Home Blog Page 59

अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर होणार; केंद्रसरकारने नामांतराला दिली मंजूरी

मुंबई:-अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी समाज माध्यमावर ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामकरण झाले आहे.*

*👉🔴🔴👉अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून करण्यात येत होती. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या मागणीला जोर चढला. गेल्या वर्षी चोंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंती दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. त्यांनी जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नाव देण्याची घोषणा केली होती.*

*👉🟥🟥👉अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने अगोदरच केंद्र सरकारकडे पाठवला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर याविषयीची माहिती दिली. नगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली. आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे महायुती सरकारने दिलेल्या वचनपूर्तीचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.*

चेतना महाविद्यालयात जागतिक औषध निर्माता दिन साजरा

संपादक:- रामवर्मा आसबे

चेताना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या विद्यमाने जागतिक औषध निर्माता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा वैज्ञानिक रांगोळी स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले. यावेळी उदय देशपांडे, सचिव विलास भोसले खजिनदार सोमनाथ माने उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे संचालिका निकिता सोमनाथ माने तसेच संचालिका प्राजक्ता विलास भोसले उपस्थित होत्या.

प्राचार्य डॉ. नेहा काजळे यांनी जागतिक स्तरावर आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी फार्मासिस्टची भूमिका महत्त्वाची असते या विषयावर मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख प्रा.प्रियंका पारेकर यांनी फार्मसी मधील करिअर या विषयावर त्यांना मार्गदर्शन केले.

प्रा‌. सुप्रिया पांढरे, प्रा. तनुजा काशीद व प्रा. भैरव व्यवहारे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्रा. प्रतीक्षा राजगुरु यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

*जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे केले उद्घाटन*

*बिडकीन औद्योगिक क्षेत्राचे केले लोकार्पण*

*सोलापूर विमानतळाचे केले उद्घाटन*

*भिडेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी*

*“महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांच्या उद्घाटनांमुळे शहरी विकासाला चालना मिळेल आणि लोकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल”*

*”पुणे शहरातील नागरिकांचे जीवनमान अधिक सुखकर करण्याच्या स्वप्नाच्या दिशेने आम्ही वेगाने वाटचाल करत आहोत”*

*”सोलापूरला थेट हवाई मार्गाने जोडण्यासाठी विमानतळाच्या अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण “*

*”भारत आधुनिक झाला पाहिजे, परंतु भारताचे आधुनिकीकरण आपल्या मूलभूत मूल्यांवर आधारित असले पाहिजे”*

*मुलींसाठी बंद असलेली शिक्षणाची कवाडे सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या थोर व्यक्तींनी उघडली”

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची कानउघाडणी

मुंबई:-महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या शिष्टमंडळाने आज ट्रायडेंट हॉटेल येथे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा विविध अंमलबजावणी यंत्रणांकडून घेतला. यावेळी मुख्य सचिव, तसेच सर्व संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांकडून सविस्तर आढावा घेतला. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत चर्चा करून त्यांच्या सूचनाही आयोगाने घेतल्या. दरम्यान, निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालकांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते.*

*👉🔴🔴👉केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांची कानउघाडणी केली आहे. निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार बदल्या/नियुक्त्यांचा अनुपालन अहवाल अद्याप सादर न केल्याबद्दल मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचे २० ऑगस्टपर्यंत अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश होते. निवडणूक आयोगाच्या स्मरणानंतर पोलिसांनी आंशिक अनुपालन अहवाल सादर केला. मात्र मुख्य सचिवांकडून अद्याप अनुपालन अहवाल सादर न करण्यात आल्याने निवडणूक आयोगाचे मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांची तात्काळ अंमलबजाणी करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच निर्धारित वेळेत अनुपालन अहवाल सादर न करण्याची कारणे स्पष्ट करण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत.*

