Home Blog Page 54

दौंड व इंदापूर विधानसभा मतदारसंघात ३३ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

पुणे, दि. ९ : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागाअंतर्गत २ ऑक्टोबर २०२४ पासून दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात विशेष मोहिम राबवून एकूण ३३ लाख ८९ हजार ८९१ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली आहे.

मोहिमेदरम्यान केलेल्या कारवाईत एकूण ६१ गुन्हे नोंदविण्यात आले असून दरम्यान एकूण ५८ आरोर्पीना अटक करण्यात आली. अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या एकूण २ चारचाकी व ७ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीचा कारखाना दोन वेळा उद्धवस्त केला आहे.

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, मयूर गाडे, दिनेश ठाकूर, सहायक दुय्यम निरीक्षक सुवास पोळ, जवान अशोक पाटील, संकेत वाजे, प्रविण सूर्यवंशी, सौरभ देवकर, जवान-नि-वाहन चालक केशव वामने यांनी सहभागी होते.

महाराष्ट्रात ईडीकडून मोठी कारवाई, देशभरात 50 शाखा असणार्‍या सोसायटीची 333 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई:-महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. त्यावेळी अमंलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. बीड येथील मुख्यालय असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीवर ही करवाई झाली आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने सोसायटीची 333 कोटी 82 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. या प्रकरणात 49 गुन्हे दाखल आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये सुरेश कुटे यांच्या कुटे डेअरी, कुटे सन्स फ्रेश डेअरी या कंपन्यांच्या जमिनी, इमारती, प्रकल्प आणि मशिनरीचा समावेश आहे. या मालमत्ता सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत. सध्या ज्ञानराधाचा अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी कारागृहात आहेत.*

*👉🟥🟥👉सुरेश कुटे यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीत 2318 कोटी रुपयांचा अपहार करत ते पैसे आपल्या अन्य कंपन्यांत कर्ज रूपाने वळवल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. हे पैसे नंतर रोखीने काढून घेत त्याद्वारे त्यांनी वैयक्तिक मालमत्तांची खरेदी केल्याचेही तपासात दिसून आले आहे. या प्रकरणात मनी लॉड्रिग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीनेही याचा तपास सुरू केला होता. ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीच्या महाराष्ट्रासह देशातील इतर शहरांमध्ये एकूण 50 शाखा आहेत. या सोसायटीत पावणेचार लाख ठेवीदारांच्या ठेवी होत्या. एकूण तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवीदारांची अडकली आहे. ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणात जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे दाखल आहेत. ज्ञानराधा सोसायटीतून परदेशात पैसा गेल्याचा संशय तपास संस्थांना आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास ईडीकडे देण्यात आला.*

*👉🔴🔴👉अमंलबजावणी संचालनालयाने 10 ऑक्टोबर रोजी ज्ञानराधाची मालमत्ता जप्त केली होती. एकूण 1002 कोटी 79 लाख रुपयांची मालमत्तेवर टाच ईडीने आणली होती. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना येथील काही इमारती आणि भूखंड होते.*

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात १ लाखांहून अधिक मतदान केंद्रे

मुंबई:-विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात १ लाख ४२७ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन गृहनिर्माण संकुलात मतदान केंद्रे उभारली आहेत तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागातील मतदारांना मतदान केंद्राच्या जवळ लवकरात लवकर पोहोचावे यासाठी केंद्रांची संख्या वाढवली आहे.*

*👉🅾️🅾️👉महाराष्ट्रातील २४१ विधानसभा मतदारसंघात मुख्य आणि सहायक मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली आहे. यंदा राज्यात मुख्य मतदान केंद्रे ही १ लाख १८६ असून त्यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ इतकी संख्या राहणार आहे. सहायक मतदान केंद्रांची संख्या २४१ इतकी आहे. यंदाच्या निवडणुकीत आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे, आणि अमरावती जिल्ह्यात जेथे आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत तेथे मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे.*

