Home Blog Page 40

चेतना फाउंडेशन सरडेवाडी येथील शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

चेतना फाउंडेशन इंदापूर येथील शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न🇮🇳🇮🇳🇮🇳

चेतना फाउंडेशन इंदापूर संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, चेतना इंटरनॅशनल स्कूल, चेतना ज्युनिअर कॉलेज सरडेवाडी इंदापूर येथे 26 जानेवारी 2025 निमित्त भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. सुजित देसाई हे अध्यक्षस्थानी होते असेच कार्यक्रम साठी चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे सचिव प्रा.विलास भोसले सर खजिनदार प्रा. सोमनाथ माने सर,संचालिका सौ. निकिता माने मॅडम संस्थेमधील सर्व शाखांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावर्षीचे ध्वजारोहण व भारत मातेचे प्रतिमापूजन फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुजित देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणानंतर संस्थेच्या प्रांगणात विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यामध्ये कवायत प्रकार,लेझीम, देशभक्तीपर गीत मुलांची देशभक्तीपर भाषणे तसेच भारत हा देश विविधतेने नटलेला आहे तसेच लहान मुलांनी विविध वेशभूषा परिधान करून कार्यक्रमांमध्ये एक वेगळेपणाचे दर्शन घडवून आणले. यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सुजित देसाई यांनी सर्वांना 76 व्या प्रजासत्ताक दिनी मार्गदर्शन करताना म्हणाले 26 जानेवारी 1950 हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी ऐतिहासिक होता या दिवशी आपल्या देशाने संविधान लागू केली एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून अस्तित्व प्राप्त केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यासाठी एक मजबूत आणि लोकशाही प्रधान संविधान दिले ज्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला हक्क आणि स्वातंत्र्य मिळाले तसेच प्रजासत्ताक म्हणजे जनतेच्या हातात सत्ता असलेला देश भारतीय संविधान आपल्याला समानता स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे संरक्षण देतो. प्रत्येक नागरिकाला शिक्षण विचार स्वातंत्र्य आणि संधी मिळाव्यात यासाठी संविधानाने व्यवस्था केलेली आहे आज देश प्रगतीच्या मार्गावर आहे पण आपल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आपण सर्वांनी आपले संविधान स्वातंत्र्यसंग्रामातील बलिदान आणि लोकशाही मूल्ये जपण्याचा संकल्प केला पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवीन भारताचा संकल्प करताना युवकांनी विज्ञान-तंत्रज्ञान आणि उद्योजकता यामध्ये प्रगती करून भारताला जागतिक स्तरावर नेतृत्व प्रदान करावे देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी कटिबद्ध राहावे असे आव्हान केले. शेवटी सर्वांना प्रजासत्ताक दिनी संविधानाची शपथ देण्यात आली.

समस्त देशवासियों को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएँ:- अमित शहा

समस्त देशवासियों को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएँ।

 

गणतंत्र दिवस भारत के संवैधानिक मूल्यों के प्रति आस्था, सामाजिक समानता के प्रति दृढ़ता और लोकतंत्र के प्रति समर्पण का प्रतीक है। इस शुभ अवसर पर मैं सभी स्वतंत्रता सेनानियों और मजबूत गणतंत्र की नींव रखने वाले संविधान निर्माताओं को श्रद्धांजलि अर्पित करता हूँ।

आइए, इस गणतंत्र दिवस पर मोदी जी के विकसित और आत्मनिर्भर भारत के निर्माण में बढ़-चढ़कर योगदान देने का संकल्प लें।

समस्त देशवासियों को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएँ:- अमित शहा

समस्त देशवासियों को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएँ।

 

गणतंत्र दिवस भारत के संवैधानिक मूल्यों के प्रति आस्था, सामाजिक समानता के प्रति दृढ़ता और लोकतंत्र के प्रति समर्पण का प्रतीक है। इस शुभ अवसर पर मैं सभी स्वतंत्रता सेनानियों और मजबूत गणतंत्र की नींव रखने वाले संविधान निर्माताओं को श्रद्धांजलि अर्पित करता हूँ।

आइए, इस गणतंत्र दिवस पर मोदी जी के विकसित और आत्मनिर्भर भारत के निर्माण में बढ़-चढ़कर योगदान देने का संकल्प लें।

Happy Republic Day:- PM India नरेंद मोदी

Happy Republic Day.

 

Today, we celebrate 75 glorious years of being a Republic. We bow to all the great women and men who made our Constitution and ensured that our journey is rooted in democracy, dignity and unity. May this occasion strengthen our efforts towards preserving the ideals of our Constitution and working towards a stronger and prosperous India.

पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी नवोदित वकिलांनी कायम शिकत राहणे गरजेचे – न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या बांधकामासाठी अतिरिक्त ८ कोटी रुपयांची तरतूद करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

*इंदापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन संपन्न*

पुणे, दि. २५: पक्षकारांचे जीवन हे वकिलाच्या हातात असते त्यामुळे पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने नवीन वकिलांनी कायम जेष्ठ वकिलांकडून शिकत आणि अभ्यास करत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी केले. ‘सर्वांसाठी आणि सर्वांपर्यंत न्याय’ अर्थात ‘ॲक्सेस टू जस्टिस फॉर ऑल’ या उद्देशाने जिथे जिथे आवश्यक आहे तेथे न्यायालयीन पायाभूत सोयी सुविधा वाढविण्यात येत आहेत, असेही त्या म्हणाल्या. इंदापूर येथील या न्यायालय इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्याच्या बांधकामासाठी आगामी अर्थसंकल्पात अतिरिक्त ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

इंदापूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयांचे उद्घाटन न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरीफ सा. डॉक्टर, खासदार सुप्रिया सुळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे महेंद्र महाजन, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश इंदापूर यू. एम. मुधोळकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर. जे. तांबे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. ए. यु. पठाण, ॲड. राजेंद्र उमाप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. गिरीश शहा आदी उपस्थित होते.

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे म्हणाल्या, जनतेला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी न्यायिक पायाभूत सोयी सुविधा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. खटल्यांची वाढलेली संख्या याकडे जनतेचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. पुणे जिल्हा हा देशातील सर्वाधिक मोठा न्यायिक जिल्हा आहे. त्यामुळे आवश्यक तेथे न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.

नवोदित वकिलांनी वकिली करताना कठोर परिश्रम करत राहिले पाहिजे, असा सल्ला देऊन त्या म्हणाल्या, यशाला कोणताही जवळचा मार्ग असू शकत नाही हे कायम लक्षात ठेवावे. कोर्टाचा आपल्यावरील विश्वास गमावू नये यासाठी प्रयत्न करा. कायम व्यावसायिकता बाळगावी. लोकांच्या हक्कासाठी त्यांचे रक्षक बनून त्यांचे संरक्षण करा.

बारामती जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालय येथून सुमारे ३ हजार न्यायालयीन प्रकरणे इंदापूर येथील न्यायालयात वर्ग करण्यात आली आहेत. त्यामुळे तालुक्यातील खटले वेगाने चालून नागरिकांना वेळेत आणि गतीने न्याय मिळू शकेल. न्यायदानाला लागणारा विलंब हा न्याय नाकारण्यासारखा असतो त्यामुळे हा विलंब होऊ नये यासाठी वकिलांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे पक्षकारांना त्रास होऊ नये यासाठी वकिलांनी वारंवार सुनावणीच्या तारखा मागू नयेत. ज्यांच्याकडे पैसेच नाहीत अशा गरिबांचा खटला मोफत चालविण्यासाठी प्रयत्न करा असेही त्या म्हणाल्या.

*जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या बांधकामासाठी आणखीन ८ कोटी रुपयांची तरतूद करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार*

इंदापूर येथील आज उद्घाटन झालेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्याच्या बांधकामासाठी अतिरिक आठ कोटी रुपयांची तरतूद आगामी अर्थसंकल्पात करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच येथे वकिली करणाऱ्या वकीलांसाठी कोर्टाच्या इमारतीशेजारी नवीन तात्पुरते लोखंडी बांधकाम उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून वीस लाख रुपये तात्काळ उपलब्ध करून दिले जातील, असेही ते म्हणाले.

आपल्या देशात, राज्यात न्यायव्यवस्थेवर जनतेचा मोठा विश्वास आहे. लोकशाहीच्या रक्षणामध्ये न्यायालयांचं खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे न्यायालयांना पायाभूत सुविधा निर्माण करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने राज्यात आवश्यक येथे न्यायालयीन इमारती उभ्या करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. इंदापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरीष्ठस्तर दिवाणी न्यायालय झाल्यामुळे सुमारे शंभर ते सव्वाशे वकील, ५०० ते हजार पक्षकार यांना बारामती येथे जावे लागायचे ते वाचले.

न्यायालयीन इमारती आणि निवासस्थानांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. पुणे येथील राणीचा बाग येथे न्यायाधीशांठी ३२ निवासस्थाने मंजूर झाली आहेत. इंदापूर येथील न्यायालयाच्या इमारतीशेजारील पंचायत समितीची दोन एकर जागा न्यायालयाच्या ताब्यात मिळण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, असेही ते म्हणाले.

