉दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कोरोना परिस्थिती हाताळण्यावरुन मुंबई महापालिकेचे कौतुक केल्याचा उल्लेखही उच्च न्यायालयाने केला. मुंबईतील ऑक्सिजन पुरवठ्याचा दाखला सर्वोच्च न्यायालयानेही दिला ही कौतुकास्पद बाब आहे. पण जर देशासाठी मुंबईचा आदर्श असेल राज्यातील इतर महापालिकांनाही तो घ्यायलाच हवा, असेही उच्च न्यायालयाने नमूद केले. तसेच राज्यात ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा जीव जाणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्लाही उच्च न्यायालयाने दिला.*

राज्यात १ लाख ४७ हजार मुलं कोरोना पॉझिटिव्ह👉👉 ७५ हजार मुलं केवळ २ महिन्यात संक्रमित झाली*

*मुंबई, ०६ मे :-महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. व्हायरसने आता बालकांनाही विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाच्या आकड्यांनुसार राज्यामधून 1 ते 10 वर्षांच्या 1 लाख 47 हजार 420 मुले आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेले आहेत. मुलांमध्ये संक्रमण पसरण्याचे प्रकरण मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये पाहायला मिळाले.*

*👉आरोग्य विभागानुसार, राज्यात दररोज जवळपास 500 मुले कोरोना संक्रमित आढळत आहेत. राज्यात 11 ते 20 वर्षांचे 3 लाख 33 हजार 926 बालके आणि तरुण आता व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. मुंबईमध्ये बालकांमध्ये संक्रमणाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.👉BMC च्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आले आहे की, गेल्या वर्षी 0 ते 10 वर्षांचे 11,080 मुले कोरोना संक्रमित आढळले आहेत आणि 17 जणांचा मृत्यू झाला आहे. नायर हॉस्पिटलच्या पीडियाट्रिक डिपार्टमेंटच्या हेड डॉ. सुषमा मलिक म्हणाल्या की, पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.5 ते 2 टक्के जास्त आहे. ज्या बालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्यातील अनेकांना निमोनिया होता. BMC कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी बालके मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त बाहेर खेळत आहेत. यामुळे ते जास्त संक्रमित झाले आहेत.*

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा केंद्राला खबरदारीचा इशारा!*

*नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परीस्थिती बिघडत चालली आहे. देशात वैद्यकीय साधनांची कमतरता भासत आहे. दिल्लीत देखील ऑक्सिजनची टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खबरदारीचा इशारा दिला आहे. न्यायालयात आज ऑक्सिजन संकटाबाबत सुनावणी घेण्यात येत आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्राने न्यायालयात म्हटले आहे की, त्यांच्या सर्वेक्षणानुसार सध्या दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा आवश्यक साठा उपलब्ध आहे. ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेन आज 280 मेट्रिक टन ऑक्सिजन आणत आहे. दिल्लीच्या 56 प्रमुख रुग्णालयांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात त्यांच्याकडे पुरेसा साठा आहे.*

*👉तसेच दिल्ली सरकारने 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी केली होती. यावर केंद्राने न्यायालयात भूमिका मांडली. जर दिल्लीला 700 मेट्रिक टन ऑक्सिजन दिलं जात असेल तर इतर राज्यात कमतरता भासेल. दिल्लीच्या 56 प्रमुख रुग्णालयांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात त्यांच्याकडे पुरेसा साठा आहे.*

*👉ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. परंतु तो लोकांपर्यंत पोहोचत नाही, याचा अर्थ दिल्लीतील काही भागात गोंधळ उडाला आहे. त्यामुळे ऑक्सिजन ऑडिट करणे आवश्यक असल्याचे केंद्राने सांगितले. यावर न्यायालयाने सरकारला काही सुचना केल्या. हा विषय अखिल भारतीय पातळीवर पाहण्याची गरज आहे. ऑक्सिजनचे ऑडिट करणे आवश्यक आहे. तिसरी लाट येण्याची चर्चा आहे, अशा परिस्थितीत सरकारने दिल्लीत ऑक्सिजनची कमतरता नसल्याचे सुनिश्चित केले पाहिजे.*

