Home Blog Page 15

डबल इंजन की सरकार अन्नदाता किसानों के साथ है, उनके हितों के संवर्धन और संरक्षण के लिए प्रतिबद्ध है:- योगी आदित्यनाथ

डबल इंजन की सरकार अन्नदाता किसानों के साथ है, उनके हितों के संवर्धन और संरक्षण के लिए प्रतिबद्ध है:- योगी आदित्यनाथ

 

इसी शृंखला में आज लखनऊ में कृषक बंधुओं से संवाद किया।

 

पिछले 11 वर्षों में आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी के नेतृत्व में भारत का अन्नदाता किसान खुशहाली की नई राह पर चल पड़ा है।

 

सभी अन्नदाता किसानों को पेराई सत्र 2025-26 के लिए गन्ना मूल्य में ₹30 प्रति क्विंटल की हुई ऐतिहासिक वृद्धि हेतु हृदय से बधाई।

शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

 

मुंबई दि. 30 : – राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री येथे केली.

 

“कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

 

सह्याद्री अतिथीगृह येथे शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळ सोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री दत्तामामा भरणे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश कुमार, शेतकरी आंदोलन शिष्टमंडळातील प्रतिनिधी माजी राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू, खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, वामनराव चटप, रविकांत तुपकर, राजन क्षीरसागर, गिरीश दाभाडकर, अजित नवले यांच्यासह सर्व प्रमुख विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे, कारण तसे केले नाही तर रब्बीची पेरणी त्यांना करता येणार नाही. म्हणून आता 32,000 कोटींच्या पॅकेज वितरण याला प्राधान्य आहे. पूर्व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून 32 हजार कोटी रूपये मदत दिली जात आहे. आत्तापर्यंत 8000 कोटी रुपये खात्यात दिले गेले आहेत. या आठवड्याअखेर 18,500 कोटी रुपये दिले जाणार असून पंधरा दिवसात 90 टक्के शेतकऱ्यांच्या थेट खात्यात रक्कम जाईल या दृष्टीने तरतूद केली असून निर्देश दिले आहेत.”

मुख्यमंत्री म्हणाले,” आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा निर्णय होता. पण ही तात्कालिक बाब आहे. दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. कर्जाची वसुली जूनपर्यंत होते, त्यामुळे जूनपर्यंत मुदत आहे. याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झाली असून या भूमिकेशी सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. अन्य विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे ”

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…*

▪️कर्जमाफी कशी करायची याबाबत एप्रिलपर्यंत समिती शिफारस करेल

▪️शिफारशीच्या आधारावर पुढच्या तीन महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करणार

▪️नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक

▪️रब्बीची पेरणी करता यावी, म्हणून आता 32,000 कोटींच्या पॅकेज वितरणास प्राधान्य

▪️विविध विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार

फुले प्रहार सामाजिक संस्था इंदापूर यांचे वतीने दिवाळी फराळ वाटप

 इंदापूर – फुले प्रहार सामाजिक संस्था इंदापूर यांचे वतीने दि.19 व 21 आॅक्टोंबर 2025 रोजी इंदापूर शहरातील बस स्थानक व शहरातील विविध भागामध्ये गरीब कष्टकरी, रस्त्याच्या कडेला दिपावली साहित्य विक्रेते आणि मोलमजुरी करणार्‍या कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.यावेळी आरपीआय इंदापूर शहराध्यक्ष अमोल मिसाळ,मोहन राव, एसटी कंट्रोलर सुरेंद्र आंबेशिंगे, विक्रम चंदनशिवे, दैनिक पुण्यनगरीचे वार्ताहार दत्तात्रय मिसाळ, विश्वसंचारचे मुख्य संपादक प्रविण डोंगरे, इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

आपणास व आपणा सर्वांच्या परीवारास आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त माझ्या कडून अनेक हार्दिक शुभेच्छा🪔🏮🕯️

*आपणास व आपणा सर्वांच्या परीवारास आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त माझ्या कडून अनेक हार्दिक शुभेच्छा🪔🏮🕯️*

*🕯🪔🏮|| शुभ दिपावली ||🪔🏮🕯*१७ऑक्टोबर*  आजपासून दीपावली ला सुरुवात होत आहे.

सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा….  !!!!!

*१७ऑक्टोबर २०२५ शुक्रवार वसुबारस !*

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,

प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास

लाभो !

*१८ऑक्टोबर २०२५-शनिवार धनत्रयोदशी !*

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

*२०ऑक्टोबर २०२५- सोमवार नरकचतुर्दशी !*

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !

अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ

आपल्याला लाभो !!

आपल्याकडून नेहमी सत्कर्म

घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!

