Home Blog Page 68

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना

👉विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा*

*मुंबई, दि. ६ ऑगस्ट :-बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची पावले उचलली आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणे आणि त्यांची भारतात परतण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.*

*👉🔴🔴👉बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तिथे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य दिले आहे.*

*👉🅾️🅾️👉मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद साधला असून बांगलादेशातील परिस्थितीचे गांभीर्य पाहता त्वरित कृतीची गरज अधोरेखित केली आहे. प्रभावित विद्यार्थ्यांना सर्व शक्य मदत करण्याची विनंती केली आहे. त्यांची तात्काळ सुरक्षितता सुनिश्चित करणे, आवश्यकता असल्यास बांगलादेशातील सुरक्षित ठिकाणी त्यांचे स्थलांतर करणे, भारतात त्यांच्या सुरक्षित परतीची प्रक्रिया जलद करणे याअनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी चर्चा केली आहे.*

*👉🟥🟥👉बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळविणे आणि त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सध्या बांगलादेशात असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची यादी संकलित करून परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्वरित संपर्क साधण्यास आणि मदत उपलब्ध करणे शक्य होणार आहे. तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि केंद्रीय अधिकारी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक पथकही स्थापन करण्यात आले आहे. बांगलादेशातील भारतीय दूतावासाशी समन्वयाने काम करण्यात येत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करता येतील.*

*👉🔴🔴👉मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांचे मायदेशात परतण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. या आव्हानात्मक काळात राज्य सरकार बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसमवेत सक्षमपणे उभे आहे.*

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, बांगलादेशात मोठा हिंसाचार; परिस्थिती नियंत्रणाबाहेर

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा,
बांगलादेशात मोठा हिंसाचार; परिस्थिती नियंत्रणाबाहेर

*👉🔴🔴👉शेख हसीना हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी रवाना;*
*👉🟥🟥👉भारतात आश्रय घेणार?*
*👉🛑🛑👉बांगलादेशमध्ये लष्करी राजवट लागू होण्याची शक्यता*

*ढाका:- बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन चिघळल्यानंतर लोकांनी जाळपोळ सुरु केली आहे. हिंसाचारामुळे बांगलादेशमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. सर्वत्र हिंसाचार होत आहे. सरकारी मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बांगलादेशात उसळलेल्या यादवी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शेख हसीना आपल्या बहिणीसह काहीवेळापूर्वीच हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी रवाना झाल्या आहेत.*

*👉🛑🛑👉शेख हसीना यांनी बांगलादेशची सूत्रे सोडल्यानंतर आता देशात लष्करी राजवट लागू होण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांनी आपले सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या घराचा ताबा घेतला आहे. त्यामुळे आता बांगलादेशमध्ये ‘न भूतो न भविष्यती’ परिस्थिती निर्माण झाली आहे. शेख हसीना या पुढील काही काळासाठी भारतात आश्रय घेऊ शकतात, असेही सांगितले जात आहे. बांगलादेशमध्ये सध्या प्रचंड मोठा नागरी संघर्ष सुरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 300 हून अधिक जणांना आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे बांगलादेशातील परिस्थिती गंभीर झाली होती. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु झालेल्या आंदोलनाचे लोण देशभरात पसरत जाऊन टोकाची परिस्थिती निर्माण झाली.*

*👉🟥🟥👉अखेर आपण ही परिस्थिती हाताळू शकणार नाही, हे ध्यानात आल्यामुळे शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. बांगलादेशात जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. सरकारी नोकरीत सध्या असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. या आंदोलनानंतर शेख हसीना सरकारने काही कोटा कमी केला, मात्र तरीही आक्रमक आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये आंदोलन पेटले होते. 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे.*

*👉🔴🔴👉त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये 30 टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना 5 टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत होते. या आरक्षण व्यवस्थेविरोधात जुलै महिन्यात सुरु झालेल्या आंदोलनाने अल्पकाळात उग्र स्वरुप धारण केले होते.*

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

*👉🅾️🅾️👉धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे*

*👉🛑🛑👉एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेनादलाची मदत घेण्यात यावी*

*👉🟥🟥👉बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी*

*मुंबई, दि. 4 :- भारतीय हवामान खात्याने पुणे आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला असून आज जोराचा पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण, औषधे, आरोग्य सुविधा इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत.*

*👉🟥🟥👉पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरातील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे. या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प, रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर, बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.*

*👉🅾️🅾️👉संपूर्ण प्रशासनाने या काळात अलर्ट राहावे. लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये त्यांच्यासाठी सर्व सुविधांची उपलब्धता करून देणे यासाठी सर्व प्रशासनाने समन्वयाने काम करावे. हवामान खात्याकडून येणाऱ्या विविध सूचनांची दखल घेऊन त्याची लोकांना त्वरित माहिती देण्यात यावी. सर्वांनी सतर्क राहून लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.*

सरकारने काही निधी खर्च करण्यासाठी वर्क ऑर्डर ३१ ऑगस्टपर्यंत काढण्याचे दिले आदेश दिले दरम्यान २० सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई:-विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हा लागते? याकडे राज्याचे लक्ष वेधले आहे. २० सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरकारने काही निधी खर्च करण्यासाठी वर्क ऑर्डर ३१ ऑगस्टपर्यंत काढण्याचे आदेश दिले आहेत. २० सप्टेंबरला आचारसंहिता लागली तर पुढे विकासकामे करता येणार नाहीत. त्यामुळे निधी खर्चाबाबत सरकार क्रियाशील असल्याचे समजते.*