*👉🔴🔴👉मतदान केंद्रांची जिल्हानिहाय संख्या*

*पुणे – ८४६२, मुंबई उपनगर – ७५७९, ठाणे – ६९५५, नाशिक – ४९२२, नागपूर- ४६३१, अहमदनगर – ३७६५, सोलापूर ३७३८, जळगाव – ३६८३, कोल्हापूर – ३४५२, औरंगाबाद- ३२७३, सातारा – ३१६५, नांदेड-३०८८, रायगड-२८२०, अमरावती- २७०८, यवतमाळ – २५७८, मुंबई शहर – २५३८, सांगली- २४८२, बीड- २४१६, बुलढाणा- २२८८, पालघर-— २२७८, लातूर – २१४३, चंद्रपूर – २०७७, अकोला- १७४१, रत्नागिरी- १७४७, जालना- १७५५, धुळे- १७५३, परभणी- — १६२३, उस्मानाबाद १५२३, नंदूरबार- १४३४, वर्धा- १३४२, गोंदिया- १२८५, भंडारा – ११६७, वाशीम- ११००, हिंगोली – १०२३, गडचिरोली – ९७२, सिंधुदुर्ग- ९२१*

इंदापूर मतदारसंघातील 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांचे 9 ते 10 ऑक्टोबरदरम्यान गृहमतदान

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षावरील 149 व दिव्यांग 19 असे एकूण 168 मतदारांचे 9 ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत गृहमतदान प्रक्रिया (होम वोटिंग) पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी दिली.

या कामी इंदापूर मतदारसंघात एकूण 15 पथके स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये एक अधिकारी, एक मतदान अधिकारी, एक पोलीस कर्मचारी व एक शिपाई, एक व्हिडिओ ग्राफर व एक सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गट विकास अधिकारी सचिन खुडे, गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात, निवासी नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांनी तहसील कार्यालय इंदापूर येथे संबंधितांना मतदान प्रक्रियेबाबत प्रशिक्षण दिले आहे, असेही डॉ. पांढरे म्हणाले.

पुन्हा डोनाल्ड ट्रम्प सरकार!

पुन्हा डोनाल्ड ट्रम्प सरकार!
*👉🔴🔴👉कमला हॅरिस यांचा पराभव करत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष,*
*👉🅾️🅾️👉बहुमताचा आकडा केला पार!!*

*👉🅾️🅾️👉अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत, आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत, अशी माहिती फॉक्स न्यूजने दिली आहे.*

*👉💥💥👉यावेळी रिपब्लिकन पक्षाने मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ट्रम्प यांच्या या विजयाने जागतिक स्तरावर चर्चेचा विषय निर्माण केला आहे.*

*👉🅾️🅾️👉ट्रम्पची विजयाची रणनीती-*

*या निवडणुकांमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका सात स्विंग स्टेट्सने निभावली. या राज्यांमध्ये दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद लावली होती, मात्र शेवटी ट्रम्प यांना या राज्यांमध्ये आघाडी मिळाली. विशेषत: दोन राज्यांमध्ये त्यांनी निर्णायक विजय मिळवला आहे. अमेरिकेतील या कठीण निवडणुकीत ५३८ इलेक्टोरल कॉलेज मतांमधून २७० पेक्षा अधिक मतांची गरज असते, जी बहुमताचा आकडा पार करण्यासाठी अत्यावश्यक असते.*

*👉🅾️🅾️👉ताज्या माहितीप्रमाणे, डोनाल्ड ट्रम्प यांनी २७७ मतांचा आकडा पार करत. इलेक्टोरल कॉलेज मतांवर आघाडी घेतली आहे, तर कमला हॅरिस २२६ मतांवर स्थिरावल्या आहेत. बहुमताचा आकडा ट्रम्प यांनी गाठला आहे. तर कमला हॅरिस यांनी त्यांचे भाषण रद्द केले. तर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प, जे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत, ते 6 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या समर्थकांना संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे.*

दहावीच्या परिक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखेत बदल; परिक्षेचे अर्ज भरण्यास दोन आठवड्यांची मुदतवाढ

पुणे:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसंदर्भात माहितीचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या आगामी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचं बोर्डाने ठरवलं आहे. नव्या सुधारीत वेळापत्रकानुसार 6 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. तर त्यानंतरचे दहा दिवस म्हणजेच 20 ते 30 नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्कासह अर्ज भरता येतील, असं बोर्डाने सांगितलं आहे.*

*👉🅾️🅾️👉राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. नियमित आणि प्रचलित अशा दोन पद्धतीने अर्ज भरले जाणार आहे. सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत. तसेच पुनर्परीक्षार्थी, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भरायचे आहेत.*

