Home Blog Page 191

मैं भारत हूँ, हम भारत के मतदाता है’ या गीताचे व्यापक प्रसारण करावे- प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे

बारामती दि. ३: राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी प्रसारित केलेले ‘मैं भारत हूँ, हम भारत के मतदाता है’ या गीताचे सर्व ठिकाणी व्यापक स्वरूपात प्रसारण करून युवकांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करावी, असे आवाहन २०१ बारामती विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

भारत निवणूक आयोगामार्फत राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी ‘मैं भारत हूँ, हम भारत के मतदाता है’ हे गीत प्रक्षेपित करण्यात आले होते. मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृतीच्या दृष्टीने या गीताची व्यापक प्रमाणात प्रसार आणि प्रसिद्धी होणे आवश्यक आहे.

त्यासाठी तालुकास्तरीय नामांकित व्यक्ती, तालुक्यातील निवडणूक विषयक कामकाज हाताळणारे अधिकारी कर्मचारी, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, कामगार तलाठी, मंडल अधिकारी, निवडणूक साक्षरता मंडळ, मतदार जागृती मंच, कंपन्याचे व्यवस्थापक, शाळा, महाविद्यालये आदींनी हे गीत https://youtu.be/to324Jlljf8 या संकेस्थळावरून डाऊनलोड करून त्याचे आपल्या स्तरावर प्रसारण करावे.

प्रेक्षागृहात सिनेमा सुरू होण्यापूर्वी व मध्यातरांमध्ये हे गीत व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्वांतर्गत प्रसारण करण्यात यावे. स्थानिक केबलवरुन या गीताचे प्रसारण करण्यात यावे. तसेच निवडणूकविषयक सर्व कार्यक्रमांमध्ये सदर गीत प्रसारित करण्यात यावे. या गीतास लाईक व शेअर करून इतर सामाजिक माध्यमांद्वारेही त्याचा प्रसार करावा, असे आवाहनही श्री. कांबळे यांनी केले आहे.
००००

मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टीने जनजागृतीचे उपक्रम राबवावेत- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

संपादक:- रामवर्मा आसबे

पुणे दि.२: पोट निवडणूक होणाऱ्या २१५- कसबा विधानसभा मतदार संघ आणि २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व संबंधित समन्वयक अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढेल यासाठी जनजागृतीचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याच्या सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस पोलीस उपायुक्त आर. राजा, संदीप सिंग गिल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. देशमुख पुढे म्हणाले, मतदारांना यादीत नाव तपासण्यासाठी https://www.nvsp.in तसेच अन्य पर्यायांची माहिती नागरिकांना द्यावी. यावेळी ८० वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार तसेच दिव्यांग मतदार यांना प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. याकरीता अशा पात्र मतदारांना ‘नमुना १२ डी’ हा अर्ज मतदारांकडून वेळेत भरून घ्यावा. त्यादृष्टीने आवश्यक नियोजन करण्यात यावे.

मतदारांना सुलभ मतदान करता यावे यासाठीच्या सुविधांची माहिती द्यावी. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृतीचे कार्य करावे. सी-व्हीजील ॲपवरील तक्रारींचे कालमर्यादेत निवारण होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन करावे. निवडणूकीशी संबंधीत सर्व अहवाल वेळेवर द्यावेत आणि कालमर्यादेत कामे करावीत. नागरिकांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

संपादक:- रामवर्मा आसबे

मुंबई, दि. 30 : मुंबई विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी स्वतंत्र निवड समित्या गठित केल्या आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी पी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरु निवड समिती गठित करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरिता कुलगुरु निवड समिती जाहीर करण्यात आली आहे.

आयआयटी वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोदकुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये तसेच हैदराबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुरेशकुमार (यूजीसी प्रतिनिधी) हे मुंबई विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.

आयआयटी कानपुरचे संचालक डॉ. अभय करंदीकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर तसेच कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. मीना चंदावरकर (यूजीसी प्रतिनिधी) हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ दि. १० सप्टेंबर २०२२ रोजी सपंल्याने विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. दिगंबर शिर्के यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ १८ मे २०२२ रोजी संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित

img 20230125 wa0046

पुणे दि. : पुणे जिल्ह्याने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’ या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.

दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ सभागृहात भारत निवडणूक आयोगाच्या वतीने १३ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. बघेल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे उपस्थित होते. यावेळी देशातील विविध भागांमध्ये निवडणूक मतदान प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यांना, जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारत निवडणूक आयोगाचा या वर्षाची संकल्पना ‘मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही’, अशी आहे. यावेळी प्रख्यात निर्देशक सुभाष घई द्वारा निर्मित ‘मैं भारत हॅुं’ या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख यांनी पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राशी संवाद साधताना ते म्हणाले, आजचा महत्वाचा दिवस आहे. तेरावा राष्ट्रीय मतदार दिवस आज आपण या ठिकाणी साजरा केला आणि सर्व देशामध्ये दहा लाख पेक्षा जास्त ठिकाणी आज आपण साजरा करत आहोत, मी आजच्या मतदार दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रामधील आणि विशेष करून पुणे जिल्ह्यामधील ८० लाख मतदारांना शुभेच्छा देतो, त्यांचा अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाचे आम्ही आभार मानतो. पुणे जिल्ह्यामधील आमच्या सर्व टीमने गेल्या दोन वर्षांमध्ये मतदार यादी आणि निवडणुकांच्या संदर्भात घेतलेल्या परिश्रमाची फलश्रुती आज मिळाली आणि आज आमच्या सगळ्या टीमला माझ्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. यामध्ये जवळपास सात लाखापेक्षा जास्त जे निवासी मतदार आहेत त्यावर काम केले. त्याचप्रमाणे मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष करून महिला मतदार, तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली, विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले. १७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदारांची नोंदणी करण्यासाठी २५ नोव्हेंबर आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी ४४२ महाविद्यालयात महाशिबिरांचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात आली. यातून ४८ हजारावर युवकांची मतदार नोंदणी करण्यात आली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्ह्यात युवकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविणे, महिलांची मतदार नोंदणी याकडे त्यांनी विशेष लक्ष देण्यात आले. वंचित घटकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवताना तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार, देह विक्री व्यवसायातील महिला यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये आयोजित शिबिरांनाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह संयुक्त विद्यमाने शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाच्या बळकटीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

जिल्हाधिकारी यांनी तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी तसेच दिव्यांग मतदारांसाठी घेतलेल्या पुढाकाराचा निवडणूक आयोगाने विशेष गौरव केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी विशेष पुढाकार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील सुमारे अडीच हजार मोठे व लहान उद्योगांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणी करण्यात आली. उद्योगांच्या ठिकाणी समन्वयक अधिकारी नेमून तसेच उद्योगांमध्ये मतदार जागृती संघ स्थापन करून मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांना यापूर्वीदेखील जिल्ह्यात पीएम किसान योजनेतील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना पीएम आवास योजना आणि स्वच्छ भारत अभियानातील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला होता.

यावेळी ‘इलेक्टिंग द फर्स्ट सिटिजन- एन इलेस्ट्रेटेड क्रॅानिकल ऑफ इंडियाज प्रेसिडेंशियल इलेक्शन’ पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती यांना भेट स्वरूपात देण्यात आली. राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते एकूण १३ राष्ट्रीय पुरस्कार वितरित करण्यात आले.

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल, ११ नव्या चेहर्‍यांचा संधी मिळणार

*नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळात येत्या काही दिवसांत फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विद्यमान मंत्रिमंडळातील किमान 11 मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. येत्या वर्षभरात दहा राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी हा फेरबदल होत असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.*

*👉🔴👉संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत हा विस्तार अपेक्षित आहे. ज्या राज्यांत निवडणुका होणार आहेत तेथील भाजपच्या खासदारांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार असल्याचे कळते. त्याबरोबरच ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नाही त्यांना डच्चू मिळणार आहे.मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांकडे पक्षाची जबाबदारी सोपविली जाणार आहे.*

सदगुरु श्री वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांचे निधन वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

*मुंबई :- जीवनविद्या मिशनचे प्रणेते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे आज दुपारी २ वा ९ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.त्या ९७ वर्षाच्या होत्या .त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव व जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद वामनराव पै व सुकन्या मालन कामत तसेच त्यांचे नातू निखिल पै, स्वप्निल कामत व नातसून प्रिया निखिल पै व पणतू यश पै असा परिवार आहे.*

*🙏💐शारदा माईंच्या महानिर्वाणामुळे जीवनविद्या परिवारावर शोककळा पसरली आहे. सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या महानिर्वाणानंतर जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक कार्यक्रमात शारदामाई यांचा सक्रीय सहभाग व आशीर्वाद सदैव लाभत असे. जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक नामधारकाला त्यांचे मातृतुल्य प्रेम, मार्गदर्शन मिळत असे. त्यांच्या निर्वाणाने जीवनविद्या मिशनमध्ये कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.*

error: Content is protected !!