Home Blog Page 63

राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, युनिफाईड निवृत्ती योजनेसह सुधारित निवृत्तीवेतन योजनेतून एका पर्यायाची निवड करता येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकारी- कर्मचारी संघटनांच्या बैठकीत घोषणा

मुंबई दि.४- राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या युनिफाईड निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवत संप संस्थगित करण्याची घोषणा केली.

राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह‍ येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल , मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे , वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता , सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार ग.दी. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघाचे उपाध्यक्ष विश्वास काटकर यांच्यासह इतर अधिकारी,कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, की आपण सर्व अधिकारी-कर्मचारी शासनाचा भाग आहात. सर्वांना न्याय मिळावा, शाश्वत निवृत्ती वेतन मिळावे, ही आमची भावना आहे. शासन शब्दाला पक्के असून अधिकारी आणि कर्मचारी यांचे नुकसान होऊ देणार नाही. संघटनांची मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या एनपीएस, युनिफाईड निवृत्ती वेतन योजना आणि राज्य शासनाने जाहिर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना निवडण्याची संधी त्यामुळे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या योजनांचा अभ्यास करुन त्यांच्या दृष्टीने फायद्याची योजनेची निवड करता येणार आहे, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी जाहीर केले.

तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात निघालेल्या जिल्हा परिषदेतील अधिकारी- कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठीचा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर आणण्यात यावा. यापूर्वी विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत केलेल्या घोषणा आणि मान्य केलेल्या मागण्यांच्या पुर्ततेचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबधित विभागांना दिल्या. राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सुधारित निवृत्तीवेतन योजनेबाबत मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे घोषित केलेला संप संस्थगित करत असल्याचे या प्रतिनिधींनी जाहीर केले.

लाडकी बहीण योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई:-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यभरातील मोठ्या संख्येने महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान राज्य सरकारकडून महिलांसाठी खूशखबर आहे. यापूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट देण्यात आली होती. मात्र सरकारने यात मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला असून सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिला अर्ज करू शकतील. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.*

*👉🟥🟥👉सध्या अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधन सणापूर्वीच सरकारने महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये वर्ग केल्यामुळे इतर महिलांचाही मोठा प्रतिसाद योजनेला दिसून येत आहे. यापूर्वी 31 ऑगस्टपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येत होता, आता सरकारने ही मुदत आणखी वाढवली असून 30 सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांचे एकूण 4500 रुपये मिळणार आहेत.*

*👉🛑🛑👉ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केलेत आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेत, आणि पहिल्या लाभ न मिळालेल्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात एकत्रितपणे 4500 रुपये मिळतील. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रितपणे 4500 रुपये खात्यात जमा होतील. दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट होती. मात्र अजूनही रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करत आहेत. काही भागात महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे अनेकवेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. याच सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकारने या योजनेला मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, जवळपास 40 ते 42 लाख महिलांच्या बँक खात्याला त्यांचे आधार नंबर लिंक नाही. त्यामुळे या महिलांचा अर्ज मंजूर होऊनदेखील त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे बँक सिडिंगची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. एकदा आधार आणि बँक खाते एकमेकांशी लिंक झाले की, या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल.*

महाराष्ट्राची विकासयात्रा वेगाने पुढे जात राहील – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

विधानपरिषद शतकमहोत्सवा निमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ ग्रंथाचे प्रकाशन

उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘ उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरण

मुंबई,दि.३ – देशाच्या विकासात महिलांचा सक्रिय सहभाग हा महत्वपूर्ण घटक आहे. महिलांच्या सहभागा शिवाय कोणतेही राष्ट्र, राज्य गतीमान प्रगती करु शकत नाही, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) देशाात पहिलं स्थान महाराष्ट्राचं असून महाराष्ट्राची विकासयात्रा अशीच वेगाने पुढे जात राहील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.

विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित ‘ महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवा’ निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘ वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व ‘ या ग्रंथाचे प्रकाशन तसेच ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘ उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी श्रीमती मुर्मू बोलत होत्या . यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान असून विविध महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहीलेल्या महाराष्ट्रांने देशात अनेक कायदे, सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली आहे. वीरमाता जिजाऊ यांची धरती असलेल्या आणि स्त्री शिक्षणाची सुरवात करणारे महात्मा जोतीराव- सावित्रीबाई फुले, संसदीय लोकशाहीवर मार्गक्रमण करत असेलल्या भारताला घटना देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यासारख्या महान विभूतींचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकमहोत्सव वर्ष साजरा होत असल्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील जनतेचे, लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करुन राष्ट्पती पुढे म्हणाल्या की, विधान परिषद सभागृहाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अनेक दिशादर्शक नियम, कायदे यांची निर्मिती केली आहे. जे पुढे देशपातळीवर स्वीकारण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वि.स.पागे यांनी दिलेला रोजगार हमी योजनेसारखा लोकोपयुक्त कायदा ही याच विधीमंडळाची देण आहे. देशाच्या लोकसभेचे पहिले सभापती ग.वा.मावळणकर हे याच विधान परिषदेचे सदस्य होते तर देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटीलही याच विधीमंडळाच्या सदस्य राहिलेल्या आहेत. विविध महत्वपूर्ण निर्णय, कायदे करण्यासोबतच लोकांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे विधीमंडळ काम करत आहे. या माध्यमातून जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका यशस्वीपणे बजावत देशाच्या संसदीय प्रणालीत महाराष्ट्र विधीमंडळाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असे सांगून विधान परिषदेच्या शतकपूर्तीच्या वाटचालीचा आढावा घेणारा संदर्भ ग्रंथ प्रकाशित केल्याबदद्ल तसेच या ग्रंथात तत्कालीन बॉम्बे विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती श्रीमती जेठी सिपाहीमलानी यांच्या वर सविस्तर माहिती देणारे प्रकरण ठेवल्या बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केले.

तसेच महाराष्ट्र ही वीरमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या मुख्य पदावर महिला अधिकारी तर पोलिस प्रशासनाच्याही प्रमुख पदावर महिला अधिकारी सक्षमपणे कार्यरत आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब असून महाराष्ट्राच्या लेकी निश्चितपणे देशाचा गौरव वाढवतील, असं प्रतिपादन राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी केलं.

*महाराष्ट्र भक्ती, शक्ती आणि प्रगतीची भूमी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन*

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर,संत रामदास,संत तुकाराम या सारख्या महान संताची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या पावन भूमीत हिंदवी स्वराज्याचा पाया रचला. त्यांच्या कार्यामुळे देशाची जगात ओळख आहे. छत्रपतींच्या शौर्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान असून प्रत्येकाच्या मनात त्यांची अमीट छाप आहे. महाराष्ट्र भक्ती, शक्ती आणि प्रगतीची भूमी आहे. असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्र विधान परिषदेचे राज्याच्या विकास कार्यात मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्र विधिमंडळात मांडलेली रोजगार हमी योजनेची संकल्पना राष्ट्रीय स्तरावर स्वीकारल्या गेली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असलेल्या लाखो गरजूंना सहायक ठरणारा हा क्रांतिकारी असा निर्णय लोकशाही इतिहासातील एक अद्वितीय उदाहरण आहे. सामाजिक आणि राजकीय सौहार्दासाठी महाराष्ट्र ओळखला जातो. या शतक महोत्सवानिमित्त उत्कृष्ट संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन केल्याबद्दल अभिनंदन करुन राज्यपाल यांनी पुरस्कार विजेत्यां सदस्यांचे अभिनंदन केले.

