Home Blog Page 316

पुणे जिल्हाअधिकारी डॉ राजेश देशमुख व  जिल्हा पोलीस अधीक्षक याच्या मार्गदर्शनाने इंदापूर पोलिसांनी केलि  कारवाई, ७२ सिलेंडर जप्त

लोणी औद्योगिक वसाहतीतील आॅक्सिजन सिलेंडरच्या बेकायदेशीर साठ्यावर जिल्हा अधिकारी डॉ राजेश देशमुख व  जिल्हा पोलीस अधीक्षक याच्या मार्गदर्शनाने इंदापूर पोलिसांनी केलि  कारवाई, ७२ सिलेंडर जप्त

एकीकडे कोरोनामुळे राज्यात प्रचंड ऑक्सिजन चा तुटवडा भासत असल्याने रेल्वे, विमानाने ऑक्सिजन मागविला जात आहे. असे असताना दुसरीकडे मात्र इंदापूर तालुक्यातील लोणी औद्योगिक वसाहतीतील कंपनी वाय एक्सिस स्ट्रॅक्चरल स्टील लिमिटेडमध्ये बेकायदेशीर रित्या साठवणूक करण्यात आलेल्या आॅक्सिजन सिलेंडरच्या साठ्यावर कारवाई करुन ७२ सिलेंडर जप्त करण्यात आले.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना इंदापूर तालुक्यातील लोणी औद्योगिक वसाहतीमधील वाय एक्सिस स्ट्रॅक्चरल स्टील लिमिटेड या कंपनीत साठा करुन ठेवल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधिक्षकांनी तात्काळ दखल घेत इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, बिट अंमलदार दिपक पालके, मोहंमद अली मड्डी, अमोल गारुडी, विनोद मोरे, विक्रम जमादार यांनी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वसाहतीत टाकलेल्या छाप्यात ५१ भरलेले व रिकामे २१ असे एकूण ७२ ऑक्सिजन सिलेंडर जप्त केले.

कंपनीतील स्टाॅकवरुन माहे एप्रिल २०२१ महिन्यात एकूण १७९ सिलेंडर ची आवक झाली असून त्यामध्ये एकूण १२५३ क्युबेक मिटर इतका ऑक्सिजन आणला गेला आहे. तो कोठून आणला याबाबत अधिक विचारपूस सुरु आहे.

सदर मिळून आलेल्या साठ्याबाबत प्रांताधिकारी व तहसिलदार यांना कळवले असून इंदापूर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.

हर_काम_देश_के_नाम

हर_काम_देश_के_नाम

PMO India

गेल्या आठवडाभरात…..

🟣 केंद्राने जर्मनी मधून 23 ऑक्सिजन टँकर विमानाने आणले

🟣 केंद्राने UAE मधून ऑक्सिजन टँकर विमानाने आणले

🟣 केंद्राने सिंगापूर मधून ऑक्सिजन टँकर विमानाने आणले

🟣 केंद्राने हाँग काँग सरकारच्या माध्यमातून 800 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध केल्या..

🟣 केंद्र आपल्या मित्र देशांकडून जवळपास एकूण 10000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे..

🟣 केंद्र ज्या राज्यात आवश्यकता आहे त्या प्रत्येक राज्यात ऑक्सिजन एक्स्प्रेस या स्पेशल रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजन टँकर पोहोचवत आहे

🟣 आजच केंद्र सरकारने लक्षद्विप सारख्या बेटावर 35 ऑक्सिजन सिलिंडर, रॅपिड अँटीजेन कीट,PPE किट्स, मास्क असे जे काही लागेल ते सर्व भारतीय नौसेनेच्या माध्यमातून पोहोचवले आहे..

🟣 लेह आणि लडाख सारख्या अतिदुर्गम भागात चिनुक हेलिकॉप्टर आणि 32 सीटर विमानातून कोविड नियंत्रणासाठी लागणारे सर्व सामान पोहोचवले जात आहे

🟣 केंद्र प्रत्येक राज्यात डेडिकेटेड मेडिकल ऑक्सिजन प्लँटची उभारणी युद्ध पातळीवर करत आहे

🟣 केंद्राने टाटा,अंबानी, अदानी, जिंदाल या सर्व उद्योगपतींसोबत त्यांच्या औद्योगिक प्लँट मधून आवश्यकता आहे तिथे ऑक्सिजन पोहोचविण्यासाठी समन्व्य साधला आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशातील सर्व ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांसोबत वैयक्तिक फॉलो अप घेत आहेत..

