Home Blog Page 61

मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. २३: मंत्रालयातील सातव्या माळ्यावर नूतनीकरण केलेल्या ‘ मुख्यमंत्री वॉर रूम’ व म्युरल (भित्तीचित्र) चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून आज करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वॉर रूममधील सोयी सुविधांची माहिती घेतली. राज्यातील प्रकल्पांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या डॅशबोर्ड, प्रकल्पाची फाईलची सद्यस्थिती, ज्या विभागाकडे प्रलंबित आहे, त्या विभागाला जाणारी नॉटिफिकेशन आदींबाबत माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतली. या सर्व पद्धतीमुळे प्रकल्पाला गती मिळून विहित कालावधीत प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पावर नियंत्रण ठेवून सातत्याने पाठपुरावा मुख्यमंत्री ‘वॉर रूम’ करीत असते. नवीन वॉर रूम अत्यंत प्रशस्त असून आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे.

*वॉर रूम ची थोडक्यात वैशिष्ट्ये*
● राज्यातील १५ क्षेत्रातील विविध ७४ प्रकल्पांच्या विविध टप्प्यांवरील कामाचा आढावा.

● प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा, निधी देणारी यंत्रणा यांच्यामधे समन्वय.

● एक्झिक्यूटिव्ह, सेक्टरल आणि प्रोजेक्ट डॅशबोर्ड ची निर्मिती, या डॅशबोर्डच्या माध्यमातून प्रकल्पाच्या प्रत्येक क्षेत्रातील कामाचे मूल्यमापन.

● प्रकल्पाला गती मिळण्यासाठी त्यामधील प्रश्न सोडविण्याकरीता सबंधित विभागाला नॉटिफिकेशन आणि अलर्ट देण्याची सुविधा.

● प्रकल्पामधील अडचण दूर करण्यासाठी ‘ रियल टाईम मॉनिटरिंग’ व्यवस्था.

● प्रकल्पाच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरणारे प्रश्न सोडविण्यासाठी विभागांमध्ये प्रभावी समन्वय व ट्रॅकिंग यंत्रणेचा विकास.

*थोडक्यात वार रूम विषयी..*

● कॉर्पोरेट क्षेत्रातील कार्यालयासारखी अंतर्गत रचना व रंगसंगती.

● राज्यात सुरु असलेल्या पायाभूत सोयी सुविधांचे प्रतिबिंब दाखविणारे दर्शनी भागात असणारे आकर्षक भित्तीचित्र
विविध अँगल मधून सादरीकरण बघणे सहज व्हावे, यासाठी एलईडी स्क्रीन.

● सध्या सुमारे ७० पायाभूत प्रकल्प डॅशबोर्डवर आहेत. ज्यांची एकूण किंमत सुमारे रु. 4 लाख कोटी असून हे प्रकल्प 15 क्षेत्रांमधील आहे.

● सीएम वॉर रूमला आजपर्यंत विविध प्रकल्पांशी संबंधित सुमारे 350 समस्या प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 165 समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे.

● प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी सुमारे 200 हून अधिक बैठका आयोजित केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

👉 संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे :

✅ लोहगाव विमानतळाचे नाव ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे करण्याचा निर्णय

✅ बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी

✅ धान उत्पादकांना दिलासा : आता प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर

✅ कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश

✅ जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय

✅ शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. १४८६ कोटीचा प्रकल्प

✅ करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा

✅ यवतमाळ, जळगांव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते

✅ क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड

✅ ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद

✅ राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ

✅ मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम; राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प

✅ हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार

✅ एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार : साठ वर्षाचा भाडेपट्टा करार

✅ ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ

✅ राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ

✅ राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण

✅ छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये

✅ अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा

✅ जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी

✅ श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार

✅ दूध अनुदान योजना सुरु राहणार. उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान

✅ महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर

देश में मोदी सरकार है, और भारत की धरती पर आतंकवाद को बढ़ावा देने वालों के साथ कोई रियायत नहीं बरती जाएगी। उन्हें सख्त से सख्त सजा दी जाएगी:- अमीत शहा

कांग्रेस और JKNC ने वादा किया है कि अगर जम्मू-कश्मीर में उनकी सरकार बनी, तो आतंकियों को रिहा कर दिया जाएगा। लेकिन देश में मोदी सरकार है, और भारत की धरती पर आतंकवाद को बढ़ावा देने वालों के साथ कोई रियायत नहीं बरती जाएगी। उन्हें सख्त से सख्त सजा दी जाएगी।
आज राजौरी की जनसभा में जनता ने कमल खिलाने का संकल्प लिया।

आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त जुहू किनाऱ्यावर स्वच्छता अभियान स्वच्छता ही सवय बनावी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त जुहू किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

स्वच्छता ही सवय बनावी
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
—-
*समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची*
*-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

मुंबई, दि. २१ – प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असे प्रतिपादन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केले. तर, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सागरी किनारा स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाचे आयोजन केले जाते. या अनुषंगाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय व श्रम व रोजगार मंत्रालय, महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्याने जुहू समुद्रकिनारा येथे समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाचे विशेष सचिव तन्मय कुमार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते.

