Home Blog Page 66

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे त्रुटी असलेले अर्ज फेरसादर करण्याचे आवाहन

पुणे, दि.२२: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत नारीशक्ती अॅप किंवा माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर लॉगिन करुन त्रुटी असलेले अर्ज फेरसादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण जामसिंग गिरासे यांनी केले आहे.

अर्ज मंजूर झाल्यानंतरही बॅंक खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांनी बँक खात्यासोबत आधारकार्ड संलग्न करुन घ्यावे. नारीशक्ती अॅप किंवा माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज भरलेल्या महिलांनी आपले आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करावी. ही प्रकिया पूर्ण केल्यानंतरच योजनेचा लाभ मिळणार आहे.

अर्जाची सद्यस्थिती ‘डिसअॅप्रुड’ अशी दिसत असल्यास आपल्या भ्रमणध्वनीद्वारे नारीशक्ती अॅपवर किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावरुन लॉगिन करुन एडिट या ऑप्शनवरुन कागदपत्रांची त्रुटी दूर करुन अर्ज पुन्हा अपलोड करावे. ज्या महिलांनी अंगणवाडी सेविका अथवा सेतू सुविधा केंद्रातून अर्ज भरला असेल त्यांनीदेखील त्यांच्या खात्यावरून अर्ज एडीट करुन त्रुटी दूर करावी.

अर्जाची सद्यस्थिती ‘रिजेक्टेड’ असे दिसल्यास अशांचे अर्ज बाद करण्यात आले असून या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही, याबाबत नोंद घ्यावी, असेही श्री. गिरासे यांनी कळविले आहे.

नवीन फौजदारी कायद्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य विचार – जिल्हा न्यायाधीश आर. के. देशपांडे

*नवीन फौजदारी कायद्यांच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेचे भारतीयीकरण – दिवाणी न्यायाधीश डॉ. निरंजन वानखडे*

*बारामती न्यायालयात ‘नवीन फौजदारी कायदे 2023’ विषयावरील मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी प्रदर्शन पाहण्याची संधी*

https://pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=2047675

आपत्तीच्या काळात यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे-अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी

पुणे, दि.२२: आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी दक्ष राहून समन्वयाने काम करण्यासोबतच नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती मुख्य बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने आयोजित ‘दक्ष’ आपत्ती व्यवस्थापन परिषद २०२४ च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी ज्योती कदम, औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अपर संचालक शारदा होंदुले, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार वैशाली म्हस्के, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय कचोळे, तहसीलदार मीनल भोसले, जयश्री आव्हाड, पुणे महानगरपालिका उपआयुक्त गणेश सोनावणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, पुणे महानगरपालिका मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.

श्रीमती द्विवेदी म्हणाल्या, आपत्तीचे भय, त्याविषयीची चिंता, आपत्तीमुळे येणारे दुःख, नैराश्य या सर्व बाबींचा आपत्तीच्या काळात नागरिकांच्या जीवनशैलीवर दूरगामी परिणाम होतात. शहरी आणि ग्रामीण भागातील आपत्तीच्या घटना वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. आपत्तीच्या काळात नागरिकांच्या प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा असतात. अचानक येणाऱ्या आपत्तीच्या काळात समयसूचकता खुप महत्वाची बाब आहे. सूक्ष्म नियोजन करुन उत्तम संवादद्वारे परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे. अशावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे. मदत व बचावकार्यात स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवावा.

मागे घडलेल्या घटनांचे विश्लेषण करुन पुढील घटना टाळण्याकरीता उपयोग करता येईल. त्यामुळे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपत्ती व्यस्थापनाबाबत ज्ञानाची देवाण-घेवाण करावी, असेही श्रीमती द्विवेदी म्हणाल्या.

श्री. चव्हाण म्हणाले, पुणे विभागात मागील दहा वर्षात पूरपरिस्थिती, दरड कोसळणे, भुस्खलन अशा विविध आपत्तीला आपल्याला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीला यशस्वीरित्या तोंड देता यावे याकरीता आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार गाव, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये चुकीच्या अफवा पसरविण्याऱ्या व्यक्ती आणि काम टाळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आपतीच्या काळात स्थानिक यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

श्रीमती म्हस्के यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आढावा, श्री. सोनावणे यांनी शहरी आपत्ती व्यवस्थापन तसेच श्री. बहिवाल यांनी आपत्ती व आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.