*महिला सक्षमीकरणासाठी शासन कृतीशील – मुख्यमंत्री*

अतिशय संघर्षमय वाटचाल करत आज देशाच्या राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांची वाटचाल सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन उपयुक्त निर्णय, महत्वाच्या योजना राबवत असून मोठ्या प्रमाणात त्याची अमंलबजावणी राज्यात सुरु आहे. महिलांना आर्थिक सहाय्य करणारी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, सुरु झाली असू महिलांचा मोठा प्रतिसाद याला मिळत आहे. या अंतर्गत आतापर्यंत दिड कोटी पेक्षा अधिक महिलांना लाभ मिळाला आहे. त्याचप्रमाणे महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणारी लखपती दिदी योजना, शासकीय कागदपत्रांवर आपल्या नावाच्या पुढे आईचे नाव लावण्याचा निर्णय तसेच लेक लाडकी योजना, मुलींना व्यावसायिक शिक्षणात मोफत शिक्षणाची संधी, यासोबतच महिलांसाठीच्या अनेक उपयुक्त योजना राज्य शासन राबवत आहे. एका बाजूला विकास साधत असताना दुस-या बाजूला कल्याणकारी योजनांची जोड देत महिला सक्षमीकरणाला बळकटी देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

*सक्षम लोकशाहीसाठी महाराष्ट्र विधीमंडळाचे योगदान उल्लेखनीय*
*विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर*

महाराष्ट्र विधीमंडळाला गौरवशाली पंरपरा असून येथील अनेक सदस्यांनी विधीमंडळ कामकाजात भरीव योगदान दिलेले आहे. आज राष्ट्पतींच्या उपस्थितीत होत असेलला विधानपरिषद शतकमहोत्सवी सोहळा या परंपरेच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे सांगून ॲड.नार्वेकर म्हणाले की, विधीमंडळाच्या कार्यपद्धतीत कालानुरुप अनेक बदल करण्यात येत असून आर्टीफिशियल टेक्नॉलॉजीचा वापर तसेच माहिती तंत्रज्ञान कार्यप्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. देशाच्या संसदीय कार्यपद्धतीत महाराष्ट्राच्या विधीमंडळाची ठळक ओळख असून या सर्वांचा आढावा घेणारा हा संदर्भ ग्रंथ सर्व संबंधित सर्वांना मार्गदर्शक ठरणारा आहे,असे सांगितले.

*सदस्य, अभ्यासक, संशोधकांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथाची निर्मिती*
*उपसभापती डॉ.नीलम गो-हे*

विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी सोहळ्यात राष्ट्रपतींची उपस्थिती ही या सभागृहाच्या वारश्याला अधिक संपन्न करणारी ऐतिहासिक घटना असल्याचे सांगून उपसभापती डॉ.नीलम गो-हे म्हणाल्या की, विधान परिषदेने वरिष्ठ सभागृह म्हणून या शंभर वर्षांत उल्लेखनीय योगदान राज्याच्या विकासात दिलेले आहे. या सर्वांचा परामर्श घेणारा सर्वंकष संदर्भ ग्रंथ प्रकाशित होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. यामध्ये सहकार्य केलेल्या संपादकीय मंडळाचे यावेळी त्यांनी अभिनंदन केले. वरिष्ठ सभागृह म्हणून राज्याच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडत असतानाच आवश्यक विषयांवर चर्चा , कायदे निर्मीतीचे महत्वाचे कार्य या सभागृहाने गेल्या शतकापासून केलेले आहे यामध्ये प्रामुख्याने रोजगार हमी योजना, एकाधिकार कापूस खरेदी योजना, महिला आयोग, देवदासी संरक्षण कायदा,पंचायत राज, रॅंगिग विरोधी कायदा, अल्पसंख्याक आयोग, डान्सबार बंदी विधेयक, ,शालेय शिक्षणात मराठी भाषा अनिवार्य कऱण्याचा निर्णय, यासारखे देशपातळीवर उल्लेखनीय ठरलेले निर्णय घेतले असून या सर्वांचा परामर्श या संदर्भ ग्रंथात घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मंत्रीमंडळातील सदसय्, तसेच माजी आजी सदस्य, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात आणि सांगता राष्ट्गीताने करण्यात आली.