*👉इतर राज्यांकडे देखील लक्ष दिले पाहिजे*

*ऑक्सिजनचे योग्य ऑडिट आणि वितरणासाठी योग्य चौकट असणे आवश्यक आहे. त्यामुळे इतर राज्यांकडे देखील लक्ष दिले पाहिजे, असे सरकारला न्यायालयाने सुचविले.*

*👉न्यायमूर्ती शाह म्हणाले की, ‘आपण आता दिल्लीकडे पाहत आहोत. पण ग्रामीण भागाचे काय, जेथे बहुतेक लोक समस्येला तोंड देत आहेत. तुम्हाला राष्ट्रीय धोरण बनवण्याची गरज आहे. तुम्ही आजची परिस्थिती पाहत आहात. पण आम्ही भविष्याकडे पाहत आहोत, त्यासाठी तुमची काय योजना आहे?’ न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी न्यायालयात काही प्रश्न उपस्थित केले. आपण तंत्रज्ञानाद्वारे उपचार करता येणाऱ्या डॉक्टरांची टीम तयार करू शकतो का? दुसरी लाट हाताळण्यासाठी आपल्याकडे मनुष्यबळ नाही. तिसर्‍या लाटेसाठीही मनुष्यबळ नाही. आपण त्यात फ्रेश ग्रॅज्युएट डॉक्टर आणि नर्स वापरु शकतो का? तिसर्‍या लाटेत डॉक्टर आणि परिचारिका थकलेल्या असतील. तेव्हा काय करणार? काही बॅकअप तयार करावा लागेल.*

*👉दिल्लीत काही मोठी रुग्णालये वगळता अन्य रुग्णालयांमध्ये सिलिंडर आहेत. तेथे फक्त १२ तासांचा साठा आहे. अशा परिस्थितीत पुरवठा केला जातो. कोविड संकटात ऑक्सिजन पुरवठा दुप्पट केल्याचे केंद्र सरकारने सांगितले.*

*👉यावर न्यायमूर्ती शाह म्हणाले, ‘तुम्ही जेव्हा हे दावे करीत असता, तेव्हा बरीच मोठी रुग्णालये न्यायालयात अशी विनवणी का करतात की आमच्याकडे केवळ दोन किंवा तीन तासांचे ऑक्सिजन शिल्लक आहे?’ यावर केंद्राने म्हटले आहे की ‘ऑक्सिजन ऑडिट करणे आवश्यक आहे. पुरवठा केला जात आहे. परंतु तो लोकांपर्यंत पोहोचत नसेल. तर याचा अर्थ काही दिल्लीच्या काही भागात काहीतरी गडबड आहे.*

साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर दगडफेक;* मराठा आरक्षण प्रकरणाचे पडसाद

साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर दगडफेक;*
मराठा आरक्षण प्रकरणाचे पडसाद*

*👉सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर दुसऱ्या दिवशी साताऱ्यात मराठा आरक्षण रद्द झाल्याचे पडसाद उमटत आहेत. येथे गृहराज्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गोवऱ्या पेटवत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या कार्यालयांवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे.*

*👉साताऱ्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर गुरुवारी अज्ञात व्यक्तीने गोवऱ्या पेटवत मराठा आरक्षण रद्द झाल्याचा निषेध करत असल्याची घोषणाबाजी केली. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका घटनेमध्ये काही अज्ञातांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या कार्यालयांवर दगडफेक करत तोडफोड केलीय. या घटनांमुळे साताऱ्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.*

