Home Blog Page 62

पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपुर्ती सोहळा उत्साहात*

अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन*

राज्यातील १ हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्गाटन*

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ*

ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनास प्रारंभ*

वर्धा, दि.२० : पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागिदारी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजसमुहाची आहे. या समुहातील कारागिर उद्योजक व्हावेत असा आमचा प्रयत्न असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या बहुआयामी प्रगतीचा नायक शेतकरीच राहणार असून त्याच्या समृध्दीसाठी सरकार सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील राहणार असल्याचीही ग्वाही प्रधानमंत्र्यांनी येथे दिली.

पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्वावलंबी मैदानात आज पार पडला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला.

आजच्याच दिवशी 1932 मध्ये महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता निर्मूलनसाठी सुरू केलेल्या अभियानाची आठवण करुन देतानांच बापूजींची कर्मभूमी आणि विनोबांची साधनाभूमी असलेल्या वर्ध्यातून विकसित भारताची निर्मिती करण्याच्या आमच्या संकल्पास ऊर्जा मिळते, असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले, विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या सोहळ्यासाठी आम्ही यामुळेच वर्ध्याची निवड केली. ही योजना केवळ एक सरकारी कार्यक्रम नसून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशात हजारो वर्षापासून असलेल्या कौशल्याचा वापर करण्याचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. इतिहासात आपल्या देशातील समृध्दीचा मोठा आधार पारंपरिक कौशल्य हाच होता. येथील वस्त्रोद्योग, शिल्पकला, धातूविज्ञान, अभियांत्रिकी अशा साऱ्याच बाबी जगात वैशिष्टपूर्ण होत्या. जगातील सर्वात मोठा वस्त्रनिर्माता भारतच होता. मात्र पारतंत्र्याच्या कालखंडात इंग्रजांनी स्वदेशी कौशल्य नष्ट केले. या पार्श्वभूमीवर गांधीजींनी वर्ध्यातूनच ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात बलुतेदारी समुहाची सातत्याने उपेक्षा झाली. त्यामुळेच प्रगती आणि आधुनिकतेत देशाची पिछेहाट झाल्याची खंत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.

कारागिरांच्या पारंपरिक कौशल्याचा सन्मान, सामर्थ्य आणि या समाजसमूहाची समृध्दी ही या योजनेमागची मूळ भूमिका असल्याचे स्पष्ट करुन श्री. मोदी म्हणाले, देशातील सातशेहून अधिक जिल्हे, अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायती तसेच हजारो स्थानिक नागरी संस्था या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत. दहा लाखांहून अधिक लोक या योजनेशी जोडले गेले असून आठ लाख शिल्पकारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यात केवळ महाराष्ट्रातीलच साठ हजारांहून कारागिर समाविष्ट आहेत. त्यांच्या कामाला आधुनिक आणि डिजिटल तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. साडेसहा लाख बलुतेदारांना आधुनिक साधने दिली गेली आहेत. या योजनेचा सर्वाधिक फायदा याच समाजसमूहांना होत आहे. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात मोठ्या औद्योगिक विकासाची क्षमता असून त्यात वस्त्रोद्योग हा अग्रणी आहे. विदर्भात कापसाचे क्षेत्र मोठे असुनही येथील शेतकऱ्यांची यापूर्वी उपेक्षा झाल्याची खंत व्यक्त करुन प्रधानमंत्री मोदी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर नांदगाव खंडेश्वर येथे टेक्सटाइल पार्कची निर्मिती झाली. आता अमरावती येथे होत असलेले पीएम मित्रा पार्क हे वस्त्रोद्योगास नवी झळाळी प्राप्त करुन देण्याच्या प्रयत्नातील पुढचे पाऊल आहे. फार्म टू फायबर, फायबर टू फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन अशा सुत्रातून आमचे प्रयत्न सुरू असून विदर्भातील उच्च दर्जाच्या सूतापासून तयार होणारे कपडे परदेशात निर्यात होऊन येथील शेतकरी समृध्द होतील. अमरावतीच्या पार्कमध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून 1 लाखाचा रोजगार उपलब्ध होईल. औद्योगिक विकासासाठी पुरक असणाऱ्या विविध पायाभूत सुविधांचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. विदर्भातील सिंचन विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या वैनगंगा-नळगंगा योजनेच्या अंमलबजावणीतून 10 लाख एकर क्षेत्र सिंचित होणार आहे. याशिवाय कांदा, सोयाबीन उत्पादकांनाही विविध निर्णयाच्या माध्यमातून सरकार मदत करत आहे, असे प्रधानमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
देशातील गरीब, वंचित तसेच परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा ही योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या खंबीर पाठबळामुळे राज्याची प्रगती गतिमानतेने होत आहे. अमरावती येथे पीएम मित्रा पार्क हा देशातील वस्त्रोद्योगाच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसावर प्रक्रिया करून कापड निर्यातीला चालना मिळणार आहे. या पार्कमध्ये 10 हजार कोटीची गुंतवणुक होणार असून सुमारे 1 लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांमुळे राज्यातील महिला व इतर घटकांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला पोषक ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

*केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी*
केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यावेळी म्हणाले, पीएम विश्वकर्मा ही योजना पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारी आहे. त्यांना उच्च गुणवत्ता व प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेला माल जागतिक बाजारपेठेत पाठवण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात 1 लाख 46 हजार कारागिरांची नोंदणी झाली आहे. कारागिरांना अत्याधुनिक साधनांसाठी 5 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून त्यांच्या उत्पादीत वस्तुंना मोठी बाजारपेठ निर्माण करण्यात आली आहे. भारतातील कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तुंच्या उत्पादनांचे प्रदर्शन वर्धा येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामिण कारागिरांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे श्री.मांझी यांनी यावेळी सांगितले.

*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
देशातील सात पीएम मित्रा पार्कपैकी अमरावती येथे होत असलेल्या पार्कच्या माध्यमातून कापसापासून कापडापर्यंत व कापडापासून फॅशनपर्यंतच्या सर्व प्रकारच्या एकत्र सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे मोठ्या गुंतवणुकीसह रोजगार उपलब्ध होईल. पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारांच्या विकासाचा विचार अद्यापपर्यंत कोणीही केला नाही, परंतू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा सारख्या योजनेच्या माध्यमातून बाजारपेठेला अनुकूल असलेल्या वस्तुंची निर्मिती करण्यासाठी प्रशिक्षणासह आर्थिक सहाय्य कारागिरांना उपलब्ध करून दिले आहे. याचा लाभ समाजातील शेवटच्या कारागिरापर्यंत पोहोचत आहे. बलुतेदार समाजसमुहाच्या जीवनात परिवर्तन घडविण्याची मोठी संधी या योजनेमधून उपलब्ध झाले असल्याचे सांगून शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

*उपमुख्यमंत्री अजित पवार*
पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या पार्कमुळे पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार असून येथे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये मोठे प्रकल्प गतिमानतेने पुर्ण केल्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा विक्रम केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणुक करण्यास उत्सुक आहेत. गडचिरोली येथे स्टील उद्योग तसेच महापे येथे सेमी कंडक्टर या उद्योगांचा यामध्ये समावेश आहे. प्रधानमंत्र्यांच्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे सरकार संपुर्ण योगदान देईल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

*कारागिरांना प्रमाणपत्र, धनादेशाचे वितरण*
प्रधानमंत्र्यांनी कळ दाबून अमरावती येथील पीएम मित्र पार्क, राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्रांचे उद्घाटन केले तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ केला. पीएम विश्वकर्मा योजनेच्या 1 लाख कारागिरांना ओळखपत्र व प्रमाणपत्र तसेच 1 लाख कारागिरांना डिजिटल कौशल्य प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. देशभरातील 75 हजार कारागिरांना कर्जाचे वितरण देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपुर्तीनिमित्त भारतीय डाक विभागाने काढलेल्या विशेष डाक तिकिटाचे अनावरण प्रधानमंत्र्यांनी केले.

सुरुवातीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चरख्याची प्रतिकृती तर केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनी ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृती भेट देऊन प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले. लघु, सुक्ष्म व मध्यम विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या परंपरागत ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या विविध आकर्षक कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ.पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस, प्रभारी विभागीय आयुक्त डॅा.विपीन ईटनकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आदींची उपस्थिती होती.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET 2024) साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना http://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या वरील वेबसाईटवर देण्यात आला आहे, असेही श्री. राठोड यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET 2024) साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना http://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या वरील वेबसाईटवर देण्यात आला आहे, असेही श्री. राठोड यांनी कळविले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यात ५६ महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि. 19: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील ५६ महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दुरदृष्यप्रणालीद्वारे २० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता उद्घाटन होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच युवक युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. महाविद्यालयात कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करून 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (पिंपरी), नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था (तळेगाव दाभाडे), कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (इंदापूर), शंकरराव भेलके महाविद्यालय (नसरापूर), शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (शारदानगर-बारामती), अण्णासाहेब मगर कॉलेज (हडपसर), डॉ. डी. वाय. पाटील बायोटेक्नोलॉजी आणि बायोइनफोरमॅटीक इन्स्टिट्युट (ताथावडे), सेंट व्हिन्सेंट कॉलेज ऑफ कॉमर्स (पुणे), जे.एस.पी.एम भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक (वाघोली), शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय (अवसरी खुर्द), वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (पुणे), स्कूल ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर (बारामती), समर्थ पॉलिटेक्निक (बेल्हे) सुभाष बाबुराव कुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (केडगाव), एसव्हीपीएम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग (माळेगाव), सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (किवळे), विठ्ठलराव थोरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था (भिगवण), गिरिजाई नर्सिंग कॉलेज (शिरुर), जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी (वडगाव सहानी), टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (खडकी), श्री जैन विद्या प्रसारक मंडळ सांगवी केशरी कला व वाणिज्य महाविद्यालय (पिंपरी), प्रीतम प्रकाश कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स (भोसरी), प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज (पिंपरी), इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन (पुणे), एमकेएसएसएस मनीलाल नानावटी व्होकेशनल इन्स्टिट्युट फॉर वमेन (कर्वे नगर), नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पॉलिटेक्निक (नायगाव-नसरापूर), भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च (नर्हे), श्री. फत्तेचंद जैन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (पिंपरी), सौ. ताराबाई शंकरलाल मुथ्था कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स (पिंपरी), एशियन कॉलेज ऑफ फार्मसी (धायरी), गर्व्हेन्मेंट पॉलिटेक्निक (पुणे), शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय (बारामती), एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स (धायरी), हरिभाई देसाई कॉलेज (पुणे), लोटस बिझनेस स्कूल (मुळशी), डॉ. शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ एमबीए (कृषी-व्यवसाय) (बारामती), डॉ. प्रा. रामकृष्ण मोरे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज (आकुर्डी), श्रीमती. गेंदीबाई ताराचंद चोपडा कनिष्ठ महाविद्यालय, (चिंचवड), एमईएस गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (पुणे), समर्थ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट (बेल्हे), मराठवाडा मित्र मंडळाचे पॉलिटेक्निक (पिंपरी-चिंचवड), कृषी विकास प्रतिष्ठान शारदाबाई पवार औद्योगिक प्रशिक्षण संस्था (शारदानगर, बारामती), अनंतराव थोपटे महाविद्यालय व संशोधन केंद्र (भोर), इरा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन (आर्वी), कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (खेड-शिवापूर), डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस (वराळे-तळेगाव), बी.डी.काळे महाविद्यालय (घोडेगाव), पद्मश्री आप्पासाहेब पवार कृषी पॉलिटेक्निक (बारामती), एमकेएसएसएस ॲकॅडमी ऑफ इनफोर्मेशन टेक्नोलॉजी (कर्वेनगर), शारदाबाई पवार इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग (शारदानगर, बारामती), डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (आकुर्डी), एमकेएसएसएस महेंद्रा नानावटी इन्स्टिट्यूट ऑफ लेसर टेक्नॉलॉजी अँड ऍप्लिकेशन्स (कर्वे नगर), राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक (भोर), विद्या प्रतिष्ठानचे पॉलिटेक्निक कॉलेज (इंदापूर) महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, स्किल डेव्हलपमेंट सेंटर (कर्वे नगर) व अरहम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज (पुणे) या महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे उद्धाटन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या उद्धघाटनप्रसंगी प्रधानमंत्री श्री. मोदी मार्गदर्शन करणार आहे. तरी जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवती, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व मान्यवरांनी नजीकच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.