स्वच्छता अभियानासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती असल्याबद्दल समाधान व्यक्त करून राज्यपाल म्हणाले, तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागृती ही सकारात्मक बाब आहे. सांडपाणी स्वच्छ आणि प्रक्रिया करूनच सागरात गेले पाहिजे तसेच सागर किनारे प्लास्टिक आणि कचऱ्यापासून मुक्त करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. निसर्गाने आपल्याला दिलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ स्वरूपातच निसर्गाला परत दिली पाहिजे, असे सांगून सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या अभियानात राज्याचे पूर्ण सहकार्य असेल, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. राज्यातही ‘स्वच्छता ही सेवा‘ पंधरवड्याचा नुकताच शुभारंभ झाला असून राज्यात ४५०० ठिकाणी हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्याला ७२० किलोमीटर लांबीमध्ये नैसर्गिक सौंदर्य लाभलेले अनेक समुद्रकिनारे लाभले आहेत. जगभरातील पर्यटक देखील स्वच्छ किनाऱ्यांना पसंती देतात. हे किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. मुंबईत सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे, पावसाळ्यानंतर ते नियमित सुरू राहणार असल्याचे सांगून यामुळे प्रदूषणात मोठी घट झाल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे, शासनाच्या सर्व यंत्रणा, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या एकत्रित सहभागातून हे शहर आणि समुद्र किनारे स्वच्छ ठेवूया, असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी जगभर जागृती अभियान राबविले जात आहे. देशात स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन लाईफ या संकल्पनेतील स्वच्छ भारत बनविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांच्या ‘एक पेड मॉं के नाम’ या उपक्रमात सहभागी होऊन सर्वांनी किमान एक झाड लावावे, असे त्यांनी सांगितले. पाण्याच्या पुनर्प्रक्रिया करणाऱ्या स्टार्टअपसाठी केंद्र सरकार मार्फत मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

प्रधान सचिव श्री. दराडे यांनी समुद्र किनारा स्वच्छतेबाबत माहिती देऊन मुंबईतील सर्व चौपाट्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून स्वच्छ केल्या जात असल्याचे सांगितले. तर तन्मय कुमार यांनी केंद्र सरकार मार्फत केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते यावेळी किनारा स्वच्छतेबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. श्री. ढाकणे यांनी या अभियानात सहभागी सर्वांचे आभार व्यक्त केले.

राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह मान्यवर, सामाजिक संस्था, विद्यार्थी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आदींनी यावेळी आधुनिक सामग्रीच्या साहाय्याने जुहू किनाऱ्याची स्वच्छता केली.

देशाच्या नजरा महाराष्ट्र विधानसभा २०२४ वेळापत्रकावर विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार

देशाच्या नजरा महाराष्ट्र विधानसभा २०२४ वेळापत्रकावर

विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार

शनिवार दि.२८ सप्टेंबर रोजी सायं. ४:३० वा. आयोगाची होणार पत्रकार परिषद

*मुंबई :-लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यातील राजकारण्यांप्रमाणे राज्यातील जनतेलाही निवडणुकांचे वेध लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसत आहे. दरम्यान शनिवार दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.*

*👉🟥🟥👉एकीकडे पक्षांमध्ये जागावाटप, मुख्यमंत्रिपद याबद्दल चर्चा सुरु असताना दुसरीकडे सत्ताधारी विरोधकामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अखेर आता याबद्दलची मोठी माहिती समोर आली आहे.*

*👉🔴🔴👉महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात येणार आहे. येत्या २६ सप्टेंबरपासून केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम चार दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाची टीम विधानसभा निवडणुकीबाबत माहिती घेणार आहे. तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली जाणार आहे.*

