Home Blog Page 324

निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा- तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश*

*जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)*
दि. २८ मार्च, २०२१

*निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा- तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश*
——
*वाढत्या संसर्गामुळे आरोग्य सुविधा झपाट्याने कमी पडत असल्याबद्दल चिंता*
——
*टास्क फोर्सने व्यक्त केली मृत्यू वाढण्याची भीती*
—–
*मंत्रालय, शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदीचेही निर्देश*

मुंबई दि २८ : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या.

*बेड्स, व्हेंटीलेटर कमी पडताहेत- मृत्यूंची संख्या वाढू शकते*

या बैठकीच्या प्रारंभी आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटीलेटर, व ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत अशी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आणले.
ते म्हणाले की, सध्या ३ लाख ५७ हजार आयसोलेशन खाटापैकी १ लाख ७ हजार खाटा भरल्या आहेत आणि उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. ६० हजार ३४९ ऑक्सिजन खाटापैकी १२ हजार ७०१ खाटा , १९ हजार ९३० खाटापैकी ८ हजार ३४२ खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत. ९ हजार ३० व्हेंटीलेटर्सपैकी १ हजार ८८१ वर रुग्णांना ठेवण्यात आले आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर खाटा उपलब्धच होत नसून संसर्ग वाढीच्या प्रमाणात सुविधाची क्षमता कमी पडते आहे.

*वेळीच चाचणी न केल्याचे गंभीर परिणाम दिसताहेत*

गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी ३ लाख सक्रीय रुग्ण होते आणि ३१ हजार ३५१ मृत्यू झाले होते मात्र आता काल २७ मार्च रोजी ३ लाख ३ हजार ४७५ सक्रीय रुग्ण असून मृत्यूंची संख्या ५४ हजार ७३ झाल्याने चिंता वाढली आहे. विशेषत: संसर्ग वाढल्यास त्या प्रमाणात मृत्य वाढू शकतात आणि यामागे वेळेवर चाचणी न करून रुग्णालयांत भरती होण्यास उशीर करणे तसेच होम आयसोलेशनमध्ये असतानाही नियमांचे पालन न करणे ही कारणे असू शकतात असेही टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी निदर्शनास आणले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका दिवशी २४ हजार ६१९ रुग्ण आढळले होते. काल २७ मार्च रोजी एका दिवशी ३५ हजार ७२६ रुग्ण आढळले असून ही संख्या येत्या २४ तासांत ४० हजार झालेली असेल अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली.

*लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे- मुख्यमंत्री*

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.

*ऑक्सिजन पुरवठा, खाटांचे प्रमाण त्वरेने वाढवा*

गेल्या वर्षी आपण टप्प्याटप्प्याने सर्व आरोग्य सुविधा वाढवल्या, फिल्ड रुग्णालये उभारली पण आताच्या या संसर्गात या सुविधा कमी पडतील की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील तसेच ऑक्सिजन उत्पादन ८० टक्के वैद्यकीय व २० टक्के इतर कारणांसाठी राखीव ठेवावे, रुग्णालयांतील खाटांच्या बाबतीत ८०:२० प्रमाणे अंमलबजावणी होते किंवा नाही व रुग्णांची गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
ई आयसीयूचा मोठ्या प्रमाणावर सुलभतेने वापर होऊ शकतो त्यामुळे त्यादृष्टीने देखील आरोग्य विभागाने त्वरित पाउले उचलावीत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

*केवळ मुंबई, पुणे नाही तर उर्वरित ठिकाणीही सुविधा हवी*

लोकांना कोरोनापेक्षा देखील आपली चाचणी पॉझिटिव्ह आली तर कुठल्याही विलगीकरण केंद्रात नेऊन टाकले जाईल व आपल्याला तिथे सुविधा मिळणार नाही अशी भीती आहे, ती त्वरित काढणे गरजेचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहरातील किंवा परिसरातील सुविधा मिळावी अशी व्यवस्था करा, तसेच केवळ मुंबई-पुणे यावर लक्ष केंद्रित न करता राज्याच्या सर्व भागात विलगीकरण सुविधा तसेच आरोग्य सुविधा कमी पडणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