एक देश-एक निवडणूक’ प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील कॅबिनेटनं एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत देशात एकाचवेळी निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. एक देश एक निवडणूक याबद्दलचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती स्थापन केली होती. या समितीनं आपला साडे अठरा हजार पानांचा अहवाल विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे काही महिन्यांपूर्वीच सुपूर्द केला होता.*

*👉🔴🔴👉लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी व्हाव्यात. २०२९ पासून याची सुरुवात व्हावी. लोकसभेसोबतच सर्व विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पुढच्या १०० दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी शिफारस कोविंद यांच्या समितीनं दिलेल्या अहवालात आहे. त्यामुळे एका ठराविक अवधीत सगळ्याच निवडणुका पार पडतील. सध्याच्या घडीला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वर्षांमध्ये, वेगवेगळ्या महिन्यांमध्ये होत आहेत.*

*👉🟥🟥👉नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सातत्यानं एक देश एक निवडणुकीचा मुद्दा मांडत आले आहेत. एक देश एक निवडणूक यासाठी ते खूप आग्रही आहेत. १५ ऑगस्टला त्यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. त्यावेळीही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. एक देश एक निवडणूक यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन मोदींनी केलं होतं. संपूर्ण ५ वर्षे राजकारण चालत राहायला नको. निवडणुका केवळ ३ ते ४ महिन्यांत व्हाव्यात. एकाचवेळी निवडणुका होत असल्यानं विकासकामांना खीळ बसणार नाही. निवडणूक आयोजनचा खर्चही कमी होईल, असं मोदी म्हणाले आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीनं अहवाल तयार करताना देशभरातील ६२ राजकीय पक्षांशी संवाद साधला. त्यातील ३२ पक्षांनी एक देश एक निवडणुकीला समर्थन दिलं. तर १५ पक्षांनी विरोध दर्शवला. उर्वरित १५ देशांनी कोणतीच भूमिका घेतली नाही. हे पक्ष तटस्थ राहिले.*

केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांबाबतच्या नवीन कायद्याची माहिती घेऊन विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्यवसाय उभे करावेत – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांबाबतच्या नवीन कायद्याची माहिती घेऊन विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्यवसाय उभे करावेत – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे, दि. १५: विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी आता फक्त कर्ज घेऊन वाटप करणे आणि वसूल करणे एव्हढेच काम करणे अपेक्षित नसून आता केंद्र सरकारच्या सहकार विभागाने आणलेल्या नवीन कायद्यानुसार या संस्थांना १५१ प्रकारचे विविध व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. संस्थांच्या चेअरमन आणि सोसायट्यांनी या योजनांची माहिती घेऊन योजना राबवाव्यात, असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

अवसरी (ता. आंबेगाव) येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कवयित्री शांता शेळके सभागृहात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने आयोजित सहकार परिषद व बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे, सहकारी संस्थाचे पुणे ग्रामीण जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भेंडे आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना बक्षीस वितरण आणि सहकार क्षेत्रात घडत असलेले बदल आणि त्या अनुषंगाने संस्थांनी निश्चित करावयाची दिशा या अनुषंगाने या सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, संस्था जपली तर आपल्याला त्यांची मदत होईल. शेतकऱ्याला पीक कर्ज, अन्य कोणतेही कर्ज वाटप, शैक्षणिक कर्ज आदींसाठी जिल्ह्यात चांगले काम आहे. सोसायट्यांनी शिस्तीने कारभार केला नाही तर तोटा वाढतो, कर्ज वाटप करून वसूली होत नसल्याने तोटा वाढतो व सोसायटी बंद पडली तर त्याचा त्रास शेतकऱ्याना होतो. बऱ्याच सोसायट्या अनिष्ट तफावतीमध्ये जातात. सोसायटीत अडचणीत आल्यास शेतकऱ्याला कर्जासाठी सावकाराकडे जावे लागते. ते किती तरी जास्त टक्केवारीने घेत असल्याने लोकांना त्रास होतो. त्यामुळे आपल्या संस्था जपल्या पाहिजेत आणि चांगल्या प्रकारे कारभार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्व अटी शर्ती पूर्ण करून देशात प्रथम क्रमांकावर आली आहे. जिल्हा बँक महिला स्वयंसहायता गटांना ४ टक्के दराने थेट कर्ज देते. मात्र या बाबतचे अधिकाधिक कर्ज वाटप व वसूल करण्यासाठी संस्थांच्या आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. जास्तीत जास्त महिलांना कर्ज वाटप करावे, असेही ते म्हणाले.

