Home Blog Page 52

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू

पुणे, दि. १७ : जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६ ते मतदान संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मनाई आदेश निर्गमित केले आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात सदर वेळेत वाणिज्यीक आस्थापना, सर्व मंडपे, दुकाने, भ्रमणध्वनी, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले, व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व चिन्हांचे प्रदर्शन निवडणूक प्रक्रियेमध्ये समावेश असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस जवळ बाळगणे, वापरणे अथवा खासगी वाहन प्रवेश करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३चे कलम १६३ अन्वये मनाई करण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ज्यांना आपली किंमत नाही, त्यांच्यापासून दूर राहा..

ज्यांना आपली किंमत नाही, त्यांच्यापासून दूर राहा

मृत्यूपूर्वी वडील आपल्या मुलाला म्हणाले, ‘माझ्या आजोबांनी मला दिलेले हे एक घड्याळ आहे. हे जवळजवळ २०० वर्षे जुने आहे. मी ते तुला देतो. तू दागिन्यांच्या दुकानात जा. त्यांना सांग की, मला ते विकायचे आहे. ते आपल्याला किती ऑफर देतायत ते पाहा. मुलगा दागिन्यांच्या दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला आणि म्हणाला, ‘त्यांनी १५० रुपये ऑफर केले. कारण ते फारच जुने आहे.’ वडील म्हणाले, ‘आता तू भंगाराच्या दुकानात जा.’

मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येऊन म्हणाला, ‘त्यांनी २० रुपये ऑफर केले. कारण ते

खूप खराब झाले आहे. आता वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन संग्रहालयात जायला सांगितलं, तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला. म्हणाला, ‘बाबा, क्युरेटरने या दुर्मीळ तुकड्यास त्याच्या मौल्यवान वस्तूंच्या संग्रहालयात समाविष्ट करण्यासाठी ५ लाख रुपयांची ऑफर दिली आहे.’ वडील शांतपणे स्मितहास्य करत म्हणाले, ‘मला तुला हेच सांगायचे होते की, योग्य ठिकाणीच तुमचं योग्य मूल्य आहे. स्वतःला चुकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य होत नसल्यास रागावू नका. ज्यांना आपले मूल्य माहीत आहे, तेच आपली प्रशंसा करतात. आपली किंमत जाणून घ्या. म्हणजे अशा व्यक्तीपासून दूर राहा, ज्यांना आपली किंमत नाही.

मतदानानंतर क्यूआर कोड स्कॅन केल्यास मिळणार प्रमाणपत्र- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम

पुणे, दि. १५: मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुणे जिल्ह्यात अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत; त्याअंतर्गत दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यास मतदाराला प्रमाणपत्र मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग (स्वीप) अंतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र ही मतदारासाठी गौरवाची बाब असणार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी त्याचा लाभ होणार आहे. मतदारांना मतदानाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी एक क्यूआर कोड तयार करण्यात आला असून त्याचे स्टीकर्स सर्व विधानसभा मतदार संघांना वितरीत करण्यात आले आहेत.

मतदान केल्यानंतर मतदान केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून त्यासाठी मतदान केंद्राबाहेरील स्टीकरवरचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर उघडणाऱ्या फॉर्ममधील माहिती अचूक भरावी तसेच मतदानाची शाई असलेल्या बोटासोबतचा सेल्फी अपलोड करावा. त्यानंतर आपण फॉर्ममध्ये भरलेल्या ई-मेल वर आपले मतदान केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी दि. २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ.‍ दिवसे यांनी केले आहे.

भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे, दि.१५: कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला; भारत निवडणूक आयोगाच्यावतीने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये १५ व १६ नोव्हेंबर रोजी नमुना १२ ड भरुन दिलेल्या ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांचे गृहभेटीद्वारे मतदान नोंदवून घेण्यात येत आहे. त्यापैकी आज ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले ९१ जेष्ठ नागरिक तसेच ४ दिव्यांग मतदार असे एकूण ९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

या प्रक्रियेकरिता विधानसभा मतदारसंघात एकूण आठ पथकांची स्थापना करण्यात आली आहे, पथकाच्यावतीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत मतदारांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे.

निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी? शिक्षण विभागाच्या सूचना काय?

