Home Blog Page 57

सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या उपस्थितीत रस्ते सुरक्षा समितीची बैठक संपन्न

सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या उपस्थितीत रस्ते सुरक्षा समितीची बैठक संपन्न

*अपघातातील मृत्यूंच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी रस्ते सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी-न्यायमूर्ती अभय सप्रे*

पुणे,दि.१८ : वाहन अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी जाऊ नयेत यासाठी सर्व संबधित यंत्रणांनी रस्ते सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी दिले.

विधान भवन येथे आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा लड्डा ऊंटवाल, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण आदी उपस्थित होते.

बेदरकारपणे आणि बेजबाबदारपणे वाहने चालवून निष्पाप नागरिकांच्या बळींच्या संख्येत वाढ होत आहे ही गंभीर बाब आहे, असे सांगून न्यायमूर्ती श्री.सप्रे म्हणाले, रस्ता अपघात कमी व्हावे, अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावे, बळींची संख्या कमी व्हावी याची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यासाठी वेळोवेळी मार्गदशक तत्वे निश्चित केली केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली रस्ता सुरक्षा समिती स्थापन केली आहे. ही समिती कायमस्वरुपी कार्यरत असून रस्ता सुरक्षेसंदर्भात उपाययोजना आणि त्यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती थेट सर्वोच्च न्यायालयास सादर करते असे त्यांनी सांगितले.

निष्पाप नागरिकांच्या रस्ते अपघातात बळींची संख्या लक्षात घेता परिवहन विभाग, पोलीस विभाग तसेच सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी सकारात्मकतेने काम करावे. अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वक बजावण्याबरोबरच निस्वार्थ भावनेने काम करावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन रस्ता सुरक्षेसंबधी नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करावी. अपघातातील बळींची संख्या कमी होण्यासाठी प्रयत्न करावे. या बैठकीत दिलेल्या निर्देशांचे सर्व संबधित यंत्रणांनी गांभीर्यपूर्वक पालन करावे.

वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने रस्ता सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनीही वाहतूकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळणे आवश्यक आहे. रस्यावर चालविण्यात येणारे वाहन सुस्थितीत असावे, वाहनचालकांनी सीट बेल्ट लावावे, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलू नये, अतिवेगाने वाहन चालवू नये, मद्यप्रशान करुन वाहन चालवू नये, वाहन परवाना तसेच वाहन व वाहनचालकांनी सुरक्षा विमा वेळोवेळी नुतनीकरण करावे, रस्ता सुरक्षा उपाययोजनांची माहिती करुन घ्यावी, त्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना न्यायमूर्ती श्री.सप्रे यांनी केल्या.

रस्त अपघातात दुचाकी वाहनचालकांची बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत त्यामुळे वाहनचालकाने स्वत: आणि सोबत बसलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणाऱ्या हेल्मेटचा वापर करावा. त्यासाठी प्रशासनाने दुचाकी वाहनचालकांसाठी हेल्मेट सक्ती करावी. वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करावे, अशा सूचना न्यायमूर्ती श्री. सप्रे यांनी केल्या.

परिवहन आयुक्त श्री. भिमनवार यांनी परिवहन विभागातर्फे रस्ता सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत माहितीचे सादरीकरण केले. विशेषत मुंबई-पुणे महामार्गावर ३० टक्क्यांने व समृद्धी महामहार्गावर ३३ टक्क्यांने अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार म्हणाले, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महामंडळ, शाळा, महाविद्यालयात कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात येईल. हेल्मेट न वापरणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, त्यासाठी आवश्यक त्या सूचना संबधित विभागप्रमुखांना जारी करण्यात येतील अशी सांगून ते पुढे म्हणाले, राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गांवर करण्यात येणाऱ्या वाहनांच्या तपासणीप्रमाणे जिल्हा तसेच शहरांतर्गत तपासणी करण्याची सूचना डॉ.पुलकुंडवार यांनी केली.

निवृत्त न्यायमूर्ती श्री.सप्रे यांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने ‘अपघातमुक्त वारी’ अभियानाचे आयोजन तसेच परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या रस्ते सुरक्षाविषयक उपाययोजनाबाबत समाधान व्यकत केले.

