पोलीस आयुक्तालयातील संशयास्पद हालचालींचा तपास सुरू…..
व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येपूर्वी मुंबई पोलीस आयुक्तालयात झालेल्या संशयास्पद हालचालींची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एन.आय.ए.) हाती लागली असून त्यांचा या गुन्ह्याशी संबंध आहे का ?,
हे पडताळण्यात येत आहे.
पश्चिाम उपनगरातील एका डान्सबारच्या मालकाची झालेली चौकशी याच पडताळणीचा भाग असल्याचे सांगण्यात आले.
मनसुख यांची ४ मार्चच्या रात्री हत्या झाली.
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला पोलीस शिपाई विनायक शिंदे हा २ आणि ३ मार्चला पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागात (सी.आय.यु.) आल्याचे आढळले.
उद्योगपती मुकेश अंबानी धमकी आणि मनसुख हत्या दोन्ही गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सचिन वाझे अटके पूर्वी ‘सी.आय.यु.’चे प्रमुख होते.
२ मार्चला ‘सी.आय.यु.’ कार्यालयात वाझे, शिंदे यांच्यासह राजकारणात कारकीर्द घडविण्यासाठी धडपडणारा माजी पोलीस अधिकारी उपस्थित होता.
काही तास सी.आय.युत. घालविल्यानंतर त्याने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेतली, अशी माहिती ‘एन.आय.ए.’ला मिळाली.
पश्चिाम उपगनरातील बार मालक ३ मार्चला आपल्या पांढऱ्या मर्सिडीज गाडीतून पोलीस आयुक्तालयात आला.
सुमारे चार तास तो सी.आय.यु. कार्यालयात होता.
तेव्हा तेथे वाझे, शिंदे यांच्यासह गुन्हे शाखेतील एक प्रभारी पोलीस निरीक्षकही उपस्थित होता.
निवृत्त पोलीस अधिकारी, बार मालक हे २ आणि ३ मार्चला पोलीस आयुक्तालयात का आले ?,
सी.आय.यु.त त्यांचा वावर कशासाठी होता ?,
आदी माहिती मिळवण्याचा प्रयत्ना सुरू असल्याचे एन.आय.ए.च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
त्या दृष्टीने या बार मालकाकडे चौकशी केल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.