Home Blog Page 301

कोरोनामुळे ज्या मुलांच्या पालकांचं निधन झालं, त्यांच्यासाठी मोदी सरकारची नवी योजना

नमोन्यूजनेशन:- रामवर्मा आसबे

कोरोनामुळे ज्या मुलांच्या पालकांचं निधन झालं, त्यांच्यासाठी सरकारची नवी योजना

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) –  ज्या मुलांचे पालक म्हणजेच आई-वडील अशा दोघांचंही कोरोनामुळे निधन झालं आहे, अशा मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘PM-CARES for Children’ ही योजना जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुलांच्या पालकांचं कोरोनामुळे निधन झालं आहे, अशा मुलांना वयाची 18 वर्षं पूर्ण केल्यानंतर दरमहा स्टायपेंड (ठरावीक रक्कम) देण्यात येईल. तसंच ही मुलं 23 वर्षांची झाल्यानंतर त्यांना पीएम केअर्समधून 10 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, असं पंतप्रधान कार्यालयानं जाहीर केलं आहे.

तसंच या मुलांना मोफत शिक्षण मिळेल याची खात्री बाळगली जाईल. तर उच्च शिक्षणासाठी या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळावं यासाठी मदत केली जाईल आणि या कर्जारील व्याज पीएम केअर्समधून फेडलं जाईल, असंही पंतप्रधान कार्यालयानं स्पष्ट केलंय.

या मुलांना वयाच्या 18 वर्षापर्यंत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा मिळेल आणि यावरील प्रीमियम पीएम केअर्समधून भरला जाईल, असंही पंतप्रधान कार्यालयानं म्हटलंय.

पीएम केअर्स फंड

कोव्हिड-19 च्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 24 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतर 27 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्राईम मिनिस्टर्स सिटिझन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंड’ची सुरुवात केली. ‘PM केअर्स फंड’ या सुटसुटीत नावानं हा फंड ओळखला जातोय.

“सर्व भारतीयांना मी विनंती आहे की, PM केअर फंडमध्ये देणगी द्या,” असं आवाहन करणारं पंतप्रधान मोदींनी ट्वीटही केलं होतं.

या निधीमुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईसह अशाच तणावाच्या स्थितींशी लढण्यासाठी बळ मिळेल, तसंच निरोगी भारत बनवण्यासाठी हे सर्व महत्त्वाचं असेल, असंही मोदी म्हणाले होते.

मोसमी वारे ३१ मेपर्यंत केरळात

नमोन्यूजनेशन:-

*👉👉मोसमी वारे ३१ मेपर्यंत केरळात?*

*पुणे :-अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेने येत असलेल्या बाष्पामुळे राज्याच्या बहुतांश भागात आठवडाभर हलक्या स्वरूपाच्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातून सध्या वेगाने प्रगती करीत असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्यास सध्या अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.यास चक्रीवादळाने मोसमी वाऱ्यांचे प्रवाह मोकळे केले आणि त्यांना चालना दिली.*

*👉👉हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात १ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.*

*👉पाऊसभान… २५ मे रोजी मोसमी वाऱ्यांनी निम्मा श्रीलंका व्यापला आणि बंगालच्या उपसागरात आणखी प्रगती केली. २७ मे रोजीही मोसमी वाऱ्यांची प्रगती सुरू होती. त्यांनी सध्या मालदीव आणि कोमोरीन भागात आणखी प्रगती केली असून, बंगालच्या उपसागरात दक्षिण-पश्चिम भागात ते वेगाने पुढे जात आहेत. ही स्थिती लक्षात घेता ३१ मेपर्यंत पाऊस केरळात दाखल होऊ शकेल.*

निराधार अवस्थेची किंमत* डॉ. ल.म.आसबे (कामधेनु परिवार)

