Home Blog Page 67

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात *महिलावर्गात समाधानाची भावना-उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर

बारामती, दि. १५: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरीता बारामती तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून एकूण ६६ हजार ४३३ अर्ज लाभाकरीता पात्र ठरले आहेत, पात्र ठरलेल्या महिलांना १४ ऑगस्टपासून प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाल्यामुळे महिलावर्गात समाधानाची भावना व्यक्त होत आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.

या योजनेअंतर्गत तालुक्यात एकूण ६८ हजार ४२४ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ६६ हजार ४३३ अर्ज लाभाकरीता पात्र ठरले आहेत. प्रशासनाच्यावतीने प्राप्त प्रत्येक अर्जाची छाननी करण्यात आली. छाननीअंती पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात १४ ऑगस्टपासून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याकरीता तालुका प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने अहोरात्र काम करीत आहेत. पात्र महिलांना विनाअडथळा अर्ज करता यावा, याकरीता ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या सूविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. ऑफलाईन अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वांवलंबीकरण, आत्मनिर्भर करण्याबरोच महिलांच्या सशक्तीकरणाला चालना देण्याकरीता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरीता महिलांनी तात्काळ अर्ज करावे, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले आहे

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिन समारंभात मतदानाची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे

स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिन समारंभात मतदानाची शपथ घेण्याचे आवाहन

पुणे, दि.१३: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिन समारंभात मतदानाची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने १ ऑगस्ट रोजी विशेष संक्षिप्त कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार ६ ते २० ऑगस्ट या कालावधीमध्ये मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, मयत, स्थलांतरित नावे वगळणे, नावामध्ये, पत्त्यामध्ये दुरुस्ती करणे, मतदान केंद्र बदलणे आदी स्वरूपाची कामे केली जाणार आहेत.

आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिन समारंभानिमित्ताने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहण साजरा करून उपस्थित अधिकारी- कर्मचारी तसेच नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात यावी. मतदार जागृती विशेष उपक्रमाचे आयोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
0000

मंगळवार १३ ऑगस्ट २०२४ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय 

मंगळवार १३ ऑगस्ट २०२४ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार
१४९ कोटीस मान्यता

(पशूसंवर्धन व दुग्धविकास)

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय
लाखो नागरिकांना लाभ

( महसूल विभाग)

डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना

(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च २०२५ पर्यंत शिथील

( सहकार विभाग)

शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापाकाना ठोक मानधन

( वैद्यकीय शिक्षण विभाग)

सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता

( सार्वजनिक बांधकाम विभाग)

नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष

( नगरविकास विभाग)

सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार

( ऊर्जा विभाग)

मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण आल्यास हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन उच्च शिक्षण विभागाकडून मदतीसाठी पोर्टलचीही सुविधा

मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण आल्यास हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

उच्च शिक्षण विभागाकडून मदतीसाठी पोर्टलचीही सुविधा

 

*मुंबई:-नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार आहे.*

 

*👉🟪🟪👉वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पालकांच्या मुलींचे पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थिनींना काही अडचणी आल्यास त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक व हेल्प डेस्क सुरू केला आहे. ही हेल्पलाईन 0796134440, 07969134441 या क्रमांकावर आणि helpdesk.maharashtracet.org यावर संपर्क करावा, ही हेल्पलाईन कार्यालयीन दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत कार्यरत आहे. या हेल्पलाईनचा उपयोग करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.*

 

*👉🔴🔴👉यासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या योजनेसाठी https://mahadbt.maharashtra.gov. in पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशत: अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने/सार्वजनिक विद्यापिठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे/स्वयं अर्थ सहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्याक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना वार्षिक शैक्षणिक व परीक्षा शुल्क या योजनेद्वारे 100 टक्के मोफत करण्यात आले आहे.*

 

*👉🟥🟥👉शैक्षणिक वर्ष सन 2024-25 व त्यापूर्वी ज्या मुलींनी प्रवेश घेतलेला आहे, सध्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या मुलींना अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थीनींनी प्रवेशासाठी पैसे भरले असतील त्यांना भरण्यात आलेले पैसे परत करण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र मुलींना रक्कम प्राप्त करुन घेण्यासाठी त्यांचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे गरजेचे आहे.*

 

*👉🔴🔴👉या योजनेचा अर्ज भरताना काही अडचण आल्यास संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य/नोडल अधिकारी, विभागीय सहसंचालक कार्यालयातील नोडल अधिकारी किंवा महाआयटीच्या पोर्टलवरील Grieviance Section मध्ये नोंद करावी. या योजनेची माहिती महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra. gov.in , उच्च शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ https://dhepune.gov.in , तंत्र शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ https://www.dtemaharashtra.gov.in, कला संचालनालयाचे https://doa.maharashtra. gov.in या सर्व अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.*

 

*👉🟥🟥👉मंजूर शिष्यवृत्ती सत्र निहाय दोन टप्प्यात बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांपैकी केवळ कोणत्याही एकाच योजनेंतर्गत लाभ मिळण्यास संबंधित विद्यार्थीनी पात्र असणार आहे, असेही मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.*

सरकारकडून तुम्हालाही ‘हा’ मेसेज आला असेल तरच लाडकी बहीण योजनेचे मिळणार पैसे!

सरकारकडून तुम्हालाही ‘हा’ मेसेज आला असेल तरच लाडकी बहीण योजनेचे मिळणार पैसे!

