चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेजमध्ये दांडिया प्रोग्रॅम उत्साहात साजरा करण्यात आला.
संपादकीय,
चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेज सरडेवाडी येथे दांडिया प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले ,
खजिनदार सोमनाथ माने, संस्थेच्या सदस्य व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
नर्सरी पासून ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी अत्यंत उत्सुकतेने व आनंदाने कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिले
आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी मंगळवार आपल्या शाळेत दांडिया प्रोग्राम उत्सव अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला
कार्यक्रमाचे सुरुवात देवीच्या पूजनाने झाली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी गोलात उभे राहून दांडिया खेळात पारंपारिक गाणी सादर केली संपूर्ण शाळा आनंदमय वातावरणाने दुमदुमली होती
मातांनी देखील गुजराती साडी घागरा आणि चनिया चोली परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला त्यामुळे खऱ्या अर्थाने परंपरेचा आणि संस्कृतीचा संगम अनुभवायला मिळाला
कार्यक्रम वेळेवर सुरू होऊन शिस्तबद्धरीत्या पार पडला मुलांचा उत्साह पालकांचा सहभाग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हा दांडियाचा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला
कार्यक्रमाचे आयोजन प्रांजली सुतार मॅडम यांनी केले व सर्व कार्यक्रम पूर्णपणे पार पाडण्यास सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.