Home Blog Page 39

समाज अन् गरजेपुरते येणारे समजतील लोक:- रामवर्मा आसबे

समाजात काही लोक आपल्याशी फक्त त्यांच्याच गरजेसाठीच संपर्कात येतात , आणि जेव्हा त्यांची गरज संपते, तेव्हा ते दूर जाऊन त्यांचा वर्तनही बदलतो. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे कारण अशा लोकांपासून सावध किंवा दूर  राहणे महत्त्वाचे आहे. त्यांची मित्रता किंवा सहकार्य हे कधीही खरे नसते, ते फक्त त्यांच्या फायद्याच्या आधारावर असते. त्यांचा गरजेच्या वेळी ते आपल्यासोबत असतात, पण एकदा गरज संपली की, तोंड फिरवतात किंवा दुरावतात, त्यामुळे, आपल्या स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहून, खरी मित्रता आणि सहकार्य करणाऱ्या लोकांच्या संपर्कात या…..

चेतना फार्मसी सरडेवाडी मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा

चेतना फाउंडेशन इंदापूर संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ विभागीय कार्यालय पुणे यांच्यामार्फत 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सर्व महाविद्यालयांमध्ये साजरा करण्यात यावा असे आव्हान केले होते त्याचाच एक भाग म्हणून चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी इंदापूर येथे विविध उपक्रमांद्वारे मराठी भाषेचे संवर्धन हा उपक्रम महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा मराठी फलक लेखन इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित देसाई हे अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग प्रा. चैतन्य महारनवर प्रा. सुरज माने यांनीही मराठी भाषेचे संवर्धन याबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच महाविद्यालयामधील पदवी आणि पदविका मधील विद्यार्थ्यांनी सुद्धा मनोगती व्यक्त केली. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. उदय देशपांडे सचिव मा. विलास भोसले खजिनदार मा.सोमनाथ माने यांचे विशेष सहकार्य लाभले तरी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक ग्रंथपाल विकास हुबाले सर प्राध्यापिका नम्रता मोरे यांनी काम पाहिले स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक चैतन्य महारनावर यांनी केली तर आभार वैष्णवी डोईफोडे यांनी केले.

पुण्यात गुलेन बेरी सिंड्रोम आजाराचे थैमान; तरुणाचा मृत्यू, रुग्णसंख्या शंभरीपार, अनेकजण व्हेंटिलेटरवर

पुणे:- पुण्यात जीबीएस म्हणजेच गुलेन बेरी सिंड्रोम असलेल्या रुग्णांची संख्या शंभरीच्या पुढे गेली आहे. दरम्यान, पुण्यात रविवारी एका तरुणाचा मृत्यू या आजारामुळे झाला. दरम्यान, या आजारावरील उपचाराच्या खर्चामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पुणे महागर पालिकेने पुढाकार घेत ज्या ठिकाणी दवाखान्यात या आजाराने बाधित रुग्ण आहेत, त्या दवाखान्यात या आजारावरील खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेतर्फे आरोग्य अधिकारी नेमला जाणार आहे. तसेच पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात या आजाराने बाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी ५० बेडसह १५ आयसीयू आरक्षित करण्यात आले आहेत.*

*👉🔴🔴👉पुण्यात रविवारी आणखी २८ जीबीएस बाधितांची नोंद झाली. त्यामुळे पुण्यात जीबीएस बंधितांचा आकडा हा १०१ वर पोहोचला आहे. तर सोलापुरातील एका तरुणाचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २३ रुग्ण ५० ते ८० वयोगटातील आहेत. ९ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल झालेला पहिलं रुग्ण हा पुण्यात आढळेलेला पहिले रुग्ण असल्याचं मानलं जात आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या काही रुग्णांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया आढळून आल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. असे म्हटले जात आहे की जगभरातील सर्व जीबीएस प्रकरणांपैकी एक तृतीयांश प्रकरणे सी. जेजुनी विषाणूमुळे उद्भवतात. त्याचबरोबर यामुळे अनेक गंभीर संक्रमण देखील होत असल्याचं पुढ आलं आहे. सध्या विशेषत: ज्या भागात रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत, त्या भागात प्रशासनाकडून पाण्याचे नमुने गोळा केले जात आहेत.*