🟣 केंद्राने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 1000 पेक्षा जास्त ऑक्सिजन आणि ICU बेड उभारले आहेत

🟣 केंद्राने रिमेडिसिवीर उत्पादक कंपन्यांना योग्य ते निर्देश देऊन तसेच नवीन 25 उत्पादन फर्मला मान्यता देऊन आपले रिमेडिसिवीरचे उत्पादन 40 लाख व्हायल्स प्रती महिना ते 90 लाख व्हायल्स प्रती महिना करायला भाग पाडले आहे

🟣 संरक्षण खात्या अंतर्गत असणाऱ्या DRDO, AFMS (Armed Forces Medical Services) यांच्या द्वारे बेड, डॉक्टर उपलब्ध करून आपल्या परीने शक्य तेवढ सहकार्य करत आहेत.. परवाच केंद्रीय रक्षा मंत्रालयाने AFMS ला आपत्कालीन खर्चाला स्वतंत्रपणे मंजुरी दिलेली आहे.. AFMS चे स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट, पॅरामेडिकल डॉक्टर, नर्स हे दिल्लीतील छत्तरपुर भागातील सरदार वल्लभभाई कोविड सेंटर मध्ये परवाच दाखल झालेले आहेत..

🟣 औद्योगिक कंपन्याना त्यांच्या CSR फ़ंडातून आरोग्य सुविधा निर्माण करायला केंद्राने मोकळीक दिलेली आहे

🟣 केंद्रीय रेल्वेने आजपर्यंत आपल्या रेल्वे कोचचे रूपांतर कोविड केअर कोचेस मध्ये केलेले आहे.. आज दिनांक 25 एप्रिल 2021 रोजी असे 3916 कोविड केअर कोचेस तयार असून त्यात जवळपास 64,000 बेड उपलब्ध आहेत.. हे रेल्वे कोचेस विविध स्थानकावर तयार ठेवले असून आवश्यकते नुसार विना विलंब वापरात यावेत अशी सुसज्ज यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे

🟣 देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्यूटला 3000 कोटी रुपये तर भारत बायोटेकला 1500 कोटी रुपये मदत देणार आहे

🟣 केंद्राने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोविड लसीकरण खुलं करून दिलेलं आहे

🟣 केंद्राने पुढील 2 महिने देशातील जवळपास 80 कोटी लोकांना गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य देण्याची जबाबदारी घेतलेली आहे

ही सर्व कामे नरेंद्र मोदीजी यांच्या कणखर नेतृत्वाखाली पूर्ण बहुमताच्या केंद्र सरकार द्वारे फक्त गेल्या एका आठवड्यात केलेली आहेत..

एवढं सगळं सोडून ज्यांना मोदीजी आणि केंद्रावर आजरोजी फक्त टिकाच करायची आहे त्यांना खुशाल करुद्या.. मोदीजी त्यांच्या कडे कधी ढुंकूनही बघत नाहीत आणि हेच त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे..

आणि म्हणून मोदींना फक्त काम करत राहणे आणि ते सुद्धा *हर काम देश के नाम* एवढंच माहिती आहे कारण लोकांच काय लोक तर देवाला पण नाव ठेवतात.. आणि अशी लोक काम शून्य पण दात काढताना मात्र आपल्या आजूबाजूला नेहमी दिसतात…

‘वंदेमातरम’ जय हिंद जय भारत’