*२१ ऑक्टोबर २०२५- मंगळवार लक्ष्मीपूजन !*

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !

नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त

होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य

आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

*२२ऑक्टोबर २०२५- बुधवार  पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*

पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव

गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे

आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

*२३ऑक्टोबर २०२५- गुरुवार भाऊबीज !*

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट

राहू दे !

*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*

*आंनदाची आणि भरभराटिची  जावो*

🙏🏻🙏🏻🙏🏻

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालया मध्ये डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती स्मरणार्थ वाचन प्रेरणा दिवस दिमाखात साजरा

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालया मध्ये डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती स्मरणार्थ वाचन प्रेरणा दिवस दिमाखात साजरा

संपादकीय:-

आज बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती दिमाखात साजरी करण्यात केली.

पारंपारिक पद्धतीने यावेळी सर्वप्रथम मान्यवराच्या हस्ते भारतरत्न डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर कॉलेजमधील ग्रंथपाल प्रा. विकास हुबाळे आणि शिक्षण विभाग प्रमुख प्रा.गीतांजली कांबळे यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्यबदल प्रकाश टाकणारे महत्वाचे भाषण दिले.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के म्हणाले की “जर लोक मला एक चांगला शिक्षक म्हणून लक्षात ठेवतील, तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल…” असे डॉ. एपीजे अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे.

दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी, भारत देशातील सर्वात प्रशंसनीय शास्त्रज्ञ, शिक्षक आणि माजी राष्ट्रपतींपैकी एक असलेले डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात येते.

हा दिवस केवळ विज्ञान आणि सार्वजनिक सेवेतील त्यांच्या कामगिरीलाच नव्हे तर विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या आजीवन वचनबद्धतेला श्रद्धांजली म्हणून साजरा केला जातो.

डॉ. कलाम यांनी कल्पना केल्याप्रमाणे, तरुण मनांना त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात उत्कृष्टता आणि नवोपक्रमाचा पाठलाग करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. आजच्याआधुनिक युगात विद्यार्थ्यांना इंटरनेट व सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ माहिती संपन्न होऊ शकते परंतु ज्ञानसंपन्न होत नाही. ज्ञानसंपन्न होण्यासाठी ग्रंथ वाचणे आवश्यक आहे. वाचनाने ज्ञान, विवेकशीलता, प्रसन्नता, शांती व आनंद प्राप्त होतो तसेच व्यक्तीचा सर्वांगीण विकासही होतो असे प्रतिपादन त्यांनी केले व विद्यार्थ्यांनी नियमित ग्रंथालयास भेट देऊन सर्व विषयांचे वाचन करावे असे आवाहन ही केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने फार्मसी चे विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. प्रास्ताविक प्रा. अनिकेत सुर्वे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.अजिंक्य देशपांडे यांनी केले.

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे क्रीडा कार्यालय अहिल्यानगर श्रीगोंदा क्रीडा समिती..

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे क्रीडा कार्यालय अहिल्यानगर श्रीगोंदा क्रीडा समिती अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने परिक्रमा शैक्षणिक संकुलन काष्टी येथे *शालेय विभागीय कुस्ती क्रीडा* स्पर्धा दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडल्या. या स्पर्धेत *एन्.ई.एस्. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर* या कॉलेजचा विद्यार्थी *चि. सुरज युवराज काळे * याने 19 वर्षे वयोगटात 86 किलो मध्ये *गोल्ड मेडल* जिंकले आहे. त्याची *राज्यपातळीवर* निवड झालेली आहे
त्याला संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सूर्यकांत रणवरे (दादा) नंदकुमार सूर्यकांत रणवरे (आबा) धनंजय सूर्यकांत रणवरे (अण्णा) विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे पर्यवेक्षक खरात सर विभाग प्रमुख संदीप रणवरे सर जेष्ठ शिक्षक बोंद्रे सर किसवे सर यांनी विजय विद्यार्थ्यांचे स्वागत व अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना हनमंते सर, मुलाणी सर, चव्हाण सर, शेंडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

इंदापूरच्या चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये तिसरा राष्ट्रीय आधुनिक उत्पादन प्रणाली (cGMP) दिन उत्साहात साजरा

इंदापूरच्या चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये तिसरा राष्ट्रीय आधुनिक उत्पादन प्रणाली (cGMP) दिन उत्साहात साजरा

संपादकीय

या पार्श्वभूमीवर चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे आज शुक्रवार दि. १० ऑक्टोबर या दिवशी ” राष्ट्रीय आधुनिक उत्पादन प्रणाली दिवस (cGMP)” साजरा करत असताना व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ निलेश सोनवणे , विभागप्रमुख, चेतना कॉलेज ऑफ फार्मसी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना १० ऑक्टोबर हा दिवस cGMP दिन म्हणून निवडण्यात आला कारण १९६२ मध्ये त्याच दिवशी, औषध सुरक्षा आणि उत्पादन पद्धतींशी संबंधित नियामक सुधारणा (थॅलिडोमाइड दुर्घटनेला प्रतिसाद म्हणून) जागतिक स्तरावर सादर करण्यात आला.