📍 *निराधार अवस्थेची किंमत* 📍
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
माणूस ज्यावेळेस पूर्ण निराधार होतो,
त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याजवळ असलेल्या
पूर्ण क्षमतेचा वापर करायला लागतो.
*अशा वेळी तो _अंतर्मुख_ होतो, _स्वतःचे परीक्षण आणि निरीक्षण_ करतो आणि आपले _अस्तित्व_ राखण्यासाठी प्राणपणाने धडपडू लागतो, खरे म्हटले तर हा त्याचा _पुनर्जन्मच_ असतो.*

🎊 _देहाचा जन्म_ आईच्या पोटी होतो,
🎊 _प्रयत्नाचा जन्म_ गरजेपोटी होतो,
🎊 _अस्तित्वाचा जन्म_ निराधार अवस्थेच्या
पोटी होतो
🎊 _कर्तुत्वाचा जन्म_ जिद्दीच्या पोटी होतो,
🎊 _दयेचा जन्म_ करूणेच्या पोटी होतो आणि
🎊 _परोकाराचा जन्म_ दयेपोटी होतो,
हा सर्व आपल्या
व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रवास असतो.
हा विकास होण्यासाठी पहिली पायरी जर कोणती असेल तर ती _निराधार अवस्था_ आहे.
अडचणीत असताना माणूस
नेहमी आधार शोधत असतो,
_ज्या वेळी कोणताच आधार नसतो त्यावेळी स्वतःच्या शक्तीचा शोध आणि वापर सुरू होतो_.
पोहायला शिकताना ज्या वेळी आपल्याला पहिल्यांदा पाण्यात फेकून देतात, त्यावेळी गटांगळ्या खात असताना आपण मदत शोधत असतो किंवा मदत मागत असतो.
मदत मिळालीच नाही, ( खरेतर पोहायला शिकवणारा ती जाणीवपूर्वक देत नाही ), तर आपल्याला आता मदत मिळत नाही हे लक्षात आल्यावर आपण हातपाय हलवायला सुरुवात करतो आणि हे हात पाय हलवणेच आपल्याला पोहायला शिकवते,
बुडू देत नाही तर तारते.
जीवनातही हेच सूत्र लागू आहे,
पूर्ण निराधार झाल्याशिवाय
आपण हात पाय हलवत नाही. त्यामुळे
आपल्या *जीवनात येणारी निराधार आवस्था ही दैवी देणगी आहे, असे समजले पाहिजे.*
*ज्या माणसाला आपले स्वतःचे ✊🏾कर्तृत्व सिद्ध करायचे आहे, _त्याने स्वतःला नेहमी निराधार समजायला हवे_.*
🎭मदतीचा हात माणसाला दुबळा बनवतो,
🙏🏻शक्यतो जीवनात हात पसरायची वेळ कधीच येऊ नये यासाठी दक्ष असावे,
हेच खरे _स्वा व लं ब न_ आहे.
🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️
सरकारी धोरणे/मदत, सरकारी नियोजन,
हे नेहमी सत्तेत असलेल्या पक्षाचे,
सत्तेत राहण्यासाठी केलेले
एक राजकीय नियोजन असते,
👁️‍🗨️यात लोककल्याणाचा विचार
शुन्य असतो आणि
👁️‍🗨️लोकमताच्या संख्येचा विचार
प्रधान असतो,
👁️‍🗨️मग तो पक्ष कोणताही असो,
याला कोणीही अपवाद नाही.
*_आपण निराधार आहोत_, हेच आपल्या जवळचे सर्वात मोठे भांडवल असावे.*
*_आपण कोणाचीही मदत घेणार नाही_, हीच आपली शेवटपर्यंत शैक्षणिक पात्रता आणि योग्यता असावी.*
*_आपला स्वाभिमान_,*
_हीच आपली इज्जत असावी._
*_आपले कर्तुत्व_,*
_हीच आपली ओळख असावी._
ज्या दिवशी अशी मानसिकता आपली बनेल,
त्यावेळी आपल्याला या जगात
काहीच अशक्य रहात नाही.
✊🏾 *कष्ट करायला लाजू नका,*
✊🏾 *मिळालेल्या ज्ञानाने, पैशाने माजू नका,*
✊🏾 *कुळ, धर्म आणि राष्ट्र*
*याच्यासाठी केलेले कष्ट*
*कधी मोजू नका ,*
_जीवनात आपल्याला काहीच कमी पडणार नाही_
🦩 *निमित्ताचा धनी केला असे प्राणी l*
*तुका म्हणे म्हणोनि व्यर्थ गेला ll*
🦩 *देह हे काळाचे धन कुबेराचे l*
*तेथे मनुष्याचे काय आहे ll*

🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ _*डॉ. आसबे ल.म.*_✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं.9822292713.📞

राज्य विश्वकोष निर्मिती मंडळ सदस्यपदी डॉ. प्रकाश पवार

राज्य विश्वकोष निर्मिती मंडळ सदस्यपदी डॉ. प्रकाश पवार
नमोन्यूजनेशन :- रामवर्मा आसबे

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सदस्यपदी शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रकाश पवार यांची निवड झाली.

डॉ. प्रकाश पवार हे कळंब ( वालचंदनगर ) ता. इंदापूर , जि. पुणे येथील आहेत . ते शिवाजी विद्यापीठात 2017 ते 2019 या काळात ते राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते.

डॉ.प्रकाश पवार हे राज्यशास्त्र विभागाचे अभ्यासक व राजकीय
विश्लेषक म्हणून राज्यात त्यांची ओळख आहे. त्यांच्या दोन पुस्तकांना राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला आहे.

त्यांच्या निवडीचे कळंब-इंदापूर परिसरामध्ये स्वागत होत आहे.
त्यांच्या निवडीचे स्वागत कलंब परिसरात होत आहे.

अस्तित्वाची नोंद* :-डॉ.ल.म.आसबे (कामधेनु परीवार)

🦩 *अस्तित्वाची नोंद* 🦩
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
सज्जन माणसे
राजकारणात पडत नाहीत,
🤦🏽‍♂️ चुकून एखादा या क्षेत्रात गेला तर
त्याला राजकारणी टिकू देत नाहीत आणि
त्याचे समाजकारण चालू देत नाहीत.
_पक्षविरहित आणि राजकारणविरहित सेवा_
_समाजाला अपेक्षित असते._ 🏛️समाजसेवा करणारी माणसे निष्ठेने, प्रामाणिकपणाने हे कार्य करीत असतील, तर त्यांच्या भोवती समाज गोळा होतो.
🏛️समाजाला अशा व्यक्तीकडून
खरोखर अपेक्षा वाटू लागते.
🏛️अशा व्यक्तीच्या भोवती गर्दी जमू लागली,
की राजकारणी लोकांचे पित्त खवळते.
➖ *दु र्ल क्षि त हो णे,*➖
*हे राजकारणातील दारिद्र्य आहे.*
_आपल्यापेक्षा दुसऱ्याला महत्त्व आले, की असे राजकारणी लोक, त्या लोककल्याणकारी व्यक्तिचे, त्याची काहीही चूक नसताना आणि त्याचा कोणताच दोष नसताना शत्रू बनतात._ *हा काळ सज्जन लोकांच्या आणि समाजसेवकांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा आणि कसोटीचा काळ असतो.*
त्यांच्या जीवनातील सत्यवाची परीक्षा
याच काळात होत असते.
⛳विश्व माऊली ज्ञानदेवांना शुद्धिपत्र मागणारे,
⛳ तुकोबारायांची गाथा इंद्रायणीत बुडविणारे,
⛳ नाथ महाराजांच्या अंगावर थुंकणारे
👹👹हेच लोक होते.👹👹
कर्मवीर भाऊराव पाटील यांना
आत्महत्येचा विचार डोक्यात
आणायला कारणीभुत ठररणारे
👹👹हेच लोक होते.👹👹
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई
यांच्या अंगावर शेण टाकणारे,
👹👹हेच लोक होते.👹👹
*याचा अर्थ राजकारण आणि राजकारणी यांच्या तावडीतून कोणाचीही सुटका होत नाही.*
_आपण स्वार्थी बनलो तर_
ते आपल्याला त्यांचा
*अनुयायी किंवा समर्थक* बनवतात.
_आपण निःस्वार्थी वृत्तीने समाजात,_
_समाज सेवा करत राहिलो, तर_
ते आपले *शत्रू* बनतात.
त्यात आपला काहीच दोष नसतो.
✊🏾✊🏾✊🏾✊🏾✊🏾✊🏾✊🏾✊🏾✊🏾✊🏾✊🏾
ज्याचा स्वतःवर विश्वास असतो, तो या महापुरातही ठामपणे , अढळ उभा राहतो.
त्याचेच चरित्र बनते आणि
जगाला ते दिशा देते.
बाकीचे जन्माला येतात आणि
प्रवाहाबरोबर वाहून जातात.
🦯 यांची नोंद फक्त सरकारी दप्तरी
जन्मल्याची असते आणि शेवटी
💀 मेल्याची असते.
आपण कोणत्या वर्गात उभे राहायचे
हे आपल्याच हातात आहे.
⛳⛳⛳
🦩 *जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती l*
*देह कष्टविती परोपकारे ll*
🦩 *भुतांची दया हे भांडवल संती l*
*आपुली ममता नाही देही ll*

