Home Blog Page 55

राज्यात आजपासून प्रचाराचे फटाके फुटणार; सभा, बैठकांचे आयोजन; स्टार प्रचारकही मैदानात उतरणार

मुंबई:- दिवाळीतील भाऊबीजेनंतर आज, सोमवारपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे फटाके फुटणार आहेत. मुंबईसह राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या सभा आणि बैठकांचा नारळ सोमवारी फुटणार आहे. स्टार प्रचारकही प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना (उबाठा) पक्षाचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या प्रमुख नेत्यांवर प्रचाराची धुरा असेल.*

*👉🔴🔴👉येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. मुंबईसह राज्यातील अनेक मतदारसंघांत मित्रपक्ष परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनधरणी आणि बैठकांच्या सत्रात राजकीय पक्षांची नेते मंडळी व्यग्र असतानाच आता सोमवारपासून मैदानी प्रचाराची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी रविवारी कुर्ला मतदारसंघात सभा घेतल्यानंतर सोमवारी त्यांच्या सभांचा धडाका कायम असणार आहे. तर उद्धव ठाकरे हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर असतील. तेथे ते सभा घेणार आहेत. पदाधिकाऱ्यांशी संवादही साधतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा मंगळवारपासून कोल्हापूर येथे होणाऱ्या महायुतीच्या सभेत सहभागी होणार आहेत. मनसेचे राज ठाकरे यांच्याही सोमवारी दोन सभा होणार आहेत. डोंबिवली येथील मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्यासाठी डोंबिवली येथे, तर ठाण्यातील अविनाश जाधव यांच्या प्रचारार्थ ठाण्यात सभा होईल. अजित पवार हे सोमवारी बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करणार आहेत. ते दिवसभर मतदारसंघातच ठाण मांडून असतील.*

*👉🟥🟥👉दिवाळीच्या सुट्टीमुळे विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला अद्याप वेग आलेला नाही. मात्र रविवारी सुट्टीचा योग साधून अनेक उमेदवार मॉर्निंग वॉक, इमारतींच्या बैठका आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्याचवेळी अनेक उमेदवारांनी थेट दिवाळी फराळाच्या निमित्ताने एकत्र येत प्रचाराची रंगत वाढवली. गोपाळ शेट्टी यांची नाराजी ठीक आहे. पण माझा त्यांच्याबाबतचा वैयक्तिक अनुभव पाहता ते नेहमी पक्षाच्या मार्गावरून चालतात. त्यामुळे ते बोरिवलीतून माघार घेतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे,’ असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. बोरिवली विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असलेले गोपाळ शेट्टी यांनी शनिवारी सकाळी फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. यानंतर अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. आता फडणवीस यांनी शेट्टी यांच्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.*

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली

मुंबई:-राज्यात विधानसभा निवडणूक होत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅप केल्याचे आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहेत. विरोधकांकडून वारंवार रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली जात होती. असं असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. त्यांना कोणत्या नव्या ठिकाणी नियुक्त केलं जाणार आहे? याबाबतची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. मात्र रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.*

*👉🔴🔴👉महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नवी नियुक्ती करण्यात येणार आहे. तीन आयपीएस अधिकाऱ्यांचं पॅनल तयार केलं जाणार आहे. हे पॅनल मुख्य आयुक्तांना अहवाल सादर करणार आहे. तीन अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल मुख्य सचिव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत. रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी असल्याने विधानसभेची निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पडणार नाहीत, असं महाविकास आघाडीतील नेत्यांकडून वारंवार म्हटलं जात होतं. असं असतानाच आता रश्मी शुक्ला यांची बदली केली गेली आहे.*

*👉🔴🔴👉1988 च्या बॅचच्या रश्मी शुक्ला या आयपीएस आहेत. महाराष्ट्रातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीत रश्मी शुक्ला यांचं नाव वर आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना अनेक नेते आणि मंत्र्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. आताही रश्मी शुक्ला यांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांनी आक्षेप घेतला. जून 2024 लाच रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ संपत असताना तो जानेवारी 2026 पर्यंत वाढवण्यात आला. ही बढती नियमबाह्य असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या बदलीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं.*

*👉🟥🟥👉विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी काँग्रेसने केली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्या प्रकरणी गुन्हे दाखल होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली. शुक्ला यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी पटोले यांनी पत्र लिहित निवडणूक आयोगाला केली. शुक्ला या भाजपला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याचा आरोप पटोलेंनी केला होता. संजय राऊत यांनी देखील रश्मी शुक्ला यांच्या बदलीची वारंवार मागणी केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.*

उद्योग विभागांतर्गतच्या आस्थापनांना मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी देण्याचे निर्देश

पुणे, दि. ३०: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांनी अधिकारी, कामगार, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

यासंदर्भात उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने परिपत्रक जारी केल्याची माहिती डॉ.दिवसे यांनी दिली आहे. या परिपत्रकानुसार लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेत कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल.

ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. मतदानासाठी मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील अथवा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आज दिपावलीचा पहिला दिवस : वसुबारस

  • 🎇 *आज दिपावलीचा पहिला दिवस : वसुबारस.*✨

दिवाळीची सुरवात धनत्रयोदशीने होत असली तरी हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे वसुबारस या सणाला देखील महत्त्व आहे. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन ) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
हिंदू धर्मात गायीला माता म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो. गाय ही सात्त्विक आहे म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्‍याला पावन करणे तसेच गाय ही आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करते. शेतीला खत देऊन पौष्टिकत्व देते, त्यामुळे या पूजनाद्वारे गायीच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार केला जातो.
*गाय वासराची पूजा करून, पहिला दिवा उजळवून दीपोत्सवाच्या मंगल पर्वाला प्रारंभ करण्याची कृषी संस्कृती अबाधित ठेवू या. सर्वांना वसुबारस आणि दीपावलीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा…!*
🎊®️💥 *रामराजे आसबे* 💥®️🎊
📲 91➖30➖60➖50➖50
♻️ ** ♻️
2️⃣8️⃣🌅1️⃣0️⃣🌅2️⃣0️⃣2️⃣4️⃣

समस्त

नमोन्यूजनेशन परिवार
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

इंदापूर विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुमित कुमार यांची नियुक्ती

पुणे, दि. 26: भारत निवडणूक आयोगाकडून इंदापूर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी दिली आहे. 

श्री. सुमित कुमार यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील हरीत इमारत, कक्ष क्रमांक ए-102 असा असून संपर्क क्रमांक 020-29750085 असा आहे. इंदापूर विधानसभेकरीता त्यांचा संपर्क क्रमांक 9607035918 असा आहे. त्यांना सकाळी 10.00 ते 11.30 वा. यावेळेत भेटता येईल.

श्री. कुमार यांचे संपर्क अधिकारी गणेश सस्ते असून त्यांचा संपर्क क्रमांक 9890949587 असा आहे. असे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पांढरे यांनी कळविले आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग कक्षाची स्थापना

पुणे, दि. २५ : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता दिव्यांग कक्ष स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी दिली आहे.

दिव्यांग कक्षामार्फत मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर, रॅम्प, आदी सुविधा पुरविणे तसेच मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सक्षम अॅपच्या अनुषंगाने समन्वय अधिकारी म्हणून कामकाज करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवक उपलब्ध देण्यात येणार आहे. याकरीता दिव्यांग कक्षासाठी नोडल अधिकारी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ७५८८९१०७८९ असा आहे.

कर्मचारी कल्याण कक्ष, प्राथमिक आरोग्य सुविधा व आपत्कालीन योजना पथकांची नेमणूक कर्मचारी कल्याण कक्ष, प्राथमिक आरोग्य सुविधा व आपत्कालीन योजना कक्षासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धार्थ नामपल्ली यांची नेमणूक करण्यात आली आहे, असेही श्री. पांढरे म्हणाले.

खासगी एफ.एम. वाहिन्या, कम्युनिटी रेडिओकरीता जाहिरात प्रमाणीकरण आवश्यक–जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर

पुणे, दि. २४ : निवडणूक प्रचारासाठी उपयोगात आणले जाणारी जाहिरात, रेकॉर्डेड संदेश, जिंगल्स, यांना जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणीकरण करुन घेणे आवश्यक आहे. कम्युनिटी रेडिओ आणि खासगी एफएम वाहिन्यांसाठीही या तरतुदी लागू असून जाहिरात प्रसारण करण्यापूर्वी या बाबींची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव डॉ. रवींद्र ठाकूर यांनी केले आहे.

जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात आयोजित आकाशवाणी, कम्युनिटी रेडिओ व एफएम चॅनेल्सच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

डॉ. ठाकूर म्हणाले, जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असून निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, उमेदवार तसेच त्रयस्थ व्यक्तींकडून विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. निवडणूक प्रचाराच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल वाहिन्या, चित्रपटगृहे, रेडिओ, कम्युनिटी रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस संदेश, जिंगल्स, ऑडिओ जाहिराती, तसेच सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळावरुन प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणीत करुन घेणे आवश्यक आहे.

विविध माध्यमांवर निवडणूक प्रचाराचे संनियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाचे सर्व माध्यमातून होत असलेल्या निवडणूक प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पूर्वप्रमाणीकरण न करता जाहिरात प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. आकाशवाणी, कम्युनिटी रेडिओ व एफएम चॅनेल्स यांनी उमेदवार, राजकीय पक्ष तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने अन्य त्रयस्त व्यक्तींकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती पूर्वप्रमाणीत केल्याची खात्री केल्याशिवाय प्रसारित करू नयेत, असे आवाहनही डॉ. ठाकूर यांनी केले.

नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नियुक्तीची अदिसूचना जारी

11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली:-न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती खन्ना 11 नोव्हेंबरपासून पदभार स्वीकारणार आहेत. ते देशाचे 51 वे सरन्यायाधीश होणार आहेत. खन्ना 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. सरन्यायाधीश पदावर त्यांना फक्त सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यांनी अनेक महत्वाच्या खटल्यांचे निकाल दिले आहेत.*

*👉🔴🔴👉खन्ना 1983 मध्ये त्यांनी कायद्याचा सराव सुरू केला होता. ते 2005 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते. जानेवारी 2019 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते फौजदारी, दिवाणी, कर आणि घटनात्मक कायद्यातील एक उत्तम तज्ञ मानले जातात. खन्ना यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय दिले आहेत.*

*👉🟥🟥👉लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर करताना असे म्हटले होते की, पीएमएलए कायद्यातील कठोर तरतुदी एखाद्याला खटल्याशिवाय जास्त काळ तुरुंगात ठेवण्याचा आधार असू शकत नाहीत. इलेक्टोरल बाँड्स असंवैधानिक घोषित करणाऱ्या खंडपीठाचे ते सदस्य होते. विवाह चालू राहणे अशक्य असल्यास सर्वोच्च न्यायालय थेट घटस्फोटाचा आदेश देण्यासाठी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करू शकते, असेही त्यांनी नमूद केले होते. यासारखे अनेक महत्त्वाचे निकाल त्यांनी दिले आहेत.*

error: Content is protected !!