Home आध्यात्मिक सदगुरु श्री वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांचे निधन वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सदगुरु श्री वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांचे निधन वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

*मुंबई :- जीवनविद्या मिशनचे प्रणेते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे आज दुपारी २ वा ९ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.त्या ९७ वर्षाच्या होत्या .त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव व जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद वामनराव पै व सुकन्या मालन कामत तसेच त्यांचे नातू निखिल पै, स्वप्निल कामत व नातसून प्रिया निखिल पै व पणतू यश पै असा परिवार आहे.*

*🙏💐शारदा माईंच्या महानिर्वाणामुळे जीवनविद्या परिवारावर शोककळा पसरली आहे. सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या महानिर्वाणानंतर जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक कार्यक्रमात शारदामाई यांचा सक्रीय सहभाग व आशीर्वाद सदैव लाभत असे. जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक नामधारकाला त्यांचे मातृतुल्य प्रेम, मार्गदर्शन मिळत असे. त्यांच्या निर्वाणाने जीवनविद्या मिशनमध्ये कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.*

error: Content is protected !!