Home Blog Page 84

पोलिसांनाही आता निवृत्ती वेतन योजना लागू होणार; केंद्र सरकारच्या धरतीवर जुनी पेन्शन मिळणार, पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा

पोलिसांनाही आता निवृत्ती वेतन योजना लागू होणार;
केंद्र सरकारच्या धरतीवर जुनी पेन्शन मिळणार,
पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा

*👉🅾️🅾️👉पोलीस दलातील एक नोव्हेंबर 2005 नंतर भरती झालेल्या जवानांना आता केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी येत्या 12 एप्रिल पर्यंत आपले अर्ज आणि संबंधित भरतीची कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई सह राज्यभरातील दोन लाख वीस हजार पैकी अर्ध्यांपेक्षा अधिक जवानांना याचा फायदा होणार असल्याचे वृत्त आहे.*

*👉🟣🟣👉याबाबत पोलिसांच्या कनिष्ठ आस्थापना शाखेने पोलिसांना विहित मुदतीत पात्र पोलिसांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.एक नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन पोलीस सेवेत रुजू झालेल्यांना केंद्र शासनाच्या धरतीवर निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येणार आहे. याबाबत पोलीस दलात सूचना देण्यात आल्या होत्या.त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालगतच्या अधिपत्याखालील सर्व अप्पर पोलीस आयुक्त तसेच पोलीस उपायुक्त कार्यालय आणि सर्व शाखा व कार्यालय येथील प्रशासकीय अधिकारी यांना सूचित करण्यात आले होते.*

*👉🛑🛑👉सूचनेत काय म्हटले आहे?*

*वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुचित करून एक नोव्हेंबर 2005 सेवेत आलेल्या पोलिसांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे. या सूचनेत म्हटले आहे की शासन निर्णयानुसार एक नोव्हेंबर 2005 पूर्वी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेले आणि या तारखेनंतर पोलीस दलात रुजू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी आपल्या अधिपत्याखालील संबंधित पोलीस अंमलदार यांनी सन 2004 व 2005 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पोलीस भरती जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज प्राप्त करून घ्यावेत त्याचे पोलीस अंमलदार एक नोव्हेंबर 2005 नंतर भरती झालेले आहेत ते या योजनेसाठी पात्र ठरतील.*

*👉🔴🔴👉12 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत,*

*संबंधित पोलीस अंमलदार यांनी आपापल्या प्रादेशिक विभाग अथवा शाखा कार्यालय येथे अर्ज करतेवेळी अर्जासोबत सन 2004 व 2005 मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात व नियुक्ती आदेशाची प्रत जोडावी या अर्जाची प्रादेशिक विभाग तसेच शाखा कार्यालय यांनी परिपूर्ण पडताळणी करून फक्त पात्र पोलीस अंमलदारांचे अर्ज 12 एप्रिल पर्यंत कक्ष -9( कनिष्ठ आस्थापना ) येथे सादर करावे. उर्वरित अपात्र अर्ज आपल्या कार्यालयाच्या स्तरावर दप्तरी दाखल करून संबंधित पोलीस अंमलदार यांना तसे अवगत करावे. दिनांक अर्ज प्राप्त न झाल्यास त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.*

मावळ विधानसभा मतदारसंघातील साडेतीन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

img 20240411 wa0024
पुणे,दि.११ : मावळ लोकसभा मतदार संघाअंतर्गत मावळ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त ३ हजार ५०० क्षेत्रीय अधिकारी, समन्वय अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख व सहाय्यक अधिकारी कर्मचारी यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीबाबत तळेगाव येथील नूतन कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, निवासी नायब तहसीलदार तथा प्रशिक्षण विभाग प्रमुख गणेश तळेकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राच्या पहिल्या दिवशी मार्गदर्शन करताना श्री. नवले यांनी अधिकारी व कर्मचारी यांची मतदानाच्या आदल्या दिवशी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचे कर्तव्य व अधिकार याबाबत माहिती दिली. कामकाज करताना होणाऱ्या चुका टाळण्याबाबत मार्गदर्शन करतांना निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे सर्वांनीच पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्तव्य करतांना प्रत्येक अधिकाऱ्याने गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणीही प्रशिक्षण व प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिक टाळू नये. मतदान प्रक्रिया ही निष्पक्ष व खुल्या वातावरणात पार पाडण्यात येऊन मतदान करणाऱ्या मतदाराला केंद्रस्थानी मानून आपले राष्ट्रीय कर्तव्य प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडावे, असे आवाहन श्री.नवले केले.

