Home Blog Page 51

राज्यात हुडहुडी, रत्नागिरी, पुणे, नाशिक, साताऱ्यासह अनेक जिल्हे गारठले; थंडी आणखी वाढण्याचा इशारा

मुंबई:-बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील वातावरणावर परिमाण होणार आहे. सध्या राज्यातील तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. सकाळी व रात्री थंडी वाढली असल्यामुळे अनेक जिल्हे गारठले आहेत. पुणे, नाशिक, रत्नागिरी, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात तापमानात कमी झाले आहे. किमान तापमानासोबतच कमाल तापमानात देखील १ ते २ अंशांनी घट झाली आहे.*

*👉🟥🟥👉डिसेंबर महिन्यात थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळं राज्यावरही त्याचे परिणाम होताना दिसत आहेत. जिथं हवेतील आर्द्रता कमी होऊ वातावरण कोरडं होत असल्याचं निदर्शनास येत आहे. राज्यातील परभणी, निफाड आणि धुळ्यात तापमानानं निच्चांकी आकडा गाठला असून, हा आकडा 10 अंशांच्याही खाली उतरल्याचं पाहायला मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या कोकणापासून विदर्भापर्यंतच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा आकडा 30 अंशांच्याही खाली आला असल्यामुळे थंडीचा प्रकोप वाढताना दिसत आहे.*

*👉🔴🔴👉हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किमान किंवा रात्रीच्या तापमानानंतर आता काही शहरातील कमाल किंवा दिवसाच्या तापमानात लक्षणीय घट होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरातील कमाल तापमान सोमवारी २८.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी कमाल तापमान होते. दरम्यान, किमान तापमान १२.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे आजपर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान आहे. कमी होणारी आर्द्रतेची पातळी आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होत आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस तापमान आणखी घट होण्याची शक्यता आहे, असे आयएमडीचे पुण्यातील वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी सांगितले. या वेळी शहरात पहाटे धुके पडण्याची शक्यता असून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असे सानप यांनी सांगितले.*

निवडणूक संपताच रश्मी शुक्लांची पोलिस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती

निवडणूक संपताच रश्मी शुक्लांची पोलिस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती

विधानसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केली आहे. राज्याच्या गृहविभागाने सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींचा आशीर्वाद; महायुतीचा वारू चौखूर उधळला; महाविकास आघाडीचा हिरमोड

मुंबई:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताचा आकडा पार केला असून राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकारच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडी बहुमताच्या आकड्यापासून कोसो दूर असून महायुतीच्या या विजयात लाडली बहिण योजनेचा मोलाचा वाटा राहिला आहे. या योजनेच्या सुरुवातीलाच विधानसभा निवडणुकीत ही मोठी योजना ठरणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते.*

*👉🔴🔴👉अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या महायुती पक्षांनी लाडली बहिण योजनेचा जोरदार प्रचार केला तर या योजनेचा प्रभाव पाहून काँग्रेसनेही अशीच योजना जाहीर केली. महायुतीच्या विजयात लाडकी बहिन योजनेचा मोठा वाटा असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. यावेळी राज्यातील विधानसभा निवडणुकीत एकूण ६६.०५ टक्के मतदान झाले तर, २०१९ च्या तुलनेत यावेळी सुमारे ५% अधिक लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे यावेळी पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त होती. निवडणूक आयोगानुसार एकूण ६ कोटी ४४ लाख ८८ हजार १९५ मतदारांपैकी ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरुष आणि ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिलांनी मतदान केले. करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ८४.९६% मतदान झाले तर, कुलाबा विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ४४.४४% मतदान झाले.*