*परभणी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चांगलीच चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी काही अटी ठेवल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची अट म्हणजे महिलेच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असू नये. या योजनेसाठी राज्यभरात आतापर्यंत दीड कोटी पेक्षा जास्त महिलांचे अर्ज पात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे. पण तरीही योजनेसाठी अद्यापही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.*

*👉🟥🟥👉अनेक महिलांना अर्ज भरण्यास अद्यापही अडचणी येत आहेत. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना नारीशक्त अ‍ॅपमधून ऑनलाईन अर्ज करता येत होता. पण काही तांत्रिक अडचणींमुळे आता अर्ज भरणं कठीण होऊन बसलं आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून अर्ज भरण्यासाठी एक वेबसाईटही जाहीर करण्यात आली आहे. पण तरीही अनेक महिलांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. असं असलं तरी काही महिलांच्या बँक खात्यांमध्ये 1 रुपया आलेला आहे. तर काही महिलांच्या मोबाईलमध्ये एक मेसेज सरकारकडून आलेला आहे. त्यामुळे या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे.*

*👉🟪🟪👉उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सरकारकडून मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे. पण महिलांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सध्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. अनेक महिलांना अद्यापही अर्ज भरता आलेला नाही. तर दीड कोटी महिलांनी नोंदणी केल्याचीदेखील माहिती समोर आली आहे. ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईल नंबरवर मेसेजही पाठवण्यात आला आहे.*

*👉🔴🔴👉लाभार्थी महिलांना सरकारकडून नेमका मेसेज काय?*

*ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईलवर एक मेसेज सरकारकडून पाठवण्यात आला आहे. हा मेसेज इंग्रजीतून आलेला आहे. “Your application no (अर्जाचा नंबर) for MMLBY has approved – WCD, GOM – MAHGOV”, असा मेसेज लाभार्थी महिलांच्या मोबाईल नंबरवर येत आहेत. त्यामुळे तुम्हालादेखील असा मेसेज आला असेल तर तुम्हालादेखील या योजनेचा फायदा मिळणार आहे. तुमच्यादेखील बँक खात्यात येत्या 17 ऑगस्टला 3000 रुपये जमा होणार आहेत.*

*👉🟥🟥👉मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून आणखी एक खूशखबर*

*या योजनेबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी आज परभणीत बोलताना आणखी एक खूशखबर दिली आहे. “लाडली बहीण योजनेसाठी 46 हजार कोटी वर्षाला लागणार आहेत. अर्थ विभागाने तो निधी आम्हाला वितरीत केला आहे. 17 तारखेचा पहिल्या हप्त्याचा निधीसह पुढचे सहा महिन्यांचा निधीची तरतूद केली आहे. त्यानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पात सादर होईल ते उपलब्ध होईल”, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे पुढचे 6 महिने तरी लाभार्थी महिलांना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपये मिळणार हे निश्चित आहे.*

सरकारकडून तुम्हालाही ‘हा’ मेसेज आला असेल तरच लाडकी बहीण योजनेचे मिळणार पैसे!

सरकारकडून तुम्हालाही ‘हा’ मेसेज आला असेल तरच लाडकी बहीण योजनेचे मिळणार पैसे!

*परभणी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चांगलीच चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी काही अटी ठेवल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची अट म्हणजे महिलेच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असू नये. या योजनेसाठी राज्यभरात आतापर्यंत दीड कोटी पेक्षा जास्त महिलांचे अर्ज पात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे. पण तरीही योजनेसाठी अद्यापही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.*

*👉🟥🟥👉अनेक महिलांना अर्ज भरण्यास अद्यापही अडचणी येत आहेत. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना नारीशक्त अ‍ॅपमधून ऑनलाईन अर्ज करता येत होता. पण काही तांत्रिक अडचणींमुळे आता अर्ज भरणं कठीण होऊन बसलं आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून अर्ज भरण्यासाठी एक वेबसाईटही जाहीर करण्यात आली आहे. पण तरीही अनेक महिलांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. असं असलं तरी काही महिलांच्या बँक खात्यांमध्ये 1 रुपया आलेला आहे. तर काही महिलांच्या मोबाईलमध्ये एक मेसेज सरकारकडून आलेला आहे. त्यामुळे या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे.*

*👉🟪🟪👉उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सरकारकडून मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे. पण महिलांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सध्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. अनेक महिलांना अद्यापही अर्ज भरता आलेला नाही. तर दीड कोटी महिलांनी नोंदणी केल्याचीदेखील माहिती समोर आली आहे. ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईल नंबरवर मेसेजही पाठवण्यात आला आहे.*

*👉🔴🔴👉लाभार्थी महिलांना सरकारकडून नेमका मेसेज काय?*

*ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईलवर एक मेसेज सरकारकडून पाठवण्यात आला आहे. हा मेसेज इंग्रजीतून आलेला आहे. “Your application no (अर्जाचा नंबर) for MMLBY has approved – WCD, GOM – MAHGOV”, असा मेसेज लाभार्थी महिलांच्या मोबाईल नंबरवर येत आहेत. त्यामुळे तुम्हालादेखील असा मेसेज आला असेल तर तुम्हालादेखील या योजनेचा फायदा मिळणार आहे. तुमच्यादेखील बँक खात्यात येत्या 17 ऑगस्टला 3000 रुपये जमा होणार आहेत.*

*👉🟥🟥👉मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून आणखी एक खूशखबर*

*या योजनेबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी आज परभणीत बोलताना आणखी एक खूशखबर दिली आहे. “लाडली बहीण योजनेसाठी 46 हजार कोटी वर्षाला लागणार आहेत. अर्थ विभागाने तो निधी आम्हाला वितरीत केला आहे. 17 तारखेचा पहिल्या हप्त्याचा निधीसह पुढचे सहा महिन्यांचा निधीची तरतूद केली आहे. त्यानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पात सादर होईल ते उपलब्ध होईल”, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे पुढचे 6 महिने तरी लाभार्थी महिलांना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपये मिळणार हे निश्चित आहे.*

लाडकी बहिण योजनेसाठी पैसे आहेत पण…”; सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारलाच झापलं! दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

“लाडकी बहिण योजनेसाठी पैसे आहेत पण…”;
सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारलाच झापलं!
दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

*नवी दिल्ली – ‘लाडली बहना’ आणि ‘लाडली बहू’ योजनेसाठी पुरेसे पैसे आहेत, मात्र जमीन मालकांना भरपाई देण्यासाठी पैसे नाहीत, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे. वन संरक्षणाशीसंबंधित टीएन गोदावर्मन सुनावणीदरम्यान शपथपत्र सादर न केल्याने महाराष्ट्र सरकार आणि मुख्य सचिवांना सुनावले आहे. न्यायालयाला गृहित धरू नये आणि न्यायालयाच्या प्रत्येक आदेशाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने सांगितले.*