*”उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘ उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. वर्षनिहाय पुरस्कार विजेत्या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे* –

*सन २०१८-१९ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार* सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, डॉ. संजय कुटे उत्कृष्ट भाषण पुरस्कार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानसभा सदस्य पराग अळवणी,विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सदस्य निरंजन डावखरे. उत्कृष्ट भाषण पुरस्कार हुस्नबानू खलिफे, सुजितसिंह ठाकूर

*सन २०१९-२० विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार* सदस्य प्रकाश आबिटकर, आशिष शेलार

*उत्कृष्ट भाषण पुरस्कार* सदस्य सुनील प्रभू, दिलीप मोहिते पाटील. विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सतीश चव्हाण, अनंत गाडगीळ उत्कृष्ट भाषण पुरस्कार रामहरी रूपनवार, श्रीकांत देशपांडे

*सन २०२०-२१ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार* अमित साटम, आशिष जयस्वाल उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रताप सरनाईक, प्रकाश सोळंके विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सदस्य प्रवीण दरेकर, दिवंगत सदस्य विनायक मेटे उत्कृष्ट भाषण पुरस्कार सदस्य मनीषा कायंदे, बाळाराम पाटील

*२०२१-२२ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार* सदस्य संजय शिरसाट, प्रशांत बंब उत्कृष्ट भाषण पुरस्कार सदस्य सरोज अहिरे, सिद्धार्थ शिरोळे विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सदस्य अनिकेत तटकरे, सदाभाऊ खोत उत्कृष्ट भाषण पुरस्कार गोपीकिशन बाजोरिया, विक्रम काळे

*सन २०२२-२३ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार* सदस्य भरत गोगावले, चेतन तुपे, समीर कुणावार उत्कृष्ट भाषण पुरस्कार सदस्य यामिनी जाधव, अभिमन्यू पवार विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सदस्य प्रसाद लाड, महादेव जानकर उत्कृष्ट भाषण पुरस्कार सदस्य बाबाजानी दुर्राणी, प्रज्ञा सातव

*सन २०२३-२४ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार* सदस्य रमेश बोरनारे, अमिन पटेल, राम सातपुते उत्कृष्ट भाषण पुरस्कार सदस्य कुणाल पाटील, श्वेता महाले, प्राजक्त तनपुरे विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सदस्य अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रमेश पाटील उत्कृष्ट भाषण पुरस्कार आमशा पाडवी, श्रीकांत भारतीय, सुनील शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लोहगाव विमानतळावर आगमन

पुणे, दि.२: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सायंकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, एअर कमोडोर आणि एअर ऑफिसर कमांडिंग शेखर यादव, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धिरज सेठ, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यावेळी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचे आणि चिन्हाचे अनावरण

शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माफीनामा

*पालघर:- मागच्या आठवड्यात सिंधुदुर्गामध्ये जे घडलं, माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांनी शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आमच्यासाठी शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. मी आज नमन करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे माफी मागितली.*

*👉🟥🟥👉पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पालघर येथील वाढवण बंदराचे भूमीपूजन पार पडले. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं होतं.*

*👉🟥🟥👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत माफी मागितली. पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, भाषणाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या मनातील भावना व्यक्त करतो. भाजपने ज्यावेळी मला सर्वप्रथम पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केलं, त्यावेळी मी सर्वात आधी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन मी राष्ट्रसेवेच्या नव्या यात्रेची सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी आणि माझ्या सर्व साथीदारांसाठी केवळ नाव नाही. आम्हा सगळ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत. मी आज माझ्या आराध्य दैवताची त्यांच्या पायावर डोकं ठेवत माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.*

*👉🔴🔴👉विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला देखील नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं. आम्ही ते नाहीत जे रोज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत असतात. देशभक्तांच्या भावनांचा अपमान करतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अपशब्द वापरुनही माफी ते मागत नाही. असं करुनही ज्यांना पश्चाताप होत नाही, महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे संस्कार दिसत आहेत, असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. आमचे संस्कार वेगळे आहेत, म्हणून महाराष्ट्रात येता क्षणी मी छत्रपती शिवाजी महाराजांनी माफी मागत आहे. जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतात, त्यांना ज्या वेदना झाल्या आहेत, त्यांची देखील मी माफी मागतो. आमच्या आराध्य दैवतापेक्षा मोठं कुणी नाही, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.*

error: Content is protected !!