_*डॉ. आसबे ल.म.*_

_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
मो.नं.9822292713.

गुळवेल हे वरदान

गुळवेल एक वरदान :- रामवर्मा आसबे  नमोन्यूजनेशन परिवार
==========
दिव्य औषधी ‘गुळवेल’ ही आयुर्वेदातील महत्त्वाची वनस्पती आहे. गुळवेल या वनस्पतीस ‘अमृता’ हे नाव देखील आहे. कारण, ती अमृतासमान गुणकारी आहे. गुळवेल माणसाच्या अगणित व्याधींना दूर करून त्यास दीर्घायुषी करते.

गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्‍या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे.
गुळवेल ही दिसायला मनीप्लांटसारखी परंतु, अतिशय दाट अशी विशाल वेल असते. पाने हृदयाच्या आकाराची असतात. यास पिवळी फुले येतात व लाल रंगाची छोटी छोटी गोल फळे झुबक्यांमध्ये लागतात. याचे कांड रसभरीत असते, ज्याचा औषधीकरिता उपयोग केला जातो.

गुळवेलीची अमृतासमान, रसायनी वा वयस्था (तारुण्याचे रक्षण करून म्हातारपण व रोगाचा नाश करणारी)
======
गुळवेल प्रतिकारशक्ती तंत्रास सशक्त करते :
शरीराचे प्रतिकार शक्ती तंत्र विकृत झाल्यास वारंवार सर्दीपडसे, ताप येणे, अशक्तपणा ही लक्षणे निर्माण होतात. गुळवेलच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. वारंवार आजारी पडणार्‍या व्यक्तींना गुळवेलामुळे फायदा होतो.
शरीरातील प्रतिकार शक्ती तंत्र विकृत झाल्यास अनेक व्याधी निर्माण होतात. विभिन्न एलर्जीजन्य आजार उदा. तसेच . गुळवेल त्रिदोष शामक आहे. गुळवेल रोगप्रतिकार तंत्रास सामान्य करते. अशा व्याधींवर गुळवेल अतिशय उपयोगीआहे, ===============
गुळवेल हे संधीवात व अन्य वात व्याधींवर उपयोगी आहे.
* गुळवेल शक्तिवर्धक व वीर्यवर्धक आहे.
* विभिन्न चर्मरोगावर प्रभावी आहे.
* मूळव्याध, महिलांचे प्रमेहादी विकारावर उपयोगीआहे
* मानसिक व्याधींवर उपयोगी.
* गुळवेल रक्तातील कोलेस्टेरॉल व रक्तशर्कराचे प्रमाण कमी करते.
===================
गुळवेल ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. तिचे खोड अनेक रोगांवरील औषधांत वापरतात.
गुळवेल कुटुपौष्टिक, पित्तसारक, संग्राहक, मूत्रजनन, ज्वरहर व नियतकालिक ज्वरनाशक गुणधर्माची आहे.
ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे.
ती रक्तसुधारक असून, पित्तवृद्धीच्या म्हणजे काविळात गुणकारी आहे व त्वचारोगात उपयोगी आहे.
मधुमेह, वारंवार मूत्रवेग तसेच प्लिहावृद्धीत उपयुक्त आहे.
गुळवेल कुष्ठ व वातरक्त विकारातही उपयुक्त आहे.