अडचणीतील सोसायट्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. मंत्रिमंडळाने सोसायट्यांच्या सचिवांच्या संवर्गाचे (केडर) पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यादृष्टीने काम चालू आहे.

वेळेत पीक कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूल न करता फक्त मुद्दल वसूल केल्यामुळे त्याचा व्याज परतावा जिल्हा बँकेला देण्याच्या अनुषंगाने शासन पातळीवरून लवकरच कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

श्री. आढळराव पाटील म्हणाले, सरकारने आणलेल्या नवीन कायद्यामुळे १५१ उद्योग संस्थेच्या माध्यमातून उभे करता येतात. त्यासाठी फक्त डोळे उघडे ठेऊन धाडस केले पाहिजे. आपल्या गावातील संस्था तोट्यात राहू नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सर्व शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित सहकार आहे. त्यांच्या जीवनात बदल होऊ शकतो. सहकारात चांगल्या प्रकारे काम झाले पाहिजे. परिसराच्या विकासासाठी सहकार महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन संस्थांनी काम करावे, असेही ते म्हणाले.

प्रा. दुर्गाडे म्हणाले, पुणे जिल्हा बँकेमार्फत महिला बचत गटांना विनातरण कर्जात ५ लाख रुपयांवरून वाढ करून ७ लाख ५० लाख रुपये कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर तारण कर्ज १५ लाख रुपये इतके दिले जाते. बँकेची या वर्षीची उलाढाल २७ हजार कोटी रुपयांची झाली आहे. बँक देशातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये प्रथम क्रमांकावर असून देशातील अग्रगण्य ५ नागरी अनुसूचित सहकारी बँकामध्येही समावेश आहे. तसेच बँकेत लवकरच १ हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

अनिष्ट तफावतीतील संस्थांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बँकेने १० कोटी रुपयांची तरतूद केली असून या संस्थांना बिगरव्याजी २० लाख रुपये देण्याचे निश्चित केले आहे. शैक्षणिक कर्ज ४० लाख रुपयांपर्यंत फक्त ६ टक्के व्याजदराने आदी विविध कर्जांना कमी व्याजदर असतानाही जिल्हा बँकेला ४१८ कोटीचा नफा झाला आहे. नफ्याचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करण्याचा प्रयत्न आहे. सोसायट्यांनी आपल्या गावातील उपलब्ध कच्चा माल आणि परिसरातील मागणी पाहून त्यानुसार व्यवसाय सुरू करावेत, असेही ते म्हणाले.

मंगेश तिटकारे म्हणाले, राज्यात २१ हजार ९७ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत. त्यातील ९ हजार म्हणजेच फक्त ४८ टक्के नफ्यात आहेत. बाकीच्या अनिष्ट तफावतीत आहेत. जिल्ह्यात वि.का.स. संस्थांची ५ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक अनिष्ट तफावत आहे. आंबेगाव तालुक्यात १०३ संस्था अ वर्गात आहेत त्यांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. ‘ब’ मधील संस्थांचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक अनिरुद्ध देसाई यांनी केले. वसुलीची परंपरा कायम राहावी आणि त्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने दरवर्षी बँकेमार्फत बक्षीस वितरण करण्यात येते. आंबेगाव तालुक्यात वसुलीचे काम अत्यंत चांगले आहे. १५१ प्रकारच्या विविध योजना राबविण्यासाठी सहकारी संस्थांच्या उप विधीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्याची चांगली अंमलबजावणी करण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.

बँकेच्या शेती संस्था विकास कक्षा बाबत प्रा. रमेश बांडे यांनी मार्गदर्शन केले.

कर्ज वाटप आणि वसुलीमध्ये चांगले काम केलेल्या वि. का. स. संस्थांसाठी देण्यात येणाऱ्या तीन वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील ५९ पैकी ४१ संस्थांचा तर शिरूर तालुक्यामधील ४२ संस्थांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आदी उपस्थित होते.