औषधी उत्पादनांमध्ये गुणवत्ता, अनुपालन, सुरक्षितता आणि चांगल्या उत्पादन पद्धतींचे महत्त्व याबद्दल शैक्षणिक संस्था, उद्योग, नियामक संस्था आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे.

cGMP दिन औषध निर्मितीच्या जागतिक मानकांप्रती भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून देखील काम करतो.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के म्हणाले की, औषधनिर्माण आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील सध्याच्या आधुनिक उत्पादन पद्धती (cGMP) बद्दल जागरूकता आणि माहिती वाढवण्यासाठी १० ऑक्टोबर २०२५ रोजी तिसरा राष्ट्रीय आधुनिक उत्पादन पद्धती (cGMP) दिन साजरा केला जातो. अनेक भारतीय औषधांची निकृष्ट गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सरकारने भारतीय औषध उत्पादक संघटना (IDMA) सोबत दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा करण्याची योजना आखली आहे.

या वर्षी निवडलेली थीम आहे: THINK cGMP – cGMP IS QUALITY.

या नावीन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रमासाठी चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरता प्रा.दाजी हुलगे, प्रा. अनिकेत सुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले.

बावडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

बावडा

दि. 10 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा मध्ये बावडा महाविद्यालयातील विद्यार्थ्याने चमकदार यश संपादन केले.

बावडा येथील श्रीमत रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थी समीर हेगडे यांने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.

त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी पाटील तसेच संस्थेचे संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 


 

आबासाहेब थोरात यांची भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली.

आबासाहेब थोरात याची भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी आबासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली असून ही नियुक्ती प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार राहुल कुल, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा भाजपा पुणे जिल्हा दक्षिण अध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर झाली. थोरात हे गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीत काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी तालुका सरचिटणीस, भाजपा ओबीसी मोर्चा, सरचिटणीस तालुका युवा मोर्चा, सरचिटणीस अशा अनेक पदावर काम चांगल्या प्रकारे केले आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्षाच्या युवा मोर्चाला नवे चैतन्य मिळेल असा विश्वास वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीची घोषणा होताच पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये युवा पदाधिकाऱ्यांनी आबासाहेब थोरात यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. भाजपमधील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरवत युवा मोर्चा अधिक बळकट आणि संघटित करण्यासाठी मी कटिबद्ध असणार

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती दिमाखात साजरी

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती दिमाखात साजरी

गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी, इंदापूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती अत्यंत उत्साहात व दिमाखात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांद्वारे या दोन्ही महान नेत्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. अरुणा कोटी हिने दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषण केले. द्वितीय वर्ष बी. फार्मसी मधील कु. वैष्णवी शेंडगे हिने देखील प्रेरणादायी वक्तव्य केले. कु. रोहिणी चोपडे हिने सुंदर असे देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमाला सुरेल वातावरण दिले, तर चि. अमित शिंदे ह्यानेही दोन्ही महान नेत्यांच्या विचारांवर प्रभावी भाषण केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु. प्रियंका हांगे हिने अत्यंत प्रभावीपणे केले. तिच्या संयोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम आकर्षक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी म्हटले की, “२ ऑक्टोबर हा दिवस भारतीयांसाठी विशेष आहे, कारण या दिवशी आपल्याला दोन महान व्यक्तिमत्त्वांची आठवण येते – महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री. गांधीजींनी जगाला सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश दिला, तर शास्त्रीजींनी आपल्या साध्या पण प्रभावी नेतृत्वातून ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेने देशाला प्रेरणा दिली.”

डॉ. म्हस्के पुढे म्हणाले की, “लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या केवळ १८ महिन्यांच्या कार्यकाळात देशाला युद्धात विजय मिळवून दिला आणि अन्नसंकटावर मात केली. त्यांचे नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि समर्पण आजही देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे.”

या प्रसंगी चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. उदय देशपांडे, सचिव श्री. विलास भोसले, खजिनदार श्री. सोमनाथ माने, सदस्य श्री. बाळू बोराटे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका वृंद उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे औचित्य अधिक वाढले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) चे कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण सातपुते व प्रा. अनिकेत सुर्वे यांनी केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि अनुशासनबद्ध पद्धतीने पार पडला.

error: Content is protected !!