Home Blog Page 82

राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षांचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे न करता भारतीय जनता पार्टी महायुतीला जाहिर पाठिंबा – ॲड.श्रीहरी बागल

मायणी :

मुंबई राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल यांनी वीस दिवस महाराष्ट्र दौरा करून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भ येथील पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेटी घेऊन मेळावे घेऊन महायुती चे काम केले आहे.पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर केला की, आपण लोकसभा निवडणूक लढवणार आहोत.हा मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन श्रीहरि बागल यानी महाविजय २०२४ साकार करण्यासाठी सर्वांना दौरा करत असताना एकत्र करुन नियोजन बद्ध काम केले आहे.यावेळी बागल साहेब म्हणाले की,राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीचा धर्म पाळणे आपले कर्तव्य आहे.व आपण महायुती चे उमेदवार भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
आपल्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज असल्याने काही नाराज लोकांनी राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्ष लोकसभा २०२४ निवडणूक स्वबळावर लढणार असा संभ्रम निर्माण केला होता.तो संभ्रम दुर करून पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.काल पहिल्या टप्प्याचे मतदान चांगल्या प्रकारे झाले आहे. तसेच उर्वरित दुसरा,तिसरा,चौथा व महाराष्ट्रातील शेवटचा पाचवा टप्प्यातही भरघोस मतदान महायुतीचा उमेदवारांना करुन लोकशाहीचा उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षांच्या चिन्हावर कोणताही उमेदवार लोकसभा निवडणूक २०२४ लढवणार नाही.राज्यात अनेक ठिकाणी पक्षाकडे सक्षम उमेदवार असतानाही पक्षाने स्वतः निवडणूक न लढवता महायुतीचे काम करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब परत तिसऱ्या वेळेसही पंतप्रधान होण्यासाठी मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व मा.श्री.आमदार प्रसादजी लाड साहेब समन्वयक (पक्ष व सरकार) यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचा महाविजय २०२४ साकार करण्यासाठी काम करणार आहे असे आश्वासन या वेळेस सर्वांना दिले आहे .

युवकांनी उत्साहाने लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

मतदार जागृतीसाठी आयोजित भित्तीपत्रक प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात उद्घाटन

पुणे,दि. २२ : अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीचा संदेश देण्यासाठी रेखाटलेल्या भित्तीपत्रक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले. युवकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हावे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन यावेळी डॉ.पुलकुंडवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय व भारतीय कला प्रसारिणी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे, भारतीय कला प्रसारिणीचे पृथ्वीराज पाठक, प्राचार्य राहूल बळवंत उपस्थित होते.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशातील नागरिकांना मताधिकार मिळाल्याने मतदानाचा दिवस हा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. प्रत्येक नागरिकाला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होता यावे व पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. मतदानावेळी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागरिकांनीदेखील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा न करता लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करावा. समाजामध्ये बदल घडविण्याची ताकद तरुण पिढीमध्ये असून नवमतदारांनी प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ.पुलकुंडवार यांनी कलेच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकाला मतदानाचे आवाहन करणारे संदेश दिल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांच्या मनात निश्चितपणे मतदान करण्याची भावना निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. दिवसे म्हणाले, कला हे प्रभावी माध्यम असल्याने कलेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत प्रभावीपणे संदेश पोहोचविता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार केलली भित्तीपत्रके मतदारजागृतीसाठी उपयुक्त ठरतील. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या चित्रांतून मतदानाचा संदेश अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचेल. अन्य माध्यमांचा उपयोग करून ही कलाकृती विविध शासकीय कार्यालयात प्रदर्शित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सजग नागरिक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी व्हावे, असे सांगून प्रत्येक पात्र मतदाराने येत्या १३ मे रोजी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे यांनी मतदान जनजागृतीसाठी स्वीप मार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच भारतीय कला प्रसारणीचे श्री. पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी तसेच विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रके तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

मयूर रघुनाथ शिंदे यांची भाजपा युवा मोर्चा इंदापूर शहराध्यक्षपदी नियुक्ती

img 20240422 wa0001

मयुर रघुनाथ शिंदे राहणार इंदापूर शहर टेभुर्णी नका यांची इंदापूर शहर अध्यक्ष पदी मा.श्री.हर्षवर्धनजी पाटील साहेब व भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष्य अंकिता पाटील ठाकरे यांच्या मार्गदर्शना खाली नियुक्ती पत्र देऊन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पदी निवड करण्यात आली.यावेळेस युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थतीत होते.

सुलभ आणि शांततापूर्ण मतदानासाठी आवश्यक प्रयत्न करा-एस.चोक्कलिंगम

img 20240421 wa0040
पुणे, दि. २१: जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे आणि मतदारांना सुलभपणे तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे; त्यादृष्टीने मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा करण्यासोबत त्याची माहिती मतदारांना द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षक आनंधी पालानीस्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, निवडणूक खर्च निरीक्षक विजय कुमार, निवडणूक पोलीस निरीक्षक जॉएस लाल्लरेमावी, मावळ मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, शिरुर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आदी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुका मुक्त, निर्भय, व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे, असे सांगून श्री. चोक्कलिंगम म्हणाले, एकापेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी मतदार मदत कक्ष ठेवण्यात यावा. मतदारांना रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी शक्य असल्यास शहरी भागात प्रतीक्षा कक्षाची सुविधा करावी. उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींना मतदानाच्या दिवशी कामगारांना मतदानासाठी पगारी रजा देण्याच्या सूचना द्याव्यात.

निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यावर विशेष लक्ष ठेवावे. कोठेही अशी घटना लक्षात आल्यास वेळीच उपाययोजना करा. मतदान संबंधी सर्व अहवाल वेळेत सादर करावे. वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवावे. सी-व्हिजिलवर प्राप्त तक्रारींचे १०० मिनिटात निवारण करावे. मतदानाच्या वेळी येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी मतदान केंद्र पथकाला मतदान आणि ईव्हीएमविषयक सूक्ष्म बाबींचे प्रशिक्षण द्यावे.

निवडणुकीत पैसा, मद्य तसेच इतर कोणत्याही स्वरुपातील आमिषाचे वाटप तसेच बळाचा वापर होऊ नये यासाठी विशेष लक्ष द्यावे. दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. समाजमाध्यमाद्वारे चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, आदी सूचना त्यांनी दिल्या.

निवडणूक विषयक नियमांचे उल्लंघन कोणत्याही घटकाद्वारे होऊ नये यासाठी पोलीस विभागासोबत सर्व संबंधित विभागांनी दक्ष राहावे. कमी मतदान असलेल्या १० मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित करून हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांना विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना द्याव्यात. मतदार माहिती स्लीप आणि माहिती पत्रकाचे वाटप वेळेवर करावे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यात महानगरपालिका आणि नगरपालिकांची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी आवश्यक प्रयत्न करावे, असेही श्री.चोक्कलिंगम म्हणाले.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, श्री.चौबे आणि पोलीस अधीक्षक श्री.देशमुख यांनी पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सदारीकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. पोलीस विभागाच्या सहकार्याने निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

मावळ, बारामती आणि शिरूर मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही निवडणूक तयारीची माहिती सादर केली.

बैठकीनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामाला भेट देऊन मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली.

मावळ मतदारसंघात बोर येथील अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई

पुणे, दि. १९ : मावळ विधानसभा मतदारसंघात मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गालगत बोर (ता.मावळ) येथील अनधिकृत जाहिरात फलकावर भरारी पथकाद्वारे कारवाई करण्यात आली असून विद्रुपीकरण विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासगी जागेत राजकीय मजकूर असलेला विनापरवाना १२० बाय ६० आकाराचा जाहिरात फलक आढळून आला आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीच्या व जमीन मालकाविरोधात विद्रुपीकरण विरोधी कायदा १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरारी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक महेश जगताप, किशोर शेवंती, सुनील शिंदे यांच्यासह गणेश गावडे, प्रमोद काळे यांनी ही कारवाई केली.

सर्व राजकीय पक्ष, प्रतिनिधी व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. परवानगीशिवाय प्रकारचे जाहिरात फलकावर मजकूर प्रसिद्ध करू नये. विनापरवानगी जाहिरात फलक लावल्याचे आढळल्यास संबंधिताविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.

गडचिरोलीत १११ वर्षांच्या आजीचे केले मतदान, तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

img 20240420 wa0004
गडचिरोलीत आज मतदान पार पडलं. मतदान केंद्रावर येत १११ वर्षीय आजींनी मतदान केलं.👉🟥🟥👉गृह मतदानाची सोय नाकारत आजींनी केंद्रावर येत मतदानाची हक्क बजावला.*

*गडचिरोली :- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली – चिमूर मतदारसंघाचा समावेश असून शुक्रवारी १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली होती. लोकशाहीच्या उत्सवात सर्वजण सहभागी झाले होते. मतदानासाठी मतदार घराबाहेर पडताना दिसत होते. अशात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत एका १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले.*

*👉🟥🟥👉फुलमती बिनोद सरकार (वय १११) असे त्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. फुलमती सरकार यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजी झाला. आजी तब्बल १११ वर्षांच्या असल्याने त्यांना चालता येत नव्हतं आणि ऐकू सुद्धा येत नव्हतं. आधारासाठी आपल्या नातवाच्या बरोबरीने दुचाकीवर बसून त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन स्वतः मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. आजींच्या मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता. तर मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या तरुण वर्गासाठी १११ वर्षांच्या आजींचा हा उत्साह आदर्शवत होता.*

*👉🔴🔴👉भारत निवडणूक आयोगाने यंदा पहिल्यांदाच ८५ वर्षावरील मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार १० ते ११ एप्रिल या कालावधीत गृह मतदान प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली. मात्र काही मतदारांनी प्रत्यक्ष केंद्रावरच मतदान करण्याचा निर्णय घेतला. ते मतदार आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. त्यात फुलमती बिनोद सरकार या आजींचा देखील समावेश होता.*

*👉🟥🟥👉लोकशाहीच्या उत्सवात तब्बल १११ वय असलेल्या या आजींनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन मतदान करणे ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी गृह मतदान नाकारून लोकशाहीच्या उत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेतला. आजींना मतदान केंद्रापर्यंत व्हील चेअरने आणण्यात आलं होतं. यावेळी त्यांना त्यांच्या नातवंडांनी, गावातील नागरिक आणि महसुलचे कर्मचाऱ्यांनी मदत केली.*

*👉🛑🛑👉कोरोना काळात लसीकरणातही आजीने घेतलेला पुढाकार*

*फुलमती सरकार यांनी १८ जानेवारी २०२२ रोजी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देखील गोविंदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले होते. त्या त्या १०९ वर्षांच्या होत्या. त्यावेळी त्यांनी युवा पिढीला मतदानासाठी पुढे येण्याचं आवाहन देखील केलं होतं. एवढंच काय तर देशावर कोरोना महामारीचा संकट असताना सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिकांचा विरोध होता. या आजींनी लसीकरणातही पुढाकार घेऊन स्वतः लस घेत लसीकरणासाठी सर्वांनी पुढे यावे असंही आवाहन केलं होतं.*

error: Content is protected !!