Home Blog Page 81

राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील मतदान; अमरावती, अकोला, परभणी, वर्ध्यात ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड?

*नागपूर:- राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, मतदानाला सुरुवात होताच काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला.*

*👉🔴🔴👉अमरावती, अकोला, परभणी आणि वर्ध्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर येथील शाळा क्रमांक १९ मधील खोली क्रमांक ५ मध्ये ईव्हीएम बंद पडलं. जवळपास १५ मिनिटे वोटिंग मशीन बंद पडलं होतं. त्यामुळे मतदारांचा चांगलाच खोळंबा झाला होता. अखेर ईव्हीएममधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. सध्या अमरावतीमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. दुसरीकडे वर्ध्यात देखील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरू झाल्यानंतर अचानक ईव्हीएम मशीन बंद पडलं. वोटिंग मशीन बंद पडताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. मतदान थांबल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.*

*👉🅾️🅾️👉अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. उमरा गावातील बुथ क्रमांक ३३३ मधील वोटिंग मशीन अचानक बंद पडलं. त्यामुळे साडेसात वाजेपर्यंत मतदानाला सुरुवात झालेली नव्हती. ईव्हीएम बदलण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. परभणी शहरातील महात्मा फुले महाविद्यालयातील 172 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन सात वाजल्यापासून बंद पडले आहे. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी सुरू होणार मतदान खोळंबलं आहे. सदर मशीन तांत्रिक कारणाने बंद पडली असून 45 मिनिटांपासून मतदान प्रक्रिया थांबली आहे. महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्पात विदर्भातील ५ जागांवर मतदान झालं होतं. यावेळी बऱ्याच नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती. दरम्यान, आज होणाऱ्या मतदानाला मतदार कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.*

राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाकडून जोरदार हालचालींना वेग आला आहे,पक्षप्रमुख ॲड.श्रीहरी बागल

img 20240426 wa0022
उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब व समन्वयक मा.प्रसादजी लाड साहेब यांच्या मार्गदर्शनाने महायुतीतील सर्व उमेदवारांसह छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना सन्मानाने लोकसभेत पाठवण्यासाठी राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाकडून जोरदार हालचालींना वेग आला आहे,पक्षप्रमुख ॲड.श्रीहरी बागल यांनी आज सातारा येथील जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी बागल म्हणाले महायुतीला प्रत्येक उमेदवारास भरघोस मतांनी विजयी करणे आपले कर्तव्य असून साताऱ्यातही राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाचे अनेक गवागावात पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचाराच्या कामाला लागलेले आहेत त्या मुळे आपण साताऱ्यातून मोठ्या लीड ने विजयी होणार असे आश्वासन दिले व महाराष्ट्रभरातून महायुती महाविजय २०२४ साकार करून देशाचे लाडके व यशस्वी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून हायट्रीक मारण्यासाठी राष्ट्रीय स्वराज्य सेना सज्ज आहे.
img 20240426 wa0023
img 20240426 wa0023

बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी जनजागृतीवर भर द्या-कविता द्विवेदी

img 20240425 wa0095
पुणे, दि. 25: मतदारसंघात स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याकरीता विविध उपक्रम राबवून जनजागृती करावी; याकरीता स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, बचत गटातील महिला आदी घटकांचा सक्रीय सहभाग घ्यावा, अशा सूचना बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिल्या.

विधानभवन येथे आयोजित बारामती लोकसभा मतदारसंघातील समन्वयक अधिकारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी समन्वयक अधिकारी हनुमंत आरगुंडे, समिक्षा चंद्राकर, अतिरिक्त समन्वयक अधिकारी विजय मुळीक, सुप्रिया डांगे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक चरणसिंह राजपूत आदी उपस्थित होते.

श्री. द्विवेदी म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या मतदान केंद्रावर येत्या ७ मे रोजी अधिकाधिक मतदान होईल, याबाबत नियोजन करावे. मतदारांना मतदान केंद्र आणि केंद्रावरील सुविधांबाबत तसेच मतदान प्रक्रियेविषयी माहिती देण्यात यावी. मतदार चिट्ठीचे वेळेत वितरण करावे. याबाबत नोंदवही अद्ययावत ठेवावी. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर विशेष लक्ष देऊन काम करावे. सहा पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात.

लोकसभा मतदारसंघात भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), आदर्श आचारसंहिता कक्ष (एमसीसी) पथकांने देण्यात आलेल्या जबाबदारीप्रमाणे अधिक प्रभावीपणे कामे करावीत. मतदारसंघात आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्लघंन होत असल्यास त्याबाबत कडक कारवाई करावी. केलेल्या कारवाईबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा. निवडणुका निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असेही श्रीमती. द्विवेदी म्हणाल्या.

श्री. अरगुंडे म्हणाले, निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठीच्या रोकड, मद्य, तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस प्रतिबंध करावा, अशा घटनांवर विशेष लक्ष ठेऊन कारवाई करावी. आचारसंहिता भंगाबाबत घटनांवर लक्ष द्यावे. निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घ्यावी, सी-व्हिजिल आणि नियंत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करावी. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईमध्ये सातत्य ठेवावे. आवश्यकता भासल्यास पथके वाढवावी. कारवाईच्या अनुषंगाने आवश्यतेनुसार सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी, असे श्री. अरगुंडे म्हणाले.

श्रीमती चंद्राकर म्हणाल्या, मतदारांना मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडण्यासाठी प्रोत्साहित करावे. स्वीप उपक्रमांअंतर्गत विविध यशस्वी उपक्रम राबवावेत.
0000

बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न

img 20240425 wa0095
पुणे,दि. २५: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी असलेल्या सर्व मतदान यंत्रांची निवडणूक निरीक्षक श्रीमती आनंदी पालानीस्वामी यांच्या उपस्थितीत विधानभवन येथील सभागृहात संगणकीय पद्धतीने मतदान केंद्रनिहाय द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, समन्वयक अधिकारी हनुमंत आरगुंडे, समिक्षा चंद्राकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रुपाली आवले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक समन्वयक अधिकारी विजय मुळीक, सुप्रिया डांगे, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बारामती लोकसभा मतदार संघात एकूण २ हजार ५१६ मतदान केंद्र असून त्यासाठी आवश्यक ९ हजार ५८ बॅलेट युनिट, ३ हजार ५६९ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८२५ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. या यंत्रांपैकी सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या १२० टक्के बॅलेट आणि १४१ टक्के कंट्रोल युनिट, तर १५२ टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रीयेची माहिती देण्यात आली. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रूममध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी स्तरावर ५ एप्रिल रोजी मतदान यंत्रांच्या प्रथमस्तरीय सरमिसळनंतर बारामती लोकसभा मतदार संघासाठी ३ हजार ५६९ बॅलेट युनिट, ३ हजार ५६९ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८२५ व्हीव्हीपॅट यंत्र वितरित करण्यात आले आहेत.

बारामती लोकसभा संघात ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने आणि नोटाचा पर्याय लक्षात घेता या मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी तीन बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार आहे. त्यानुसार २३ एप्रिल रोजी पूरवणी सरमिसळ प्रक्रीयेद्वोर आवश्यक बॅलेट युनिट वितरीत करण्यात आले आहेत. सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत, असे श्रीमती द्विवेदी यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान दोन मान्यवरांना पद्म भूषण, तर तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

दोन मान्यवरांना पद्म भूषण, तर तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली, 22: देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणा-या ‘पद्म पुरस्कार-2024’ चे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज झाले. यामध्ये महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यामध्ये माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, दिग्गज अभिनेत्री वैजयंतीमाला बाली, अभिनेता मिथुन चक्रवर्ती , सुप्रसिध्द गायिका उषा उत्थप या काही मान्यवरांचा समावेश आहे. तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परराष्ट्र मंत्री, एस.जयशंकर तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते. प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील पाच मान्यवरांना पुरस्कार आज प्रदान करण्यात आले.

आज पार पडलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या पहिल्या टप्पयात, महाराष्ट्र राज्यातून पाच मान्यवरांना विविध क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल गौरविण्यात आले. यात माजी केंद्रीय मंत्री श्री राम नाईक यांना सार्वजनिक सेवा क्षेत्रात, श्री दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त यांना कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर डॉ. मनोहर कृष्ण डोळे यांना औषधी, डॉ. जहीर इसहाक काझी यांना साहित्य व शिक्षण क्षेत्रात तर श्रीमती कल्पना मोरपारिया यांना व्यापार व उद्योग क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.

*महाराष्ट्रातील पद्पुरस्कार प्राप्त मान्यवरांविषयी*

*राम नाईक*- माजी केंद्रीय मंत्री राहिलेले श्री राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री राम नाईक यांनी वयाच्या 35 व्या वर्षी नोकरी सोडली आणि त्यानंतर ते राजकारणात गेले. खासदार व केंद्रीय मंत्री व राज्यपाल अशी पदे त्यांनी भुषविली असून, 1989, 1991, 1996, 1998 व 1999 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेआहेत. त्यांनी उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल पदही भुषविले आहे. त्यांच्या अथक प्रत्यनांमुळे उत्तर प्रदेशला स्थापनेनंतर 68 वर्षांनी उत्तर प्रदेश दिवस साजरा करण्यास मिळाला.

*राजदत्त* – श्री दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त या नावाने प्रख्यात असलेले राजदत्त यांना त्यांनी दिलेल्या कला क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करणत आले. त्‍यांच्या चित्रपटसृष्टीतील 50 वर्षांपेक्षा जास्त कामगिरीचा हा मोठा सन्मान आहे. राजदत्त यांनी आजवर तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे प्रथम पुरस्कार 8 वेळा, 3 द्वितीय आणि 2 तृतीय असे तब्बल 13 राज्य चित्रपट पुरस्कार पटकावले आहेत. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मधुचंद्र’ या पहिल्याच चित्रपटाला त्यांना उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. यासोबतच ‘राघूमैना’, ‘देवकीनंदन गोपाला’, ‘माझं घर माझा संसार’, ‘शापित’, ‘पुढचं पाऊल’, ‘हेच माझं माहेर’, ‘अरे संसार संसार, ‘मुंबईचा फौजदार’ या सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन केले आहे. 92 वर्षांच्या राजदत्त यांनी चित्रपटसृष्टीत 50 वर्षांपेक्षा अधिक वर्षांचे योगदान आहे.

*डॉ. जहीर इसहाक काझी –* डॉ. झहीर काझी यांना त्यांनी साहित्य व शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने आज गौरविण्यात आले. गेल्या 40 वर्षांपासून ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत, ज्यात 150 वर्षे जुन्या अंजुमन-इ-इस्लामचे प्रमुख म्हणून 13 वर्षांचा समावेश आहे, ज्यात सुमारे 97 शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, अनाथाश्रम आणि इतर शैक्षणिक संस्थेमार्फत चालतात. नवीन पनवेल येथे 10.5 एकर जागेवर पसरलेल्या अभियांत्रिकी, आर्किटेक्चर आणि फार्मसी आणि पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर कार्यक्रम देणारे एकात्मिक तांत्रिक कॅम्पस तसेच विधी महाविद्यालयाची स्थापना करण्याचे श्रेय त्यांना मिळाले आहे. त्यांनी गोवा मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि शहरातील नायर हॉस्पिटलमधून एमडी (रेडिओलॉजी) केले. सराव करणारे रेडिओलॉजिस्ट, काझी हे नागपाडा येथील प्राइम डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक आहेत. त्यांनी यापूर्वी व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणून मुंबई विद्यापीठ सिनेटचे सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वेळा शिक्षण अल्पसंख्याक संघाच्या समस्या आणि धोरणांवर चर्चा करण्यासाठी आणि जॉर्डनच्या राजाच्या भेटीदरम्यान आमंत्रित केले आहे.

*कल्पना मोरपरिया* – श्रीमती कल्पना मोरपारिया यांनी व्यापार व उद्योग क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी आज पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रीमती कल्पना मोरपरिया या एक भारतीय बँकर आहेत. आयसीआयसीआय बँकेत त्यांनी दीर्घ सेवा दिली असून,सध्या त्या जेपी मॉर्गन इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी अनेक आघाडीच्या भारतीय कंपन्यांच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून काम केले आहे. ते बॉम्बे विद्यापीठातून कायद्याचे पदवीधर आहेत आणि त्यांनी भारत सरकारने स्थापन केलेल्या अनेक समित्यांवर काम केले आहे. फॉर्च्युन मासिकाने आंतरराष्ट्रीय व्यवसायातील पन्नास सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक म्हणून त्यांनी स्थान मिळविले आहे.

*डॉ मनोहर कृष्ण डोळे –* औषधी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत आज डॉ डोळे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ डोळे हे धर्मादाय नेत्र रुग्णालय चालवतात, त्याची स्थापना 1982 मध्ये झाली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातील विविध भागात दर महिन्याला 10 ते 12 मोफत नेत्रशिबिरांचे आयोजन करतात. वर्षानुवर्षे, त्यांच्याद्वारे चालवलेले फाउंडेशनमार्फत, नारायणगाव, पुणे आणि आसपासच्या वंचित ग्रामीण तसेव आदिवासी लोकांना नेत्रसेवा पुरवत .असतात. नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे.

देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा/कार्यक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ दिला जातो; उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या पुरस्कारांची घोषणा केली जाते.

हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी मार्च / एप्रिलच्या सुमारास राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात प्रदान केले जातात. वर्ष 2024 साठी, राष्ट्रपतींनी 132 पद्म पुरस्कार प्रदान करायला मान्यता दिली असून, यामध्ये 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 30 महिला आहेत आणि या यादीत परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय या श्रेणीतील 8 मान्यवर आणि 9 मरणोत्तर पुरस्कारप्राप्त मान्यवरांचाही समावेश आहे.

*पद्म पुरस्कारांची यादी 2024*

*पद्मविभूषण* – वैजयंतीमाला बाली (कला), कोनिडेला चिरंजीवी (कला), एम व्यंकय्या नायडू (जनसंपर्क), बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) (सामाजिक कार्य), पद्म सुब्रमण्यम (कला)

*पद्मभूषण* – एम फातिमा बीवी (मरणोत्तर) (सार्वजनिक घडामोडी), होर्मुसजी एन कामा (साहित्य आणि अध्यापन), मिथुन चक्रवर्ती (कला), सीताराम जिंदाल (व्यवसाय आणि उद्योग), अश्विन बालचंद मेहता (वैद्यक), सत्यब्रत मुखर्जी (वैद्यकशास्त्र) सार्वजनिक घडामोडी), राम नाईक (सार्वजनिक वर्तन), तेजस मधुसूदन पटेल (औषध), ओलंचेरी राजगोपाल (सार्वजनिक वर्तन), राजदत्त (कला), तोगदान रिनपोचे (मरणोत्तर) (अध्यात्मवाद), प्यारेलाल शर्मा (कला), चंद्रेश्वर प्रसाद ठाकूर. (वैद्यक), उषा उथुप (कला), विजयकांत (मरणोत्तर) (कला), कुंदन व्यास (साहित्य आणि अध्यापन – पत्रकारिता), यंग लिऊ (व्यवसाय आणि उद्योग)

*पद्मश्री* – पार्वती बरुआ : भारतातील पहिली महिला माहुत, जागेश्वर यादव : आदिवासी कल्याण कार्यकर्ता,चामी मुर्मू: आदिवासी पर्यावरणवादी, गुरविंदर सिंग: दिव्यांग सामाजिक कार्यकर्ता,सत्यनारायण बेलेरी: कासरगोड, केरळ येथील भात शेतकरी, संगठनकिमा : आयझॉल येथील सामाजिक कार्यकर्त्या, हेमचंद मांझी: पारंपारिक औषधी व्यवसायी, दुखू माझी: पश्चिम बंगालमधील आदिवासी पर्यावरणवादी, के चेल्लम्मल: दक्षिण अंदमानमधील सेंद्रिय शेतकरी, यानुंग जामोह लेगो: पूर्व सियांग आधारित हर्बल औषध तज्ञ , सोमन्ना: म्हैसूर, कर्नाटक येथील आदिवासी कल्याण कर्मचारी , सर्वेश्वर बसुमातारी: आसाममधील चिरांग जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी, प्रेमा धनराज: प्लास्टिक सर्जन (पुनर्रचनात्मक) आणि सामाजिक कार्यकर्त्या., उदय विश्वनाथ देशपांडे: आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक, यझदी मानेक्शा इटालिया: प्रख्यात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, शांती देवी पासवान आणि शिवन पासवान: जागतिक स्तरावर ओळखले जाणारे गोडना चित्रकार, रतन कहार: पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील भादू लोक गायक, बालकृष्णन सदनम पुथिया वीटील: कल्लूवाझी कथकली नृत्यांगना ६० वर्षांहून अधिक काळ कलेचा सराव करत आहे., उमा माहेश्वरी डी: हरिकथेची पहिली महिला व्याख्याता, गोपीनाथ स्वेन: ओडिशातील गंजम जिल्ह्यातील कृष्ण लीला गायक, स्मृती रेखा चकमा: त्रिपुरातील चकमा लोईनलूम शाल विणकर, ओमप्रकाश शर्मा: मच थिएटर कलाकार 7 दशकांपासून 200 वर्ष जुन्या कलेचा सराव करत आहेत,नारायणन ईपी: कन्नूर येथील ज्येष्ठ तेय्याम लोकनर्तक, भागबत पठण: बारगढ, ओडिशा येथील सबदा नृत्य लोकनृत्य कलाकार, सनातन रुद्र पाल: पाच दशकांचा अनुभव असलेले प्रसिद्ध शिल्पकार., बद्रप्पन एम: कोईम्बतूर, तमिळनाडू येथील वल्ली ओयल कुमी लोकनृत्य कलाकार, जॉर्डन लेपचा: आसाममधील मंगन येथील लेपचा जमातीतील बांबू कारागीर., मचिहान सासा: मणिपूरमधील उखरुल येथील लोंगपी कुंभार. मातीची पारंपरिक कला जपण्यासाठी पाच दशके घालवली., गद्दम संमिया: जनगाव, तेलंगणा येथील चिंदू यक्षगानम थिएटर कलाकार.,जानकीलाल: बेहरूपिया कलाकार राजस्थानमधील भिलवाडा येथील.,दसरी कोंडप्पा: नारायणपेट, तेलंगणा येथील बुर्रा वीणा खेळाडू.,बाबू राम यादव: 6 दशकांहून अधिक अनुभव असलेले ब्रास मारोरी शिल्पकार.,नेपाळ चंद्र सूत्रधार: छाऊ मुखवटा निर्माता,खलील अहमद (कला),काळूराम बामनिया (कला) ,रेझवाना चौधरी बन्या (कला),नसीम बानो (कला),रामलाल बरेथ (कला),गीता रॉय बर्मन (कला),सोम दत्त बट्टू (कला) ,तकदिरा बेगम (कला) ,द्रोण भुयान (कला) ,अशोक कुमार बिस्वास (कला),रोहन बोपण्णा (क्रीडा),वेलू आनंदा चारी (कला) ,राम चेत चौधरी (विज्ञान आणि अभियांत्रिकी),जोश्ना चिनप्पा (क्रीडा),शार्लोट चोपिन (इतर – योग),रघुवीर चौधरी (साहित्य आणि शिक्षण), जो डी क्रूझ (साहित्य आणि शिक्षण),गुलाम नबी दार (कला), चित्त रंजन देबबर्मा (इतर – अध्यात्मवाद),राधा कृष्ण धीमान (औषध),मनोहर कृष्णा डोळे (औषध) ,पियरे सिल्व्हेन फिलिओजात (साहित्य आणि शिक्षण), महाबीर सिंग गुड्डू (कला), अनुपमा होस्केरे (कला),राजाराम जैन (साहित्य आणि शिक्षण),यशवंत सिंग कथोच (साहित्य आणि शिक्षण),जहिर आय काझी (साहित्य आणि शिक्षण),गौरव खन्ना (क्रीडा),सुरेंद्र किशोर (साहित्य आणि शिक्षण- पत्रकारिता),श्रीधर माकम कृष्णमूर्ती (साहित्य आणि शिक्षण),सतेंद्रसिंग लोहिया (क्रीडा),पूर्णिमा महातो (क्रीडा),राम कुमार मल्लिक (कला),चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (औषध),सुरेंद्र मोहन मिश्रा (मरणोत्तर) (कला) ,अली मोहम्मद आणि गनी मोहम्मद (कला),कल्पना मोरपरिया (व्यापार आणि उद्योग), ससिंद्रन मुथुवेल (सार्वजनिक व्यवहार) ,जी नचियार (औषध),किरण नाडर (कला),पाकरावुर चित्रण नंबूदिरीपाद (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण),शैलेश नायक (विज्ञान आणि अभियांत्रिकी),हरीश नायक (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण),फ्रेड नेग्रिट (साहित्य आणि शिक्षण),हरी ओम (विज्ञान आणि अभियांत्रिकी),शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर (सामाजिक कार्य),राधे श्याम पारीक (औषध) ,दयाल मावजीभाई परमार (औषध)बिनोद कुमार पसायत (कला),सिल्बी पासाह (कला) ,मुनी नारायण प्रसाद (साहित्य आणि शिक्षण),के.एस.राजन्ना (सामाजिक कार्य),चंद्रशेखर चन्नपट्टण राजन्नाचार (औषध),रोमलो राम (कला),नवजीवन रस्तोगी (साहित्य आणि शिक्षण)

निर्मल ऋषी (कला),प्राण सभरवाल (कला), ओमप्रकाश शर्मा (कला),एकलव्य शर्मा (विज्ञान आणि अभियांत्रिकी),राम चंदर सिहाग (विज्ञान आणि अभियांत्रिकी),हरबिंदर सिंग (क्रीडा), गोदावरी सिंग (कला) ,रवि प्रकाश सिंग (विज्ञान आणि अभियांत्रिकी),शेषमपट्टी टी शिवलिंगम (कला),केथवथ सोमलाल (साहित्य आणि शिक्षण), शशी सोनी (व्यापार आणि उद्योग),उर्मिला श्रीवास्तव (कला), लक्ष्मण भट्ट तैलंग (कला),माया टंडन (सामाजिक कार्य) ,अस्वथी थिरुनल गौरी लक्ष्मीबाई थमपुरट्टी (साहित्य आणि शिक्षण),माया टंडन (सामाजिक कार्य),जगदीश लाभशंकर त्रिवेदी (कला) ,सनो वामुझो (सामाजिक कार्य) ,कुरेल्ला विठ्ठलाचार्य (साहित्य आणि शिक्षण),किरण व्यास (इतर – योग)

*****************

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.55 / दिनांक 22.04.2024

भाजपचा पहिला विजयोत्सव! लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने खाते खोलले

भाजपचा पहिला विजयोत्सव!
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने खाते खोलले
सुरज लोकसभा निवडणुक बिनविरोध*
*👉☄️☄️☄️👉तर भाजपचे एकमेव उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी*
*👉🔴🔴👉देशातील पहिला बिनविरोध विजय*

*👉🛑🛑👉स्वतंत्र भारताच्या संसदेत १८व्या लोकसभेसाठी पहिला खासदार भाजपाचा!*

*👉🟥🟥👉तर भाजपाची विजयी दौड सुरु…*

*👉🛑🛑👉सुरत(गुजरात) लोकसभा क्षेत्रातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी*

*👉🔴🔴👉मुकेश दलाल यांना विजयी प्रमाणपत्र प्राप्त झाले असून ते सुरतमधील नामवंत व्यक्ती आहेत आणि भाजपचे महासचिव आहेत.*

*👉🅾️🅾️👉👉तर मुकेश दलाल यांचे विजयाचा आनंद व्यक्त करताना सीआर पाटिल यांनी सोशल मीडिया एक्सवर अशी प्रतिक्रिया दिली आहे की,सुरत ने पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना पहिले कमळ निवडून दिले असून भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांचे अभिनंदन केले आहे.*

*👉🔴🔴👉१९८९ पासून भाजपा सुरत मतदार संघात विजय मिळवून देत असून गुजरात हा भाजपाचा गड असल्याचे मानले जात आहे.*

*सुरत:- (आबा खवणेकर कोकणचा तडाखा न्यूज):- देशभरात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. गेल्या शुक्रवारी म्हणजे १९ तारखेला पहिल्या टप्प्यासाठी १०२ मतदारसंघात मतदान झाले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्याआधी देशातील एका लोकसभा मतदारसंघातील निकाल जाहीर झाला आहे.*

*👉🛑🛑👉भाजपने गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. पक्षाचे उमेदवार मुकेश दलाल यांची या मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर या मतदारसंघातून मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार शिल्लक राहिले, ज्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली. निवडणूक आयोगाकडून याची लवकरच घोषणा केली जाईल.सुरत लोकसभा मतदारसंघातून पहिल्याच दिवशी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने येथील समीकरण बदलून गेले. त्यानंतर बीएसपीचे उमेदवार प्यारे लाल भारती यांनी देखील अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतला.*

*👉🅾️🅾️👉मुकेश दलाल हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष सीआर पाटील यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जाता. सुरत लोकसभा मतदारसंघात बिनविरोध निवड झालेले ते पहिले खासदार ठरले आहेत. सुरतमधून अन्य कोणीच उमेदवार नसल्याने अखेर मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे.आता गुजरातमधील लोकसभेच्या २५ जागांसाठी ७ मे रोजी मतदान होईल.*

जिल्हा परिषदेत मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर मतदानाबाबत जनजागृती करावी-मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील

img 20240422 wa0066
जिल्हा परिषदेत मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन

अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर मतदानाबाबत जनजागृती करावी-मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील

पुणे,दि. २२: पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर नागरिकांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, स्वीप समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, विजयसिंह नलावडे, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई आदी उपस्थित होते.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनातील अधिकारी आपली जबाबदारी चोख पार पाडीत आहेत, असे सांगून श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी तर मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. राज्यात मतदार संख्येच्यादृष्टीने पुणे हा मोठा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे.

जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली सतरा ते आठरा हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. प्रशासनात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची अधिक जबाबदारी असून इतरांना मतदानाचे आवाहन करताना त्याची सुरूवात आपण स्वत: मतदान करून करावी. गावातील ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करून गावातील जास्तीत जास्त नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करावे. ग्रामसेवकांनी गावातील दिव्यांग, वयोवृद्ध नागरिकांचे मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न करावे.

श्रीमती तांबे म्हणाल्या, गेल्या सहा सात महिन्यापासून जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचेही यात खूप मोठे योगदान आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदार असलेल्या पुणे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी खूप कमी असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदानावेळी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून या तसेच अन्य सुविधांची माहिती देऊन मतदारांना मतदानाचे आवाहन करावे, असेही त्या म्हणाल्या.

श्रीमती कडू म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून नव मतदारांची नोंदणी करून घेतली आहे. महिलांची टक्केवारी वाढावी यासाठी महिला व बाल कल्याण विभाग व बचत गटांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. शिक्षण विभागामार्फत शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याविषयी पत्रलेखनातून जनजागृती करण्यात येत आहे. सर्व विभागप्रमुखांना त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा याबाबत पत्र देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली.

error: Content is protected !!