*👉मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द झाल्यानंतर सध्याचा राज्यातील लॉकडाऊन उठल्यावर मराठा समाजाचा उद्रेक होईल असा इशारा साताऱ्यातील मराठा क्रांती मोर्चाने राज्य सरकारला बुधवारी आरक्षण रद्द करण्याचा निकाल आला त्या दिवशीच दिला होता. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली होती. या पार्श्वभूमीवर सर्वत्र शांतता असताना आज सकाळी साताऱ्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर अज्ञाताने गोवऱ्या पेटवून दिल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करून काचा फोडल्या. अज्ञातांनी दोन्ही पक्षांच्या कार्यालयाच्या आवारात गोवऱ्या टाकल्या. या घटनेने सातारा शहरात एकच खळबळ उडाली. मराठा आरक्षण रद्द केल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अज्ञातांनी हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा प्रकार करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.*

*👉सातारा शहरातील पोवई नाका परिसरातील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या या घरासमोर आज सकाळी कोणीतरी गोवऱ्या आणून ठेऊन त्या पेटविल्याचे निदर्शनास आले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच व कायम बंदोबस्त असणाऱ्या ठिकाणीच हा प्रकार घडल्याने सातारा शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने या पेटलेल्या गोवऱ्या विझविल्या आणि त्या बंगल्यासमोरुन हटवल्या.*

*👉या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भवनावरही अज्ञात व्यक्तीकडून सकाळी दगडफेक केली. काचांचा आवाज आल्यामुळे भवनातील कार्यकर्ते बाहेर आले. त्यावेळी गेटवरून उडी मारून संबंधित पळून गेल्याचे निदर्शनास आल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शीने सांगितले. तसेच काँग्रेस भवनावरही दगडफेक झाली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. हे हल्ले करणाऱ्या अज्ञातांचा शोध सुरु करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलीस करत आहेत. दुपारपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.*

*👉या प्रकारानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणांची पहाणी केली. अधिक तपासासाठी वरिष्ठ पातळीवरून पोलिसांना सूचना करण्यात आल्यात.*

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने👉👉 आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना*

👉राज्यात ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर झालेल्या बैठकीतही या संदर्भात सूतोवाच झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या असून, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील माध्यमांशी बोलाताना याबाबत विधान केलं आहे.*

*👉राजेश टोपे म्हणाले, “कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता केंद्राने वर्तवलेली आहेच. ती जुलै शेवट, ऑगस्ट, सप्टेंबर या दरम्यान राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याची पूर्व तयारी राज्य शासनााच्यावतीनं केली जात आहे. यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना आहेत की, आपण बेड वाढवण्याकडे लक्ष द्या, केवळ बेडची संख्या वाढवून चालणार नाही. त्याला लागणारं मनुष्यबळ, कुशल मनुष्यबळ, डॉक्टर्स, औषधी, ऑक्सिजन या सगळ्यासंदर्भात स्वतः आपण स्वयंपूर्ण झालो पाहिजेत. यासाठी आपण पीएसए दर्जाचे ऑक्सिजन प्लॅन्ट लावले पाहिजे. ऑक्सिजन जनरेटर आपण मोठ्या पद्धतीने विकत घेतले पाहिजेत. आपण जे काही ग्लोबल एक्स्प्रेशन ऑफ इंट्रेस्ट काढलं होतं, त्या संदर्भातील देखील जे काही प्रस्ताव विविध देशातून आलेले आहेत, त्याबाबत अंति निर्णय त्वरीत घेतला पाहिजे. असे आदेश आरोग्यमंत्री म्हणून मी आताच झालेल्या माझ्या व्हीसीमध्ये दिलेले आहेत.”*

*👉ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता*

*तसेच, “लिक्विड ऑक्सिजन साठवण्यासाठी जे ऑक्सिजन टँक्स आहेत, ते जे काही ऑफर झालेल्या आहेत त्याच्या पीओ लवकर दिल्या गेल्या पाहिजेत. ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरच्याबाबत आमचं जे काही टास्क फोर्स आहे, त्यांनी लवकर त्यांना अप्रुव्हल दिलं पाहिजे.” असं देखील यावेळी टोपेंनी बोलून दाखवलं.*