नमोन्यूजनेशन

रामवर्मा आसबे

अवघड झाले आहे जीवनाचे 

अवघड झाले आहे जीवनाचे
हे जर मानवाने एकमेकांशी सलगन्न राहिले असते.
तर ही वेळ दुष्मणावर पण आली नसती. आज लोकांकडून पुण्य कमी पाप जास्त झालेत. मग ते कोणत्याही स्वरूपाची असुद्या. आपण परमेश्वराची देण आहोत. त्यांनी एकच सांगितले आहे. येताना काही घेऊन येत नाही का जाताना काही घेऊन जात नाही 😔 आहे त्यातच समाधानी राहा . मी खूप काही दिले आहे तरी सुद्धा तुम्ही समाधानी नाही. मग परमेश्वराची लीला आ परपार आहे. एक व्हायरल विषाणू. जो दिसत नाही. तो एवढ्या जीवाला मारू शकतो तर. मग शेवटी त्याने पण हात जोडले. त्याने आज मंदिरे बंद आहेत. आपण देवाला नवस करतो तो आपल्या इच्छा पूर्ण करतो. मग हे पाप तुम्ही कशासाठी करता. हे फक्त निमित्त आहे. आज लोक एवढे मरत आहेत. हेच जर मानवाने आधीच जाणून घेतले असते तर एवढी वेळ आली नसती. म्हणून चांगले कर्म करा लालसा नको.आपल्या ला परमेश्वराने जीवन दिले हेच मोलाचे आहे. पण आपण हव्या पोटी सर्व विसरून गेलो. किती प्राण्याची बळी गेले, लोकांचे बळी गेले, आज ही झाडे सृष्टीने निर्माण केली म्हणजे परमेश्वराने. पृथ्वी कोणी तयार केली कोणी सांगेल का.
सायटीस्ट ने बनवली का पृथ्वी. त्याने शोध लावले.सूर्या पर्यन्त पोचला तिथे त्याने ओंकार स्वर ऐकला. परमेश्वर तुम्हला दर्शन देतो पण तुम्ही समजू शकत नाही. तुम्ही एखादी प्रार्थना करा तो तुमच्या आत्म्याला स्वीकार करतो. मग हे का मानवी जीव समजू शकले नाही कि आपले ह्या पृथ्वी तलावर काहीच नाही.
बास फक्त हत्या, लालसा,फसवणूक,मग कोणतेही प्रकारांचे असो.
ह्या जल्मी जर आपण मनुष्य म्हणून जगलो नाही सदैव लालसा पोटी जगत राहिलो तर परमेश्वर पण साथ देणे सोडून देईल.

आज प्राण्यांना परमेश्वराने हवी तेवढी मोकळीक दिली. त्यांनी कधी, लालसा नाही, हत्या, नाही खोटे पणा
मुके आहेत ते जीव पण परमेश्वराने त्यांना टच पण करून दिला नाही.निर धास्त बिधास्त फिरत आहेत. त्याने जाणवून दिले.अजून ही मानव जागा होऊ शकतो. चांगले कर्म करा चांगले फळ मिळेल. आयुष्य ही जे आज 50,60 मध्येच मानवी जीव जात आहेत. चांगले कर्म केले तर 60, काय 100 ते 150 वर्षे जगू शकाल. बिना औषध पाण्याचे. पूर्वी च्या लोकांचे आयुष्य काढून बगा किती वर्षे जगली बिना लालसा ची.त्यांना लालसा नव्हती.लालसा पोटी आत्ताच्या मानवी जिवाने खूप संपत्ती लालसा पोटी जमा केली. पण त्यांच्या आयुष्य जर बघितले तर 60,70,80 आतले दिसतील.100 कोणी क्रॉस दिसणार नाहीत.

सर्वांना एकच विनंती आहे. लालसा सोडा. 🙏🏻🙏🏻🙏🏻 मनुष्य म्हणून जागा. एकमेकांचे मन सांभाळा एकमेकांना मदत करा.
पटले तर शेअर करा.(copy paste)

👉मुंबईत ‘जम्बो कोविड’ सेंटरसाठी केंद्राकडून परवानगी

नमोन्यूजनेशन

👉मुंबईत ‘जम्बो कोविड’ सेंटरसाठी केंद्राकडून परवानगी”*

*👉राज्याती वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. रूग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिविर इंजकेश्नसह लस तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वेळोवेळी केंद्र शासनाकडे आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तर, केंद्र सरकारकडून देखील महाराष्ट्रासाठी शक्य त्या सर्वप्रकारे मदत केली जात असल्याचे दिसून येत आहे. आता महाराष्ट्र शासनाने केलेल्या विनंतीनुसार केंद्र सरकारकडून मुंबईत जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी देण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.*

*👉“महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अतिशय आभारी आहे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.*