*👉🟥🟥👉दरम्यान भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी २० सप्टेंबरला आचारसंहिता लागण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होणार असल्याने कोकणात गणेशोत्सवात निवडणुकीचा प्रचार होण्याची शक्यता आहे.*

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी सांगितलंय, गुरुजी लाख, सव्वा लाख पगार घेतात! तर गुरुजींचा दर्जा सुधारला नाही, तर सेवेतून कमी करणार

मुंबई :- शिक्षकांना शिकवता येत नाही, त्यांना 6 महिने पूर्ण पगार देऊ. त्यांना प्रशिक्षण देऊ. त्यानंतर जर त्यांच्यात बदल झाला नाही, तर त्यांचा मूळ पगारातला 50 टक्के पगार कमी करू. तरीसुद्धा शिक्षक सुधारले नाहीत, तर त्यांना सेवेतून दूर करू.सेवेतून दूर करणे हेतू नाही, मुलांचे शिक्षण हे शिक्षण खात्याचं अंतिम उद्दिष्ट आहे. पण जर शिक्षक कमी पडले, तर त्यांच्यावर कारवाई करणार असा इशारा चक्क राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे.तसेच पुढील काळात शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर सर्वांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार आहे. आठवीपर्यंत परीक्षा नाही यामुळे मुलं निर्धास्त राहतात. त्याला गणित, विज्ञान, इंग्रजी येतं की नाही याची चिंता कोणी करत नाही. यापुढे शिक्षकांना ही मुभा राहणार नाही. अनेक शिक्षकांना लाख, सव्वा लाख पगार असतो. मग मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आतापर्यंत ही जबाबदारी ठरवण्यात आली नव्हती,” असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.*

*👉🅾️🅾️👉पुण्यात आयोजित झी 24 तासच्या शिक्षण परिषदेत ते बोलत होते. शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक, अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. केसरकर म्हणाले, सीबीएसई आणि आपल्या बोर्डात काही फरक नाही. आपला अभ्यासक्रम त्याच तुलनेचा आहे. इंग्रजी माध्यमातीलच मुलं हुशार असतात, असं नाही. जिल्हा परिषदेच्या अनेक मुलांनी इंग्रजी शाळांपेक्षा मोठे यश मिळवलेले आपण पाहिले आहे. इंटरनॅशनल स्कूल आणि भारतीय शिक्षण व्यवस्था यांचा किती संबंध आहे याची मला शंका आहे. खरे तर जगात एकाच वेळी 40 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारी एकमेव आपली शिक्षण व्यवस्था आहे.*

*👉🟥🟥👉शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले मी एक परिपत्रक काढले आहे ज्या शिक्षकांना शिकवता येत नसेल त्यांना पूर्ण पगार देऊन अगोदर प्रशिक्षण देऊ पण जर सुधारले नाहीत तर त्यांना सेवेतून कायम करू दूर करू आतापर्यंत शिक्षकांच्या सर्व समस्या सोडविण्यात आले आहेत शिक्षकांना एकाच ठिकाणी राहून शिक्षणाचे काम सेवा म्हणून करावे शिक्षणाचा दर्जा वाढण्यावर भर द्यावा यात जर आता शिक्षक कमी पडले तर त्यांची खैर नाही.*

*👉🛑🛑👉आठवीपर्यंत परीक्षेतील यशापयशाची आत्तापर्यंत गणती केली जात नव्हती. त्यामुळे मुलं निर्धास्त होती, शिक्षकही निर्धास्त होते. त्यामुळे त्याला गणित, इंग्रजी, विज्ञान येत की नाही हे कोणीच पाहत नव्हते‌. मात्र आता असे होणार नाही. शिक्षकांवर आत्तापर्यंत जबाबदारी ठरवण्यात आली नव्हती. आता ती ठरवली आहे अनेक शिक्षकांना लाख, सव्वा लाखापर्यंत पगार असतो, मग मुलांची जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे.*

*👉🟥🟥👉जर्मनीशी मनुष्यबळ पुरवण्यासाठी करार*

*कोणत्याही पालकमंत्र्यांनी आपल्या सिस्टर सिटीचा उपयोग महाराष्ट्रासाठी झाला पाहिजे असा विचार केला नाही अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. जर्मनीतील बाडेन-वुर्टेमबर्ग हे दुसरं सर्वात श्रीमंत राज्य आहे. त्यांना 5 लाख तरुणांची गरज असून, आम्ही 4 लाखांचं टार्गेट घेतलं. पहिल्या 10 हजार मुलांना प्रशिक्षण दिलं जात आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बदलणारा हा निर्णय आहे. साधा वायरमन जरी जर्मनीत गेला तर त्याला वर्षाला 30 लाख असेल, जो स्वप्नातही विचार करु शकत नाही. नर्सेसला वर्षाला 36 हजार पगार मिळेल असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.*

*👉🔴🔴👉”इंग्रजी ही कधीही जगाची भाषा नव्हती आणि नसणार आहे. इंग्रजी ही फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर संवादासाठी वापरली जाणारी भाषा आहे. प्रत्येक देशाला स्वतची भाषा असते. त्या देशातील सर्व व्यवहार त्या भाषेत चालतात. जर या मुलांना जर्मन भाषा शिकवली नाही तर ही मुलं जर्मनीत जाऊ शकत नाही. त्याचं प्रशिक्षण सध्या सुरु आहे. शासकीय नोकरीत आरक्षण हवं म्हणून महाराष्ट्र पेटवायचा आणि किती संधी आहे हे युवकापर्यंत पोहोचवायचं नाही हा विरोधाभास आहे,” असं ते म्हणाले.*

error: Content is protected !!