बैठकीस नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, नागपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर, बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, गोंदियाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मतदान जनजागृती करताना चेतना इंटरनॅशनल स्कूल चे विद्यार्थी

मतदान जनजागृती करताना चेतना इंटरनॅशनल स्कूल चे विद्यार्थी

img 20241019 wa0007
img 20241019 wa0007

तलाठी, कोतवाल, अव्वल कारकून नामे नामशेष! राज्य सरकारकडून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल

मुंबई:-महसूल विभागातील ग्रामस्तरावर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे तलाठी, कोतवाल व अव्वल कारकून यांच्या पदनामात राज्य शासनाने बदल केला आहे. तलाठ्यांना यापुढे ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखण्यात येणार असून, कोतवालांना महसूल सेवक म्हणून संबोधण्यात येईल.शासकीय कार्यालयांमधील अव्वल कारकून यांचेही पदनाम बदलण्यात आले असून, त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून ओळखले जाणार आहे.*

 

*👉🟥🟥👉विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारच्या बैठकीनंतर महसूल विभागाने पदनामातील बदलांचे तीन शासन निर्णय जारी केले. त्यानुसार तलाठी, कोतवाल व अव्वल कारकून यांच्या पदनामातील हे बदल सुचविले आहेत. गावपातळीवर तलाठी आणि कोतवाल ही प्रचलित नावे आहेत. सर्वांना परिचित असलेल्या या पदांच्या नामात बदल झाल्याने त्यांची ओळख बदलण्याचा प्रयत्न राज्य सरकारने या माध्यमातून केला आहे.*

तलाठी, कोतवाल, अव्वल कारकून नामे नामशेष! राज्य सरकारकडून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल

मुंबई:-महसूल विभागातील ग्रामस्तरावर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे तलाठी, कोतवाल व अव्वल कारकून यांच्या पदनामात राज्य शासनाने बदल केला आहे. तलाठ्यांना यापुढे ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखण्यात येणार असून, कोतवालांना महसूल सेवक म्हणून संबोधण्यात येईल.शासकीय कार्यालयांमधील अव्वल कारकून यांचेही पदनाम बदलण्यात आले असून, त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून ओळखले जाणार आहे.*

 

*👉🟥🟥👉विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारच्या बैठकीनंतर महसूल विभागाने पदनामातील बदलांचे तीन शासन निर्णय जारी केले. त्यानुसार तलाठी, कोतवाल व अव्वल कारकून यांच्या पदनामातील हे बदल सुचविले आहेत. गावपातळीवर तलाठी आणि कोतवाल ही प्रचलित नावे आहेत. सर्वांना परिचित असलेल्या या पदांच्या नामात बदल झाल्याने त्यांची ओळख बदलण्याचा प्रयत्न राज्य सरकारने या माध्यमातून केला आहे.*

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 288 जागांसाठी किती मतदार असतील?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

288 जागांसाठी किती मतदार असतील?

एकूण मतदार

9 कोटी 63 लाख

नव मतदार

20.93 लाख

पुरुष मतदार

4.97 कोटी

महिला मतदार

4.66 कोटी

युवा मतदार

1.85 कोटी

तृतीयपंथी मतदार

56 हजाराहून जास्त

85 वर्षावरील मतदार

12.48 लाख

शंभरी ओलांडलेले मतदार

149 हजारापून जास्त

दिव्यांग मतदार 6.32 लाख

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 288 जागांसाठी किती मतदार असतील?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

288 जागांसाठी किती मतदार असतील?

एकूण मतदार

9 कोटी 63 लाख

नव मतदार

20.93 लाख

पुरुष मतदार

4.97 कोटी

महिला मतदार

4.66 कोटी

युवा मतदार

1.85 कोटी

तृतीयपंथी मतदार

56 हजाराहून जास्त

85 वर्षावरील मतदार

12.48 लाख

शंभरी ओलांडलेले मतदार

149 हजारापून जास्त

दिव्यांग मतदार 6.32 लाख

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. १५: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ प्रक्रिया पारदर्शक, निर्भय वातावरणात आणि सुलभ, सहजतेने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज असून राजकीय पक्षांनीही निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

 

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते

 

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे, असे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असून त्या दिवसापासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात होणार आहे. नामनिर्देशन दाखल करण्याचा अखेरचा दिवस २९ ऑक्टोबर असून ३० ऑक्टोबर रोजी छाननी होणार आहे. ४ नोव्हेंबर हा उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक असून त्या दिवशी निवडणूक लढविणारे उमेदवार निश्चित होतील. मतदान २० नोव्हेंबर तर मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