गुळवेलीचे सत्त्व व काढा वापरतात. गुळवेलीचा पाण्यातील अर्क ज्वरनाशक म्हणून वापरतात. गुळवेलीचा काढा शक्तिवर्धक असून, दुर्बल करणारे रोग, खंडित ताप आणि अपचनात वापरतात. गुळवेल सत्त्व दीर्घकालीन आम्लअतिसारात वापरतात. आतड्यांचा प्रक्षोम आणि शक्ती क्षीण झालेली असताना तसेच संधिवाताची लक्षणे दूर करण्यासाठी ही औषधी वनस्पती महत्त्वाची मानली जाते.विशेष म्हणजे शरीरातील सर्वच पेशी वाढविण्यासाठी उपयोगी आहे
सौम्य विषमज्वरात आणि जीर्णज्वरात गुळवेलीचा चांगला उपयोग होतो.
गुळवेलीने भूक लागते, अन्नपचन चांगले होते, रोग्याचा फिक्कटपणा कमी होतो, अशक्तपणा कमी होऊन शक्ती वाढते.
===================
*सेवन विधी* :-
गुळवेलचे खोड औषधीकरिता उपयोगात आणतात. करंगळीएवढ्या जाडीचे एक फूट लांब कांड घेऊन त्यास कुटावे. त्यात ५-१० तुळशीची पाने घालावी व २ कप पाण्यात उकळावे. १/४ म्हणजेच १/२ कप होईपर्यंत आटवावे, नंतर गाळून १ चमचा मध घालून प्यावे. दिवसातून एक किंवा दोन वेळा घ्यावे.
बाजारामध्ये गुळवेल सत्व, अमृतारिष्ट इत्यादी नावाने गुळवेल उपलब्ध आहे, परंतु ताजी गुळवेल वनस्पती अधिक प्रभावी आहे.
मोसमी फ्लूसारख्या तापांकरिता ५-७ दिवस व अन्य व्याधींसाठी ३ आठवडे ते १/२ महिने किंवा अधिक काळाकरिता सेवन करावे ================
पचनाचे कार्य अधिक चांगले होते.
कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये ताप येऊन गेल्यानंतर गुळवेळीची भाजी खाणे फायद्याचे ठरते. कावीळ कमी होण्यास मदत होते.
*औषध उपयोगी भाग* – खोड व पाने
मात्रा – खोड व पाने 1-3 चमचे दिवसातून 3-4 वेळा घेऊन वर दूध साखर घ्यावे.
काढा – 4-8 चमचे दिवसातून 2-3 वेळा घेऊन वर पाणी प्यावे.
गुळवेल सत्त्व – पाव ते अर्धा चमचा दिवसातून 3-4 वेळा घेऊन वर दूध साखर घ्यावी.
===============
वृद्ध लोकांनी व हृदयविकाराच्या रुग्णांनी गुळवेल सत्त्व किंवा अमृतारिष्ट घ्यावे.
मुरलेल्या जुन्या तापामध्ये- गुळवेल सत्त्व फार गुणकारी ठरते.
यकृत विकार, कावीळ- गुळवेलसत्त्व अर्धा चमचा अधिक हळद अर्धा चमचा अधिक मध 1 चमचा दिवसातून 3-4 वेळा घेणे
मधुमेहात उपयुक्त – गुळवेलीमुळे मधूमेही रुग्णांची रक्तामधील वाढलेली साखर कमी होते. तसेच मधुमेहामध्ये होणारे मज्जादाह(न्यूरायटिस), अंधत्व (आॅप्टिक न्यूरायटिस) इत्यादी उपद्रव टळण्यास मदत होऊन प्रतिकारशक्ती वाढते.
शुक्रधातूवर्धक – पिल्यास आरोग्य चांगले राहून तारुण्याचे रक्षण होते.