*ई आयसीयू वर भर – आरोग्यमंत्री*

यावेळी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ग्रामीण भागात रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्काचा शोधअधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली. विशेषत: छोट्या श्रांत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान असून ई आयसीयू वर भर देण्यासाठी पाउले उचलण्यात येतील असे सांगितले. महाराष्ट्रातील लसीकरण देशात चांगले असून ग्रामीण भागात उपलब्ध शीत साखळी वापरून उपकेंद्रांवर लसीकरण वाढवले तर अधिक वेग मिळेल असे सांगितले.
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिरा रुग्णालयांत पोहचत आहेत ही चिंतेची बाब आहे. अगदी १० ते १८ वयोगटात देखील मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसत असून पुढील काळात तरुणांमध्ये देखील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

*अर्थचक्र प्रभावित होणार नाही- मुख्य सचिव*

यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले की महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे तसेच गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाणही चांगले झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले असून ज्याठिकाणी संसर्ग वाढ जास्त आहे तिथे लसीकरणाचा वेग वाढवण्याची सुचना त्यांनी केल्याचे ते म्हणाले. लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास कोणताही गोंधळ उडू नये व समन्वय राहावा म्हणून योग्य त्या सुचना प्रशासनास देण्यात येत आहेत तसेच अर्थचक्रही प्रभावित होणार नाही त्याचे संतुलन ठेवण्यात येईल.

*बैठकीतील निर्णय*

• मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती ( एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल.
• ऑक्सिजनची महत्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा
• गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणकरण्यावर भर द्यावा
• मृत्यू पुढे जाऊन वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू , व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे
• प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी
• विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत
• सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे
०००

लॉकडाऊन केल्यास कोट्यवधींचं नुकसान, पुन्हा चूक करणार नाही तेलंगणा चे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

लॉकडाऊन केल्यास कोट्यवधींचं नुकसान, पुन्हा चूक करणार नाही तेलंगणा चे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव*

*हैदराबाद:-जगासह देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आटोक्यात आल्यासारखी वाटणारी कोरोना रुग्णसंख्या मार्च महिन्यापासून पुन्हा वाढू लागली. त्यामुळे चिंता वाढू लागली असून देशात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही राज्यांमध्ये विशेषत: महाराष्ट्रांमध्ये कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे या राज्यात लॉकडाऊन केले जाण्याची दाट शक्यता आहे. असे असताना तेलंगणा सरकारने राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करणार नसल्याचं स्पष्ट केलंय, त्यामुळे राज्यातील नागरिकांनी सुटकेशा निश्वास सोडला आहे. जगभर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी तेलंगणमध्ये पुन्हा लॉकडाउन जाहीर केले जाणार नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.*

*👉विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत त्यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट गंभीर बनू नये म्हणून सरकारने खासगी आणि सरकारी शैक्षणिक संस्था यापूर्वीच बंद ठेवल्या आहेत. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेशिवाय निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनामुळे सरकारचा एक लाख कोटी रुपयांचा महसूल व इतर उत्पन्न बुडाल्याची माहिती त्यांनी दिली. चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांनी आपली भेट घेऊन लॉकडाउनबाबत विचारणा केल्याचेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, निर्मात्यांनी चित्रपटांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. प्रदर्शनाचा निम्मा टप्पा पूर्ण झाला आहे. नव्याने लॉकडाउन लागू झाल्यास उत्पन्न आणखी घटण्यास ते कारणीभूत ठरेल अशी चिंता व्यक्त करण्यात आली.*

*👉चाचण्यांच्या माध्यमातून रुग्णालयांमधील सेवा सुधारण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. लसीकरणही सुरु आहे. केंद्राने सर्व राज्यांना गरजेनुसार समान प्रमाणात लशीचा पुरवठा केला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. नागरीकांना लस टोचून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन न करण्याचा निर्णय अनेकांना पटल्याचं दिसून येतोय.*

पोलीस आयुक्तालयातील संशयास्पद हालचालींचा तपास सुरू…..