श्री. देशमुख यांनी मतदान यंत्राबाबत माहिती दिली. प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्रे स्वतः हाताळावीत. प्रशिक्षणार्थींनी प्रात्यक्षिकाच्या आधारे मतदान प्रक्रियेची माहिती करून घ्यावी, यामुळे प्रत्यक्ष मतदानावेळी चुका होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री.नवले यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून शंकांचे निरसन केले.

उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना सर्वसाधारण सूचनांचे पालन करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

पुणे, दि. १०: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना सर्वसाधारण सूचनांचे पालन करावे व योग्यरितीने नामनिर्देशनपत्र दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिसूचनेत नमूद केलेल्या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाहीत. नामनिर्देशनपत्र हे नमुना २अ मध्ये दाखल करावे, त्यासोबत नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्र सादर करावे. नामनिर्देशनपत्राचा नमुना २अ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्र पूर्णपणे भरलेले असणे आवश्यक आहे.

एका उमेदवारास अधिकाधिक ४ नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १७३ (अ) अन्वये उमेदवाराने स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी किंवा प्राधिकृत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष छाननीपूर्वी शपथ घ्यावी लागेल. दोनपेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही. नामनिर्देशनपत्र दाखल करणारे उमेदवाराचे वय २५ वर्षापेक्षा कमी नसावे.

उमेदवार निवडणूक लढवीत असणाऱ्या लोकसभा मतदारसंघाव्यतिरीक्त, इतर लोकसभा मतदारसंघातील मतदार असल्यास, ज्या लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारयादीची प्रमाणित प्रत नामनिर्देशनपत्रासोबत दाखल करणे बंधनकारक राहील. उमेदवार स्वतः किंवा त्यांचे कमीत कमी एका प्रस्तावकाने स्वतः उपस्थित राहून नामनिर्देशनपत्र दाखल करावे.

नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उमेदावारासहीत एकूण ५ व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. (त्यामध्ये उमेदवार व त्यांचे चार प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात येईल.) नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवाराच्या केवळ ३ वाहनांना कार्यालयाच्या परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. वाहने वाहनतळावरच उभी करण्याची अनुमती राहील.

उमेदवार हा ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे त्याच लोकसभा मतदारसंघातील मतदार हे प्रस्तावक असणे बंधनकारक राहील. मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारास १ मतदार प्रस्तावक म्हणून असणे बंधनकारक राहील. अपक्ष उमेदवार आणि इतर राज्यातील मान्यताप्राप्त पक्ष, नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार यांना मतदारसंघातील १० मतदार प्रस्तावक म्हणून असणे बंधनकारक राहील.

प्रस्तावक अशिक्षीत असल्यास, त्यांनी त्यांचा अंगठा (ठसा) हा निवडणूक निर्णय अधिकारी किंवा विनिर्दिष्ट सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या उपविभागीय अधिकारी दर्जापेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्यासमोर जाऊन त्यांच्याकडून प्रमाणित करुन घेणे बंधनकारक राहील.

प्रपत्र-२६ मधील शपथपत्र न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग किंवा नोटरी पब्लिक किंवा उच्च न्यायालयाने शपथपत्र करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या शपथ आयुक्त यांचेसमोर केलेले असणे बंधनकारक राहील. शपथपत्राच्या प्रत्येक पृष्ठावर उमेदवाराची (अभिसाक्षीची) स्वाक्षरी आवश्यक आहे. या व्यतिरिक्त शपथपत्राच्या प्रत्येक पृष्ठावर नोटरी किंवा शपथ आयुक्त किंवा दंडाधिकारी ज्यांच्या समक्ष शपथपत्र सत्यापित केले गेले असल्यास त्यांचा शिक्का असणे आवश्यक राहील.

नामनिर्देशनपत्रासोबत विहित नमुन्यातील शपथपत्र हे १०० रुपयांच्या मुद्रांक कागदावर देणे बंधनकारक राहील. शपथपत्रातील सर्व माहिती किंवा रकाने पूर्णपणे भरलेले असावे. शपथपत्रातील माहिती टिक, डॅश केलेली ग्राह्य धरली जाणार नसून त्यामध्ये निरंक (निल) किंवा लागू नाही (नॉट ॲप्लिकेबल) अशी स्पष्ट माहिती नमूद करणे बंधनकारक राहील.