*👉🟥🟥👉सध्याच्या वेळापत्रकानुसार आजची तारीख म्हणजेच 5 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता अर्ज भरण्यास यामध्ये दोन आठवड्यांची वाढ करत मुदतवाढ देण्यात आली आहे. माध्यमिक शाळांनी अर्ज भरण्यापूर्वी शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची माहिती भरून मंडळाकडे पाठवणे अनिवार्य आहे. परीक्षा अर्ज ऑनलाइन भरायचे असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमार्फत अर्ज भरणे आवश्यक असल्याचं बोर्डाने म्हटलं आहे. विद्यार्थ्यांनी अर्जात भरलेली माहितीची पडताळणी करून ती अचूक असल्याची खात्री करुन घेण्याची जबाबदारीही शाळांचीच आहे.*

*👉🅾️🅾️👉विद्याथ्यर्थ्यांचे अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रीलिस्ट 4 डिसेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची घोषणा करण्यात आलेली. राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे यासंदर्भात माहिती देताना 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह बारावीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले जातील, असं सांगितलं होतं. तसेच त्यानंतर म्हणजेच 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह 12 वीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.*

मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार

मुंबई:-महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदावरून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनेही (उद्धव ठाकरे) शुक्ला यांना पोलिस महासंचालकपदावरुन हटविण्यासाठी मागणी केली होती.त्यातच निवडणूक आयोगाकडून राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ल यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. पण आता त्यांच्या जागी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.*

*👉🔴🔴👉विवेक फणसाळकर हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक मोठमोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी त्यांची नेमणूक झाली आहे. त्यापूर्वी ते महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे संचालक होते. ठाणे पोलिस आयुक्तपदावरुन मे 2021 मध्ये त्यांची या ठिकाणी बदली झाली. याशिवाय, 2016-18 या कालावधीत फणसळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून पदभार सांभाळला होता. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाचेही ते प्रमुख होते.*

*👉🟣🟣👉रश्मी शुक्लांना हटवण्याची केली जात होती मागणी*

*काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वी निवडणूक आयोगाला पत्र लिहून डीजीपी रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. पटोले यांनी त्यांच्या निःपक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केले होते. याचदरम्यान आता निवडणूक आयोगाकडून राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ल यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.*

*👉🅾️🅾️👉निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या*

*राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, मात्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीबाबत काँग्रेसकडून अडथळे निर्माण केले जात आहेत. 20 नोव्हेंबरपूर्वी त्यांची बदली करण्याची विनंती काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. ते वादग्रस्त अधिकारी असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोगाला पत्रही पाठवले होते. जोपर्यंत ते या पदावर आहेत, तोपर्यंत राज्यात निष्पक्ष निवडणुका घेणे कठीण जाईल, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता त्यांची बदली होताना दिसत आहे.*

*👉🛑🛑👉रश्मी शुक्लांविरोधात तक्रारींचा डोंगर*

*केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात तक्रारी आल्या होत्या. महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काँग्रेसची ही मागणी फेटाळून लावली होती. मात्र, आता या तक्रारीवर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. रश्मी शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निष्पक्ष निवडणुका होत नसल्याची भीती काँग्रेसने व्यक्त केली होती. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी अधिकाऱ्यांना निष्पक्ष राहण्याचा इशारा दिला होता. राजीव कुमार यांनी यापूर्वी आढावा बैठका आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या घोषणेदरम्यान अधिकाऱ्यांना केवळ निष्पक्ष राहण्यासाठीच नव्हे तर त्यांचे कर्तव्य बजावताना त्यांच्या वागणुकीत अन्यायकारक वागणूक टाळण्याचा इशारा दिला होता.*

*👉🅾️🅾️👉दरम्यान, झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीपूर्वी डीजीपीची बदली करण्यात आली असून, झारखंडमध्येही आचारसंहिता लागू झाली आहे. 19 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने झारखंडचे डीजीपी अनुराग गुप्ता यांचीही बदली केली होती. डीजीपीला तत्काळ प्रभावाने हटवल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्या दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पदभार दिला होता.*

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

पुणे, दि. ४ : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सदरची तपासणी तीन टप्प्यात उप कोषागार कार्यालय, इंदापूर येथे करण्यात येणार आहे.

या वेळापत्रकानुसार पहिली तपासणी ९ नोव्हेंबर रोजी तर दुसरी १३ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!