*👉🔴🔴👉सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, के.व्ही. विश्‍वनाथन आणि संदीप मेहता यांनी १३ ऑगस्टपर्यंत यासंदर्भात शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आणि त्यानुसार शपथपत्र सादर केले नाही तर मुख्य सचिवांना न्यायालयात हजर राहावे लागेल, असे सांगितले.*

*👉🟥🟥👉न्यायाधीश गवई म्हणाले, न्यायालयाला गृहित धरू नका. आपण न्यायालयाच्या प्रत्येक आदेशाकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. आपल्याला पुरेसा वेळ दिला होता आणि आपल्याकडे मोफत योजनांसाठी पैसे आहेत, मात्र न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भरपाई करण्यासाठी पैसे नाहीत. मोफत वस्तूंवर खर्च करण्यात येणाऱ्या पैशातील काही हिस्सा जमीन मालकांना नुकसान भरपाईसाठी बाजूला काढून ठेवायला हवा, असेही मत मांडले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या वतीने हजर झालेले वकील आदित्य ए पांडे यांना शपथपत्र सादर करण्याचे सादर करण्याचे सांगितले.*

*👉🅾️🅾️👉न्यायाधीश गवई, न्यायाधीश मेहता आणि न्यायाधीश विश्‍वनाथन यांचे पीठ वन संरक्षणाशी संबंधित टीएन गोदावर्मन यांच्या याचिकेवर सुनावणी करत होते. टीएन गोदावर्मन थिरुमुलकापद प्रकरण हे एक ऐतिहासिक पर्यावरण प्रकरण आहे. या प्रकरणावर पहिली सुनावणी १९९६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात झाली होती.*

*👉🅾️🅾️👉सेवानिवृत्त वन अधिकारी टीएन गोदावर्मन यांनी वनजमीनीच्या संरक्षणावरून चिंता व्यक्त केली होती आणि त्यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. वनजमिनीवरील उत्खनन आणि बांधकाम कोणत्याही पर्यावरण मंजुरीशिवाय करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरू आहे. याचअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने १९५० मध्ये पुण्यातील २४ एकर जमीन खरेदीसंदर्भात हे मत मांडले. राज्य सरकारने या जमिनीवर ताबा मिळवला होता. आणि त्यानंतर ही जमीन संरक्षण संस्थेला देण्यात आली. तत्पूर्वी न्यायालयाने राज्य सरकारला फटकारत राज्याची कृती ही एका व्यक्तीच्या खासगी मालमत्तेवर अतिक्रमण करणारी असल्याचे म्हटले होते. राज्याने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती, असे न्यायालयाने सांगितले.*

*👉🟪🟪👉यावर न्यायालयाने राज्याला शपथपत्र सादर करण्याचे सांगितले होते. याचिकाकर्त्याला समकक्ष जमीन किंवा दुसऱ्या जमिनीचा भाग दिला जाईल का? याचिकाकर्त्यांला पुरेसा मोबदला दिला जाईल का? राज्य सरकार संबंधित जमिनीला वनभूमीच्या रूपाने निश्‍चित करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार का? यासंदर्भात राज्य सरकारकडून शपथपत्र सादर केले गेले नाही. त्यामुळे १३ ऑगस्टपर्यंत शपथपत्र सादर केले नाही तर मुख्य सचिवांना व्यक्तीश: हजर राहावे लागेल, अशी तंबी दिली.*

लाडकी बहिण योजनेसाठी पैसे आहेत पण…”; सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारलाच झापलं! दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

“लाडकी बहिण योजनेसाठी पैसे आहेत पण…”;
सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारलाच झापलं!
दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

*नवी दिल्ली – ‘लाडली बहना’ आणि ‘लाडली बहू’ योजनेसाठी पुरेसे पैसे आहेत, मात्र जमीन मालकांना भरपाई देण्यासाठी पैसे नाहीत, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे. वन संरक्षणाशीसंबंधित टीएन गोदावर्मन सुनावणीदरम्यान शपथपत्र सादर न केल्याने महाराष्ट्र सरकार आणि मुख्य सचिवांना सुनावले आहे. न्यायालयाला गृहित धरू नये आणि न्यायालयाच्या प्रत्येक आदेशाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने सांगितले.*

*👉🔴🔴👉सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, के.व्ही. विश्‍वनाथन आणि संदीप मेहता यांनी १३ ऑगस्टपर्यंत यासंदर्भात शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आणि त्यानुसार शपथपत्र सादर केले नाही तर मुख्य सचिवांना न्यायालयात हजर राहावे लागेल, असे सांगितले.*

*👉🟥🟥👉न्यायाधीश गवई म्हणाले, न्यायालयाला गृहित धरू नका. आपण न्यायालयाच्या प्रत्येक आदेशाकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. आपल्याला पुरेसा वेळ दिला होता आणि आपल्याकडे मोफत योजनांसाठी पैसे आहेत, मात्र न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भरपाई करण्यासाठी पैसे नाहीत. मोफत वस्तूंवर खर्च करण्यात येणाऱ्या पैशातील काही हिस्सा जमीन मालकांना नुकसान भरपाईसाठी बाजूला काढून ठेवायला हवा, असेही मत मांडले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या वतीने हजर झालेले वकील आदित्य ए पांडे यांना शपथपत्र सादर करण्याचे सादर करण्याचे सांगितले.*

*👉🅾️🅾️👉न्यायाधीश गवई, न्यायाधीश मेहता आणि न्यायाधीश विश्‍वनाथन यांचे पीठ वन संरक्षणाशी संबंधित टीएन गोदावर्मन यांच्या याचिकेवर सुनावणी करत होते. टीएन गोदावर्मन थिरुमुलकापद प्रकरण हे एक ऐतिहासिक पर्यावरण प्रकरण आहे. या प्रकरणावर पहिली सुनावणी १९९६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात झाली होती.*