*👉🅾️🅾️👉खडकवासला धरणाजवळील विहिरीत शनिवारी ई.कोलाय या जीवाणूचे प्रमाण अधिक आढळले, मात्र या विहिरीतील पाण्याचा वापर झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नागरिकांना पाणी उकळून पिण्याचा आणि अन्न गरम करून खाण्याचा तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. त्याच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या आयव्हीआयजी इंजेक्शनची किंमत २० हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. १६ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल झालेल्या ६८ वर्षीय महिलेच्या नातेवाईकाने सांगितले की, उपचारात एकूण १३ इंजेक्शनचा वापर करण्यात आला. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेत प्रशासनाला खबरदा रीच्या सूचना दिल्या आहेत. पवार म्हणाले की, जीबीएसबद्दल मला समजले की या विशिष्ट आजाराचे उपचार महाग आहेत, त्यामुळे मी जिल्हा प्रशासन आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन नागरिकांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला. पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील बाधितांवर वायसीएम रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील रुग्णांवर पुणे शहरातील कमला नेहरू रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात या आजारावर मोफत उपचार केले जाणार आहेत.यासाठी ५० बेडसह १५ आयसीयू आरक्षित करण्यात आले आहेत, असे पवार म्हणाले.*

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’ चा समारोप शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार

पुणे, दि. २६: शेतीत प्रगती साधण्याच्यादृष्टीने शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे; शेतकरी संशोधक असला पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’  च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बाबासाहेब देशमुख, उप विभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके, आजी, माजी संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अतिशय नेत्रदीपक कृषी प्रदर्शन, जनावरे, घोडेबाजार व डॉग शो आयोजित केला. यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होते. त्यादृष्टीने नवीन माहिती, तंत्रज्ञान यासोबतच जातिवंत जनावरांची ओळख इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे ही समाधानाची बाब आहे. या बाजार समितीला शेतकरी निवास उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

श्री. पवार पुढे म्हणाले, या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने, आधुनिक शेतीची साधने, महिला बचत गटांची उत्पादने, गृहोपयोगी वस्तू पाहायला मिळाल्या. पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडेबाजार या ठिकाणी पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील देशातील दोनशे प्रकारची जातीवंत घोडे वैशिष्ट्यपूर्ण डॉग शो, खिलार जनावरे, बैल, गाई या ठिकाणी पाहायला मिळाले.

इंदापूर तालुक्यातील शेतकरी डाळिंब, केळी, पेरू, द्राक्षे, ड्रॅगन फ्रुट आदी फळबागांत अग्रेसर आहे. येथील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे द्राक्षाचे वाण तयार केले आहेत. हे पाहता शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, पिकाला माफक पाणी देण्याची पद्धत, ऊसाचे उत्पादन वाढविणे, चांगल्या प्रकारची फुले, फळे कशी पिकवावीत याबाबतचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. आपल्याकडे शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, इतर राज्यातील, देशातील तंत्रज्ञान आणावे लागेल, अशी सूचनाही त्यांनी केली.

श्री. पवार पुढे म्हणाले, आपल्या कृषी प्रधान देशात कृषी विकासाला प्रचंड क्षमता आहे. कृषी क्षेत्रात शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला वाव देऊन अनेक संधीचा लाभ देता येऊ शकतो. शेतीतून मिळणारे उत्पादन खाद्यासोबतच देशाच्या उद्योग व्यवसाय प्रक्रियेत वापरले जाते. आता जगामध्ये जागतिक हवामान बदलासह शेतीसमोर अनेक आव्हाने असून त्यामुळे कृषी मालाचा पुरवठा कमी होऊ शकतो. निविष्ठा खर्चामुळे शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही. लांब आणि खंडित जमीन असल्यामुळे उत्पादकता कमी होते. यावर मात करून शेतकऱ्यांना पुढे जाणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकरिता आगामी अर्थसंकल्पात शक्य तितकी मदत करण्यात येईल. सरकार जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असताना गैरफायदाही घेण्याचा प्रकार होऊ नये, असेही श्री. पवार म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जनावरांचे प्रदर्शन, घोड्यांची शर्यत, डॉग शो पाहिला व यातील उत्कृष्ट ठरलेल्या जनावरांच्या मालकांना बक्षिसे वितरीत केली. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनाही बक्षीस वितरण केले.