*👉🟥🟥👉केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत केलेल्या सूचनांचा अहवाल न दिल्याने आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह निवडणुका होणाऱ्या इतर 4 राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीत एकाच जागी 3 वर्षापेक्षा जास्त काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण आयोगाच्या पत्राकडे दुर्लक्ष केल्याने आयोगाने नाराजी दर्शवली. दिलेल्या कालावधीत या सगळ्याची माहिती का दिली नाही? हे स्पष्ट करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही राज्य सरकारकडून कुठलही उत्तर न आल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने ताशेरे ओढले आहेत.*

इस्रायलची इराणमध्ये जाऊन गुप्त कारवाई; लष्करी अधिकाऱ्यांना केले ठार

जेरूसलेम:-इस्रायलकडून गेल्या काही दिवसांपासून कारवाया सुरु आहे. हमास आणि हिजबुल्लाहवर इस्रायल तुटून पडला आहे. इस्रायलकडून सतत हल्ले केले जात आहे. आता अलीकडच्या काही दिवसांत लेबनॉन आणि गाझामध्ये त्यांच्याकडून सातत्याने कारवाया सुरु आहेत.*

*👉🟪🟪👉या कारवायांमध्ये इस्रायलने हिजबुल्लाह आणि हमासच्या अनेक कमांडरांना ठार केलं आहे. लेबनॉनमध्ये एकापाठोपाठ एक हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत. या दरम्यान इस्रायलने इराणला देखील दुखावले आहे. हमासच्या प्रमुखाला इस्रायलने इराणमध्ये ठार केल्याने इराणने देखील इस्रायलविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. दुसरीकडे इस्रायलने गुप्त कारवाई करत IRGC सदस्यांना ठार मारले आहे. इतकंच नाही तर त्याने काही महत्त्वाची कागदपत्रे देखील मिळवले आहेत. आता इस्रायलला कसं प्रत्युत्तर द्यायचं हे इराणला देखील कळत नाही.*

*👉🅾️🅾️👉बीबीसीच्या रिपोर्टनुसार, इराणमधील एक गट आपल्या सरकारवर खूश नाही. कारण इस्त्रायल लेबनॉनमध्ये इराणचा जवळचा मित्र असलेल्या हिजबुल्लाला लक्ष्य करत आहे. असे असूनही इराण शांत आहे. इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांनीही संयुक्त राष्ट्रात सांगितले की त्यांच्या देशाला सर्वांसाठी शांतता हवी आहे आणि कोणाशीही संघर्ष करण्याचा त्यांचा हेतू नाही.*

*👉🟪🟪👉इराण सरकार आपल्या प्रमुख सहयोगी हमास आणि हिजबुल्लाह यांच्या विरुद्ध इस्रायलच्या कारवाईवर देखील शांत आहे. पेजर स्फोटात इराणचे राजदूत देखील जखमी झाले होते त्यानंतर ही इराण शांत आहे. असं येथील लोकांचे म्हणणे आहे. पण इराण सध्या संयमाच्या भूमिकेत आहे. या वर्षी एप्रिलमध्ये इस्रायलने दमास्कसमधील इराणी वाणिज्य दूतावासावर हल्ला केला तेव्हा इराणने इस्त्रायलवर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले. तेहरानमध्ये हमासचे नेते इस्माईल हनीयेह यांच्या हत्येनंतर इराणनेही इस्रायलचा बदला घेण्याची शपथ घेतली होती.*

केंद्रीय निवडणूक आयोगाची टिम मुंबईत दाखल

मुंबई:-महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे आज गुरूवारी रात्री ८ वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.*

*👉🔴🔴👉केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या शिष्टमंडळात वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धमेंद्र शर्मा, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त नितेश व्यास, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीश गर्ग, उपनिवडणूक आयुक्त हिर्देश कुमार, उपनिवडणूक आयुक्त अजित कुमार, उपनिवडणूक आयुक्त मनोजकुमार साहू, उपनिवडणूक आयुक्त संजय कुमार, उपनिवडणूक आयुक्त त्याचबरोबर आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.*

*👉🟥🟥👉२७ ते २८ सप्टेंबर या दोन दिवसीय भेटी दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव यांच्यासह राज्यातील विविध अंमलबजावणी अधिकारी यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार आहेत. यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे.*

error: Content is protected !!