न्यायालयीन पायाभूत सोयी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मुंबई येथे उच्च न्यायालयासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी बीकेसी येथे जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आवश्यक तितका खर्च करण्यात येईल. मुंबई येथे २ हजार कोटी रुपये खर्च करून जीएसटी भवन उभारण्यात येत आहे. तेथे भाड्याच्या इमारतीत असलेली शासकीय कार्यालयेही स्थलांतरित करण्यात येणार असल्याने प्रचंड भाडे वाचणार आहे. एअर इंडियाची इमारत शासनाच्या ताब्यात मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असून त्यानंतर तेथेही राज्य शासनाची कार्यालये स्थलांतरित करता येतील,

यशदाचा विस्तार करून उर्वरित १०० एकर जागेवर मसुरीच्या धर्तीवर अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, राज्यात जनतेची, तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांची सोय व्हावी अशा देखण्या इमारती उभ्या करण्यासाठी प्रयत्न असतो. सारथीची चांगली वास्तू पुण्यात उभी केली असून सामाजिक न्याय विभागाची इमारत उभारण्याचे निश्चित केले असून
शालेय शिक्षण भवन, नोंदणी भवन, कृषी भवन, जमाबंदी आयुक्तालय भवनाची कामे सुरू आहेत. जीएसटी भवनाचे काम संपत आले आहे. कामगार भवन, पणन आणि सहकार भवन, साखर भवन शेजारी एक नवे भवन, नगर विकास भवन, महिला व बाल विकास आयुक्तालयासाठी भवन, बालेवाडी येथे ऑलिम्पिक भवन, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे महानगर पालिका इमारत आधी भव्य इमारती उभारण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कोरोनाच्या संकटाच्या काळातही या इमारतीच्या कामासाठीचा निधी कमी पडू दिला नाही आणि इमारतीचे काम थांबले नाही. इंदापूर येथील वकील हे एकविचाराने काम करतात त्यामुळे त्यांनी हे न्यायालय सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार उच्च न्यायालयाने या न्यायालयाला मंजुरी दिली, असेही ते म्हणाले.

न्यायमूर्ती श्री. मारणे म्हणाले, न्यायालयीन व्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाकडे मार्गक्रमण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पक्षकारांना न्यायासाठी पुणे शहरात यावे लागू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पुण्यात शिवाजीनगर येथे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात वकील आणि पक्षकार येत असल्याने मोठी गर्दी होत असते. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये उभारण्यात येत आहेत. सध्या बारामती, खेड राजगुरुनगर, वडगाव मावळ आणि आज इंदापूर येथे ही न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. लवकरच जुन्नर येथे न्यायालयाचे काम सुरू करण्यात येत आहे. लवकरच शिरूर येथेही सुरू करण्यात येईल. पुणे हा देशातील सर्वात मोठा न्यायालयीन जिल्हा असून एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आजच्या घडीला प्रलंबित असलेल्या ५४ लाख खटल्यांपैकी ७ लाख १० हजार खटले एकट्या पुणे जिल्ह्यात प्रलंबित आहेत. हे साठलेले खटले निकाली काढण्यासाठी नवीन न्यायालयीन सोयी सुविधा उभारणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. न्यायालयीन व्यवस्थेत पुण्यापासून बाजूला झाल्यामुळे वकिलांनी स्वतःचा दर्जा, वकिलीचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

न्यायमूर्ती आरीफ सा. डॉक्टर म्हणाले, या भागात न्यायालयीन व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या इमारतीमुळे तातडीने न्यायव्यवस्थेकडे न्यायासाठी येता येणार आहे. इंदापूरला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हे न्यायालय सुरू झाल्यामुळे पक्षकार, पोलीस, वकील यांचा अमूल्य वेळ वाचणार असून या क्षेत्राच्या प्रगतीला मोठी संधी मिळणार आहे. सर्वसामान्यांना वेळेत न्याय मिळवा यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत, असेही ते म्हणाले.

न्यायाधीश श्री. महाजन म्हणाले, पुणे जिल्ह्यात देशात सर्वाधिक १५३ न्यायाधीश असून एकट्या पुणे शहरात ८० न्यायाधीश आहेत. त्यामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये सुरू करण्यात येत आहेत. इंदापूर येथे हे न्यायालय झाल्यामुळे इंदापूर तालुक्यातील काही दूर अंतरावरील भागातून बारामती येथे न्यायालयीन कामासाठी जावे लागण्याचा त्रास वाचणार आहे, असे सांगून पुणे शहर व जिल्ह्यातील न्यायाधीशांच्या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लागावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक ॲड. गिरीश शहा यांनी केले.