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी ISO मानांकन प्रमाणित.

img 20250126 wa0020
चेतना फाउंडेशन इंदापूर संचलित चेतना इंटरनॅशनल स्कूल, सरडेवाडी यांना नुकतेच ISO – 9001: 2015 हे मानांकन जाहीर झाले त्याबद्दल चेतना फाउंडेशन इंदापूरचे अध्यक्ष उदय देशपांडे सचिव प्रा. विलास भोसले सर खजिनदार प्रा. सोमनाथ माने सर व सर्व संचालक मंडळ यांनी चेतना इंटरनॅशनल स्कूल मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांचे अभिनंदन केले. चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे म्हणाले की ISO मानांकन मिळण्यासाठी संस्थेने काटेकोरपणे नियमांचे पालन केले, सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तरी सदर ISO मानांकनाचे चे प्रमाणपत्र 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संस्थेचे खजिनदार प्रा. सोमनाथ माने सर यांच्याकडे नमोन्यूजनेशन चेे संंपादक, आत्मनिर्भर उद्योग समूहाचे अध्यक्ष:- रामवर्मा आसबे यांच्याकडून सुपूर्द करण्यात आले यावेळी चेतना कॉलेजचे प्राचार्य डॉ सुजित देसाई तसेच  स्कूल बस मालक चालक सतीश मिसाळ विठ्ठल गुरगुडे उपस्थित होते.

हे प्रमाणपत्र आत्मनिर्भर उद्योग समूह यांच्यामार्फत संस्थेला बक्षीस म्हणून देण्यात आले.

चेतना फाउंडेशन सरडेवाडी येथील शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

चेतना फाउंडेशन इंदापूर येथील शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न🇮🇳🇮🇳🇮🇳

चेतना फाउंडेशन इंदापूर संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, चेतना इंटरनॅशनल स्कूल, चेतना ज्युनिअर कॉलेज सरडेवाडी इंदापूर येथे 26 जानेवारी 2025 निमित्त भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. सुजित देसाई हे अध्यक्षस्थानी होते असेच कार्यक्रम साठी चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे सचिव प्रा.विलास भोसले सर खजिनदार प्रा. सोमनाथ माने सर,संचालिका सौ. निकिता माने मॅडम संस्थेमधील सर्व शाखांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावर्षीचे ध्वजारोहण व भारत मातेचे प्रतिमापूजन फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुजित देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणानंतर संस्थेच्या प्रांगणात विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यामध्ये कवायत प्रकार,लेझीम, देशभक्तीपर गीत मुलांची देशभक्तीपर भाषणे तसेच भारत हा देश विविधतेने नटलेला आहे तसेच लहान मुलांनी विविध वेशभूषा परिधान करून कार्यक्रमांमध्ये एक वेगळेपणाचे दर्शन घडवून आणले. यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सुजित देसाई यांनी सर्वांना 76 व्या प्रजासत्ताक दिनी मार्गदर्शन करताना म्हणाले 26 जानेवारी 1950 हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी ऐतिहासिक होता या दिवशी आपल्या देशाने संविधान लागू केली एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून अस्तित्व प्राप्त केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यासाठी एक मजबूत आणि लोकशाही प्रधान संविधान दिले ज्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला हक्क आणि स्वातंत्र्य मिळाले तसेच प्रजासत्ताक म्हणजे जनतेच्या हातात सत्ता असलेला देश भारतीय संविधान आपल्याला समानता स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे संरक्षण देतो. प्रत्येक नागरिकाला शिक्षण विचार स्वातंत्र्य आणि संधी मिळाव्यात यासाठी संविधानाने व्यवस्था केलेली आहे आज देश प्रगतीच्या मार्गावर आहे पण आपल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आपण सर्वांनी आपले संविधान स्वातंत्र्यसंग्रामातील बलिदान आणि लोकशाही मूल्ये जपण्याचा संकल्प केला पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवीन भारताचा संकल्प करताना युवकांनी विज्ञान-तंत्रज्ञान आणि उद्योजकता यामध्ये प्रगती करून भारताला जागतिक स्तरावर नेतृत्व प्रदान करावे देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी कटिबद्ध राहावे असे आव्हान केले. शेवटी सर्वांना प्रजासत्ताक दिनी संविधानाची शपथ देण्यात आली.

error: Content is protected !!