Home Blog Page 58

तब्बल १९ मोठे निर्णय; शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीतही राज्य सरकारचा धडाका

मुंबई:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर प्रवासी वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली. आज रात्री १२.०० वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे.*

*👉🔴🔴👉राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून लागण्याची शक्यता असताना त्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक मोठ्या निर्णयांची घोषणा झाली. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे.राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता ही शिंद सरकरची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची शक्याता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे.*

*👉🟥🟥👉मुंबईत पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी, धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील 125 एकर जागा देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय घेण्यात आले आहे. धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील 125 एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. देवनार डम्पिंग ग्राउंडची 125 एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोरिवलीची जागा दिल्यानंतर या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवनार डम्पिंग ग्राउंडच जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धारावी पुनर्विकास अदानी समुह करत आहे. तसेच राज्यातील दोन मोठ्या नदी जोड प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. दमणगंगा, गोदावरी नदी जोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.*

*👉🛑🛑👉मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :-*

✅ मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी.

✅ आगरी समाजासाठी महामंडळ

✅ समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

✅ दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

✅ आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

✅ वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

✅ राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

✅ पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

✅ खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

✅ राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

✅ पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

✅ किल्लारीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्यास कर्ज परतफेड समान हप्त्यात करण्यास मान्यता

✅ अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

✅ मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

✅ खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

✅ मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

✅ अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

✅ ‘उमेद’साठी अभ्यासगट

✅ कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

राज्यात विधानसभेची आचारसंहिता याच आठवड्यात? आज पुन्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक

मुंबई :- राज्याची विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्यााची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावला जात आहे. तर, दुसरीकडे मंत्रालयात प्रशासकीय पातळीवरही निर्णयांच्या अंमलबजावणीसाठीच्या कार्यवाहीसाठी लगबग सुरू आहे.*

*👉🔴🔴👉आजही राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे.*

*राज्यात विधानसभेची आचारसंहिता कधी लागू होणार याची उत्सुकता वाढली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग कुठल्याही क्षणी निवडणूक जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक 10 ऑक्टोबर रोजी पार पडली होती. या बैठकीत कॅबिनेटने तब्बल 80 निर्णय घेतले होते. ही कॅबिनेट बैठक शेवटची असेल असे म्हटले जात होते. पण, आज पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आजच्या बैठकीतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत.*

*👉🛑🛑👉दोन दिवसांत आचारसंहिता?*

*सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या निवडणुका जाहीर करू शकतो. दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सोमवारी, निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, आज कोणतीही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली नाही. त्यामुळे आज निवडणूक जाहीर होणार नाही, हे स्पष्ट आहे. येत्या एक-दोन दिवसात निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.*

*👉🅾️🅾️👉विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया निकालासह 26 नोव्हेंबर पूर्वी पूर्ण केली जाईल असे केंद्रीय निवडणूक आयोगाने या आधीच स्पष्ट केले आहे. आचारसंहितेचा कालावधी 30 दिवसांचा असेल हे लक्षात घेता आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू केली जाण्याची शक्यता आहे. राज्याच्या विधानसभेची मुदत नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया निकालांसह पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता याच आठवड्यात लागू होणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे.*

*👉🔴🔴👉महायुती-मविआची लगबग*

*सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकांवरी महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. दोन्ही आघाड्यांमध्ये बहुसंख्या जागांवर एकमत झाले आहे. काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या दिल्लीत बैठका पार पडणार आहेत. जागा वाटपावर अंतिम निर्णय आणि उमेदवारांची चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.*

*👉🟥🟥👉आमदारांपासून मंत्र्याची धावाधाव*

*लोकप्रिय योजनांचे निर्णय तर होताना पाहायला मिळत आहे. मात्र महायुतीमधील नेत्यांच्या लाभाचे निर्णय ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहेत. अनेक निर्णय हे नियमना डावलून घेतले जात असल्याची टीका विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहे. मंत्रीमंडळ बैठकीत तर शासन निर्णय काढण्याचा धडाका सुरू आहे. दिवसाला शेकडो शासन निर्णय जारी होताना पाहायला मिळत आहे. त्यासाठी आमदारांपासून मंत्र्याची चांगलीच धावाधाव सुरु झालीय. आचारसंहितेच्या आधीच टेंडर काढण्यासाठी सर्वांनी तागद पणाला लावलीय. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींना निधी मिळणारे शासन निर्णय सर्वाधिक पाहायला मिळत आहे.*

अपघातानंतर वाहने पेटली,ट्रक जळून खाक

इंदापूर : इंदापूर बारामती राज्य रस्त्यावर वेताळ मंदिराच्या अलिकडे ट्रक व हायवा गाडीची धडक होवून दोन्ही वाहने पेटल्याची घटना आज ( दि१३) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेत ट्रक जळून खाक झाली. दोन्ही वाहनांचे चालक गंभीररीत्या भाजले. इंदापूर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तातडीने येवून आग आटोक्यात आणली.आर जे ११ जी डी ०४३१ असा जळालेल्या ट्रकचा क्रमांक आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शासकीय वसतिगृहांचे दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण

पुणे, दि. ११: इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने मुला-मुलींसाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील ४४ वसतिगृहांचा दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण सोहळा बुधवारी (९ ऑक्टोबर) संपन्न झाला.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे हा सोहळा आयोजित करण्यात आला. पुणे येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने मुला-मुलींसाठी उभारण्यात आलेल्या वसतिगृहांचा उद्‌‌घाटन सोहळा टी.एस.एस.एम भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय नऱ्हे येथे पार पडला. या सोहळ्यास विभागाचे प्रादेशिक उपसंचालक खुशाल गायकवाड, इतर बहुजन कल्याण पुणेचे सहाय्यक संचालक विशाल लोंढे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश हिंगे आदी उपस्थित होते.

या घटकातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलांसाठी एक व मुलींसाठी एक याप्रमाणे शासकीय वसतिगृहे सुरु करण्यासाठी शासनामार्फत मान्यता देण्यात आलेली आहे. याअंतर्गत नऱ्हे येथे वसतिगृह सुरू करण्यात आले असून येथे १०० मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच १०० मुलींच्या क्षमतेचे वसतिगृहदेखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे श्री. लोंढे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ८०० यात्रेकरू विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना

पुणे, दि. १०: मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत पुणे येथून ७२९ जेष्ठ नागरिक व ७१ सहायक अशा ८०० यात्रेकरुंना घेऊन जाणारी जिल्ह्यातील पहिली भारत गौरव पर्यटन रेल्वे श्रीराम जन्मभूमी अयोध्येकडे रवाना झाली. राज्यात ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनाने शासकीय दुखवटा जाहिर झाल्याने साधेपणाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून रेल्वे मार्गस्थ झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अयोध्येकडे रवाना होणाऱ्या तीर्थयात्रेकरुंना चित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

यावेळी आय.आर.सी.टी.सीचे जनरल मॅनेजर गौरव झा, क्षेत्रीय अधिकारी गुरुराज सोना तसेच समाजकल्याण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

या तीर्थयात्रेच्या निमित्ताने एका महत्त्वाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या चित्रफित शुभेच्छा संदेशात म्हणाले. ही योजना राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधून सुरु झाली आहे. तीर्थदर्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हा प्रशासनाचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी अभिनंदन केले.

यावेळी ‘जय श्रीराम, जय श्रीराम’ या जयघोषात पुणे रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन ८०० यात्रेकरु तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे मार्गस्थ झाले.

चेतना फाउंडेशन इंदापूर संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी, इंदापूरचा आयपीआयएस व आयआयईआर पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार

संपादकीय:- रामवर्मा आसबे

चेतना फाउंडेशन इंदापूर संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी यांचे बी फार्मसी व डी. फार्मसी या महाविद्यालयाचा पुणे येथील नामांकित संस्था आयपीआयएस व आयआयईआर यांच्यामध्ये नॉलेज शेरिंग आयपीआर प्रोटेक्शन, विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रोफेशनल ॲडोन कोर्सेस व फार्मा क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन बदलांची माहिती आदान प्रदान करण्यासंदर्भात हा करार महत्वपूर्ण आहे. ग्रामीण भागात उच्च शिक्षणासाठी मागील वर्षापासून चेतना कॉलेज ऑफ फार्मसी संस्था कार्यरत असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता तसेच ग्रामीण व शहरी विध्यार्थी यांच्यातला गॅप भरून काढण्यासाठी वेगवेगळे प्रोफेशनल कोर्सेस सुद्धा या करारांतर्गत शिक्षक व विद्यार्थी यांना उपयोगी पडणार आहेत.

ॲड संजय पांगरे निर्मित इन्टेलेक्तुल प्रॉपर्टी इन्टेलेक्त सर्विसेस, पुणे हि नामांकीत संस्था मागील बरेच वर्षे आयपीआर (इन्टेलेक्तुल प्रॉपर्टी राईट्स) प्रोटेक्शन साठी काम करीत असून बऱ्याच महाविद्यालयाबरोबर त्यांचा सामंजस्य करार असून त्यानुसार ते पेटंट, कॉपीराईट, इंडस्ट्रीअल डिझाईन, जिओग्रफिकल इंडीकेशन, ट्रेडमार्क मिळवून देण्याकरिता मदत करतात. तसेच या सर्व गोष्टींचे कमर्सियालायझेषण करण्यासाठी सुद्धा हि संस्था सपोर्ट करते. या सामंजस्य करारावर बी. फार्मसी व डी. फार्मसी प्राचार्य डॉ नेहा काजळे व कंपनीचे डायरेक्टर ॲड संजय पांगरे स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळी तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री उदय देशपांडे ,सचिव श्री विलास भोसले तसेच बी. फार्मसी प्रमुख प्रा डॉ महेश जाधव तसेच डी. फार्मसी प्रमुख प्रियांका पारेकर इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.

अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर होणार; केंद्रसरकारने नामांतराला दिली मंजूरी

मुंबई:-अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी समाज माध्यमावर ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामकरण झाले आहे.*

*👉🔴🔴👉अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून करण्यात येत होती. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या मागणीला जोर चढला. गेल्या वर्षी चोंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंती दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. त्यांनी जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नाव देण्याची घोषणा केली होती.*

*👉🟥🟥👉अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने अगोदरच केंद्र सरकारकडे पाठवला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर याविषयीची माहिती दिली. नगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली. आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे महायुती सरकारने दिलेल्या वचनपूर्तीचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.*

error: Content is protected !!