Home विधानसभा इंदापूर विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुमित कुमार यांची नियुक्ती

इंदापूर विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुमित कुमार यांची नियुक्ती

पुणे, दि. 26: भारत निवडणूक आयोगाकडून इंदापूर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी दिली आहे. 

श्री. सुमित कुमार यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील हरीत इमारत, कक्ष क्रमांक ए-102 असा असून संपर्क क्रमांक 020-29750085 असा आहे. इंदापूर विधानसभेकरीता त्यांचा संपर्क क्रमांक 9607035918 असा आहे. त्यांना सकाळी 10.00 ते 11.30 वा. यावेळेत भेटता येईल.

श्री. कुमार यांचे संपर्क अधिकारी गणेश सस्ते असून त्यांचा संपर्क क्रमांक 9890949587 असा आहे. असे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पांढरे यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!