*👉🟥🟥👉राज्यातील विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राचा दौरा आयोजित केला आहे. येत्या २६, २७ आणि २८ सप्टेंबरला निवडणूक आयोगाचे अधिकारी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. येत्या गुरुवारी २६ सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीहून मुंबईत येतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी २७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक होईल. यानंतर त्याच दिवशी दुपारी १ वाजता सीईओ, नोडल अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. यापाठोपाठ दुपारी ३ वाजता निमलष्करी दलाचे अधिकारी, आयकर विभाग, गुप्तचर यंत्रणा, सीबीआय, ईडी अधिकाऱ्यांबरोबर बैठक होईल. तसेच शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्यासह प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी महत्त्वाच्या बैठका होतील. या सर्व बैठकींमध्ये राज्याची सध्याची परिस्थिती आणि विधानसभा निवडणूक याबद्दलचा आढावा घेतला जाईल.*

*👉🔴🔴👉यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी किती पोषक वातावरण आहे, याबद्दलची माहिती जाणून घेईल. त्यानंतर शनिवारी २८ सप्टेंबरला सकाळी ९. ३० वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची बैठक होणार आहे. यानंतर दुपारी ४. ३० वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद घेतील. या पत्रकार परिषेदनंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीकडे रवाना होतील, अशी माहिती समोर आली आहे.*

*👉🟥🟥👉केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेतल्यानतंर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाईल, असं बोललं जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होऊ शकते, अशीही चर्चा सध्या रंगली आहे.*

*👉🔴🔴👉विशेष म्हणजे येत्या ॲाक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राबरोबर झारखंड विधानसभेची निवडणूक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा कधी होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.*

हिजबुल्लाहच्या हल्ल्याने इस्रायल हादरले रॉकेट आणि मिसाईलचा मारा; जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ

जेरूसलेम:- हिजबुल्लाह आणि इस्रायलमधील तणाव वाढला असून अधिकृत युद्धाची घोषणा झाली आहे. इस्रायलने हिजबुल्लाहवर हल्ला केला होता. यालाच प्रत्युत्तर म्हणून आज रविवारी हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ले करण्यास सुरवात केली आहे. रॉकेट, क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हा हल्ला करण्यात आला आहे. हिजबुल्लाहने आज रविवारी उत्तर इस्रायलमध्ये १०० हून अधिक रॉकेट आणि क्षेपणास्त्रे डागले आहेत. या हल्ल्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला पाहायला मिळाला. लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते. या हल्ल्याला हिजबुल्लाहचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पलटवार म्हंटलं जात आहे.*

*👉🔴🔴👉इस्रायली संरक्षण दलाने याबाबतची अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, हिजबुल्लाह सतत आमच्या लोकांना लक्ष्य करत आहे. रविवारी सकाळी जेझरेल खोऱ्यात 140 हून अधिक रॉकेट आणि ड्रोन हल्ला करण्यात आला. यानंतर हैफा, नाझरेथ, अफुला, लोअर गॅलीलीसह अनेक लष्करी तळांजवळ अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिजबुल्लाह दहशतवादी आमच्या नागरिकांना लक्ष्य करत आहेत. तर IDF ने X वर लिहिले आहे की, हजारो इस्रायलींनी बॉम्ब आश्रयस्थानांमध्ये लपून रात्री काढल्या आहेत. त्यांच्या डोक्यावरून रॉकेटचा वर्षाव होत होता.रात्रभर रॉकेट अलर्ट सायरन वाजत राहिले.*

*👉🟥🟥👉इस्त्रायली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहकडून सतत इस्रायलविरोधात हल्ले केले जात आहेत. रविवारी सकाळी जेझरील खोऱ्यात 140 हून अधिक रॉकेट आणि ड्रोन डागण्यात आले. यानंतर हैफा, नाझरेथ, अफुला, लोअर गॅलीलीसह अनेक लष्करी तळांजवळ अलर्ट जारी करण्यात आला. IDF ने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहचे दहशतवादी सतत आमच्या नागरिकांना लक्ष्य करत आहेत. यामुळे हजारो इस्त्रालयींना जीव मुठीत घेऊन शेल्टरमध्ये रात्र काढावी लागली. त्यांच्या डोक्यावरुन सतत रॉकेटचा वर्षाव होत होता. काही रॉकेट हे त्यांच्या घरावरही पडले. तर काही रॉकेटचा आवाज सतत येत होता.*

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी इंदापूर ला डी फार्मसी ची मान्यता