खटाखट नव्हे, फटाफट योजना, ज्यांचे फॉर्म रखडले, त्यांना तीन महिन्याचे एकदम 4500 रु. देणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

पुणे :- ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही. ही फटाफट फटाफट चालणारी योजना आहे. आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत. ज्या बहिणींचे फॉर्म रखडले त्यांना तीन महिन्यांचे 4500 रुपये एकदम देणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.पुण्यात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.*

*👉🟥🟥👉देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात पुणे येथे होत आहे. सुरुवात पुण्यापासून का? असे मला विचारले एकाने विचारले होते. ज्यावेळेस परकियांचे आक्रमण आमच्यावर झाले त्यावेळेस आई जिजाऊंनी स्वराज्याची संकल्पना शिवरायांना दिली. महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सांगितले की. महिलांना शिक्षणाचा अधिकार आहे. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा याच पुण्यात सुरू केली. त्यामुळे पुणे हे महत्त्वाचे ठिकाण आहे, असे त्यांनी म्हटले.*

*👉🛑🛑👉प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही*

*ते पुढे म्हणाले की, आपले सरकार देना बँक सरकार आहे. याआधीच सरकार लेना बँक सरकार होते. मागच्या काळातील सरकार वसुली करणारे सरकार होतं. आत्ताचे सरकार बहिणींना देणारे सरकार आहे. त्यामुळे आज आपण ठरवले पुण्यापासून सुरुवात करायची. पण पुण्यापासून जरी औपचारिक सुरुवात केली असली तरी मुख्यमंत्र्यांनी सांगितले पैसे क्रेडिट करणे सुरू करा. आता 1 कोटी 3 लाख महिलांना त्यांच्या खात्यात 3 हजार रुपये प्रत्येकी जमा झाले आहेत. आता थोड्या महिला बाकी आहेत. पण काळजी करू नका, प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही हा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.*

*👉🔴🔴👉ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही*

*31 जुलैपर्यंतचे फॉर्मचे पैसे जमा केले आहेत. 31 ऑगस्टपर्यंतच्या फॉर्मचे पैसे जमा होताना महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्रित पैसे आम्ही टाकणार आहोत. सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही सगळे पैसे मिळणार आहेत. योजना कुठेही बंद होणार नाही. ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही. ही फटाफट फटाफट चालणारी योजना आहे. आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.*

*👉🟥🟥👉त्यावेळी सावत्र भावांच्या पोटात खूप दुखलं*

*ज्या वेळेस आम्ही या योजनेची घोषणा केली त्यावेळेस तुमच्या सावत्र भावांच्या पोटात खूप दुखलं. सावत्र भावांनी खूप प्रयत्न केले की, योजना होऊ नये म्हणून पहिल्यांदा कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्यावर पुरुषांचे फोटो लावले. जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म आम्ही सरकारला दिले होते. मात्र, सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाहीत. काही ठिकाणी मोटरसायकलचे फोटो लावले. त्यांच्याकडून जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजे आणि महिलांपर्यंत पैसे पोहोचू नये, असा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा त्यांनी टाकला. हे पोर्टल स्लो व्हावे, असा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे चार-पाच दिवस ते पोर्टल बंद होते. चार-पाच लोकांनी हाहाकार सुरू केला की, पोर्टल बंद पडले आहे. पोर्टल बंद पडले तरी आम्ही ऑफलाइन फॉर्म स्वीकारले. ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि आमच्या बहिणींना पैसे देण्याचा आमचा निर्धार पूर्ण केला, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.*