*👉🟥🟥👉राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम म्हणाले की, महाराष्ट्रात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी म्हटले की, आतापर्यंत असं कधीच घडलं नव्हतं. राज्यात प्रथमच महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले त्यामुळे, एकूण मतदानाची टक्केवारी ६६% हून अधिक झाली. चोक्कलिंगम म्हणाले की, गेल्या तीन दशकांत असे घडलेले नाही. निवडणुकीत महिलांचा वाढता सहभाग ‘लाडली बेहन योजना’ कारण मानले जात होते. निवडणुकीपूर्वी राज्यभर लाडकी बहीण योजनेची बरीच चर्चा रंगली होती. निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीने सत्तेत आल्यास ‘लाडली बेहन योजने’त दिलेली रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले तर लाडकी बहीण योजनेला टक्कर देण्यासाठी काँग्रेसनेही ‘महालक्ष्मी योजने’अंतर्गत कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर महिलांना दरमहा ३,००० रुपये आणि महिलांना मोफत बस प्रवासाचे आश्वासन दिले होते. मात्र, महायुतीची चाल महाराष्ट्रात ठप्प झाली आणि महायुतीचा महाराष्ट्रात मोठ्या विजयाच्या फरकाने सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता महिला मतदारांवर प्रभाव टाकण्यात ‘लाडली बेहन योजना’ खरोखरच यशस्वी ठरली का, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. या योजनेचा थेट फायदा महायुतीला झाला का, याचे उत्तर होय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार करवीर, चिमूर, ब्रम्हपुरी, नेवासा, कागल, आरमोरी, नवापूर, शाहूवाडी, कुडाळ आणि पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले.*

मतमोजणीसाठी २ हजार १४३ अधिकारी कर्मचारी नियुक्त

पुणे, दि. २२: जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी ५२८ सूक्ष्म निरीक्षक, ५५३ मतमोजणी पर्यवेक्षक तसेच ५७७ मतमोजणी सहायक असे १ हजार ६५८ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय राखीव ४५८ अधिकारी, कर्मचारी असे एकूण २ हजार १४३ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील ८ हजार ४४३ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली असून मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरु होणार आहे. मतमोजणी साठी जुन्नर ८७, आंबेगाव ८५, खेळ आळंदी ७७, शिरूर ९०, दौंड ५७, इंदापूर ६१, बारामती ७७, पुरंदर ५९, भोर ९७, मावळ ६६, चिंचवड ८७ ,पिंपरी ९८, भोसरी ८७, वडगाव शेरी ८९, शिवाजीनगर ६२, कोथरूड ८७, खडकवासला ८०, पर्वती ९३, हडपसर ९३, कॅन्टोन्मेंट ६० आणि कसबा पेठ ६६ याप्रमाणे अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

निवडणुकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्युलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यास सक्त मनाई आहे. उमेदवार प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी. मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपुर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असेही निवडणूक प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला; ३ प्रवाशी वाहनांवर दहशतवाद्यांनी केला अंदाधुंद गोळीबार; ५० जणांचा मृत्यू

पेशावर:-पाकिस्तानातील खैबर-पख्तूनख्वा भागात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. तीन बसेसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी झालेल्या या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाल्याचे तर 20 जण जखमी झाल्याच्या वृत्ताला स्थानिक अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे.*

*👉🅾️🅾️👉मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेनजीक कुर्रम जिल्ह्यातील वाहनांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांनी कट रचलेला होता. दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी या बस जवळ येताच त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. ही बस खैबर पख्तूनख्वाहून पेशावरकडे जात होती. हल्ल्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या हल्ल्यामध्ये 6 महिलांचा आणि 3 लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. हल्ल्यात एकूण 50 जण दगावले असून 20 जण जखमी झालेले आहेत. स्थानिक पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानचे वर्चस्व असलेल्या भागामध्ये हा हल्ला करण्यात आला आहे.*

*👉🟥🟥👉खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन खान गंडापूर यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. त्यांनी हल्ल्याची चौकशी करून विस्तरृत अहवाल सादर करण्यासाठी कायदामंत्री, खासदार आणि मुख्य सचिवांचे शिष्टमंडळ कुर्रमला रवाना केले आहे. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन खान गंडापूर यांनी सदर हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्याप्रती आणि त्यांच्या कुटुंबियाप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. सोबतच पीडितांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे. निर्दोष नागरिकांना अशा पद्धतीने लक्ष्य करणे हे अत्यंत निंदनीय बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्यांनी हा हल्ला घडवला ते फार काळ कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.*

मतदार केंद्रावर भ्रमणध्वनी घेऊन जाण्यास बंदीच निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेपास उच्च न्यायालयाचा नकार!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी घेऊन जाण्यास बंदी घालण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय कोणत्याही दृष्टीने बेकायदेशीर नाही, असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. तसेच, निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेपास नकार देताना या निर्णयाला आव्हान देणारी मनसेने केलेली जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली.*

