Home Blog Page 308

डॉक्टर राजेश देशमुख जिल्हा अधिकारी पुणे यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

डॉक्टर राजेश देशमुख
जिल्हा अधिकारी पुणे
यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

आपल्या हातून झालेल्या अनेक गौरवशाली कार्याबद्दल तसेच कोरोना काळामध्ये आपण दिलेल्या विशेष योगदानाबद्दल आपले आमच्या संपूर्ण
नमो न्यूज नेशन ग्रुप तर्फे विशेष अभिनंदन करतो आहोत.

ईश्वर आपणास यश,किर्ती,दिर्घायुष्य प्रदान करो
हरी ओम्
🕉🕉🕉💐

पुणे जिल्हा अधिकारी डॉ राजेश देशमुख सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पुणे जिल्हा अधिकारी डॉ राजेश देशमुख सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जगावरति आलेल्या महामारि मधुन आपले जिवन सुखि आनंदी व निरोगि राहो याच शुभेच्छा

शुभेच्छुक:- रामवर्मा आसबे

नमोन्यूजनेशन

पत्रकार दिपक खिलारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पत्रकार दिपक खिलारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोरोना सारख्या महामारि  पासुन तुम्ही सुखी आनंदी समाधानि व निरोगी राहो हिच एक छोटिशि शुभेच्छा

शुभेच्छुक :- रामवर्मा आसबे

नमोन्यूजनेशन

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन रुग्णालयांनी बालकांसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा- सुविधा निर्माण कराव्यात* – विभागीय आयुक्त सौरभ राव

*कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन रुग्णालयांनी बालकांसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा- सुविधा निर्माण कराव्यात*

विभागीय आयुक्त सौरभ राव*

◆ *लहान मुले कोरोनाने बाधित झाल्यास त्यांच्यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र केंद्र तयार करण्याबाबत विचार करावा*

◆ *कोविड नंतर उद्भवणाऱ्या आजरा बाबतही तयारी आवश्यक*
◆ *कोविड लसीकरणावर अधिकाधिक भर*
◆ *सर्व प्रकारच्या विशेषज्ञ डॉक्टरांनी कोरोना काळात सेवा देण्याचे आवाहन*

◆ *सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरच्या वापराबाबत पालकांनी बालकांमध्ये जागृती करावी*

◆ *कोरोनामुळे निर्माण झालेला ताण तणाव व भीती दूर करण्यासाठी मनसोपचार तज्ञ, स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे*

पुणे,दि.10: कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना करताना वैद्यकीय तज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संसर्ग आढळून येण्याची शक्यता गृहीत धरुन जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांनी लहान बालकांसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा- सुविधा गतीने निर्माण कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केल्या.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त संतोष पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ.अर्चना पाटील, आरोग्य विभागाचे सल्लागार तथा टास्क फोर्सचे डॉ. सुभाष साळुंके, डॉ.डी. बी.कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ससून रुग्णालयाच्या कोरोना चाचणी विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, पुणे विभागात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये बालके बाधित झाल्यास त्यांच्यावर योग्य उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णालयांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना निर्माण करणे आवश्यक आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पॅरा मेडिकल स्टाफ ने आपले कर्तव्य खूप चांगल्या पद्धतीने बजावले आहे. या पुढे देखील सर्व प्रकारच्या विशेषज्ञ डॉक्टरांनी कोरोना काळात सेवा द्यावी, असे आवाहन श्री. राव यांनी केले.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, कोविड आजाराबरोबरच कोविड पश्चात उद्भवणाऱ्या आजारामध्ये देखील उपचार सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य आजाराबाबतही दक्ष रहावे, असे आवाहन त्यांनी केले. कोरोना प्रतिबंधासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचा वापर आदी दक्षता मुलांनी घ्यावी, यासाठी पालकांनी बालकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन यावेळी श्री. राव यांनी केले.

ससूनचे कोविड चाचणी विभागाचे डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी ससून मध्ये तयार करण्यात आलेल्या सुविधांबाबत माहिती दिली.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. संजय जोग म्हणाले, बऱ्याचदा कोरोनाच्या रुग्णांना सरसकट रेमडेसीविर चा वापर केला जात आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार पद्धतीचे पालन होणे गरजेचे आहे.

भारती हॉस्पिटल चे डॉ.संजय ललवाणी म्हणाले, तिसऱ्या लाटेची शक्यता पाहून रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड तयार करणे आवश्यक आहे. याबरोबरच बालरोगतज्ञ, नर्स, औषधसाठा तयार ठेवणे गरजेचे आहे. याबरोबरच लहान बालकांसोबत येणाऱ्या मातांसाठी वेगळा कक्ष निर्माण करावा लागेल, असे सांगितले.
युनिसेफ चे प्रतिनिधी प्रवीण पवार यांनी तिसऱ्या लाटेमधील लोकांमधील कोविडचा धोका कमी करण्यासाठी सहभाग्य पध्दतीने जाणीवजागृती कार्यक्रम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
बैठकीत संचालक डॉ.अर्चना पाटील, टास्क फोर्स चे डॉ. सुभाष साळुंके, डॉ. डी. बी.कदम यांनी कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेतील लक्षणे, संभाव्य तिसरी लाट, उपाययोजना, म्युकर मायकोसिस मधील उपचार, आदी बाबतीत माहिती दिली. तसेच ग्रामीण भागातील नागरिक व बालकांना त्याच भागात वैद्यकीय सेवा मिळवून दिल्यास शहरातील रुग्णालयावर ताण येणार नाही असे सांगितले.
बैठकीला जिल्ह्यातील विविध रुग्णालयांचे प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना टाळेबंदीच्या कालावधीत होणारे बालविवाह रोखण्याच्या*