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी इंदापूर ला डी फार्मसी ची मान्यता
चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजला शैक्षणिक वर्ष 2024 25 साठी डी फार्मसी या अभ्यासक्रमासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पी. सी . आय ) प्राधिकरणाकडून डी फार्मसी या शाखेसाठी 60 जागांची मान्यता मिळाली आहे
तसेच पी .सी .आय . बरोबर महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ (एम . एस . बी . टी . ई ) या दोघांच्या तज्ञ समितीने महाविद्यालयांमध्ये असणाऱ्या सोयी – सुविधा व प्राध्यापक यांची सखोल तपासणी करून ही मान्यता दिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणे आणि त्या विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील यशस्वी करिअर घडवणे हे संस्थेचे ध्येय असून बाहेरच्या विद्यार्थ्यांना वसतीगृह, बस व कॅन्टीन ची सुविधा उपलब्ध आहे असे संस्थेचे अध्यक्ष श्री उदय देशपांडे, सचिव श्री विलास नामदेव भोसले, खजिनदार श्री सोमनाथ पांडुरंग माने यांनी सांगितले आहे .

पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपुर्ती सोहळा उत्साहात*

अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन*

राज्यातील १ हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्गाटन*

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ*

ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनास प्रारंभ*

वर्धा, दि.२० : पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागिदारी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजसमुहाची आहे. या समुहातील कारागिर उद्योजक व्हावेत असा आमचा प्रयत्न असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या बहुआयामी प्रगतीचा नायक शेतकरीच राहणार असून त्याच्या समृध्दीसाठी सरकार सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील राहणार असल्याचीही ग्वाही प्रधानमंत्र्यांनी येथे दिली.

पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्वावलंबी मैदानात आज पार पडला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला.

आजच्याच दिवशी 1932 मध्ये महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता निर्मूलनसाठी सुरू केलेल्या अभियानाची आठवण करुन देतानांच बापूजींची कर्मभूमी आणि विनोबांची साधनाभूमी असलेल्या वर्ध्यातून विकसित भारताची निर्मिती करण्याच्या आमच्या संकल्पास ऊर्जा मिळते, असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले, विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या सोहळ्यासाठी आम्ही यामुळेच वर्ध्याची निवड केली. ही योजना केवळ एक सरकारी कार्यक्रम नसून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशात हजारो वर्षापासून असलेल्या कौशल्याचा वापर करण्याचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. इतिहासात आपल्या देशातील समृध्दीचा मोठा आधार पारंपरिक कौशल्य हाच होता. येथील वस्त्रोद्योग, शिल्पकला, धातूविज्ञान, अभियांत्रिकी अशा साऱ्याच बाबी जगात वैशिष्टपूर्ण होत्या. जगातील सर्वात मोठा वस्त्रनिर्माता भारतच होता. मात्र पारतंत्र्याच्या कालखंडात इंग्रजांनी स्वदेशी कौशल्य नष्ट केले. या पार्श्वभूमीवर गांधीजींनी वर्ध्यातूनच ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात बलुतेदारी समुहाची सातत्याने उपेक्षा झाली. त्यामुळेच प्रगती आणि आधुनिकतेत देशाची पिछेहाट झाल्याची खंत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.

कारागिरांच्या पारंपरिक कौशल्याचा सन्मान, सामर्थ्य आणि या समाजसमूहाची समृध्दी ही या योजनेमागची मूळ भूमिका असल्याचे स्पष्ट करुन श्री. मोदी म्हणाले, देशातील सातशेहून अधिक जिल्हे, अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायती तसेच हजारो स्थानिक नागरी संस्था या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत. दहा लाखांहून अधिक लोक या योजनेशी जोडले गेले असून आठ लाख शिल्पकारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यात केवळ महाराष्ट्रातीलच साठ हजारांहून कारागिर समाविष्ट आहेत. त्यांच्या कामाला आधुनिक आणि डिजिटल तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. साडेसहा लाख बलुतेदारांना आधुनिक साधने दिली गेली आहेत. या योजनेचा सर्वाधिक फायदा याच समाजसमूहांना होत आहे. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात मोठ्या औद्योगिक विकासाची क्षमता असून त्यात वस्त्रोद्योग हा अग्रणी आहे. विदर्भात कापसाचे क्षेत्र मोठे असुनही येथील शेतकऱ्यांची यापूर्वी उपेक्षा झाल्याची खंत व्यक्त करुन प्रधानमंत्री मोदी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर नांदगाव खंडेश्वर येथे टेक्सटाइल पार्कची निर्मिती झाली. आता अमरावती येथे होत असलेले पीएम मित्रा पार्क हे वस्त्रोद्योगास नवी झळाळी प्राप्त करुन देण्याच्या प्रयत्नातील पुढचे पाऊल आहे. फार्म टू फायबर, फायबर टू फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन अशा सुत्रातून आमचे प्रयत्न सुरू असून विदर्भातील उच्च दर्जाच्या सूतापासून तयार होणारे कपडे परदेशात निर्यात होऊन येथील शेतकरी समृध्द होतील. अमरावतीच्या पार्कमध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून 1 लाखाचा रोजगार उपलब्ध होईल. औद्योगिक विकासासाठी पुरक असणाऱ्या विविध पायाभूत सुविधांचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. विदर्भातील सिंचन विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या वैनगंगा-नळगंगा योजनेच्या अंमलबजावणीतून 10 लाख एकर क्षेत्र सिंचित होणार आहे. याशिवाय कांदा, सोयाबीन उत्पादकांनाही विविध निर्णयाच्या माध्यमातून सरकार मदत करत आहे, असे प्रधानमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
देशातील गरीब, वंचित तसेच परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा ही योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या खंबीर पाठबळामुळे राज्याची प्रगती गतिमानतेने होत आहे. अमरावती येथे पीएम मित्रा पार्क हा देशातील वस्त्रोद्योगाच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसावर प्रक्रिया करून कापड निर्यातीला चालना मिळणार आहे. या पार्कमध्ये 10 हजार कोटीची गुंतवणुक होणार असून सुमारे 1 लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांमुळे राज्यातील महिला व इतर घटकांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला पोषक ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

*केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी*
केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यावेळी म्हणाले, पीएम विश्वकर्मा ही योजना पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारी आहे. त्यांना उच्च गुणवत्ता व प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेला माल जागतिक बाजारपेठेत पाठवण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात 1 लाख 46 हजार कारागिरांची नोंदणी झाली आहे. कारागिरांना अत्याधुनिक साधनांसाठी 5 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून त्यांच्या उत्पादीत वस्तुंना मोठी बाजारपेठ निर्माण करण्यात आली आहे. भारतातील कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तुंच्या उत्पादनांचे प्रदर्शन वर्धा येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामिण कारागिरांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे श्री.मांझी यांनी यावेळी सांगितले.

*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
देशातील सात पीएम मित्रा पार्कपैकी अमरावती येथे होत असलेल्या पार्कच्या माध्यमातून कापसापासून कापडापर्यंत व कापडापासून फॅशनपर्यंतच्या सर्व प्रकारच्या एकत्र सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे मोठ्या गुंतवणुकीसह रोजगार उपलब्ध होईल. पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारांच्या विकासाचा विचार अद्यापपर्यंत कोणीही केला नाही, परंतू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा सारख्या योजनेच्या माध्यमातून बाजारपेठेला अनुकूल असलेल्या वस्तुंची निर्मिती करण्यासाठी प्रशिक्षणासह आर्थिक सहाय्य कारागिरांना उपलब्ध करून दिले आहे. याचा लाभ समाजातील शेवटच्या कारागिरापर्यंत पोहोचत आहे. बलुतेदार समाजसमुहाच्या जीवनात परिवर्तन घडविण्याची मोठी संधी या योजनेमधून उपलब्ध झाले असल्याचे सांगून शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

*उपमुख्यमंत्री अजित पवार*
पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या पार्कमुळे पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार असून येथे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये मोठे प्रकल्प गतिमानतेने पुर्ण केल्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा विक्रम केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणुक करण्यास उत्सुक आहेत. गडचिरोली येथे स्टील उद्योग तसेच महापे येथे सेमी कंडक्टर या उद्योगांचा यामध्ये समावेश आहे. प्रधानमंत्र्यांच्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे सरकार संपुर्ण योगदान देईल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

*कारागिरांना प्रमाणपत्र, धनादेशाचे वितरण*
प्रधानमंत्र्यांनी कळ दाबून अमरावती येथील पीएम मित्र पार्क, राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्रांचे उद्घाटन केले तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ केला. पीएम विश्वकर्मा योजनेच्या 1 लाख कारागिरांना ओळखपत्र व प्रमाणपत्र तसेच 1 लाख कारागिरांना डिजिटल कौशल्य प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. देशभरातील 75 हजार कारागिरांना कर्जाचे वितरण देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपुर्तीनिमित्त भारतीय डाक विभागाने काढलेल्या विशेष डाक तिकिटाचे अनावरण प्रधानमंत्र्यांनी केले.

सुरुवातीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चरख्याची प्रतिकृती तर केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनी ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृती भेट देऊन प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले. लघु, सुक्ष्म व मध्यम विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या परंपरागत ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या विविध आकर्षक कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ.पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस, प्रभारी विभागीय आयुक्त डॅा.विपीन ईटनकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!