Home आध्यात्मिक सोडून चाललेली माणसं

सोडून चाललेली माणसं

नमोन्यूजनेशन :-रामवर्मा आसबे

*सोडून चाललेली माणसं*

डोंगरा आड गेलेला माणूस परत येतो.
ढगा आड गेलेला माणूस परत येत नाही.

का कोणास ठाऊक माणसं न सांगता भराभर सोडून चाललीत एकमेकांना .. कित्येक स्वप्न तशीच सोडून. ढगाआड !!

😢😢

माणूस गेल्यानंतर माणसं हळहळ करतात. पण हयात असताना हीच माणसं एकमेकांना छळतात.

सत्ता, संपत्ती, अहंकार, ईर्ष्या, स्पर्धा सगळं किती क्षणिक आहे याचा इतका अनुभव यापूर्वी कधी आला नसेल.

आपले प्राधान्यक्रम चुकले आहेत. एकमेकांत स्पर्धा करता करता जगण्याशी स्पर्धा झाली.

नको त्या गोष्टीना नको तितकं महत्व देणारी,
किरकोळ अहंकारासाठी एकमेकांना अगदी बोलणं सोडून देणारी माणसंच आहेत.

माणसाचा क्षणाचा भरवसा राहिला नाही.
फुलपाखरा सारखं क्षणभंगुर जगणं झालंय.
त्यामुळे माणूस माणसात असेपर्यंतच माणसांनी माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे.

मी का माघार घेऊ ?
मी का फोन करू ?
मी का कमीपणा घेऊ ?
हे सगळं सोडून आधार, धीर, आनंद दिला-घेतला पाहिजे.

माणूस गेल्यानंतर आपण त्याचं कितीही कौतुक केलं, स्टेटस ठेवलं, रडलो तरीही तो ते कधीच पाहू शकत नाही की त्याला कोणी सांगू ही शकत नाही…….

*मित्रांनो, जिवंत पणी एकमेकांना प्रेम द्या,आधार द्या,मदत दया,दिलासा द्या.. नात्याला महत्व द्या.*…

गेल्यावर हळहळ करून उपयोग नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!