Home Blog Page 85

लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ

लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ

पुणे, दि. ५: जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ८ हजार ३८२ मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रकिया करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रुपाली आवळे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरवले आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ११ हजार ८९८ बॅलेट युनिट, ११ हजार ८९८ कंट्रोल युनिट आणि १२ हजार ७४९ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.

सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत. या यंत्रांपैकी सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या १४१ टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १५२ टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूममध्ये आणि पुणे लोकसभा मतदारसंघासाठीची यंत्रे भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. त्या-त्या विधानसभा मतदारसंघात देखील मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे डॉ.दिवसे यांनी सांगितले.

सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे योगेश बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे गणेश नलावडे, भारतीय जनता पार्टीचे राजाभाऊ शेडगे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अशोक कांबळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रमेश सकट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित गव्हाणे, शिवसेनेचे राजू गवळी आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मदत व मदतीचे परिणाम

मदत आणि परिणाम

खळखळ वाहणाऱ्या गढूळ पाण्यामध्ये जर एखादी व्यक्ती पडली असेल किंवा स्वतःला ओढून घेत असेल त्या व्यक्तीला काढण्यासाठी स्वच्छ,निर्मळ कपडे किंवा चरित्र असलेली व्यक्ती पाण्यात उतरली असता त्या व्यक्तीला पण पाण्यामध्ये गढूळ होऊन एखाद्या वेळेस पाण्यासंगे वाहून जावे लागते त्यामुळे चांगले व्यक्तिमत्व किंवा कपडे असणाऱ्या व्यक्तीला पण गडूळ व्हावे लागते, त्यामुळे गढूळ पाण्यामध्ये पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी चांगल्या व्यक्तीने विचार करून पाण्यामध्ये उतरले पाहिजे कारण ती व्यक्ती स्वतःला वाचवण्यासाठी खूप तडफडत असते त्यामुळे त्याचे मुळे आपले शरीर किंवा त्याचा निर्मळपणा खराब होऊ नये याचा विचार केला पाहिजे .
लिखाण:- रामवर्मा आसबे

भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी मितेश गादिया

img 20240401 wa0472
भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी मितेश गादिया

शिरूर शहर भाजपा माजी कार्याध्यक्ष मितेश गादिया यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. पुणे येथे झालेल्या बैठकीत निवडीचे पत्र मा. ना. चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे ,जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी मा. ना.चंद्रकांत दादा पाटील मंत्री महाराष्ट्र राज्य, माजी मंत्री बाळा भाऊ भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, माजी जि प अध्यक्ष प्रदीप कंद,संदिप खर्डेकर समन्व्यक महायुती,प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, जिल्हा सरचिटणीस संजय रौंधाळ ,जिल्हा सरचिटणीस ताराचंद कराळे,सरचिटणीस भगवानराव शेळके, कायदा आघाडी राज्य प्रभारी धर्मेंद्र खांडरे, राहुल पाचर्णे,शिरूर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते.

मुद्रणालय चालकांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील तदतुदींचे पालन करावे- डॉ.सुहास दिवसे

मुद्रणालय चालकांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील तदतुदींचे पालन करावे- डॉ.सुहास दिवसे

पुणे, दि. १८: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्रणालय चालकांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, पूना प्रेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहूल मारुलकर, सदस्य रवींद्र जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, निवडणुकीदरम्यान उपयोगात आणले जाणारे हस्तपत्र, हस्तपुस्तिका, भित्तीपत्रके आदी छापिल प्रचारसाहित्याच्या छपाईसंदर्भात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२७ए नुसार तरतुदींचे पालन होणे आवश्यक आहे. त्यानुसार निवडणूक प्रचारसाहित्यावर मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता असणे बंधनकारक आहे.

प्रकाशकाने ओळखीचा पुरावा म्हणून ओळखणाऱ्या दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेले स्वस्वाक्षरीत प्रतिज्ञापत्र दोन प्रतीत मुद्रकाकडे सादर करणे आवश्यक आहे. मुद्रकाने छपाईनंतर प्रतिज्ञापत्र आणि प्रचारसाहित्याची एक प्रत तात्काळ जिल्हाधिकारी यांना पाठविणे आवश्यक आहे.

या कलमाचा भंग झाल्यास सहा महिन्यापर्यंतचा तुरुंगवास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. तरी जिल्ह्यातील सर्व मुद्रणालय चालकांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाचे पालन करुन वेळोवेळी माहिती सादर करावी. मुद्रणालय संघटनेनेदेखील आपल्या सर्व सदस्यांना या तरतुदीची माहिती द्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बैठकीदरम्यान केले.

अधर्मी कुकर्मी व समाज

अधर्मी कुकर्मी अशी लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा समाजाने समजून जायचं देशामध्ये काहीतरी अन्यायकारक, समाजविरोधी या लोकांनी केलेले आहे या मुळे ही लोक स्वतःला वाचवण्य अण् चांगल्या व्यक्तीला हरवण्या साठी एकत्रित आलेली असतात तेव्हा अन्याय झालेल्या जनतेच्या बाजूने भगवंत स्वतः प्रकट होऊन बाजू घेत असतो, अन्याय झाले लोकांच्या बाजूने उभा असतो अन्याय झालेल्या लोकांना मदत करत असतो तेव्हा अन्याय झालेल्या लोकांनी मागे न हटता झालेल् या अन्यायावरती ईश्वराच्या पुढे व समाजापुढे कुकर्मी लोकांच्या विरोधात लढायचे असते व कुकर्मी अधर्मी लोकांना हरवायचे असते व चांगल्या राष्ट्रहित करणाऱ्या व्यक्तीला निवडून द्यायचे असते