कार्यक्रमास माजी आमदार विजय मोरे, यशवंत माने, बारामती, दौंड, इंदापूर, करमाळा आदी तालुक्यातील न्यायाधीश, विविध वकील संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात ७ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे दि. २४: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी ७ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही.

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात ७ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे दि. २४: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी ७ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही.

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या शुभहस्ते प्रा. सोमनाथ माने सर यांना राज्यस्तरीय महात्मा फुले व सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला.

इंदापूर येथील राजमाता अहिल्याबाई होळकर निवासी महाविद्यालय इंदापूर येथील प्राध्यापक व चेतना फाऊंडेशन चे खजिनदार  सोमनाथ माने सर यांना नुकतेच पुणे येथे झालेल्या महात्मा ज्योतिराव फुले इतिहास अकॅडमी यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमाची व राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाची भूमिका ही डॉ. श्रीमंत कोकाटे सर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलेली आहे. आपल्या देशात सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घालणाऱ्या महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रति असलेल्या कृतर्थ भावनेने त्यांच्या नावाने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार ही भूमिका थोर इतिहास तज्ञ डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी मांडली. जर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मा.दत्तात्रय सावंत साहेब आय.आर.एस मा. विपुल वाघमारे साहेब माननीय श्री गणेश माने देशमुख साहेब चेअरमन जय हिंद सहकारी साखर कारखाना मा.शिवाजी खांडेकर मा. रावसाहेब मिरगणे मा. सौ श्रीलेखा पाटील मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मा.महेश आप्पा शिंदे व योगेश निंबाळकर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जवळपास 30 गुणवंत शिक्षकांना श्रीमंत छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. आपल्या मनोकातामध्ये श्रीमंत छत्रपती संभाजी राजे यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजासाठी सुरू केलेल्या विविध शाळा महाविद्यालय आश्रम शाळा यांची माहिती दिली तसेच पुढच्या पिढीला घडवायचे असेल तर शिक्षक हाच एकमेव पर्याय आहे हे त्यांनी कणखरपणे सांगितले व उपस्थित सर्व गुणवंत शिक्षकांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.औदुंबर लोंढे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक सोमनाथ गोडसे यांनी केले सदर कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन महात्मा फुले इतिहास अकादमी, राष्ट्र सेवा समूह, रयत प्रकाशन, गिरी प्रेमी ग्रुप पुणे यांनी केले.

प्रा. सोमनाथ माने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

img 20250123 wa0024
चेतना फार्मसी कॉलेज सरडेवाडी यांचे खजिनदार प्रा. सोमनाथ माने सर राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

आता मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये

मुंबई:-महसूल प्रशासनाचे कामकाज आणखी गतीने व्हावी यासाठी राज्यातील सर्व मोठया जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावले उचलली असून तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिल्या आहेत.*

 

*👉🔴🔴👉मागच्या आठवड्यात पुणे येथील विभागीय आयुक्तालयात महसूल मंत्र्यांनी पुणे विभागातील जिल्हाधिका-यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारीपदाची गरज असल्याचे सांगितले. मोठया जिल्ह्यांचे आकारमान, कामकाज, गरज, महसूल व कार्यपद्धती लक्षात ही पदे तातडीने निर्माण करण्याची सूचना त्यांनी केली होती. गुरुवारी बावनकुळे यांनी नागपूर येथील एका बैठकीनंतर सर्व विभागीय आयुक्तांना दूरध्वनीवर संपर्क साधून या पदांचे प्रस्ताव तातडीने तयार करावेत अशी सूचना केली.*

 

*👉🟣🟣👉शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना या सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आहेत. जोपर्यंत प्रत्येक आदिवासी पाडे, वस्ती येथील वंचित लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचणार नाहीत तोपर्यंत शासकीय योजनांनाही अर्थ उरणार नाही. उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी महसूल यंत्रणा, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग यांनी जबाबदारीने अशा वस्त्यांना भेटी देऊन त्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले.*

 

*👉🅾️🅾️👉महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांचा तत्काळ निपटारा व्हावा, सुनावणीसाठी जी प्रकरणे आहेत त्यावर योग्य कारवाई करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये दोन अपर जिल्हाधिकारी कार्यालये संपूर्ण आस्थापनेसह कार्यान्वित करण्याबाबात प्रस्ताव सादर करा असे आदेश देण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.*

error: Content is protected !!