उमेदवारांनी मागील १० वर्षाच्या कालावधीत शासनाने वाटप केलेल्या निवासस्थानाचा ताबा घेतला असल्यास, शासकीय निवासस्थानाचे भाडे, विद्युत, पाणीपट्टी, दूरध्वनी आकारणी केल्याबाबत संबंधित यंत्रणेचे ‘ना देय प्रमाणपत्र’ सादर करणे बंधनकारक राहील.

राजकीय पक्षाच्या उमेदवाराने प्रपत्र ‘ए’ आणि ‘बी’ यांची मूळ शाईची स्वाक्षरीत प्रत पक्षाचे मोहोरेसह नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करणे बंधनकारक राहील.

सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम २५ हजार रुपये व उमेदवार अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील असल्यास १२ हजार ५०० रुपये भरल्याची पावती किंवा चलनाची प्रत नामनिर्देशनपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत जात, जमात प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत सादर करावी. अनामत रक्कम रोख स्वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात स्वीकारली जाईल.

उमेदवारांनी निवडणूकीसाठी नव्याने स्वतंत्र बँक खाते उघडणे बंधनकारक राहील. इतर कोणतेही बँक खाते ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीव्यतिरिक्त इतर कोणतेही व्यवहार असू नयेत. सदरील बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या कमीत कमी एक दिवस अगोदर उघडलेले असावे. नामनिर्देशनपत्रासोबत बँकेच्या पासबुकची किंवा बँक खात्याच्या व्यवहाराचा तपशील छायांकित प्रत सादर करावी.

उमेदवाराचे छायाचित्र पांढऱ्या किंवा फिकट पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवरील पूर्ण चेहरेपट्टी असलेले स्टॅम्प साईज २ से.मी. X २.५ से.मी. आकाराचे अलीकडच्या काळातील असावे. (मागील लगतच्या तीन महिन्यातील छायाचित्र असावे). निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषाप्रमाणे नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील नमूद जागी छायाचित्र चिटकवावे. उमेदवारांनी ५ छायाचित्र स्वतंत्र दाखल करावेत. छायाचित्रावर, पाठीमागे नाव नमूद करुन स्वाक्षरी करणे बंधनकारक राहील. छायाचित्र दाखल करताना भारत निवडणूक आयोगाचे विहित नमुन्यातील घोषणापत्र दाखल करावे.

नामनिर्देशनपत्र दाखल करता वेळी येणारी वाहने, व्यक्ती, मिरवणूक व इतर बाबी यावर होणारा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात बंधनकारक राहील. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयीन परिसरात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची उमेदवारांनी किंवा त्यांचे प्रतिनिधींनी दक्षता घ्यावी.

ह्या सर्वसाधारण स्वरुपाच्या असून नामनिर्देशनपत्र दाखल करताना भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व तरतूदीनुसार परिपूर्ण नामनिर्देशनपत्र भरण्याची व त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे दाखल करण्याची अंतिम जबाबदारी ही उमेदवाराची राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिली आहे.
००००

मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरण्यात येणार

मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरण्यात येणार

मुंबई, दि. 10 : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून 19, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र याशिवाय या पुराव्यांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना माहिती- चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात दोन विविध घटनांमध्ये ६५ लाख रुपयांची रोकड आणि वाहन जप्त

जिल्ह्यात दोन विविध घटनांमध्ये ६५ लाख रुपयांची रोकड आणि वाहन जप्त

पुणे दि.१०- जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून भरारी पथकाद्वारे आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस पथक आणि भरारी पथकांद्वारे दोन विविध घटनांमध्ये सुमारे ६५ लाखांची रोकड आणि एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.

आचारसंहिता काळात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही. भरारी पथकांतर्फे विविध ठिकाणी जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी भोसरी एममआयडीसी पोलीस स्टेशन जवळील सी सर्कल जवळ ८ एप्रिल रोजी मध्यरात्री फॅन्सी नंबर प्लेट असलेली आणि संशयास्पदरितीने फिरणारी काळ्या रंगाची फॉरच्यूनर गाडी आढळून आली. पोलीसांनी अधिक तपास करून गाडीतून १३ लाख ९० हजाराच्या ५०० रुपयांच्या नोटा आणि ३० लाख रुपये किंमतीचे वाहनही पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त केले आहे.