*👉तसेच, “या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बीपीसीएलने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेड येथे उपलब्ध होऊन करोनाबाधितांवर उपचार होऊ शकतील.” असं फडणवीस म्हणाले आहेत.*

*👉याचबरोबर “बीपीसीएलचे संचालक अरुणसिंग यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी राज्य सरकारने कम्प्रेसरची व्यवस्था केल्यास ऑक्सिजन सिलेंडर्स भरून देण्याची सुद्धा तयारी दर्शविली आहे. यामुळे सुद्धा मोठा दिलासा महाराष्ट्राला मिळेल.” अशी देखील फडणवीस यांनी माहिती दिली आहे.*

कोविड तपासणी करण्या साठी येणाऱ्या तालुक्यातील जनतेसाठी नगरसेवक मा.अनिकेत वाघ यांनि सावलि साठि केले नियोजन

कोरोना वरति मात करायचे आसेल तर होमिओपॅथिक एक वरदान डॉक्टर :- संदेश शहा

कोरोना तसेच इतर विषाणूजन्य आजारावर होमिओपॅथी व हर्बल औषधे रामबाण : डॉ. संदेश शहा व डॉ. राधिका शहा, इंदापूर.
डॉ. संदेश शहा मो 9922419159
डॉ. राधिका शहा मो 7972544521
डॉ. संदेश शहा हर्बल वर्ल्ड, सुश्रुत हॉस्पिटल, दत्त मंदिर मागे, इंदापूर जि. पुणे.

कोरोना प्रतिबंध त्रिसूत्री भाग २ *योग,प्राणायाम आणि ध्यान (मेडीटेशन)*प्रा.धनंजय देशमुख

कोरोना प्रतिबंध त्रिसूत्री भाग २ *योग,प्राणायाम आणि ध्यान (मेडीटेशन)*
🚩🧘‍♀🚩🧘‍♂🚩🧘‍♀🚩

🕉 *ओम धन्वंतरैय् नम:*🕉.
*व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*
मार्गदर्शक *ह.भ.प.बंडातात्या कराडकर*
प्रेरणा
*राष्ट्रबंधू शहीद राजीव दिक्षित*
🤸🏻‍♂ 🧘‍♀ 🧘‍♂ 🤸🏻‍♂
*चळवळ आरोग्याची*