*मानसिक ताणतणाव कमी होतो*- गुळवेलीमुळे मानसिक ताणतणाव कमी होतो. असे आता अधुनिक शास्त्रीय संशोधनाने सिद्ध झाले आहे. गुळवेलीचा परिणाम अ‍ॅड्रिनल या अंत:स्रावी ग्रंथीवर होऊन त्या ग्रंथीच्या अ‍ॅड्रिनॅक्लीज या अंत:स्रावावर नियंत्रण येते. या अंत:स्रावामुळे यकृतातून रक्त प्रवाहात जी शर्करा मिसळली जाते. गुळवेलीमुळे इन्शूलिन या अंत:स्रावाची शर्करेवर चांगली प्रक्रिया होऊन परिणामी रक्तामधील साखरेचे नियंत्रण राखले जाते. त्याचा मधुमेहीला चांगलाच उपयोग होतो.
================
रसायन कार्य – आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यामुळे गुळवेलीचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते. म्हणूनच आपण प्रत्येकाने अगदी तुळशीप्रमाणेच गुळवेलही आपल्या परसात लावून दररोज गुलवेलीची ताजी 4-6 पाने चावून खावीत. ते शक्य नसल्यास गुळवेलसत्त्व खात्रीच्या जुन्या आयुर्वेदिक कंपनीचेच वापरावेत, कारण त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. दररोजच्या गुळवेलीच्या सेवनाने आपले तारुण्यरक्षण होऊन म्हातारपण दूर राहीलच, पण व्याधीचाही प्रतिकार होऊन शरीर निरोगी, सतेज राहील यात शंका नाही.
==================
(गुळवेल) :-
गुळवेलचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म ती ज्वरनाशक, ज्वरध्न आहे. गुळवेल ही डेंग्यू, चिकन गुनिया, फ्लू, स्वाईन फ्लू इत्यादी विभिन्न व्हायरल इन्फेक्शन वर रामबाण औषधी आहे. मागील वर्षी दिल्लीमध्ये डेंग्यू तापाची साथ पसरली होती. तेथील द्वारका या वसाहतीतील उदाहरण उल्लेखनीय आहे. या वसाहतीतील शेकडो कुटुंबांमध्ये डेंग्यूचा प्रकोप झाला. डेंग्यूने फणफणणारा १०४ फॅ.पर्यंतचा ताप, संपूर्ण अंगात विशेषत: सांध्यात भयंकर वेदना होत्या. रक्ताची चाचणी केली असता डेंग्यू असल्याचा रिपोर्ट आला. त्याच वसाहतीमध्ये बाबा रामदेवांचे पतञ्जली योग केंद्र कार्यरत होते. त्यांच्या प्रमुखांनी सर्वांना गुळवेल घेण्याचे सुचविले. तसेही डेंग्यू किंवा तत्सम व्हायरल तापांसाठी आधुनिक वैद्यक शास्त्रात औषध नाही आणि समाधानाची बाब म्हणजे सर्वांना आराम मिळाला. अशा व्हायरल तापाने ग्रस्त अनेक रुग्णांचा केवळ गुळवेलमुळे आजार दूर झाल्याचा अनुभव आहे.
डेंग्यूसारख्या व्हायरल तापामध्ये रुग्णांच्या रक्तातील श्‍वेत रक्तपेशी प्लॅटिलेट्‌स चे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. अशा रुग्णांना प्लाझ्मा रक्तघटक दिल्या जातो. परंतु अशा रुग्णांना गुळवेल दिल्यास त्यांच्या श्‍वेत रक्तपेशीव प्लॅटिलेट्‌स लवकर सामान्य होतात.
===============
कॅन्सर व गुळवेल :-
कॅन्सरवर गुळवेलच्या संशोधनाचे परिणाम आशादायी आहेत. कर्करोगाच्या रुग्णास किमोथेरपी चिकित्सा सुरू असताना त्याचे दुष्परिणाम अतिशय कष्टदायक असतात. मळमळ, उलट्या, तोंडास फोडे येणे, भूक न लागणे, शरीराचा दाह होणे, अशक्तपणा इ. दुष्परिणाम भोगावे लागतात. मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलने केलेल्या संशोधनाद्वारे हे तथ्य समोर आले आहे की, अशा रुग्णांना गुळवेल दिल्यास वरील दुष्परिणाम कमी होतात व रुग्ण लवकर बरा होतो.
*बाजारात मिळणारी गुळवेलीची औषधे* अमृतारिष्ट, गुडुच्यादी चूर्ण, गुडुच्यादी क्वाथ (काढा). गुडुची लोह गुडुची सत्त्व. गुडुची तेल – त्वचारोग व वेदना कमी करण्यासाठी बाहेरून लावावे.आणि सर्व आजारात उपयोगी म्हणजे गिलोय सत्व ,
*पाककृती*
गुळवेलीची भाजी
साहित्य – गुळवेलीची कोवळी पाने, चिरलेला कांदा व लसूण, तेल, तिखट. मीठ इ.
कृती – गुळवेलीची पाने स्वच्छ धुऊन, चिरून घ्यावीत. तेलात कांदा व लसूण लालसर होईपर्यंत भाजून घ्यावी. नंतर त्यामध्ये चिरलेली भाजी, तिखट, मीठ घालून चांगले परतून घ्यावे.
*आपल्या सर्वांच्या चांगल्याआरोग्यासाठी महत्वपुर्ण सादर* 🌹🌹🌹🙏🏻..