*👉🅾️🅾️👉सेवानिवृत्त वन अधिकारी टीएन गोदावर्मन यांनी वनजमीनीच्या संरक्षणावरून चिंता व्यक्त केली होती आणि त्यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. वनजमिनीवरील उत्खनन आणि बांधकाम कोणत्याही पर्यावरण मंजुरीशिवाय करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरू आहे. याचअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने १९५० मध्ये पुण्यातील २४ एकर जमीन खरेदीसंदर्भात हे मत मांडले. राज्य सरकारने या जमिनीवर ताबा मिळवला होता. आणि त्यानंतर ही जमीन संरक्षण संस्थेला देण्यात आली. तत्पूर्वी न्यायालयाने राज्य सरकारला फटकारत राज्याची कृती ही एका व्यक्तीच्या खासगी मालमत्तेवर अतिक्रमण करणारी असल्याचे म्हटले होते. राज्याने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती, असे न्यायालयाने सांगितले.*

*👉🟪🟪👉यावर न्यायालयाने राज्याला शपथपत्र सादर करण्याचे सांगितले होते. याचिकाकर्त्याला समकक्ष जमीन किंवा दुसऱ्या जमिनीचा भाग दिला जाईल का? याचिकाकर्त्यांला पुरेसा मोबदला दिला जाईल का? राज्य सरकार संबंधित जमिनीला वनभूमीच्या रूपाने निश्‍चित करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार का? यासंदर्भात राज्य सरकारकडून शपथपत्र सादर केले गेले नाही. त्यामुळे १३ ऑगस्टपर्यंत शपथपत्र सादर केले नाही तर मुख्य सचिवांना व्यक्तीश: हजर राहावे लागेल, अशी तंबी दिली.*

मंत्रिमंडळ बैठक : बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२४ एकूण निर्णय-१३

मंत्रिमंडळ बैठक : बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२४

एकूण निर्णय-१३

जलसंपदा विभाग

*शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन*

*महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता*

*पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार*

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 87 हजार 342 कोटी 86 लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून विशेषत: मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला मोठा फायदा होणार आहे.

या प्रकल्पामुळे गोदावरीच्या उपखोऱ्यातून वैनगंगेतील पाणी बुलढाणा जिल्ह्यातील वैनगंगा प्रकल्पात आणण्यात येईल. यासाठी एकूण ४२६.५२ कि.मी.चे जोड कालवे बांधण्यात येतील. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील १५ तालुक्यांना सिंचन तसेच पिण्याचे पाणी आणि औद्योगिक कारणासाठी याचा उपयोग होईल. रब्बी हंगामात पाण्याचा वापर करता यावा म्हणून ३१ साठवण तलाव देखील बांधण्यात येणार आहेत. राष्ट्रीय जलविकास अभिकरणामार्फत याचा सविस्तर प्रकल्प अहवाल २०१८ मध्ये सादर करण्यात आला होता. केंद्रीय जल आयोगाने देखील यास मान्यता दिली असून राज्य जलपरिषदेच्या बैठकीत हा प्रकल्प एकात्मिक राज्य जल आराखड्यात समाविष्ट करण्यात आला आहे.
—–०—–

सांस्कृतिक कार्य विभाग

*९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान*

*अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार*

९ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येईल.

यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग नोडल विभाग राहणार असून ग्रामविकास विभाग हा ग्रामीण भागासाठी तर नगर विकास विभाग हा शहरी भागांसाठी नोडल विभाग राहील.
या काळात तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेला, तिरंगा सेल्फी अशा विविध माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येईल तसेच त्या त्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होतील. १३, १४ आणि १५ ऑगस्ट असे ३ दिवस घरोघर तिरंगा फडकविण्यात येईल.
—–०—–

गृहनिर्माण विभाग

*प्रकल्पबाधितांना सदनिका उपलब्ध करण्याच्या धोरणास मान्यता*

प्रकल्पबाधितांना सदनिका उपलब्ध करून देण्याच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रकल्पग्रस्तांच्या सदनिकांच्या निर्मितीमध्ये वाढ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

या धोरणानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि एमएमआरडीए यांनी पुढील 15 वर्षात पुरेशा प्रमाणात प्रकल्पग्रस्त सदनिका निर्माण होण्यासाठी सविस्तर कृती आराखडा तयार करावयाचा आहे. या प्राधिकरणानी पुढील 3-5 वर्षात किती प्रकल्पग्रस्त सदनिकांची आवश्यकता आहे याचा आढावा घ्यावयाचा आहे. हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या वर्धनक्षम ठरण्यासाठी टीडीआर निर्मिती आणि त्याची उपयोगिता यातील तरतुदीत सुधारणा देखील कराव्या लागतील. बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये निर्माण होणाऱ्या अतिरिक्त सदनिका या प्रकल्पग्रस्त सदनिका म्हणून वापरात आणण्यात येतील.

बृहन्मुंबईमधील प्रकल्प लक्षात घेता समन्वय समितीला प्रकल्पग्रस्त सदनिकांच्या उपलब्धतेनुसार प्राधान्यक्रम ठरविण्याचे अधिकार असतील.

शासकीय जमिनी तसेच केंद्राच्या अखत्यारितील मिठागराच्या जागा, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या जागा या प्रकल्पग्रस्त सदनिकांसाठी उपलब्ध करून घेण्याकरिता नगर विकास विभागातर्फे पाठपुरावा करण्यात येईल. याशिवाय विविध नियोजन प्राधिकरणाच्या योजना एकत्र करण्याची मुभा देऊन विकासकाने प्रकल्पग्रस्त सदनिका दिल्यास या विकासकाला विक्रीसाठी दिलेल्या घटकातून अधिमुल्यामध्ये 50 टक्केपर्यंत अधिमुल्य समायोजित करण्याची मुभा देण्यात येईल.
—–०—–

नगरविकास विभाग

*लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार*

*कर्ज उभारण्यास मान्यता*

लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग देण्यासाठी कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड मार्फत खुल्या बाजारातून कर्ज घेऊन हा निधी उभारण्यात येईल. महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अशा या योजनेतून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना स्व हिश्याचा निधी उभारता येईल. या कर्जासाठी अपात्र ठरणा-या नागरी संस्थांना या योजनेत कर्ज मिळेल.
केंद्राच्या अमृत-2 योजनेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेस मंजूर पाणी पुरवठा प्रकल्पातील स्व हिश्यातील 822 कोटी 23 लाख रक्कम एमयूआयडीसीएल / एमयूआयएफने कर्ज स्वरुपात प्राधान्याने मंजूर करावी आणि आवश्यकता भासल्यास शासन या संस्थांना अग्रिम निधी मंजूर करेल. कर्जाची उभारणी झाल्यानंतर अग्रिम रक्कम एमयूआयडीसीएल / एमयूआयएफने शासनास परत करावी.

