
इंदापूरच्या चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये तिसरा राष्ट्रीय आधुनिक उत्पादन प्रणाली (cGMP) दिन उत्साहात साजरा
संपादकीय
या पार्श्वभूमीवर चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे आज शुक्रवार दि. १० ऑक्टोबर या दिवशी ” राष्ट्रीय आधुनिक उत्पादन प्रणाली दिवस (cGMP)” साजरा करत असताना व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ निलेश सोनवणे , विभागप्रमुख, चेतना कॉलेज ऑफ फार्मसी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना १० ऑक्टोबर हा दिवस cGMP दिन म्हणून निवडण्यात आला कारण १९६२ मध्ये त्याच दिवशी, औषध सुरक्षा आणि उत्पादन पद्धतींशी संबंधित नियामक सुधारणा (थॅलिडोमाइड दुर्घटनेला प्रतिसाद म्हणून) जागतिक स्तरावर सादर करण्यात आला.
औषधी उत्पादनांमध्ये गुणवत्ता, अनुपालन, सुरक्षितता आणि चांगल्या उत्पादन पद्धतींचे महत्त्व याबद्दल शैक्षणिक संस्था, उद्योग, नियामक संस्था आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे.
cGMP दिन औषध निर्मितीच्या जागतिक मानकांप्रती भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून देखील काम करतो.
चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के म्हणाले की, औषधनिर्माण आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील सध्याच्या आधुनिक उत्पादन पद्धती (cGMP) बद्दल जागरूकता आणि माहिती वाढवण्यासाठी १० ऑक्टोबर २०२५ रोजी तिसरा राष्ट्रीय आधुनिक उत्पादन पद्धती (cGMP) दिन साजरा केला जातो. अनेक भारतीय औषधांची निकृष्ट गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सरकारने भारतीय औषध उत्पादक संघटना (IDMA) सोबत दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा करण्याची योजना आखली आहे.
या वर्षी निवडलेली थीम आहे: THINK cGMP – cGMP IS QUALITY.
या नावीन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रमासाठी चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरता प्रा.दाजी हुलगे, प्रा. अनिकेत सुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले.