Home Blog Page 80

जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पुणे, दि. २९: उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत पुणे जिल्ह्यात येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकान मालक, व्यवस्थापनांनी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी येत्या ७ व १३ मे रोजी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने उदा. खाजगी कंपन्यामधील आस्थापना, दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, खरेदी केंद्रे , मॉल्स, किरकोळ विक्रेते आदी ठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी किंवा अपवादात्मक परिस्थितीत त्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास त्याठिकाणी दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी. सवलत देण्यापूर्वी संबंधित महानगरपालिका अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घ्यावी. याबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडील शासन परिपत्रकातील निर्देशाचे तंतोतंत पालन होईल, याबाबत दक्षता घ्यावी.

संबंधित आस्थापनेतील अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्याकडून मतदानाकरीता भरपगारी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याची तक्रार कामगार कार्यालयास प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनेविरुद्ध भारत निवडणूक आयोग तसेच शासनाने विहित केलेल्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

निवडणूकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास संबंधितांनी अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय, पुणे विभाग, कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय, पुणे जिल्हा adclpune5@gmail.com किंवा dyclpune2021@gmail.com या ई-मेल पत्त्यावर किंवा विभागाचे अधीक्षक चि. भि. केंगले, यांच्या भ्रमणध्वनी क्र. ८७९६६७५०८९ वर तक्रार दाखल करावी, असे आवाहन अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी केले आहे.

शिरूर लोकसभा निवडणूकीसाठी ३२ उमेदवार रिंगणात शिरूरचे निवडणूक अधिकारी अजय मोरे यांच्या उपस्थितीत उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप

पुणे,दि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या ३५ उमेदवारांपैकी ३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने शिरूर लोकसभेसाठी ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज अंतिम करण्यात आलेल्या यादीनुसार उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांच्या उपस्थितीत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

यावेळी निवडणूक निरीक्षक कुमार सौरभ राज, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे आदी उपस्थित होते. चिन्ह वाटपानंतर श्री. मोरे यांनी उमेदवारांना निवडणूक नियमांची माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उमेदवारांना ९५ लाख खर्च करण्याची मर्यादा आहे. उमेदवारांकडून खर्च मर्यादेचे उल्लंघन होता कामा नये. नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून खर्च गणना केली जाईल. उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. वाहने, सभा, रॅली, मिरवणूकीसाठी पूर्व परवानगी आवश्यक आहे.

प्रचार कालवधीमध्ये केवळ रुपये १० हजारापर्यंतचा खर्च रोखीने करता येईल, १० हजारांवरील खर्च धनादेशाद्वारे करता येईल, निवडणूक यंत्रणेमार्फत भरारी पथके स्थिर सर्वक्षण पथके तसेच व्हिडीओ संनियंत्रण पथकाद्वारे नियंत्रण ठेवण्यात येईल. शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार ५०९ मतदान केंद्र आहेत. उमेदवारांनी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान प्रतिनिधी नियुक्त करावेत, अशा सूचना श्री.मोरे यांनी केल्या.

उमेदवारांसाठी निवडणूक प्रचाराची वेळ सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतची असेल. दोन धर्मात समाजात तेढ निमार्ण होईल असा प्रचार करू नका किंवा देव देवतांचा, धार्मिक चिन्हाचा प्रचारात वापर करू नये. मतदानापूर्वी ४८ तास प्रचार थांबविण्यात यावा. आचार संहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास निवडणूक कार्यालयाकडे तक्रार करावी. मतदानाच्या दिवशी सकाळी साडे पाच वाजता मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रावर उपस्थित राहणे आवशक आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी साडे पाच वाजता मॉक पोल घेतले जाईल.

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर उमेदवारांनी त्यांचा बुथ लावणे आवश्यक आहे. बुथ लावण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिकेकडून उमेदवारांनी परवानगी घ्यावी, अशा सूचना देवून लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री.मोरे यांनी केले.

पुणे लोकसभेसाठी ३५ उमेदवार रिंगणात जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप

पुणे,दि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या ४२ पैकी ७ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने पुणे लोकसभेसाठी ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज अंतिम करण्यात आलेल्या यादीनुसार उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

यावेळी निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊ गलांडे, समन्वयक अधिकारी प्रतिभा इंगळे, अनिल पवार, खर्च व्यवस्थापनाचे समन्वयक अधिकारी प्रकाश अहिरराव, खर्च प्रमुख महेश अवताडे उपस्थित होते.

डॉ.दिवसे यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार खर्चाचा दैनंदिन लेखा ठेवणे बंधनकारक असल्याचे यावेळी सांगितले. उमेदवारांना ९५ लाख रुपये इतक्या खर्चाची मर्यादा असून खर्च मर्यादेचे उल्लंघन करू नये. उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. वाहने, सभा, रॅली, मिरवणूकीसाठी पूर्व परवानगी आवश्यक आहे. निवडणूक यंत्रणेमार्फत भरारी पथके स्थिर सर्वक्षण पथके तसेच व्हिडीओ संनियंत्रण पथकाद्वारे नियंत्रण ठेवण्यात येईल,अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. लोकसभा निवडणूक चांगल्या वातावरणामध्ये पारदर्शकपणे होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन डॉ.दिवसे यांनी उमेदवारांना केले.

बारामती लोकसभा मतदार संघातील टपाली मतदान आणि मतदान कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या मतदानाचे वेळापत्रक जाहीर

पुणे, दि. २७: जिल्ह्यात पहिल्यांदाच ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा तसेच मतदान कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मतदान सुविधा केंद्रे स्थापन करून तेथे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून बारामती लोकसभा मतदार संघातील या मतदानाचे वेळापत्रक निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी जाहीर केले आहे.

दौंड विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया १ ते ३ मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) १ ते ३ मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) ४ ते ६ मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे.

इंदापूर विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया ३० एप्रिल ते १ मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) २ ते ४ मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) २ ते ६ मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे.

बारामती विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया १ ते २ मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) १ ते ३ मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) ४ ते ६ मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे.

पुरंदर विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया २ व ३ मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) १ ते ३ मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) ४ ते ६ मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे.

भोर विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया २ ते ४ मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) १ ते २ मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) ३ ते ६ मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे.

खडकवासला विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया १ ते २ मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) २९ एप्रिल ते १ मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) २ ते ६ मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे, असेही बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

राज्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव; नाशिकच्या मालेगावात दोघांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा सतर्क

राज्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव;
नाशिकच्या मालेगावात दोघांचा मृत्यू;
आरोग्य यंत्रणा सतर्क

*नाशिक:- गेल्या दोन वर्षांपूर्वी जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाइन फ्लूचा धोका पुन्हा समोर येण्याची भीती आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव झाला आहे. मालेगावातील स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोघा रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन मालेगाव महापालिकेकडून करण आले आहे.*

*👉🔴🔴👉मालेगावात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे असून स्वाइन फ्लूचा धोका वाढत आहे. मालेगावमधील ६३ वर्षीय महिलेचा ५ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. त्या महिलेस स्वाइन फ्लू झाल्यानंतर तिच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरु होते. दुसरीकडे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होत असल्याने रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मालेगावमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. गेल्या २० दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे.*

*👉🟥🟥👉सर्दी, खोकला, ताप व चालताना दम लागणे ही लक्षणे दिसत असल्यास तातडीने जवळचे महापालिका रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा आपला दवाखाना येथे तपासणी करून घ्यावी. औषधोपचार सुरू करावेत. घाबरून जाण्याचे कारण नाही. अशा सूचना महापालिका आरोग्य विभागाने केले आहेत. मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री अहिरे यांनी पालिकेकडून उपाययोजना सुरु करण्यात आल्याची माहिती दिली. स्वाइन फ्लू बरा होतो, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.*

राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील मतदान; अमरावती, अकोला, परभणी, वर्ध्यात ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड?

*नागपूर:- राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, मतदानाला सुरुवात होताच काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला.*

*👉🔴🔴👉अमरावती, अकोला, परभणी आणि वर्ध्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर येथील शाळा क्रमांक १९ मधील खोली क्रमांक ५ मध्ये ईव्हीएम बंद पडलं. जवळपास १५ मिनिटे वोटिंग मशीन बंद पडलं होतं. त्यामुळे मतदारांचा चांगलाच खोळंबा झाला होता. अखेर ईव्हीएममधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. सध्या अमरावतीमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. दुसरीकडे वर्ध्यात देखील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरू झाल्यानंतर अचानक ईव्हीएम मशीन बंद पडलं. वोटिंग मशीन बंद पडताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. मतदान थांबल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.*

*👉🅾️🅾️👉अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. उमरा गावातील बुथ क्रमांक ३३३ मधील वोटिंग मशीन अचानक बंद पडलं. त्यामुळे साडेसात वाजेपर्यंत मतदानाला सुरुवात झालेली नव्हती. ईव्हीएम बदलण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. परभणी शहरातील महात्मा फुले महाविद्यालयातील 172 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन सात वाजल्यापासून बंद पडले आहे. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी सुरू होणार मतदान खोळंबलं आहे. सदर मशीन तांत्रिक कारणाने बंद पडली असून 45 मिनिटांपासून मतदान प्रक्रिया थांबली आहे. महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्पात विदर्भातील ५ जागांवर मतदान झालं होतं. यावेळी बऱ्याच नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती. दरम्यान, आज होणाऱ्या मतदानाला मतदार कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.*

error: Content is protected !!