कोरोना प्रतिबंध त्रिसूत्री भाग २ *योग,प्राणायाम आणि ध्यान (मेडीटेशन)*

🤸🏻‍♂🧘‍♂🧘‍♀🤸🏻‍♂
जागतिक आरोग्य संघटना आणि हार्डवर्ड युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार ज्यांची शारीरिक रोगप्रतिकारशक्ती चांगली अशा लोकांना या आजाराचा प्रादुर्भाव होत नाही. कोरोना विषाणूच्या
या सद्यस्थितीमध्ये आपण स्थिर आणि शांत रहाणे गरजेचे आहे.या भयानक स्थितीचा मनाच्या स्थितीवर परिणाम होऊन आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होतो आपली शारीरिक आणि मानसिक रोगप्रतिकारशक्ती वाढवून दैनंदिन जीवनात आनंदी,उत्साही राहण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग चे *सद्गुरू श्री श्री रविशंकर गुरुजी* तसेच पतंजली योग समितीचे *परपूज्य स्वामी रामदेव बाबा* यांनी सांगितलेले खालील योग प्राणायाम शास्त्रोक्त पध्दतीने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कि ज्यामुळे आपला या आजारापासून नक्कीच बचाव होईल.
😡✔ *फुफ्फुसाची कार्यक्षमता तपासणे*
आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता जाणून घेण्यासाठीे डॉक्टर सांगतात की,जो व्यक्ती दीर्घ श्वास घेऊन फुफ्फुसात ३० सेकंद ते १ मिनिट रोखून धरतात ते कोरोनाग्रस्त नाहीत किंबहुना त्यांचे शरीर कोरोनाला प्रतिकार करू शकते.
कोरोनाग्रस्त असेल तो ५-१० सेकंदही श्वास रोखू शकणार नाहीत.
आपल्या फुफ्फुसाची श्वास रोखून धरण्याची क्षमता वाढवून कोरोना सारख्या आजारापासून वाचण्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे योग प्राणायाम.
*योगिक जॉगिंग*(सुक्ष्म व्यायाम/शारीरिक हालचाली)
*सुर्यनमस्कार*
हा सर्वांग व्यायामाचा प्रकार आहे.सर्व महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो.हृदय व फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते.पचनक्रिया सुधारते.मनाची एकाग्रता वाढते दररोज ६ किंवा १२ सुर्यनमस्कार नित्यनेमाने करावेत.
*मुद्रा प्राणायाम*- यामध्ये तर्जनीचे टोक अंगठ्याच्या तळाशी हळूवार दाब देऊन ठेवावे राहिलेली सर्व बोटे सरळ ठेवावीत. दिर्घ आणि खोल श्वास घ्यावा काही काळ रोखून अत्यंत सावकाश सोडावा.ही क्रिया ५मिनिटे करावी यामुळे फुफ्फुसाची श्वास रोखून धरण्याची क्षमता वाढते. श्वसनासंबंधीचे सर्व आजार बरे होतात.
*कपालभाती*
खरे तर हा प्राणायाम नव्हे शरीरशुध्दीकरण क्रिया आहे
यामध्ये मध्यमशक्तीपूर्वक पोटाला आतल्या बाजूला धक्का देवून श्वास बाहेर सोडावा .पोट परत पूर्वस्थितीमध्ये येऊ द्यावे म्हणजेच जाणीवपूर्वक श्वास न घेता आपोआप श्वास घेतला जातो
या प्राणायाममुळे शरीरातील कार्बनडाय ऑक्साईड वायू बाहेर पडतो त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा होऊन फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.
*भस्रिका प्राणायाम*
वज्रासनामध्ये किंवा सुखासनामध्ये आपल्या सोईनुसार बसून दोन्ही हातांच्या हलक्या मुठी बंद करून त्या खांद्याच्यासमोर धराव्यात. छातीमध्ये श्वास घेत हात वर उचलावेत त्याच वेळी मुठी खोलाव्यात. श्वास सोडताना हात खाली आणत पुन्हा मुठी बंद करत खांद्यासमोर पूर्व स्थितीत आणाव्यात. अशाप्रकारे २०-२०-२०