आरोग्य हे बाजारात विकत मिळत नसल्याने आजार होण्यापेक्षा त्याला प्रतिबंध करणे ही काळाची गरज : डॉ. संदेश शहा.
आरोग्य हे बाजारात विकत मिळत नसल्याने आजार होण्यापेक्षा त्यास प्रतिबंध करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने आरोग्य साक्षर व सजग होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आरोग्य संदेश बहुउद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदेश शहा यांनी केले.
इंदापूर ज्येष्ठ नागरिक भवनमध्ये जेष्ठ नागरिक संघ, आरोग्य संदेश प्रतिष्ठान व समाजभूषण शरदकुमार माणिकचंद शहा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आयोजित ‘निरोगी शरीर हिच खरी संपत्ती ‘ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी अध्यक्ष बाबासाहेब घाडगे व नंदकुमार गुजर, दत्तात्रय चांदणे यांच्या हस्ते सामाजिक कार्याबद्दल डॉ. संदेश शहा व डॉ. राधिका शहा यांचा फेटा घालून, सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे संस्थापक सदस्य सुभाष थोरात, भानुदास पवार, शहाजी बागल यांचा अभिष्टचिंतन सत्कार करण्यात आला.
डॉ. शहा पुढे म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेने सन २०२५ मध्ये भारत मधुमेह तर सन २०३० मध्ये कॅन्सर ची राजधानी होणार असल्याचा इशारा दिला आहे. त्याबरोबर स्त्री व पुरुष वंध्यत्व, थायरॉईड, सोरायसिस, सांधेदुखी, तसेच इतर आजारांचे प्रमाण वाढत आहे.सध्या अन्न, हवा व पाणी प्रदूषित झाले असल्या मुळे आपले आयुर्मान घटत चालले आहे. मानसिक ताणतणाव, फास्ट फूड संस्कृती, रासायनिक खतांचा वापर वाढल्याने अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आजार होण्यापेक्षा त्यास प्रतिबंध करण्यासाठी सर्व चिकित्सा पद्धतीच्या एकत्रित सर्वसमावेशक औषधोपचार पद्धती बरोबरच सिंपथी देखील तेव्हढीच महत्वाची आहे. शरीर हे पंचमहाभूताने बनले असून शरीरात ७२ टक्के पाणी व २२ टक्के अन्न आहे. त्यामुळे संतुलित आहार, भरड धान्य वापर, दैनंदिन व्यायाम, ध्यानधारणा या बरोबरच आयनीकृत म्हणजेच अल्कलाईन
आयोनाईजड पाणी पिल्यास अनेक दुर्धर विकारांना प्रतिबंध होवून मानवी आयुर्मान दीर्घा युषी होण्यास मदत होईल. त्यासाठी आदर्श आरोग्य दिनचर्या तयार करून समाजाचे आधारस्तंभ असलेल्या जेष्ठ नागरिकांनी आरोग्य आचारसंहितेचे तंतोतंत पालन करणे ही काळाची गरज आहे.
यावेळी डॉ. राधिका शहा यांनी नगरपरिषदेचे, बिसलेरी पाणी व आयनी कृत पाणी यातील शास्त्रीय फरक उदाहरण देवून विशद करून आयनीकृत पाण्याची प्रात्यक्षिके दाखवली. या पाण्यामुळे कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब, मूतखडे आदी विविध दुर्धर आजार बरे होण्यास मदत होते. कोरोना आजारामुळे सर्व औषधोपचार पद्धतीच्या तसेच आपल्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात या पाण्याचा नित्य वापर करून आपण आपल्या कुटुंबाचे, समाज व मित्र परिवाराच्या आरोग्याचे शिल्पकार होणे गरजेचे आहे.
स्वागत प्रमोद भंडारी यांनी तर प्रास्ताविक नंदकुमार गुजर यांनी केले. सुत्रसंचलन जेष्ठ नागरिक संघाचे सचिव हनुमंत शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन सुभाष महाजन यांनी केले.
यावेळी अशोक गानबोटे,
सुभाष थोरात, भानुदास पवार, भीमराव वणवे, पांडुरंग जगताप, कृष्णा ताटे सर, इंद्रेश्र्वर पलंगे, सलीम शेख, जावेद मोमीन, संतोष जामदार यांच्यासह जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

चेतना इंटरनॅशनल स्कूल येथे  भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

15 ऑगस्ट 2024 वार गुरुवार रोजी चेतना फाउंडेशन संचलित चेतना इंटरनॅशनल स्कूल व कॉलेज या ठिकाणी 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय उदय देशपांडे, सचिव विलास भोसले , खजिनदार सोमनाथ माने, सदस्य निकिता माने मॅडम, फार्मसी प्रिन्सिपल नेहा काजळे मॅडम, स्कूल प्रिन्सिपल सुधीर करगळ सर उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर शिक्षण अधिकारी मा.अजिंक्य खरात साहेब तसेच कारगिल विजेते खिल्लारे सर ,माझी पी.एस.आय चांगदेव शेंडगे उपस्थित होते.
खरात साहेब यांच्या हस्ते चेतना फाउंडेशनच्या क्रीडांगणावर ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायले. कवायत व लेझीम यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आपले प्राविण्य दाखवले. मा. खरात साहेबांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्र दिन व प्रजासत्ताक दिन यातील फरक सांगितला तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली सुतार मॅडम यांनी केले.
तसेच वैष्णवी डोईफोडे ,प्रांजली सुतार व विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार मेघना जगताप यांनी केले व कार्यक्रमाचे सांगता वंदे मातरम ने करण्यात आली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात *महिलावर्गात समाधानाची भावना-उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर

बारामती, दि. १५: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरीता बारामती तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून एकूण ६६ हजार ४३३ अर्ज लाभाकरीता पात्र ठरले आहेत, पात्र ठरलेल्या महिलांना १४ ऑगस्टपासून प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाल्यामुळे महिलावर्गात समाधानाची भावना व्यक्त होत आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.

या योजनेअंतर्गत तालुक्यात एकूण ६८ हजार ४२४ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ६६ हजार ४३३ अर्ज लाभाकरीता पात्र ठरले आहेत. प्रशासनाच्यावतीने प्राप्त प्रत्येक अर्जाची छाननी करण्यात आली. छाननीअंती पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात १४ ऑगस्टपासून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याकरीता तालुका प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने अहोरात्र काम करीत आहेत. पात्र महिलांना विनाअडथळा अर्ज करता यावा, याकरीता ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या सूविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. ऑफलाईन अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वांवलंबीकरण, आत्मनिर्भर करण्याबरोच महिलांच्या सशक्तीकरणाला चालना देण्याकरीता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरीता महिलांनी तात्काळ अर्ज करावे, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले आहे

error: Content is protected !!