औंध येथील भारतीय संविधान मंदिराचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि. १४: औंध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता दुरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक तथा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण पुणे प्रादेशिक सह संचालक रमाकांत भावसार यांनी दिली आहे.

राज्यातील ४३४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये संविधान मंदिराची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रमाचे एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई येथे सकाळी ११.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

औंध येथे आयोजित कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी, परिसरातील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. भावसार यांनी केले आहे.

सुनीता विल्यम्स अंतराळामध्येच अडकल्या; स्टारलाइनर यानाचं वाळवंटात सेफ लँडिंग

न्यूयाँर्क:-अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि सहकारी बुश विल्मोर यांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अंतराळयान ३ महिन्यांनंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरले आहे. लँडिंग 3 मोठे पॅराशूट आणि एअरबॅगच्या मदतीने झाले. नासाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार पहाटे साडेतीन वाजता हे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळे झाले होते. पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे 6 तास लागले. स्टारलाइनरने सकाळी सव्वा नऊ वाजता पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. तेव्हा त्याचा वेग ताशी 2735 किमी इतका होता. हे सकाळी 9 वाजून 32 मिनिटांनी अमेरिकेतील न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँड स्पेस हार्बर (वाळवंट) येथे उतरले.*

*👉🟣🟣👉बोइंग कंपनीने हे अंतराळयान नासासाठी बनवले आहे. 5 जून रोजी सुनीता आणि बुच यांना ISS मध्ये पाठवण्यात आले. हे केवळ 8 दिवसांचे मिशन होते, परंतु त्याच्या सुरक्षित परतण्याबद्दल अनेक शंका होत्या. त्यामुळे नासाने अंतराळवीरांना बोइंगऐवजी स्पेसएक्स यानाने आणण्याचा निर्णय घेतला. सध्या बोईंगची स्टारलाइन क्रूशिवाय पृथ्वीवर सुखरूप परतली आहे.*

*👉🔴🔴👉सीएनएनच्या वृत्तानुसार, स्टारलाइनरच्या वापसी आणि त्याच्याशी संबंधित अपडेट्सबाबत NASA ने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात बोईंगचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. 24 ऑगस्ट रोजी नासाने सुनीता विल्यम्स यांच्या परतीसाठी बोइंगचे स्पेसक्राफ्ट स्टारलाइनर असुरक्षित घोषित केले होते. तेव्हापासून, बोईंगच्या कोणत्याही अधिकाऱ्याने स्टारलाइनरशी संबंधित कोणत्याही पत्रकार परिषदेला हजेरी लावली नाही. नासाचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच म्हणाले की, स्टारलाइनरने चांगले लँडिंग केले. आम्ही ते तपासासाठी पाठवले आहे. अंतराळयानामध्ये बिघाड कशामुळे झाला हे आम्ही लवकरच सांगू. नासा आणि बोईंग यांच्यात समस्या असल्या तरी दोघेही संयुक्तपणे स्टारलाइनरची चौकशी करतील. जेणेकरून स्टारलाइनच्या प्रोपल्शन सिस्टममध्ये बिघाड का झाला हे शोधता येईल.*

*👉🟥🟥👉नासाचे माजी अंतराळवीर गॅरेट रेझमन यांनी सीएनएनला सांगितले की, रिकामे अंतराळ यान आणण्याचा नासाचा निर्णय पूर्णपणे योग्य आहे. Reisman सध्या एलोन मस्कच्या SpaceX शी संबंधित आहेत. ते म्हणाले की स्टारलाइनर सुरक्षितपणे उतरले असले तरी त्याच्या सुरक्षित लँडिंगबद्दल कोणालाही खात्री नव्हती. स्पेस स्टेशनवर उपस्थित सुनीता विल्यम्स यांनी स्टारलाइनरच्या सुरक्षित लँडिंगनंतर आनंद व्यक्त केला. टीमचे कौतुक करताना त्या म्हणाले की, तुम्ही लोक उत्कृष्ट आहात. त्याचवेळी, बोईंगची लँडिंग कमांडर लॉरेन ब्रेंकी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, स्टारलाइनर सुखरूप घरी आलं आहे. किती नेत्रदीपक लँडिंग केले.*

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! कमी पटसंख्येच्या शाळांवर आता कंत्राटी शिक्षक; निवृत्त शिक्षकासह डीएड, बीएड उत्तीर्ण तरुणांनाही संधी; दरमहा 15000 मानधन!