*👉🔴🔴👉निवडणूक प्रक्रियेच्या सुरळीत कामकाजासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे, असेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने मनसेचे कार्यकर्ता उजाला श्यामबिहारी यादव यांची याचिका फेटाळताना नमूद केले. निवडणूक प्रक्रिया ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि त्यात डिजिलॉकर ॲपद्वारे ओळखपत्रे सादर करण्याची परवानगी देण्याची मागणी याचिकाकर्ता करत आहे. परंतु, कोणत्याही व्यक्तीला डिजिलॉकरद्वारे त्यांच्या भ्रमणध्वनीमधील कागदपत्रे पडताळणीसाठी दाखवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे, मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी घेऊन जाण्यास बंदी घालणारा निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला कोणत्याही दृष्टीने बेकायदा आढळून येत नाही, असे देखील खंडपीठाने यादव यांची याचिका फेटाळताना अधोरेखीत केले.*

*👉🟥🟥👉तत्पूर्वी, मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी घेऊन जाण्यास बंदी घालणारा आदेश १९९८ पासून अंमलात आहे. असे असताना याचिकाकर्त्याने त्याला आता आव्हान दिल्याची बाब केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने वरिष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी आणि वकील अक्षय शिंदे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर, १९९८ पासून तंत्रज्ञानात खूप सारे बदल झाल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. तथापि, केंद्रावरील अधिकाऱ्यांनी, तसेच मतदारांनी मतदानाचे महत्त्व कायम राखण्याच्या दृष्टीने गोपनीयतेचा आदार केला पाहिजे. असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी घेऊन जाण्यास परवानगी दिल्यास नागरिक कोणत्या पक्षाला मतदान केले हे दाखवण्यासाठी चित्रफित तयार करण्याची शक्यता असून त्याचा निष्पक्ष निवडणुकांवर परिणाम होईल, असेही निवडणूक आयोगाने बंदीच्या निर्णयाचे समर्थन करताना न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने आयोगाची ही बाजू याचिका फेटाळताना योग्य मानली.*

*👉🔴🔴👉दरम्यान, मतदारांना मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी आणण्याची आणि डिजिलॉकर ॲपद्वारे ओळखपत्रे सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यादव यांनी केली होती. डिजिलॉकर ॲपला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती- तंत्रज्ञान मंत्रालयाने मान्यता दिली असल्याचेही याचिकेत नमूद केले आहे. त्यामुळे, मतदान केंद्रामध्ये जाताना भ्रमणध्वनीवर बंदी घातल्यास अधिकृत ओळखपत्रांसाठी डिजिलॉकरवर अवलंबून असलेल्या मतदारांची गैरसोय होऊ शकते, भ्रमणध्वनी नेण्यावरील बंदीमुळे अनेकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. ज्येष्ठ नागरिक, महिलांना मदतीसाठी कुटुंबातील सदस्यांशी किंवा इतरांशी संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनीची आवश्यकता भासू शकते. भ्रमणध्वनी ही संवाद साधण्याची आणि डिजिटायझेशनच्या उद्देशाने एक महत्त्वाची गरज आहे, असेही याचिकेत म्हटले होते. भ्रमणध्वनी नेण्यावर बंदी घालणे मतदारांच्या हक्कांचे उल्लंघन असून प्रत्येक मतदाराचे मत लोकशाहीसाठी महत्त्वाचे असल्याचेही याचिकेत नमूद केले होते. याशिवाय, राष्ट्रीय माहितींतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, डिजिलॉकर ॲपचा वापर ३२१ दशलक्ष लोकांकडून केला जातो, त्यामध्ये ७.७६ अब्ज दस्तऐवज संग्रहित केले आहेत. त्यामुळे, मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने मतदारांना मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी नेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली होती.*

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू

पुणे, दि. १७ : जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६ ते मतदान संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मनाई आदेश निर्गमित केले आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात सदर वेळेत वाणिज्यीक आस्थापना, सर्व मंडपे, दुकाने, भ्रमणध्वनी, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले, व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व चिन्हांचे प्रदर्शन निवडणूक प्रक्रियेमध्ये समावेश असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस जवळ बाळगणे, वापरणे अथवा खासगी वाहन प्रवेश करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३चे कलम १६३ अन्वये मनाई करण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

error: Content is protected !!