ते पुढे म्हणाले, मतदारांना मतदान करण्याचा अनुभव आनंददायी सुखदायी सुलभ व्हावा यावर भारत निवडणूक आयोगाने भर दिलेला असून त्यानुसार जिल्हा निवडणूक प्रशासन काटेकोर काम करेल. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रॅम्प, ज्येष्ठ मतदार, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर आदी किमान सुविधा करण्यात येणार असून ५ किंवा त्यापेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी रांगांचे व्यवस्थापन, सावलीसाठी मंडप, महिला मतदार, अंध आणि ज्येष्ठ मतदारांसाठी स्वतंत्र रांगा, बालकांसाठी पाळणाघर, वैद्यकीय सुविधा आदी अधिकच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

 

*मतदार नोंदणीसाठी १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची संधी*

जिल्ह्यात २१ मतदार संघात एकूण ८७ लाख ५७ हजार ४२६ मतदार असून अजूनही नामनिर्देशन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापूर्वी १० दिवसांपर्यंत म्हणजेच १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज क्रमांक ६ भरून मतदार नोंदणीची संधी आहे. त्यामुळे उर्वरित पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी, त्यासाठी राजकीय पक्षांनीही आवाहन करावे. जिल्ह्यात ८ हजार ४१७ मतदार केंद्रे असून त्यात ५० ते ६० सहाय्यकारी मतदान केंद्रांची वाढ होऊ शकते, असेही ते म्हणाले.

 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी आदर्श आचारसंहिता, फिरती सर्वेक्षण पथके (एफएसटी) आणि स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी), निवडणुकीतील पैशाचा वापर, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू यांची जप्ती यासाठीची यंत्रणा, निवडणूक प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण, निवडणुकीसाठी केलेल्या व्हीएचए, सी- व्हिजिल, केवायसी, सुविधा पोर्टल आदी संगणकीय व्यवस्था, उपयोजके (एप्लिकेशन्स), महिला, दिव्यांग, युवा संचलित, संकल्पना आधारित विशेष मतदान केंद्रे, आदर्श मतदान केंद्रे आदीबाबत माहिती दिली.

0000

राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे..

दिनांक 15 ऑक्टोंबर राज्यपालांनी विधान परिषदेवर सात आमदारांची नियुक्ती केलीय. यामध्ये चित्राताई किशोर वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, पंकज छगन भुजबळ, इद्रिस इलियास नायकवडी, हेमंत श्रीराम पाटील, डॉ. मनीषा कायंदे यांच्या नावांचा समावेश आहे.

महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रसने आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. त्यानुसार भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे..

दिनांक 15 ऑक्टोंबर राज्यपालांनी विधान परिषदेवर सात आमदारांची नियुक्ती केलीय. यामध्ये चित्राताई किशोर वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, पंकज छगन भुजबळ, इद्रिस इलियास नायकवडी, हेमंत श्रीराम पाटील, डॉ. मनीषा कायंदे यांच्या नावांचा समावेश आहे.

महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रसने आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. त्यानुसार भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

तब्बल १९ मोठे निर्णय; शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीतही राज्य सरकारचा धडाका

मुंबई:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर प्रवासी वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली. आज रात्री १२.०० वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे.*

*👉🔴🔴👉राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून लागण्याची शक्यता असताना त्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक मोठ्या निर्णयांची घोषणा झाली. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे.राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता ही शिंद सरकरची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची शक्याता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे.*

*👉🟥🟥👉मुंबईत पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी, धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील 125 एकर जागा देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय घेण्यात आले आहे. धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील 125 एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. देवनार डम्पिंग ग्राउंडची 125 एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोरिवलीची जागा दिल्यानंतर या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवनार डम्पिंग ग्राउंडच जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धारावी पुनर्विकास अदानी समुह करत आहे. तसेच राज्यातील दोन मोठ्या नदी जोड प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. दमणगंगा, गोदावरी नदी जोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.*

*👉🛑🛑👉मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :-*

✅ मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी.

✅ आगरी समाजासाठी महामंडळ

✅ समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

✅ दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

✅ आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

✅ वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

✅ राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

✅ पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

✅ खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

✅ राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

✅ पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

✅ किल्लारीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्यास कर्ज परतफेड समान हप्त्यात करण्यास मान्यता

✅ अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

✅ मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

✅ खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

✅ मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

✅ अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

✅ ‘उमेद’साठी अभ्यासगट

✅ कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

error: Content is protected !!