चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेजमध्ये महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
संपादकीय,
चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेज सरडेवाडी येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले ,
खजिनदार सोमनाथ माने, संस्थेच्या सदस्य व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
नर्सरी पासून ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी अत्यंत उत्सुकतेने व आनंदाने कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिले
गांधीजींनी “करेंगे या मरेंगे” यांचा नारा दिला तसेच चंपारण्य लढा, मिठाचा सत्याग्रह, याविषयी शिंदे सरांनी माहिती दिली
तसेच रिटा घोष मॅडम यांनी स्वदेशीचा स्वीकार करा असे गांधी जयंती विषयी त्यांनी मुलांना मंत्र दिला
स्कूलच्या प्राचार्या निकिता मॅडम यांनी मिठाचा सत्याग्रह याविषयी माहिती दिली तसेच हिंसा आणि अहिंसा याबद्दल विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारून त्यांना स्वदेशी विषयी प्रेरित केले
कार्यक्रमाचे आयोजन प्रांजली सुतार मॅडम यांनी केले व सर्व कार्यक्रम पूर्णपणे पार पाडण्यास सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.