या योजनेतल्या कर्जाची नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाने परतफेड न केल्यास त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या जीएसटी, वित्त आयोगाचे अनुदान, मुद्रांक शुल्क परतावा यामधून कर्ज व व्याजाच्या हप्त्याची रक्कम परस्पर वळती करण्यात येईल.
—–०—–

आदिवासी विकास विभाग

*आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदतवाढ*

आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

1 डिसेंबर 2018 अन्वये ही विशेष भरती मोहिम राबविण्यात आली होती. यातील नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकाना ही मुदत देण्यात येत आहे. ही परीक्ष उत्तीर्ण झाल्यापासून पुढील काळात त्यांना सेवाविषयक लाभ देण्यात येतील. ही मुदतवाढ देण्यापूर्वीच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना पुढील सेवाविषयक लाभ देण्यात येतील. ही मुदतवाढ केवळ एक वेळची बाब म्हणून देण्यात येत आहे. या मुदतवाढी नंतरही जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील.
—–०—–

आदिवासी विकास विभाग

*अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार*

*आता जात प्रमाणपत्रांचे समितीमार्फत पुनर्विलोकन करता येईल*

अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम २०००) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

चुकीच्या नोंदीच्या आधारे वैधता प्रमाणपत्र देण्यात आल्याचे दिसून आल्यास अशा प्रकरणात प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करण्याची तरतूद नसल्याने हे प्रमाणपत्र रद्द करण्यात अडचणी येतात. त्यामुळे वैधता प्रमाणपत्राचे पुनर्विलोकन या समितीमार्फत करण्याची तरतूद करण्यात येईल. याशिवाय समितीच्या आदेशाविरुद्ध केवळ उच्च न्यायालयात अपिलाची तरतूद आहे. त्यामुळे अनेक न्यायालयीन प्रकरण प्रलंबित आहेत. म्हणून उच्च न्यायालयात प्रकरण जाण्यापूर्वी एक अपिलिय प्राधिकरण देखील गठीत करण्यात येईल.

जात प्रमाणपत्र अवैध झाल्यास सध्या २ हजार ते २० हजार रुपये दंडाची तरतूद आहे. मात्र त्यात वाढ करणे गरजेचे असून आता या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एफआयआर देखील दाखल करण्याची तरतूद करण्यात येईल. समिती सदस्यांना न्यायालयामार्फत दंड लावला जातो. त्यादृष्टीने देखील सदस्यांना संरक्षण मिळण्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात येईल.
—–०—–

वन विभाग

*विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड*

विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड वसूल करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.

दंडाशिवाय अशारितीने तोडलेले कोणतेही झाड आणि ते वाहून नेण्यासाठी वापरलेली हत्त्यारे, नौका, वाहने सरकारजमा करण्यात येतील. या संदर्भातील दुरुस्ती महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम 1964 मधील कलम 4 मध्ये करण्यात येऊन अध्यादेश मांडण्यात येईल.
—–०—–

उद्योग विभाग

*महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार*

*पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार*

महाराष्ट्र लॉजिस्टीक धोरण-2024 ला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने केलेल्या शिफारसीनुसार लॉजिस्टीक धोरण तयार करण्यात आले आहे. हे धोरण पुढील 10 वर्षातील विकासाला समोर ठेऊन तयार करण्यात आले आहे. या धोरणामुळे राज्यात सुमारे 5 लाख इतकी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. यातून सुमारे 30 हजार 573 कोटी उत्पन्न मिळेल असे अपेक्षित आहे.

सध्याच्या 14-15टक्के च्या तुलनेत लॉजिस्टिकचा खर्च किमान 4-5टक्के ने कमी करणे, लॉजिस्टिकसाठी लागणारा वेळ कमी करणे, विविध उपाययोजनांद्वारे हरित उपक्रम राबवून कार्बन उत्सर्जन कमी करणे, ब्लॉक चेन, कृत्रिम बुध्दीमत्ता, इंटलीजन्ट लॉजिस्टीक मॅनेजमेंट सिस्टमचा वापर, ग्रीन लॉजिस्टिक पार्कचा प्रसार, शाश्वत डिझाईन,मोडल शिफ्ट या बाबी समाविष्ट आहेत. या क्षेत्रात देशांतर्गत व परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, तसेच महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक हब दर्जा मिळवण्याचा प्रयत्न असेल. हे धोरण तयार करतांना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, जवाहरलाल नेहरु पोर्ट प्राधिकरण, मुंबई पोर्ट ट्रस्ट, राज्य रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीए, सिडको, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांचा सहभाग घेण्यात आला आहे.
या धोरणांतर्गत राज्यात 2029 पर्यंत 10 हजार एकरहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येतील. यात
*आंतरराष्ट्रीय मेगा लॉजिस्टीक हब* म्हणून पनवेल येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संलग्न नवी मुंबई-पुणे क्षेत्रात 2 हजार एकरवर इंटरनॅशनल मेगा लॉजिस्टिक हबचा विकसित करण्यात येईल. त्याच्याशी नवी मुंबई ते पुणे हे क्षेत्र तळोजा, पाताळगंगा, रसायने, खोपेाली, महाड, रोहा, चाकण,तळेगांव या औद्योगिक वसाहती संलग्न असल्यामुळे हे क्षेत्र आंतराष्ट्रीय स्तरावरील व्यापार व उद्योगांचे प्रमुख केंद्र होईल. या हबच्या विकासासाठी पंधराशे कोटीची तरतूद करण्यात येईल.