*राज्यात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढलेली आहे.या रूग्णांवर उपचारासाठी मेडीकल ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे.त्यामुळे राज्यात उत्पादित होणारे आणि इतर राज्यातून प्राप्त होणारे ऑक्सिजन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सुरळीतपणे व त्या-त्या जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे राज्यातील लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा यासाठी पुरवठा बाबतचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादकांना देण्यात येते. अशी माहिती आरोग्यमंत्री टोपेंनी दिली आहे.*

*याचबरोबर आज 6 मे साठी प्रशासनाने उत्पादकांना 1713 टन ऑक्सीजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्र जारी केले आहे. दिनांक 4 मे, 2021 रोजी राज्यात 1720 टन ऑक्सिजनचा पुरवठा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना करण्यात आला. यामध्ये परराज्यातून प्राप्त झालेल्या 257.5 टन ऑक्सिजनचा अंतर्भाव आहे. तसेच, गुजरात येथून 116.5 टन, भिलाई छत्तीसगड येथून 60 टन आणि बेल्लारी कर्नाटका येथून 81 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाव्दारे व शासनाव्दारा या कामी नेमलेल्या नोडल ऑफिसर्स व्दारा राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत. अशी देखील माहिती टोपेंनी दिली असून, रेमडेसिवीरबाबतची राज्यातील आजची स्थिती दर्शवणाऱ्या आकडेवारीचा तक्ता देखील ट्विट केला आहे.*

*👉मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत आदेश –*

*राज्यात करोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्ट महिन्यात येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यापूर्वी आपण प्राणवायूच्या बाबतीत स्वंयपूर्ण झाले पाहिजे. प्रत्येक तालुक्यात प्राणवायूचा प्रकल्प तयार पाहिजे. प्राणवायूसाठी आज जी धावपळ सुरु आहे, ती तेव्हा होता कामा नाही. तिसऱ्या लाटेच्यावेळी प्राणवायू नाही ,अशी सबब कोणालाही सांगता येणार नाही, याची सर्वांना दक्षता घ्यावी ,असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी राज्यातील विभागीय आयुुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.*

*👉👉लसीकरणाची गती मंदावल्यास महाराष्ट्रात करोना तिसरी लाट येईल;👉 तज्ज्ञांचा इशारा*

*महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास राज्यात करोनाची तिसरी लाट येऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांनी बुधावारी महाराष्ट्रातील करोना परिस्थितीसंदर्भात इशारा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने पुरेश्या प्रमाणामध्ये लसी उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वर्षांमधील व्यक्तींचं लसीकरण एक मे पासून सुरु न करता पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केल्यानंतर ही माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या या इशाऱ्यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.*

*👉तिसऱ्या लाटेचे नियोजन गरजेचे*

*कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून या लाटेची तीव्रता कमी करण्यासह आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढू नये यासाठी आत्तापासून उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच पहिली आणि दुसरी लाट हाताळताना आढळेल्या त्रुटी, उणीवा भरून काढण्यावर लक्ष केंद्रित करणेही आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ब्रिटनपासून अनेक देशांमध्ये दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट आली आहे. त्यामुळे राज्यातही तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.*

आमदार निलेश लंके यांचा महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार यांनी बोध घ्यावा. दिपक अण्णा काटे

आमदार निलेश लंके यांचा महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार यांनी बोध घ्यावा.
मा.दिपक अण्णा काटे

पारनेर तालुक्याचे विद्यमान आमदार निलेश भाऊ लंके यांनी उभा केलेल्या कोव्हिड सेंटरला शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष पै. दिपक अण्णा काटे व उद्योजक पप्पु भाऊ जासुद यांनी भेट दिली.यावेळी संघटनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

ना मास्क, ना फेसकव्हर, सॅनेटायजरचा विषयच नाही. अशा स्थितीतही दिवसातील जवळपास २० तास कोव्हिड सेंटरमध्ये थांबून बाधित रूग्णांची ऑक्सिजन लेव्हल,टेंमपरेचर तपासण्यापासून आस्थेवाईकपणे चौकशी करीत अहोरात्र रुग्णसेवाचा वसा घेतलेले पारनेर – नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके हे राज्यभर चर्चेत आले आहेत. मंगळवारी तर त्यांनी चक्क भाळवणीच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरातच मुक्काम केला.