श्वासाचे ३ राऊंड करावेत. प्रत्येक राऊंड नंतर अर्धा मिनिटे हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने उघडलेले मांडीवर ठेवून विश्रांती घ्यावी.
शरीरातील अशुद्ध घटक व कार्बनडायऑक्साईड बाहेर टाकण्यास मदत होते. फुफ्फुसे अत्यंत बलवान करुन सर्दी, खोकला, दमा, श्वासासह संपूर्ण छातीच्या आजारावर भस्त्रिका ही अत्यंत उपयुक्त आहे.
*नाडीशोधन प्राणायाम*
यामध्ये डाव्या हाताची चिनमुद्रा/ज्ञानमुद्रा(अंगठा आणि तर्जनी यांची टोके जोडून गोल करणे आणि राहिलेली तीन बोटे सरळ) करून उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन ती बंद करून पुन्हा उजव्या नाकपुडीने सोडावा.पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने सोडावा. हा प्राणायाम करताना श्वास घेऊन सोडताना काही काळ श्वास रोखून धरला(कुंभक)तर फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढण्यासाठी फायदा होतो.
या प्राणायाममुळे शरीरातील सर्व नाड्यांचे शुध्दीकरण होऊन प्राणशक्ती शरीरातील प्रत्येक घटकांना पोहचवली जाते. श्वसनासंबंधीचे सर्व आजार बरे होतात. मानसिक संतुलन सुधारते.
*भ्रमरी प्राणायाम*
दोन्ही हाताच्या अंगठ्याने कानाचा तोंडावळा (त्रिकोणी भाग)बंद करून तर्जनी कपाळावर त्याचवेळी मध्यमा,अनामिक आणि करंगळी नासिकेच्या जवळ डोळ्याच्या खोबनीत हलकेसे ठेवावीत.ओठ बंद करून नाकाने दीर्घ श्वास घ्यावा आणि नाकानेच सावकाश श्वास सोडत नाद स्वरूपात भुंग्याप्रमाणे(भ्रमर) गुंजन करावे पुन्हा याचप्रमाणे ही क्रिया ५वेळा करावी.
या प्राणायाम मुळे मानसिक ताणतणाव, चंचलता दूर होऊन मनाची एकाग्रता वाढते. ह्रदयरोग आणि उच्चरक्तदाबा करीता अत्यंत उपयुक्त आहे.
*ओमकार*
श्वासावर लक्ष केंद्रित करून मन स्थिर ठेवून नाकाने दिर्घ श्वास घ्यावा आणि श्वास सोडत अ….ऊ….आणि म….काराचा उच्चार करावा ही क्रिया ५ वेळा करावी.
या प्राणायामुळे मनशांत आणि स्थिर होते.
*ध्यान(मेडीटेशन)*
दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करून वातावराणामध्ये निर्माण झालेल्या आनंदी लहरींची अनुभूती घेत काहीही न करता मंद श्वास आणि प्रश्वास यासोबत विनाप्रयास मनाची विश्रांती म्हणजेच ध्यान
नियमित सरावाने याचा कालावधी १०मिनिटापासून २०मिनिटापर्यंत करावा.
*अँक्युप्रेशर पॉईंट*
👉ब्लड सर्क्युलेशन साठी क्लॉपिंग थेरपी (२००टाळ्या वाजविणे )
👉फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नं३० (अनामिका आणि मध्यमाच्या मध्ये आडव्या रेषेच्या वरती)
👉 लसीकाग्रंथी साठी नं १६ (तळहातापासून चार बोटे खाली मनगटावर)
👉ह्रदयाची बळकटी साठी नं ३६(करंगळी आणि अनामिकेच्या मध्ये आडव्या रेषेच्या खाली)
👉सर्दी साठी नं३४(तर्जनी आणि मध्यमा ची मधील भाग/पेरा)
👉मुत्राशय नं १८(अंगठा आणि तर्जनी यामधून वरून खाली येणारी वक्राकार रेषा याचा शेवटचा भाग)
👉अंगठ्यापासून बाहेरील बाजूने मनगटापर्यंत येणारे पॉईंट नं १ते ७

