Home Blog Page 315

राज्यात 15 मे पर्यंत संचारबंदी*

नमोन्यूजनेशन
राज्यात 15 मे पर्यंत संचारबंदी*
राज्यातला लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला,कडकडीत बंद होणार,निर्बंधांमध्ये वाढ*

*मुंबईः-राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मे पर्यंत संचारबंदी राहणार आहे. प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे.👉सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलीय. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असेल.*

*👉👉खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी*

*सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत. लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आलाय. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.*

*👉👉अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार,*

*यापूर्वी लग्न समारंभासाठी 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती 100 वर नेण्यात आली होती. आता मात्र अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकंच नव्हे, तर अवघ्या 2 तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावे लागणार आहेत. या नियमांचं पालन झालं नाही तर तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.*

*👉👉नियमावलीत नेमके नियम कोणते?*

*1. 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन*
*2. 15 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन*
*3. सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद*
*4. सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद*
*5. राज्यात जिल्हा बंदी लागू*
*6. अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद*
*7. सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी*
*8. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी*
*9. सार्वजनिक वाहतूक 50% क्षमतेनं चालणार*
*10. एसटी बस वाहतूक 50% क्षमतेनं सुरू राहणार*
*11. अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा*
*12. खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास 10 हजार दंड*
*13. सरकारी कार्यालयांमध्ये 15% उपस्थिती*
*14. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयं 15% हजेरीनं चालणार*
*15. लग्न समारंभासाठी 25 जणांना फक्त 2 तासांसाठी परवानगी*
*16. लग्नाचे नियम मोडल्यास 50 हजार दंड भरावा लागणार*
*17. बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार*
*18. होम क्वॉरंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक*
*19. कोरोना संक्रमीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार*
*20. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार*

संकटात आम्ही राजकारण नाहीतर कृती करतो..

*संकटात आम्ही राजकारण नाहीतर कृती करतो..
सत्तेवर असतानाही एका राज्यमंत्राच्या मुलाला जे जमलं नाही, ते राजवर्धन दादांनी करून दाखवलं. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांचे जवळचे नातेवाईक इंदापूर येथील एका रुग्णालय येथे कोविड रुग्ण म्हणून ॲडमिट आहेत. त्यांना रेमीडीसीवीर इंजेक्शनची गरज लागल्याने जिल्हाध्यक्ष यांचे नातू यांनी बुधवारी राज्यमंत्र्यांकडून रेमीडीसीवीर औषध उपलब्ध होईल म्हणून त्यांच्या मुलांशी संपर्क केला असता, त्यांनी इंजेक्शन मिळू शकत नाही असे उत्तर दिले … मग पेशंट ची बिकट अवस्था पाहून जयदीप यांनी राजवर्धन दादा यांना संपर्क केला व दादांना पेशंटची सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनतर दादांनी एका क्षणांचाही विलंब न लावता स्वतःची यंत्रणा कामाला लावून रेमीडीसीवीर इंजेक्शन मिळवून दिले. राजवर्धन दादांनी.. ना पक्ष पहिला ना जातधर्म पाहिला… या खऱ्या खुऱ्या नि:स्वार्थी समाजसेवेस सलाम !

इंदापूरचे कोविड सेंटर पेशंटच्या शोधात 

इंदापूरचे कोविड सेंटर पेशंटच्या शोधात

इंदापूर तालुक्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. तालुक्यातील नागरिकांना बेड मिळवण्याकरिता वणवण हिंडावे लागत आहे. तसेच बेड उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना जमिनीवर गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहे. तर काहींना ऑक्सिजन बेड अभावी मृत्यू ला सामोरे जावे लागत आहे. अशी भयंकर परिस्थिती तालुक्यात उद्भवली आहे.

वास्तविक पाहता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर येतील धावत्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी एका शैक्षणिक संस्थेमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, तरंगवाडी येथील शासकीय शाळेमध्ये १३० बेड चे कोविड केअर सेंटर उभारणार असल्याचे ठणकावून सांगितले होते. त्याचप्रमाणे इंदापूर कॉलेज या ठिकाणी ५० बेड चे कोविड सेंटर उभारणार असल्याचे सांगितले.

सद्य परिस्थिती पाहता इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयामध्ये सध्या ५० बेड चे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. परंतु मंत्री महोदय यांनी सांगितल्या प्रमाणे तरंगवाडी येथील १३० बेड च्या कोविड सेंटर च्या उभारणी साठी त्यांनी जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी व संबंधित सर्व अधिकाऱ्यांचा फौजफाटा घेऊन तेथील शाळेची प्रत्यक्षात पहाणी केली व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या घटनेला आता एक आठवडा उलटून गेला आहे.

मध्यंतरी प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी इंदापूर येथील विद्याप्रतिष्ठान संकुलामध्ये १०० बेड चे कोविड केअर सेंटर उभारले व ते ताब्यात घेतले आहे. हे सेंटर उभारणीवेळी या ठिकाणी राज्यमंत्री यांच्या पुत्राने येऊन मी किती काम करतो हे दाखवण्याकरिता तेथील कोविड सेंटर करिता आवश्यक असणाऱ्या गाद्या, उश्या, बेड उचलण्याचे काम केले.