तर दुसऱ्या एका घटनेत १० एप्रिल रोजी दुपारी शिरुर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना शिरुर नगर परिषद क्षेत्रातील कमान पूलाजवळ एका खाजगी वाहनातून ५१ लाख १६ हजाराची रक्कम नेली जात असल्याचे पाहणीत आढळून आले. याबाबत माहिती मिळताच भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी प्राप्तिकर विभागाला याबाबत माहिती दिली. सदर रक्कम कोषागारात ठेवण्यात आली असून प्राप्तिकर विभागाच्या चौकशीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे.
०००

देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे मूळ संकल्पना पुण्याची; पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

img 20240409 wa0044
पुणे, दि. ८: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कमी मतदान असलेल्या शहरांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांत मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून असा उपक्रम देशात प्रथमच राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची मूळ संकल्पना पुणे जिल्ह्याची असून पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदार संघांच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदार संघाची अधिसूचना १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे तर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १९ एप्रिल २०२४ अशी आहे. बारामती मतदार संघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ एप्रिल आहे. पुणे, शिरुर आणि मावळ मतदार संघांची अधिसूचना प्रसिद्धी १८ एप्रिल रोजी, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत २५ एप्रिल तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत २९ एप्रिल २०२४ अशी आहे.

आजपर्यंत पुणे जिल्ह्यात ४३ लाख २८ हजार ९५४ पुरूष, ३९ लाख ६३ हजार २६९ स्त्री तर ७२८ तृतीयपंथी अशा एकूण ८२ लाख ९२ हजार ९५१ मतदारांची नोंद झाली आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. ६, आणि स्थलांतरणासाठी अर्ज क्र. ८ सादर करण्याची अद्यापही संधी असून बारामती मतदार संघात ९ एप्रिलपर्यंत तर अन्य तीन मतदार संघात १५ एप्रिलपर्यंत आलेल्या अर्जांवर निवडणूक प्रशासनाकडून कार्यवाही केली जाणार आहे. अंतिम मतदारसंख्या त्यावेळी निश्चित होईल.

सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ५ किंवा ५ पेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेल्या इमारतीमध्ये वाहनतळाची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पाळणाघर, स्त्रीयांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह आदी ठळक सुविधांसह अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी शहरी भागात प्रत्येक वॉर्ड कार्यालयात मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट वितरणाचे कामकाज कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण सुरू झाले आहे.

मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात तर शिरूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव (कोरेगाव) औद्यागिक वसाहतीतील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्राची प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, अग्नीशमन यंत्रणा आदी विभागांनी सुरक्षतेच्यादृष्टिने संयुक्त पाहणी केली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदार संघात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. निवडणूकीच्या कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असून लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

इंदापूर येथे निवडणुकीकरीता नियुक्त अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

img 20240405 wa0804(1)

इंदापूर, दि.५: इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे, तहसीलदार इंदापूर श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता नियुक्त सुमारे २ हजार ५०० अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी इंदापूर येथे दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.या प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम यंत्र हाताळणे, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे अभिरूप मतदान, मतदानाच्यावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांबाबतही माहिती देण्यात आली. मतदानाच्यावेळी निवडणूक आयोगांच्या सूचनांबाबतही यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

इंदापूरचे उपअधीक्षक भूमी अभिलेख रवींद्र पिसे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक विजयकुमार आतार यांनी केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, इतर सहायक कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले.

*इंदापूर येथे संकल्पपत्र लेखन*
मतदार जागृती मंचाच्यावतीने जिल्हा परिषद शाळा इंदापूर क्र. ५ तसेच विठ्ठलराव थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, भिगवण येथे विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र लिहून घेण्यात आले. या संकल्पपत्रांवर पालकांकडून स्वाक्षरी घेवून विद्यार्थी त्यांना मतदानासाठी आवाहन करणार आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या परिचितांकडूनही संकल्पपत्र भरून घ्यावे अशा सूचना विस्तार अधिकारी संजय रुईकर आणि संजय खळदकर यांनी दिल्या.

लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ

लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ

पुणे, दि. ५: जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ८ हजार ३८२ मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रकिया करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रुपाली आवळे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरवले आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ११ हजार ८९८ बॅलेट युनिट, ११ हजार ८९८ कंट्रोल युनिट आणि १२ हजार ७४९ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.

सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत. या यंत्रांपैकी सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या १४१ टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १५२ टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूममध्ये आणि पुणे लोकसभा मतदारसंघासाठीची यंत्रे भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. त्या-त्या विधानसभा मतदारसंघात देखील मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे डॉ.दिवसे यांनी सांगितले.

सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे योगेश बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे गणेश नलावडे, भारतीय जनता पार्टीचे राजाभाऊ शेडगे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अशोक कांबळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रमेश सकट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित गव्हाणे, शिवसेनेचे राजू गवळी आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!