लसीकरण प्रमाणपत्र सोशल नेटवर्किंगवर शेअर करु नका, केंद्र सरकारचा इशारा….

नमोन्यूजनेशन:-

लसीकरण प्रमाणपत्र सोशल नेटवर्किंगवर शेअर करु नका,
केंद्र सरकारचा इशारा….

देशभरामध्ये आधीच करोनाचं संकट असताना सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढलं आहे.
लॉकडाउन आणि निर्बंधांमुळे ऑनलाइन व्यवहारांमध्ये वाढ झालीय.
त्यामुळेच सायबर गुन्हेगारीही वाढल्याचं चित्र दिसून येत आहे.
त्यामुळेच एका चुकीच्या पोस्टमुळे सायबर गुन्हेगारांच्या हाती माहिती लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
देशातील नागरिकांनी अधिक स्मार्टपणे ऑनलाइन माध्यमांवर सजग रहावे म्हणून सरकारकडूनही वेळोवेळी सूचना आणि इशारे देण्यात येतात.
सरकारने नुकताच करोना लसीच्या प्रमाणपत्रासंदर्भात असाच एक इशारा दिलाय.
सरकारने करोना लसीकरणानंतर देण्यात येणारं प्रमाणपत्र ऑनलाइन माध्यमांवर,
सोशल नेटवर्किंगवर पोस्ट न करण्याचं आवाहन केलं आहे.
या प्रमाणपत्रावर लस घेणाऱ्या व्यक्तीची बरीच खासगी माहिती असते.
यात नाव, वय यासारख्या माहितीचा समावेश असतो.
या माहितीच्या आधारे सायबर गुन्हेगार फसवणूक करु शकतात.
करोना लसीचा डोस घेतल्यानंतर लस घेणाऱ्या व्यक्तीला सरकारकडून लसीकरणाचं प्रमाणपत्र दिलं जातं.
यामध्ये लसीकरणासंदर्भातील महितीबरोबरच इतर महत्वाची माहितीही असते.
हे प्रमाणपत्र भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान लस घेतल्याचा पुरावा म्हणून कमी येऊ शकतं.
कोवीन आणि आरोग्य सेतूवरुन हे प्रमाणपत्र डाऊनलोड करता येतं.
सरकारने सोशल नेटवर्किंगसंदर्भातील सूचना देण्यासाठी सुरु केलेल्या सायबर दोस्त या ट्विटर हॅण्डलवरुन हे प्रमाणपत्र सोशल नेटवर्किंगवर पोस्ट न करण्याचं आवाहन केलं आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत या सोशल दोस्त ट्विटर हॅण्डलचा कारभार पाहिला जातो.