लिखाण :- रामवर्मा आसबे

हमारा हर काम राष्ट्र को पहले रखते हुए होना चाहिए। कोई भी कदम उठाने से पहले हम ये ज़रूर सोचें कि उससे राष्ट्र का भला जरूर हो। – प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी

हमारा हर काम राष्ट्र को पहले रखते हुए होना चाहिए। कोई भी कदम उठाने से पहले हम ये ज़रूर सोचें कि उससे राष्ट्र का भला जरूर हो।

– प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी

ईडीने जप्त केलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटणार,पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

ईडीने जप्त केलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटणार,👉👉पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा*
https://twitter.com/ANI/status/1772871369417527421?t=I-3ESK5fhWCPLfacB_WeUQ&s=19
*नवी दिल्ली:-गेल्या काही वर्षांमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या धाडी वाढल्या आहेत. यावरुन विरोधक सतत केंद्र सरकारवर टीका करतात. अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि.27) एक मोठे वक्तव्य केले. सक्तवसुली संचालनालय म्हणजे ईडीने देशभरातून जप्त केलेली संपत्ती गरीबांमध्ये वितरीत केली जाणार आहे. याची तयारी केली जात असल्याचे मोदींनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ईडीकडून जप्त केलेली संपत्ती गरीबांमध्ये वाटण्याच्या दिशेने काम केले जात आहे. नुकतेच त्यांनी कृष्णानगर मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या राजमाता अमृता रॉय यांच्याशी फोनवरून संवाद साधला. रॉय तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोइत्रा यांच्या विरोधात निवडणूक लढत आहे.*

*👉🅾️🅾️👉कृष्णनगर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात भाजपने राजघराण्यातील सदस्य अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. आज पीएम मोदींनी अमृता यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी पीएम मोदी म्हणाले, ईडीने पश्चिम बंगालमध्ये 3000 कोटी रुपये जप्त केले आहेत. हा गरिबांचा पैसा आहे. कोणी शिक्षक होण्यासाठी पैसे दिले, तर कोणी कारकून होण्यासाठी पैसे दिले. माझी इच्छा आहे की, नवीन सरकार बनताच गरीब जनतेचा पैसा त्यांना परत केला जावा. यासाठी मी कायदेशीर सल्ला घेतोय. बंगालच्या लोकांनी विश्वास ठेवावा की, ईडीने जप्त केलेले 3000 कोटी रुपये परत करण्यासाठी भाजप सरकार काही ना काही मार्ग शोधेल.*

*👉🟥🟥👉पंतप्रधान मोदी आणि अमतृा रॉय यांच्यातील चर्चेची माहिती देताना भाजप नेत्यांनी सांगितले की, राज्यात नोकऱ्या देण्यासाठी तृणमूलने सुमारे 3,000 कोटी रुपये लाटले. पंतप्रधान मोदींनी राजमाता अमृता रॉय यांना सांगितले की, भ्रष्टाचाऱ्यांनी सर्वसामान्यांचा पैसा लुटला आहे, सध्या हा पैसा ईडीकडे आहे. तो गरीब जनतेला परत केला पाहिजे. यासाठी ते कायदेशीर पर्याय शोधत आहे. एकीकडे भाजप देशातून भ्रष्टाचार उखडून टाकण्यासाठी कटिबद्ध आहे, तर दुसरीकडे सर्व भ्रष्टाचारी एकमेकांना वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत. पश्चिम बंगालमधील जनता परिवर्तनासाठी मतदान करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.*

*👉🔴🔴👉कोण आहेत अमृता रॉय?*

*अमृता रॉय 18व्या शतकातील स्थानिक राजे कृष्णचंद्र रॉय यांच्या घराण्याच्या वंशज आहेत. लोकसभा निवडणुकीत कॅश फॉर क्वेरी प्रकरणात अडकलेल्या महुआ मोईत्रा यांच्यावर टीएमसीने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे, तर भाजपने कृष्णानगरमधून त्यांच्या विरोधात ‘राजमाता’ अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. अमृता रॉय यांनी 20 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना उमेदवारी देण्याचा भाजपचा निर्णय हा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे. विशेष म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीटही देण्यात आले. आता पीएम मोदींनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि बंगालमधील भ्रष्टाचार संपवण्याच्या भाजपच्या योजनेवर भाष्य केले.*

कसाबला पकडणाऱ्या IPS सदानंद दाते यांच्याकडे NIA ची धुरा

img 20240327 wa0413
मुंबई:-लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने NIA च्या महासंचालकपदी IPS सदानंद दाते यांची नियुक्ती केली आहे. ते 1990 च्या कॅडरमधील आहेत. 26/ 11 च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी कसाबला पकडण्याची कामगिरी दाते यांनी केली आहे. त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.*

*👉🔴🔴👉देशातील आणि देशाबाहेरील दहशतवादाची पाळेमुळे नष्ट करण्याच्या NIA च्या कार्याला अधिक गती येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई हल्ल्याच्या वेळी प्रसंगावधान आणि बाहादुरी दाखवत दाते यांनी ओलिसांची सुटका केली आणि कसाबला जिंवत पकडण्यात यश मिळवले. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानिक करण्यात आले आहे.*

*👉🟥🟥👉मुंबई हल्ला ही आपली कारकिर्दीतील आव्हानात्मक कामगिरी होती. या घटनेत आपल्यापरीने सर्वोकृष्ट कामगिरी करण्यासाठी आपण प्रयत्न केले, असे दाते म्हणाले होते. याआधी दाते यांनी सीआरपीएफ, आईबी, एटीएसमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत. तसेच मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.*

error: Content is protected !!