कोरोनाच्या या संकट काळात अनेक राजकिय पुढारी घरात बसून असतानाच ,बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आ. लंके यांनी आपल्या घरादाराकडे पुर्णपणे दुर्लक्ष करत पुर्ण वेळ हजारो रुग्णांना बेड,व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे, इंजेक्शन उपलब्ध करून गरजू रुग्णांपर्यंत पोहचविणे, वृद्ध माता पिता, तरुण बंधु भगिनींच्या प्रत्येक बेडवर जात त्यांची तपासणी करणे, त्यांना मायेचा आधार देणे , कोण जेवले नाही ? कुणाला काही त्रास होतो का? कुणा वृद्ध आजी -आजोबांच्या सोबत नातेवाईक नसल्यास त्यांच्या मुलाचे कर्तव्य पार पाडणे, तरुण बंधु भगिनींचा भाऊ होणे, चिमुकल्यांचा मामा होणे, मायेच्या आधारा बरोबरच रुग्णांना मानसीक आधार देत त्यांच्यात नवीन उर्जा निर्माण करणे या सर्व भूमिका एकाच वेळी पार पाडणारा अष्टपैलु अामदार आयुष्याच्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका पार पाडतोय.

यावेळी बोलताना दिपक काटे म्हणाले पारनेर चे विद्यमान आमदार लोकनेते निलेश भाऊ लंके यांनी समाजसेवेचा वारसा जपत तब्बल ११०० चे बेडचे कोव्हिड सेंटर उभारुन महाराष्ट्रातील सर्व मंत्री आमदार खासदार यांना लाजवेल असे काम करुन दाखवले आहे. एव्हडेच नाही तर स्वतः लंके साहेब दिवसातून तब्बल २० तास तेथे उपस्थित राहून लोकांना धीर देण्याच काम करत आहेत.त्यांच्या कार्याचे करावे तेव्हढे कौतुक थोडेच आहे.अश्याच प्रकारे जर महाराष्ट्रातील सर्व अजी-माजी मंञी व अाजी-माजी अामदारांनी जर काम केल्यास एका वेळेस जरी महाराष्ट्रावर १० जरी रोगांनी आक्रमण केले तरी आपण त्या रोगांशी लढू शकतो.
परंतु गरज आहे ती फक्त इच्छा शक्ती ची . महाराष्ट्रात असा एकही आमदार नाही की ज्याची आर्थिक स्थिती मजबूत नाही.म्हणजे बाकीकडे फक्त झगा मगा आन मला बघा असेच उपक्रम चालू दिसतोय.आता जनतेने विचार केला पाहिजे की आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी त्यांची कामे करत आहेत का .फक्त इलेक्शन च्या वेळेस आम्हाला तुमच्या सेवेची एक संधी द्या म्हणायचं आणि आता खरी गरज असताना फक्त काळजी घ्या म्हणायचं.इंदापूर तालुक्यात ही एक माजी मंत्री व एक विद्यमान राज्यमंत्री आहेत . जनतेला त्यांच्या कडून खुप अपेक्षा आहेत.त्यांनी श्रेय वाद आणि नुसते उद्घाटने करण्याची घाई करण्यापेक्षा लोकांना सुविधा कश्या उपलब्ध होतील यावर लक्ष द्यावे हीच गोर-गरीब निराधार जनतेची अपेक्षा अाहे.

error: Content is protected !!