पुणे – राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या अनुषंगाने १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे शाळा भरवणे शक्य नसल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.*

*👉🔴🔴👉राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेतील कामकाज आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. तसेच अनेक मतदान केंद्रेही शाळांमध्ये असतात. मतदानासाठीची तयारी करण्यासाठी निवडणूक प्रशासन शाळा ताब्यात घेते. या पार्श्वभूमीवर १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शाळांना सुटी देण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने शिक्षण विभागाला सादर केला होता. या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत. राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२०४ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत आयुक्त स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, असे नमूद करण्यात आले आहे.*

*👉🟥🟥👉शाळांतील बहुसंख्य शिक्षकांना निवडणुकीच्या काम करावे लागत असल्याने शाळेत शैक्षणिक कामकाज होऊ शकत नाही. तसेच काही ठिकाणी शाळांमध्ये मतदान केंद्र असते. त्यामुळे त्या ठिकाणीही पूर्वतयारी करावी लागते. ही बाब लक्षात घेता शाळा बंद ठेवाव्या लागू शकतात. त्यामुळे शाळांना सुटी देण्याचा निर्णय योग्य ठरतो. या संदर्भात शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासन यांनी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणे उचित ठरेल. मात्र, सरसकट सुटी देणेही योग्य ठरणार नाही, असे माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी सांगितले.*

मुंबई स्वप्नाचं शहर, स्वप्न पुर्ण करणारी युती म्हणजे महायुती; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

मुंबई:- मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे. पण स्वप्न पुर्ण करणारी युती म्हणजे महायुती आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शिवाजी पार्क येथे महायुतीची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.*

*👉🟥🟥👉आघाडी ध्रुविकरणाचे राजकारण करत आहे. संपुर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी मी फिरलो आहे. लोकांबरोबर संवाद साधला आहे. त्यात महायुतीचे सरकार येताना स्पष्ट पणे दिसत आहे असे मोदी यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातली ही माझी शेवटची सभा आहे. प्रचारासाठी मी संपुर्ण महाराष्ट्रात फिरलो आहे. यावेळी प्रत्येक भागातल्या लोकांशी संवाद साधला आहे. आता मी आमच्या मुंबईत आहे. पुर्ण महाराष्ट्राचा आशिर्वाद महायुती बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी एकच आवाज आहे भाजपा महायुती आहे तर गती आहे. महाराष्ट्राची प्रगती आहे. असं ते यावेळी म्हणाले.*

*👉🔴🔴👉महाराष्ट्रातून नव्या नव्या गोष्टी प्रत्येक वेळी समोर आल्या आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना प्रेरणा दिली आहे. टिळक -आगरकरांसारखे समाज सुधारक याच भूमितून आले आहे. त्यांची विचारधार हिच आमची विचार धारा आहे असे मोदी यावेळी म्हणाले. त्यांच्या विचारांवर महायुतीला गर्व आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या गौरवाचा अपमान करत असताना दिसत आहे असा आरोपही त्यांनी केला. आघाडी ध्रुविकरणाचे राजकारण करत आहे. याच आघाडीच्या लोकांनी राम मंदीराला विरोध केला. मतांसाठी यांनी भगवा आतंकवाद हा शब्द आणला.*

*👉🟥🟥👉आघाडीने सावरकरांचा अपमान केला. कश्मीरमधील 370 कलम परत लागू करण्याचा प्रस्तावही आणला आहे. त्यांचा काश्मीरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान काश्मीरमध्ये लागू करण्यास विरोध आहे असा हल्लाबोलही यावेळी केला. राजकारणात वार पलटवार होत असतात. ते आपण समजू शकतो. पण देशाची पेक्षा कोणताही पक्ष मोठा नसतो. पण काही हे आघाडीचे लोक देशा पेक्षा पक्षाला मोठं समजत आहेत. भारत प्रगती करत आहे. त्यामुळे या आघाडीच्या लोकांना त्रास होत आहे. ते नेहमी अनेक प्रश्न उपस्थित करत असतात. याच लोकांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू दिला नाही. आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यानंतर यांच्या पोटात दुखू लागले असंही ते म्हणाले. त्यामुळे या आघाडी पासून सावध रहा असा सल्लाही मोदींनी यावेळी दिला.*

मतदानाच्या आणि आधीच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या मुद्रित माध्यमातील जाहिराती प्रमाणीत करुन घेणे बंधनकारक

पुणे, दि. १२: मतदानाच्या आणि एक दिवस आधीच्या दिवशी मुद्रित माध्यमात (प्रिंट मीडिया) प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणीत करुन घेणे बंधनकारक आहे. पूर्व- प्रमाणीत करुन घेतल्याशिवाय जाहिराती प्रसिद्ध करू नयेत असे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून त्यांचे तंतोतंत पालन व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी म्हणजेच दि. २० नोव्हेंबर २०२४ आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि. १९ नोव्हेंबर) मुद्रित माध्यमातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसू शकेल अशा जाहिराती प्रसिद्ध होऊ नयेत याबाबत दक्षता घेण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.

कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी या तारखेला प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती प्रमाणीत करुन घ्याव्यात. प्रमाणीकरणाचे अर्ज जाहिरात प्रसिद्धीच्या किमान २ दिवस अगोदर एमसीएमसी समितीकडे सादर करावेत, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. दिवसे यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!