*नॅशनल मेगा लॉजिस्टीक हब :-* नागपूर- वर्धा नॅशनल मेगा लॉजिस्टिक हब हे पंधराशे एकरवर उभारण्यात येईल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी जोडला असून, नागपूर जिल्ह्याचे देशातील वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक केंद्रीय स्थानामुळे लॉजिस्टिक हबच्या विकासासाठी अनुकूल आहे. जिल्ह्यात 4 राष्ट्रीय द्रुतगती मार्ग आणि एक समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर प्रगतीपथावर असून जिल्हा पूर्वीपासून मालवाहतूक करण्याचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखला गेला आहे. या हबसाठी देखील पंधराशे कोटीची तरतूद करण्यात येईल.

*राज्य लॉजिस्टीक हब :-* छत्रपती संभाजी नगर-जालना, ठाणे-भिवंडी, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, पुणे- पुरंदर व पालघर- वाढवण या 5 ठिकाणी प्रत्येकी 500 एकरवर राज्य लॉजिस्टीक हब लॉजिस्टीक सुविधा उपलब्ध करतील. या पाच हबसाठी 2 हजार 500 कोटीची तरतूद करण्यात येईल.

*प्रादेशिक लॉजिस्टीक हब :* नांदेड-देगलूर, अमरावती – बडनेरा , कोल्हापूर-इचलकरंजी नाशिक – सिन्नर व धुळे-शिरपूर या पाच ठिकाणी प्रत्येकी 300 एकर जागेवर प्रादेशिक हब उभारण्यात येईल. या पाच प्रादेशिक लॉजिस्टीक हबच्या विकासासाठी पंधराशे कोटीची तरतूद करण्यात येईल.

*जिल्हा लॉजिस्टीक नोडस :-* राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची मुलभूत क्षमता, अंतर्भूत उद्योग व्यवसायाच्या संधी व पारंपारीक कौशल्याच्या आधारे निर्माण झालेली आर्थिक विकासाची केंद्रे याच्या समन्वयातून व विश्लेषणातून 25 जिल्हा लॉजिस्टीक नोडस तयार करण्यात येतील. यात प्रत्येक जिल्ह्यात किमान 2 ते 3 ठिकाणी अशी एकूण 100 एकर क्षेत्रावर जिल्ह्याची दोन-तीन प्रमुख उद्योग व्यापार व व्यवसायची ठिकाणे हब आणि स्पोक मॉडेल अंतर्गत जोडली जातील. जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रातील 15 टक्के क्षेत्र खाजगी क्षेत्रातील लॉजिस्टीक नोडस साठी राखीव ठेवण्यात येतील.
याशिवाय राज्यात लॉजिस्टीक पार्क विकासकासाठी वित्तीय प्रोत्साहन अनुदान ही देण्यात येईल. या धोरणांतर्गत विहित केलेल्या झोन I आणि झोन II मधील वर्गवारीमध्ये स्थापित होणाऱ्या पात्र लॉजिस्टीक पार्क यांना भांडवली अनुदान देण्यात येईल. ते पुढीलप्रमाणे – लघु लॉजिस्टिक पार्क: किमान 5 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या हबसाठी किमान 10 कोटी गुंतवणूक असलेल्या घटकांना 20 टक्के भांडवली अनुदान देण्यात येईल. मोठा लॉजिस्टिक पार्क: किमान 50 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या हबसाठी आणि किमान 100 कोटी गुंतवणूक असलेला घटकांना 15 टक्के भांडवली अनुदान देण्यात येईल. विशाल लॉजिस्टिक पार्क: किमान 100 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या हबसाठी किमान 200 कोटी गुंतवणूक असलेल्या घटकांना 15 टक्के भांडवली अनुदान देण्यात येईल. अतिविशाल लॉजिस्टिक पार्क: किमान 200 एकरवरील हबसाठी आणि किमान 400 कोटीची गुंतवणूक असलेल्या घटकांना 10 टक्के भांडवली अनुदान देण्यात येईल. तसेच या सर्व लॉजिस्टीक पार्कंना औद्योगिक दराने वीज, निर्णायक औद्योगिक पायाभूत सहाय्य व ग्रीन लॉजिस्टीक सहाय्य दिले जाणार आहे.
झोन I,झोन II व झोन III मधील स्थापित होणाऱ्या लघु,मोठे, विशाल, अतिविशाल व बहुमजली लॉजिस्टीक पार्क यांना लॉजिस्टीक घटकांना उद्योग व पायाभूत क्षेत्र दर्जा, ग्राउंड कव्हरेज मध्ये सवलत, झोन निर्बंधामध्ये शिथिलता,उंचीच्या निर्बंधामध्ये शिथिलता,ऑपरेशन्स 24×7,कौशल्य व उद्योजकता विकासासाठी सहाय्य तसेच एकल खिडकी प्रणाली,व्यवसाय सुलभता अशी बिगर वित्तीय प्रोत्साहन देण्यात येतील.

*बहुउद्देशिय लॉजिस्टीक पार्क :-* शहरी/निमशहरी भागात किमान 20 हजार चौ.फुट बांधीव क्षेत्र असलेल्या क्षेत्रास “बहुमजली लॉजिस्टीक पार्क” असे संबोधले जाईल व किमान गुंतवणूक 5 कोटी इतकी राहील. ठाणे,मुंबई व पुणे या महानगरांमध्ये खुल्या जागेची उपलब्धतेमध्ये अडचणी असल्याने, जागेचा जास्तीत वापर होण्यासाठी बहुउद्देशीय लॉजिस्टीक पार्क प्रस्तावित करण्यात आले आहेत.
प्रत्येक जिल्हयातील 6 (प्रथम 100 घटकांना) लॉजिस्टीक पार्कच्या आतील तसेच प्रत्येक जिल्हयातील 6 (प्रथम 100 घटकांना) लॉजिस्टीक पार्कच्या बाहेरील एमएसएमई – स्टोरेज आणि कार्गो हाताळणी घटकांना व्याज अनुदानासह मुद्रांक शुल्क सवलत, औद्योगिक दराने वीज, तंत्रज्ञान सुधारणा सहाय्य व व्यवसाय सुलभता असे वित्तीय प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच उद्योग व पायाभूत क्षेत्र दर्जा,ग्राउंड कव्हरेज मध्ये सवलत,झोन निर्बंधामध्ये शिथिलता,उंचीच्या निर्बंधामध्ये शिथिलता,ऑपरेशन्स 24×7,कौशल्य व उद्योजकता विकासासाठी सहाय्य तसेच एकल खिडकी प्रणाली,व्यवसाय सुलभता असे बिगर वित्तीय प्रोत्साहन देण्यात येईल.
लॉजिस्टीक क्षेत्रातील एमएसएमईना (जमिन किंमत वगळून 50 कोटी गुंतवणूक मर्यादा असणारे घटक) कोणत्याही प्रकारच्या पूर्वपरवानगी पासून सूट देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी राज्य शासन मैत्री कक्षाद्वारे आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.
—–०—–