पुढील भागात

*कोरोना प्रतिबंध त्रिसूत्री*- षट्कर्म(शुध्दीकरण क्रिया)

*जय गुरुदेव*
🤸🏻‍♂ 🧘‍♀ 🧘‍♂ 🤸🏻‍♂

*प्रा धनंजय शामराव देशमुख*
अकलूज(वडापुरी ता.इंदापूर)
📞९२६०७१०७१०
deshmukhvyasanmukti@gmail.com
🙏☝🌹🙏☝🌹🙏

कर्म आणि प्रारब्ध :- डॉक्टर आसबे ल.म

*कर्म आणि प्रारब्ध*
आपले कर्म जसे असेल, तसेच त्याचे फळ मिळाल्याशिवाय रहात नाही. प्रारब्ध, नशीब, प्राक्तन, संचित या सगळ्यांचा हिशोब आपण केलेल्या कर्मानुसार ठरत असतो.
प्रयत्नवादी माणसे यशस्वी होतात, त्याचे कारण त्यांच्या जीवनात येणाऱ्या यशाला, ते कर्तृत्व समजतात आणि येणाऱ्या अपशात ते स्वतःला जबाबदार धरतात ,स्वतःची चूक शोधून दुरूस्त करतात आणि त्याचे कारण ते प्रारब्ध किंवा कर्म समजतात.
*परीयेसी गव्हारा सादर l कर्मे निर्वंश झाले सगर l भिल्ले विंधिले शारंगधर l झाला पुरंदर पंचानन ll*
धर्मग्रंथातील या सर्वांना आपण केलेल्या कर्मानुसार फळ मिळालेले आहे. वर्तमान काळात गरजेचे काय आहे ? योग्य काय आहे ? नित्य काय आहे ?आणि सत्य काय आहे ? हे समजायला *विवेक* असावा लागतो. विवेक हा संत्संगतीने जागा होतो. भूतकाळात केलेली कर्मे माणसाला बदलता येत नाहीत. भविष्यकाळ आपल्या हातात नसतो, त्यामुळे ठरवलेल्या गोष्टी आपल्याला करता येतीलच असे नाही, परंतु वर्तमान काळात केलेली कोणतीच गोष्ट निष्फळ ठरत नाही.
*सत्कर्म केले, तर त्याचे फळ चांगले मिळते आणि दुष्कर्म केले, तर त्याचे फळ निश्चित वाईट मिळते.*
आज समाजात अनेक दुष्कर्मे करूनही काही माणसे श्रीमंत व प्रतिष्ठित झालेली दिसतात, त्याचे कारण वर्तमानातील त्यांचे कर्म जरी खराब असले तरी त्याचे दुष्फळ भविष्यात निश्चित मिळणार असते. वर्तमानात चालू असलेला भरभराटीचा काळ , हे त्याच्या पूर्व कर्माचे फळ असते, याच्यावर विश्वास ठेवावाच लागेल.
*कर्मे मन्मथ झालासे राख l कर्मे चंद्राशी घडलासी दोष l कर्मे भार वाहती कुर्मशेष l कर्मे खरमुख ब्रम्हा देखा ll*
आजच्या महामारीच्या भयानक परिस्थितीत आपल्याला या कर्माचा विचार करावाच लागतो. अनेक घरे आणि कुटुंबे उध्वस्त होत आहेत. अनेक प्रयत्न करूनही रोग थांबत नाही. मृत्यूची भीती टांगत्या तलवारी सारखी प्रत्येकाच्या डोक्यावर नाचत आहे. यातून मानसिक शांती मिळवायची असेल, तर कर्म आणि प्रारब्ध स्वीकारावेच लागेल.
*कर्मे वासुकी लंके दिवटा l कर्मे हनुमंता उदरी कासोटा l कर्मे शुकदेव गर्भी काष्टा l पातळावाटा बळी गेला ll*
कधी कधी आपले काही चुकत नाही, आपण सदाचारी आहोत, पवित्र आहोत, परोपकारी आहोत, धर्माचरणी आहोत, तरीही आपल्याला जीवनात दुःख का भोगावे लागते ? असा प्रश्न निश्चित पडतो. त्यासाठी रामायणात पहावे लागते.
*कर्मे दशरथ वियोगे मेला l कर्मे श्री राम वनवासाला गेला l कर्मे रावण क्षयो पावला l वियोग घडला सीतादेवी ll*
यात ही सगळी चांगले वागणारी माणसे होती, केवळ कर्मामुळे या वेदना त्यांना भोगाव्या लागल्या.
*कर्मे दुर्योधनादी रणी नासले l कर्मे पांडव महापंथी गेले l कर्मे सिंधूजळ शोषिले l नहुष झाला सर्फ देखा ll*
ज्या व्यक्तीने कर्माची आणि प्रारब्धाची शक्ती जाणली आणि मानली, त्या व्यक्तीची कर्माचे भोग भोगताना भक्कम मानसिक तयारी आपोआप होत असते. कर्म आणि प्रारब्ध चुकणार नाही याचे भोग भोगावेच लागतात.
*हे सर्व भोग शरीराला भोगावे लागतात, शरीराचा संबंध सोडला म्हणजेच विदेही अवस्थेत आपण पोहोचलो तर आपोआप आपण मुक्त आणि आत्मिक आवस्थेत येतो.*
ही अवस्था भक्ताची सत्चिदानंद अवस्था आहे. *या अवस्थेला भगवान परमात्म्याशी अद्वैत भाव निर्माण होतो. ज्यावेळी हा भाव निर्माण होतो त्यावेळी कर्माच्या आणि प्रारब्धाच्या भोगाची कोणतीच वेदना शरीराला त्रास देत नाही किंवा अशा आत्मस्थित असलेल्या व्यक्तीला शारीरिक वेदना होत नाहीत.* याला योग शास्त्रांमध्ये *प्रत्याहार* असे म्हणतात आणि परमार्थात *स्थितप्रज्ञ आवस्था* म्हणतात. याचा अर्थ *कर्म आणि प्रारब्ध यांचा भोग आणि त्याची वेदना जीवनातून संपवायची असेल, तर आत्मिक आवस्थेतच यावे लागेल आणि हे अध्यात्मशिवाय शक्य नाही.*
*कर्मा ते शंभू मानी आपण l किती भेशील कर्मभेण l बापरखुमादेवीवरु विठ्ठल शरण l केली कर्मे निवारी नारायण ll*
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.
मो.नं.9822292713.

error: Content is protected !!