*वि श्व गु रू :- डॉ. ल.म.आसबे (कामधेनु परीवार)

💎💎💎💎💎💎
🎓 *वि श्व गु रू* 🎓
💎💎💎💎💎💎
राजकारणात संधीचा फायदा उठवणारी
माणसे मोठी होत असतात.
राजकारणात संधी शोधायची नसते,
तर ती तयार करायची असते.
*घडलेली प्रत्येक घटना चांगली असो वा वाईट, _त्या घटनेकडे संधी म्हणूनच खरे राजकारणी पहात असतात_.*
या लोकांना सुखद, दुःखद कसल्याही घटना
राजकारणासाठी उपयोगी पडत असतात.
*संपूर्ण समाज शांत, सुखी आणि समाधानी असला, तर राजकारण करता येत नाही.*
याच्या उलट परिस्थिती निर्माण केल्याशिवाय
अशा लोकांचे अस्तित्व
समाजाला जाणवत नाही.
🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️
समाजाला अति त्रास देणाऱ्या माणसाला किंवा
समाजासाठी प्रामाणिकपणाने स्वतःला अतिशय त्रास करून घेणाऱ्या माणसालाच
समाज लक्षात ठेवतो,
मधल्या माणसाची दखलही समाजाने
कधी घेतली नाही, घेतही नाही
आणि पुढेही घेणार नाही.
_अन्यायाशिवाय बंड होत नाही_,
_बंडाशिवाय बदल होत नाही_ आणि
_बदलाशिवाय राजकारण करता येत नाही._
👁️‍🗨️अन्याय झालेला, समाजाला समजत असतो,
परंतु अन्यायग्रस्त समाज संघटित नसतो.
👁️‍🗨️समान दुःख, समान अडचणी यातून
संघटन तयार होते.
👁️‍🗨️त्याचे नेतृत्व करणारा नेता होतो, _
🤦🏽‍♂️दुर्दैवाने असा नेता लोकशाहीत लोकनेता न राहता भविष्यात पुढे स्वार्थी पक्का राजकारणी बनतो,_
ही प्रक्रिया आहे आणि अनादिकालापासून ती चालत आलेली आहे यात बदल होणार नाही.
नेतृत्व निःस्वार्थी राहणे
आजच्या काळात सर्व समाजाला अपेक्षित आहे,
परंतु व्यवहारीकदृष्ट्या हे अतिशय कठीण आहे.
दगडापेक्षा वीट बरी
अशी समाजाची काहीशी अवस्था आहे.
⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
*शि व रा यां चा आ द र्श,*
राजकारणासाठी प्रत्येक नेत्याच्या समोर असावा.
हा राजा अन्यायाच्या विरोधात बंड करून उभा राहीला, _लोकनेता_ झाला.
आपल्या आयुष्यातील एकही क्षण स्वार्थी वागला नाही, त्यामुळे तो _युगपुरुष_ ठरला.
त्यांच्या मृत्यूनंतरही हजारो पिढ्यांसाठी आदर्श म्हणूनच _गुरु_ ठरला.
🤦🏽‍♂️ *दुर्दैवाने आज छत्रपती शिवाजीराजांसारख्या विश्वगुरूला _आदर्श समजण्याऐवजी, सर्व पक्षाचे राजकारणी राजकारणातील एक प्रभावी हत्यार म्हणूनच वापरतात_.*
_ज्या दिवशी या विश्वगुरूला_,
_लोकनेते गुरु म्हणून स्वीकारतील_
_त्या दिवशी खऱ्या अर्थाने_
*भारत विश्वगुरू होईल.*
या दिवसाची वाट भारतातील प्रत्येक
सुजाण नागरिक उत्कंठेने पहात आहे.

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ *डॉ.आसबे ल.म.*✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार_.
📞मो.नं.9822292713.📞

error: Content is protected !!