वैद्यकीय शिक्षण विभाग

*कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय, आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय*

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय आणि आजरा तालुक्यातील उत्तूर येथे योग व निसर्गोपचार महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

कागल येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय आणि तितक्याच रुग्ण खाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी आवश्यक जागा उपलब्ध करून देतील. यासाठी एकूण 487 कोटी 10 लाख रुपये खर्च येईल.

उत्तूर येथे 60 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय तसेच तितक्याच खाटांचे रुग्णालय सुरु करण्यात येईल. यासाठी देखील कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नि:शुल्क जागा उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी एकूण 182 कोटी 35 लाख रुपये खर्च येईल.
—–०—–

विधि व न्याय विभाग

*न्यायमूर्तीना सेवा निवृत्तीनंतर घरकामगार, वाहनचालक सेवा*

न्यायमूर्तीना सेवा निवृत्तीनंतर घरकामगार, वाहनचालक सेवा असे अनुज्ञेय सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती आणि अन्य न्यायमूर्ती यांना किंवा मृत्यू पश्चात त्यांच्या पती किंवा पत्नीस लाभ देण्यात येतात. हे लाभ मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झालेल्या पण इतर राज्याच्या उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झालेल्या किंवा मृत्यू पश्चात त्यांच्या हयात पती किंवा पत्नीस देण्यास आज मान्यता देण्यात आली.
—–०—–

महसूल विभाग

*सेना कल्याण शैक्षणिक संस्था, राधा कल्याणदास दर्यानानी ट्रस्टला मुद्रांक शुल्क माफ*

सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात १०० टक्के सूट देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मौ. कान्हे येथील राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला तसेच आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीला याचा लाभ होईल. आर्मी वेल्फेअर सोसायटी, दक्षिण कमांड मुख्यालय हे आर्मी लॉ कॉलेजच्या विस्तारीकरणासाठी जमीन घेणार आहे. त्यामुळे लोकहितास्तव हा निर्णय धेण्यात आला.
—–०—–

सहकार विभाग

*जुन्नरच्या आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय*

औषधी वनस्पती प्रक्रिया आदिवासी सहकारी संस्थांसाठी अर्थसहाय्य योजनेतून जुन्नरच्या श्री. कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संस्थेस एक वेळचे अर्थसहाय्य म्हणून २ कोटी रुपये देण्यात येतील. यातून या संस्थेने नाबार्डकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेची परतफेड करावयाची आहे.
—–०—–

अल्पसंख्याक विकास विभाग

*अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस मान्यता*

*राज्यातील अल्पसंख्याकांचे मागासलेपण दूर करणार*

राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’च्या धर्तीवर ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संस्थेसाठी एकूण ११ पदे निर्माण करण्यात येतील. त्याचप्रमाणे या संस्थेच्या वेतन, कार्यालयीन खर्च, मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी, प्रशिक्षणासाठी एकूण ६ कोटी २५ लाख रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

राज्यात मुस्लिम, जैन, बौध्द, ख्रिश्चन, ज्यु, सिख, पारशी हे अल्पसंख्याक नागरिक आहेत. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा या संस्थेमार्फत अभ्यास करण्यात येईल.

राज्यपालांच्या हस्ते ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्र ग्रंथाचे प्रकाशन —– एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी .पी. राधाकृष्णन

राज्यपालांच्या हस्ते ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्र ग्रंथाचे प्रकाशन
—–
एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी .पी. राधाकृष्णन

ठाणे,दि.७ :- भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानले जाते. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्रा.डॉ.प्रदीप ढवळ आणि डॉ.अरुंधती भालेराव, राजन बने व सान्वी ओक लिखित ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथील नाट्यगृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

ग्रंथदिंडीच्या माध्यमातून ‘योद्धा कर्मयोगी.. एकनाथ संभाजी शिंदे’ हा चरित्र ग्रंथ व्यासपीठावर आणण्यात आला आणि या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री शंकर बाबा पापळकर, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार रविंद्र फाटक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, साहित्य संमेलन अध्यक्ष रविंद्र शोभणे, शारदा एज्युकेशन सोसायटीचे विलास ठुसे आदि मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन म्हणाले की, मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळाली आहे, हे मी माझे भाग्यच समजतो. मला याचा मनस्वी आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपली संस्कृती टिकली नसती. त्यांच्या महान कार्यामुळेच महाराष्ट्राचे नाव आज संपूर्ण देशात आदराने घेतले जाते. आधीच्या वक्त्यांनी केलेल्या भाषणातून आणि जमलेल्या जनसागराकडे पाहून माझी अशी खात्री झाली आहे की, एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत.
ते म्हणाले, पुस्तके कधीही फुकट घेऊन वाचू नयेत. पुस्तकाचे मूल्य देऊन पुस्तके वाचल्यास आपल्या भावना त्या पुस्तकाचे वाचन करताना एकजीव होतात, त्यातील मतितार्थ आपल्याला समजतो, असे माझे व्यक्तिगत मत आहे.

राज्यपाल म्हणाले की, आज केवळ भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आपल्या कामाने मंत्रमुग्ध करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख साधा चहावाला म्हणून करण्यात आली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रिक्षावाला म्हणून. मात्र एका साध्या चहावाल्यास देशाचे पंतप्रधान पद तर एका रिक्षावाल्यास मुख्यमंत्री पद हे केवळ भारतीय लोकशाहीच्या महानतेमुळेच शक्य झाले आहे.

जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही, असे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले की, कोरोना काळात एकनाथ शिंदे यांनी केलेले काम हा महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. त्यांनी गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्या भागात केलेले काम हे अतिशय वाखाण्याजोगे आहे. मनापासून एखादे काम करणे, ही इच्छाशक्ती असणे यातूनच व्यक्ती समाजासाठी काहीतरी करू शकतो, तसे काम श्री.एकनाथ शिंदे सतत करताना दिसून येतात. संपूर्ण देशाला विकासाच्या वाटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेत आहेत. आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांची उत्तम साथ मिळत आहे. 2047 साली भारत हा महासत्ता बनणार यात शंकाच नाही. विशेष म्हणजे हे शासन ज्या प्रकारे काम करीत आहे त्यातून महाराष्ट्राचा विकास हा होणारच होणार आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्र जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार यात शंकाच नाही. मी महाराष्ट्रात जनतेचा सेवक म्हणून आलो आहे. त्यामुळे शक्य तितकी जनसेवा करण्याचा संकल्प मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करीत आहे, असे राज्यपाल शेवटी म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्यावर पुस्तक लिहिण्याइतपत मी असे काही मोठे काम केलेले नाही. सर्वांच्या साथीने मी इथपर्यंत पोहोचलो आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार. सत्तेचा वापर हा गोरगरिबांच्या कल्याणासाठीच व्हायला हवा, ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आहे. मला काय मिळाले, यापेक्षा मी समाजाला काय दिले हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच मी या मार्गावर काम करण्याचा प्रयत्न करतोय. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे, आणि उद्याही मी कार्यकर्ताच राहणार आहे. मी असे मानतो की, सी.एम.म्हणजे कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणूस, ही बाळासाहेबांची शिकवण. मी त्याच शिकवणीच्या आधारे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. माझ्याकडे आलेला माणूस रिकाम्या हाताने कधीच जात नाही आणि कधी जाणारही नाही. मी आज जे काही आहे ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळेच. मी संपूर्ण महाराष्ट्र हे माझे कुटुंब मानतो. यश आले तर हुरळून जाऊ नये आणि अपयश आले तर खचून जावू नये, ही आईची शिकवण मी आजही कायम स्मरणात ठेवली आहे. हे शासन 24 x 7 लोककल्याणासाठी काम करीत आहे. हे शासन विकास आणि कल्याण याची सांगड घालून लोकांसाठी चांगल्या योजना राबवीत आहे. यापुढेही हे शासन लोककल्याणाचा विचार करूनच निर्णय घेणार, राजकीय हिताचे कधीही निर्णय घेतले जाणार नाहीत. निर्णय हे सर्वसामान्यांच्या हिताचेच घेतले जातील.

शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस येण्यासाठी आम्ही सर्व एकत्र मिळून प्रयत्नशील आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा आम्हाला खंबीर पाठिंबा आहे. त्यामुळे जे काम करीत आहोत ते सर्वसामान्य जनतेसाठीच. यामुळे माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी समाजासाठी काम करीत राहणार, असे सांगून माझ्या या सर्व वाटचालीत माझ्या पत्नीचा खूप मोठा वाटा आहे. तिची खंबीर साथ मला नेहमी समाजासाठी काम करण्याची सदैव प्रेरणा देते. माझ्या या सामाजिक कार्यात माझे सर्व कुटुंबिय सदैव माझ्या पाठीशी असतात, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या जडणघडणीत त्यांचे आई-वडील, पत्नी आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे अमूल्य योगदान आहे. छत्रपती शिवरायांनी देव, देश आणि धर्मासाठी लढणे हा मंत्र जपला होता आणि आधुनिक युगात हा मंत्र जपताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कृतीतून दिसतात. त्यांची संयमी वृत्ती, लोकांचे ऐकून घेण्याची प्रवृत्ती, कठोर मेहनतीची तयारी, विविध पदांना न्याय देण्याची वृत्ती हे त्यांचे गुणविशेष अनुकरणीय आहेत. जनतेत राहून जनतेसाठी काम करणे, हा ध्यास घेतलेला लोकनेता एकनाथ शिंदेंकडे पाहिले की दिसून येतो. संघर्षाला शांतपणे तोंड देण्याची वृत्ती, मित्रांप्रती कर्तव्य हेही त्यांचे गुणविशेष आहेत. अशा व्यक्तीचा चरित्र ग्रंथ प्रकाशित होणे, हे निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक असते. अशा व्यक्तींचे चरित्र वाचल्यावर ते सर्वसामान्यांना नेहमीच प्रेरणा देतात आणि त्यातून सर्वसामान्य नागरिक घडतातही.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारणाची शिकवण अवघ्या महाराष्ट्राला दिली. त्यांच्या शिकवणीचे अनुकरण करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. लोकांच्या सदैव गराड्यात राहणारा मुख्यमंत्री, शेतीची आवड असणारा मुख्यमंत्री, गावाकडे रमणारा मुख्यमंत्री ही सर्व विशेषणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लागू होतात. त्यांच्या सर्व यशात त्यांच्या सर्व कुटुंबियांचेही मोठे योगदान आहे.

याप्रसंगी पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाविषयी अनेक उदाहरणे देऊन ते सर्वसामान्यांचे नेते आहेत, ते लोकनेते आहेत, ते अनाथांचे नाथ आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली तर सूत्रसंचालन सुप्रसिध्द निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी केले. या चरित्र ग्रंथाचे लेखक प्रा.डॉ.प्रदीप ढवळ यांनी मनोगत व्यक्त करताना या चरित्र ग्रंथाच्या निर्मिती विषयीची माहिती उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, पुस्तकाचे लेखक प्रा.डॉ.प्रदीप ढवळ, डॉ.अरुंधती भालेराव, राजन बने आणि सान्वी ओक तसेच ग्रंथाली प्रकाशनचे सुरेश हिंगलासपूरकर यांचा राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून तसेच राष्ट्रगीत व राज्यगीताने करण्यात आली तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. आभार प्रदर्शन शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.विलास ठुसे यांनी केले.

error: Content is protected !!