पोलीस आयुक्तालयातील संशयास्पद हालचालींचा तपास सुरू…..

व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येपूर्वी मुंबई पोलीस आयुक्तालयात झालेल्या संशयास्पद हालचालींची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एन.आय.ए.) हाती लागली असून त्यांचा या गुन्ह्याशी संबंध आहे का ?,
हे पडताळण्यात येत आहे.
पश्चिाम उपनगरातील एका डान्सबारच्या मालकाची झालेली चौकशी याच पडताळणीचा भाग असल्याचे सांगण्यात आले.
मनसुख यांची ४ मार्चच्या रात्री हत्या झाली.
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला पोलीस शिपाई विनायक शिंदे हा २ आणि ३ मार्चला पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागात (सी.आय.यु.) आल्याचे आढळले.
उद्योगपती मुकेश अंबानी धमकी आणि मनसुख हत्या दोन्ही गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सचिन वाझे अटके पूर्वी ‘सी.आय.यु.’चे प्रमुख होते.
२ मार्चला ‘सी.आय.यु.’ कार्यालयात वाझे, शिंदे यांच्यासह राजकारणात कारकीर्द घडविण्यासाठी धडपडणारा माजी पोलीस अधिकारी उपस्थित होता.
काही तास सी.आय.युत. घालविल्यानंतर त्याने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेतली, अशी माहिती ‘एन.आय.ए.’ला मिळाली.
पश्चिाम उपगनरातील बार मालक ३ मार्चला आपल्या पांढऱ्या मर्सिडीज गाडीतून पोलीस आयुक्तालयात आला.
सुमारे चार तास तो सी.आय.यु. कार्यालयात होता.
तेव्हा तेथे वाझे, शिंदे यांच्यासह गुन्हे शाखेतील एक प्रभारी पोलीस निरीक्षकही उपस्थित होता.
निवृत्त पोलीस अधिकारी, बार मालक हे २ आणि ३ मार्चला पोलीस आयुक्तालयात का आले ?,
सी.आय.यु.त त्यांचा वावर कशासाठी होता ?,
आदी माहिती मिळवण्याचा प्रयत्ना सुरू असल्याचे एन.आय.ए.च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
त्या दृष्टीने या बार मालकाकडे चौकशी केल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

पंढरपूर पोटनिवडणूक:-* महाविकास आघाडीची दोस्तीत कुस्ती शिवसेना जिल्हा प्रमुखाची बंडखोरी

पंढरपूर पोटनिवडणूक:-*
महाविकास आघाडीची दोस्तीत कुस्ती शिवसेना जिल्हा प्रमुखाची बंडखोरी*

*पंढरपूर, २६ मार्च:- राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी येथे बंडाचे निशाण फडकावले असून आज बैलगाडीतून वाजत गाजत येत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.*

*👉शैला गोडसे या गेल्या विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारी मागत होत्या मात्र, गेल्यावेळीही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. आता पोटनिवडणुकी रणधुमाळी सुरू असतानाच त्यांनी बंड पुकारत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली आहे. शैला यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे पहिले पाऊल टाकले आहे. शैला गोडसे या सोलापूर जिल्हा परिषद सदस्य असून वाडीवस्त्यांपर्यंत त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. जनतेसाठी वारंवार आंदोलने करणाऱ्या शैला गोडसे या महिला वर्गात विशेष लोकप्रिय असून जनतेच्या रेट्यामुळेच आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.*