टाळेबंदीच्या कालावधीत होणारे बालविवाह रोखण्याच्या*

*जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना*

पुणे दि. १० : जिल्हयात बालविवाह होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि बालविवाह लक्षात आल्यास त्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.
कोरोना महामारीच्या काळात इतर समस्यासोबत भेडसवणारी महत्त्वपूर्ण समस्या म्हणजे बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या एक वर्षाच्या कालावधीत राज्यातील वेगवेगळया भागात एकूण ५६० बालविवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे. अक्षय तृतीयेच्या मूहूर्तावर होणा-या विवाहात बालविवाह रोखण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडून पत्र प्राप्त झाले आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार बालविवाह बेकायदा ठरतात आणि त्याविरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या माध्यमातून बालविवाह रोखणे व बालहक्कांच्या संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी म्हटले आहे.
पुणे जिल्हयात बालविवाह होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि असे बालविवाह लक्षात आल्यास त्यावर तातडीने आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपल्या जिल्हयातील बालकल्याण समिती, पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या निदर्शनास आणून तात्काळ बालविवाह थांबविण्याची प्रक्रिया करावी असे निर्देश संबंधित यंत्रणेला जिल्हाधिकारी डॉ. देशुमख यांनी दिले आहेत

सोडून चाललेली माणसं

नमोन्यूजनेशन :-रामवर्मा आसबे

*सोडून चाललेली माणसं*

डोंगरा आड गेलेला माणूस परत येतो.
ढगा आड गेलेला माणूस परत येत नाही.

का कोणास ठाऊक माणसं न सांगता भराभर सोडून चाललीत एकमेकांना .. कित्येक स्वप्न तशीच सोडून. ढगाआड !!

😢😢

माणूस गेल्यानंतर माणसं हळहळ करतात. पण हयात असताना हीच माणसं एकमेकांना छळतात.

सत्ता, संपत्ती, अहंकार, ईर्ष्या, स्पर्धा सगळं किती क्षणिक आहे याचा इतका अनुभव यापूर्वी कधी आला नसेल.

आपले प्राधान्यक्रम चुकले आहेत. एकमेकांत स्पर्धा करता करता जगण्याशी स्पर्धा झाली.

नको त्या गोष्टीना नको तितकं महत्व देणारी,
किरकोळ अहंकारासाठी एकमेकांना अगदी बोलणं सोडून देणारी माणसंच आहेत.

माणसाचा क्षणाचा भरवसा राहिला नाही.
फुलपाखरा सारखं क्षणभंगुर जगणं झालंय.
त्यामुळे माणूस माणसात असेपर्यंतच माणसांनी माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे.

मी का माघार घेऊ ?
मी का फोन करू ?
मी का कमीपणा घेऊ ?
हे सगळं सोडून आधार, धीर, आनंद दिला-घेतला पाहिजे.

माणूस गेल्यानंतर आपण त्याचं कितीही कौतुक केलं, स्टेटस ठेवलं, रडलो तरीही तो ते कधीच पाहू शकत नाही की त्याला कोणी सांगू ही शकत नाही…….

*मित्रांनो, जिवंत पणी एकमेकांना प्रेम द्या,आधार द्या,मदत दया,दिलासा द्या.. नात्याला महत्व द्या.*…

गेल्यावर हळहळ करून उपयोग नाही

प्रल्हाद साठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक:-रामवर्मा आसबे

प्रल्हाद साठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक

कोरोना सारख्या जागतिक संकटातून आपण सुखि आनंदी निरोगी संपन्न राहो हिच एक शुभेच्छा

शुभेच्छुक:-रामवर्मा आसबे नमोन्यूजनेशन

प्रल्हाद साठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक:-रामवर्मा आसबे

प्रल्हाद साठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक

कोरोना सारख्या जागतिक संकटातून आपण सुखि आनंदी निरोगी संपन्न राहो हिच एक शुभेच्छा

शुभेच्छुक:-रामवर्मा आसबे नमोन्यूजनेशन

श्रीमंत ढोले सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :-शुभेच्छुक रामवर्मा आसबे

श्रीमंत ढोले सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जगामध्ये सर्वत्र थैमान मांडलेल्या कोरोना सारख्या माहाभयंकर संकटातून आपण निरोगी व सुखी आनंदी प्रसन्न राहो हिच एक छोटिशि शुभेच्छा:-शुभेच्छुक रामवर्मा आसबे

नमोन्यूजनेशन

श्रीमंत ढोले सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :-शुभेच्छुक रामवर्मा आसबे

श्रीमंत ढोले सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जगामध्ये सर्वत्र थैमान मांडलेल्या कोरोना सारख्या माहाभयंकर संकटातून आपण निरोगी व सुखी आनंदी प्रसन्न राहो हिच एक छोटिशि शुभेच्छा:-शुभेच्छुक रामवर्मा आसबे

नमोन्यूजनेशन

error: Content is protected !!