मुंबई – राज्यातील जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांचा पट २० किंवा त्याहून कमी आहे, त्या शाळांमध्ये आता सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड, बीएड उत्तीर्ण बेरोजगार तरूण-तरूणींना शिक्षक म्हणून संधी मिळणार आहे. त्यांना दरमहा १५ हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने गुरूवारी घेतला आहे.*

*👉🟥🟥👉कमी पटंसख्येच्या शाळांमध्ये नेमलेल्या कंत्राटी शिक्षकास १२ रजा असतील. याशिवाय त्यांना नियमित शिक्षकांप्रमाणे अध्यापनाचे तास घ्यावे लागतील. त्यांना प्राथमिकचे शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्तीचे आदेश द्यावेत. त्या शिक्षकाच्या कामाचे एक वर्षानंतर मूल्यमापन होईल. त्यात त्याचे काम समाधानकारक नसल्यास त्या कंत्राटी शिक्षकाची सेवा समाप्त केली जाणार आहे. दरम्यान, कंत्राटी शिक्षक मिळाल्याशिवाय त्या शाळांवरील शिक्षकांची बदली केली जाणार नाही. या कंत्राटी शिक्षकांवर केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे नियंत्रण राहील, असेही शासन निर्णयात नमूद आहे.*

*👉🟥🟥👉शासन निर्णयातील ठळक बाबी…*

*🔺🔺स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांची पटसंख्या २० किंवा त्याहून कमी आहे, त्या शाळांमध्ये मंजूर केलेल्या दोन शिक्षकांपैकी एकजण सेवानिवृत्त किंवा डीएड, बीएड झालेल्या बेरोजगार उमेदवाराची कंत्राटी पद्धतीने निवड करण्यास परवानगी*

*🔺🔺निवृत्त शिक्षकाचे वय ७० पर्यंत असावे, तो मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेला असावा, त्यांची कोणतीही चौकशी प्रलंबित नसावी*

*🔺🔺निवृत्त शिक्षकाची नेमणूक करताना त्यास ज्या गटासाठी घ्यायचे आहे, त्या गटाला सेवाकाळात त्यांनी अध्यापन केलेले असावे*

*🔺🔺कंत्राटी निवृत्त शिक्षक तीन वर्षांपर्यंत नेमला जावा किंवा त्यांचे वय ७० होईपर्यंतच नियुक्ती करावी, तो शिक्षक शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा*

*🔺🔺डीएड, बीएड उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देता येईल, पण त्यास कोणत्याही संवर्गात सेवा समावेशन, सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे अधिकार नसतील*

*🔺🔺डीएड, बीएडधारक बेरोजगार उमेदवारास सुरवातीला एकाच वर्षासाठी नेमणूक द्यावी, त्यानंतर योग्यता व गुणवत्तेच्या आधारावर कालावधी वाढविण्याची संधी*

राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; विहीरीसाठी भरघोस अनुदान मिळणार; मंत्रीमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय

मुंबई:-राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आले. यापैकी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान मिळणार आहे. आता सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस 4 लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस 1 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते.*

*👉🔴🔴👉बैठकीत घेतलेले निर्णय पुढीलप्रमाणे :-*

*1) 🔺🔺सार्वजनिक बांधकाम ➖पुणे- छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार*

*2)🔺🔺पशुसंवर्धन विभाग ➖ अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार*

*3)🔺🔺वस्त्रोद्योग विभाग ➖शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य*

*4)🔺🔺कृषी विभाग➖बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान*

*5)🔺🔺महिला व बालविकास ➖अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. ३६ हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार*

*6)🔺🔺कामगार विभाग ➖औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते*

*7)🔺🔺पशुसंवर्धन विभाग ➖ थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ.*

*8)🔺🔺जलसंपदा विभाग➖ धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार.*

*9)🔺🔺विधी व न्याय विभाग ➖काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय, पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय, हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा करणार*

error: Content is protected !!