*दरम्यान, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे येथे निडणूक अटीतटीची होणार असल्याचे बोलले जात आहे. उमेदावारी अर्ज दाखल केल्यानंतर जनतेची उमेदवारी म्हणून मी अर्ज भरला असल्याचे गोडसे यांनी सांगितले. तसेच, बंडखोरी करुन अर्ज भरल्यामुळे शिवसेना पक्षाने कारवाई केली तरी आपण उमेदवारीवर ठाम असल्याचेही गोडसे म्हणाल्या. गोडसे यांच्या या भूमिकेमुळे आता पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे.*

*ब्रेकिंग-* *राष्ट्रपति रामनाथ कोविंद की बिगड़ी तबीयत, सीने में दर्द की शिकायत, आर्मी हॉस्पिटल में एडमिट।*

*ब्रेकिंग-*

*राष्ट्रपति रामनाथ कोविंद की बिगड़ी तबीयत, सीने में दर्द की शिकायत, आर्मी हॉस्पिटल में एडमिट।*

फिरत्या चित्ररथाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ

फिरत्या चित्ररथाचा जिल्हाधिकारी
डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ

नमोन्यूजनेशन संपादकिय:-,दि.25/03/2021 जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पुणे जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत तसेच जैवविविधता पूरक गाव संकल्पनेबाबत आणि कोरोना प्रतिबंधक जनजागृती बाबत एलईडी मोबाईल व्हॅन (फिरता चित्ररथ) द्वारे प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या मोबाईल व्हॅन द्वारे प्रसिद्धी कार्यक्रमाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते झाला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे, माहिती विभागाचे प्रभारी उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, माहिती अधिकारी वृषाली पाटील तसेच विलास कसबे, संजय गायकवाड, चंद्रकांत खंडागळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी भाजपच्या सौ.संजना सावंत यांची निवड*

नमोन्यूजनेशन
*👉👉सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी भाजपच्या सौ.संजना सावंत यांची निवड*

*👉👉सौ.संजना सावंत यांनी पुन्हा तिसर्यादां केली हॅट्रीक*

*👉👉भाजपच्या सौ.संजना सावंत यांना 30 मते तर शिवसेनेच्या सौ.वर्षा कुडाळकर यांना 19 मते पडली*

*👉👉शिवसेनेने ही निवडणूक अटीतटीची केली होती. मात्र आमदार नितेश राणे यांच्या राजकीय रणनिती मुळे अखेर भाजपच्या सौ.संजना सावंत यांची पुन्हा तिसर्यादां सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी निवडून आलेल्या आहेत.*

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी भाजपच्या सौ.संजना सावंत यांची निवड*

नमोन्यूजनेशन
*👉👉सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी भाजपच्या सौ.संजना सावंत यांची निवड*

*👉👉सौ.संजना सावंत यांनी पुन्हा तिसर्यादां केली हॅट्रीक*

*👉👉भाजपच्या सौ.संजना सावंत यांना 30 मते तर शिवसेनेच्या सौ.वर्षा कुडाळकर यांना 19 मते पडली*

*👉👉शिवसेनेने ही निवडणूक अटीतटीची केली होती. मात्र आमदार नितेश राणे यांच्या राजकीय रणनिती मुळे अखेर भाजपच्या सौ.संजना सावंत यांची पुन्हा तिसर्यादां सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी निवडून आलेल्या आहेत.*

सिंधुदुर्ग जिल्हा उपसरपंच संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदि आबा खवणेकर याची निवड

सिंधुदुर्ग जिल्हा उपसरपंच संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदि आबा खवणेकर याची निवड झाले बद्दल अभिनंदन

रामवर्मा आसबे

नमोन्यूजनेशन

सिंधुदुर्ग जिल्हा उपसरपंच संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदि आबा खवणेकर याची निवड

सिंधुदुर्ग जिल्हा उपसरपंच संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदि आबा खवणेकर याची निवड झाले बद्दल अभिनंदन

रामवर्मा आसबे

नमोन्यूजनेशन

error: Content is protected !!