प्रशासनाने घाई गडबडीमध्ये विद्याप्रतिष्ठान येथील कोविड केअर सेंटर मधील १०० बेड हे मधुचंद्राच्या रात्रीसाठी जसे सजवले जातात अगदी तसेच फक्त गाद्या आणि उश्या टाकून सजवलेले असल्याचे दृश्य आहे.

सध्या तालुक्यातील नागरिक हा बेड साठी तालुकाभर व तालुक्याच्या बाहेर, जिल्ह्याच्या ठिकाणी वणवण हिंडूनही त्याच्या पदरी निराशा मिळत आहे. तालुक्यामध्ये ऑक्सिजन बेड ची कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

वास्तविक पाहाता नागरिकांना आरोग्य अधिकारी, सेवक कर्मचारी, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर औषधे, गोळ्या, रेडमिसिव्हर इंजेक्शन इत्यादी आरोग्याच्या सोई-सुविधा असलेले कोविड सेंटर उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे, मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

या समस्येविषयी लोकप्रतिनिधींना प्रसार माध्यमांनी विचारल्यास लोकप्रतिनिधी हे बेड न मिळणे,ऑक्सिजन बेड न मिळणे, रेडमिसिव्हर न मिळणे ही समस्या फक्त इंदापुरातच नाही असे सांगतात व दिड-दीड लाख दिले तरीही कोणीही आरोग्य अधिकारी कामावर येत नसल्याचे उत्तरे देऊन मोकळे होत आहेत.

खुद्द राज्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या तरंगवाडी येथील १३० बेडच्या कोविड सेंटर विषयी अधिक माहिती घेतली असता त्या ठिकाणी फक्त मंत्री महोदय यांची पाहणी झाली आहे. कोविड सेंटर उभे करण्याविषयी आमच्याकडे कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याचे तेथील अधिकारी वर्गाकडून समजले.

सध्या एका ऑक्सिजन बेड साठी चौदा जणांची प्रतिक्षा पणाला लागत आहे.तेरा जणांना बेड मिळणे मुश्कील झाले आहे. तर दुसरीकडे गोडबोले मामा हे जनतेला फक्त गोड गोड बोलून आपली वेळ मारुन नेत असल्याची चर्चा सध्या तालुक्यातील नागरिक करीत आहेत.

👉ऑक्सिजनची चिंता मिटणार,👉पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला मोठा निर्णय*

👉ऑक्सिजनची चिंता मिटणार,👉पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला मोठा निर्णय*

*👉कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. ऑक्सिजन आणि बेड मिळत नसल्यामुळे रुग्णांची परवड होत आहे. ऑक्सिजन अभावी लोकांना प्राण गमावावा लागत आहे. या अडचणीच्या प्रसंगी पीएम मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM केअर फंडातून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कंटेनरला मंजूरी दिली आहे. बुधवारी झालेल्या उच्चस्थरिय बैठकीत नरेंद्र मोदी यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.*

*👉कोरोना काळात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचं व्यवस्थापन कसं करायला हवं, यावर चर्चा झाली. पोर्टेबल ऑक्सिजन कंटेनरच लवकरात लवकर खरेदी करुन गरज असलेल्या राज्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या.यापूर्वी पीएम केअर फंडातून 713 पीएसए प्रकल्पांना मंजूरी दिली होती. आता मोदी यांनी पीएम केअर फंडाअंतर्गत 500 नवीन ऑक्सिजन प्लांटलाही मंजूरी दिली आहे. 500 नवीन पीएसएला मंजूरी दिली आहे. यांवा डीआरडिओ आणि CSIR मार्फत स्वदेशी तंत्रानाद्वारे विकसीत केलं जाणार आहे.*

नमोन्यूजनेशन

रामवर्मा आसबे

लॉकडाउनमध्ये किमान १५ दिवसांची वाढ होण्याचा अंदाज👉आरोग्य मंत्री राजेश टोपे

लॉकडाउनमध्ये किमान १५ दिवसांची वाढ होण्याचा अंदाज👉आरोग्य मंत्री राजेश टोपे*

*मुंबई, २८ एप्रिल:-राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे 1 पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या 1 मे रोजी राज्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही.*

*👉आरोग्य मंत्री पुढे म्हणाले की, तरुणांना माझं नम्र आवाहन आहे की आपण सगळ्यांना मोफत लसीकरण करतो आहोत. पण आता समजुतदारीने काम घ्यावं लागणार आहे. नोंदणीसाठी कोविन अॅप वापरणं सक्तीचं आहे. त्यामुळे आधी नोंदणी करूनच नोंदणी केंद्रावर जाता येणार आहे. कुणीही थेट केंद्रावर जाऊन लसीची मागणी करू नये. केंद्र सरकारने नोंदणी बंधनकारक केली आहे”, असं यावेळी राजेश टोपे म्हणाले.*

*👉👉दरम्यान, सध्या आपण ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. त्यासंदर्भात देखील मंत्रमंडळात चर्चा झाली. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन वाढवावाच लागेल, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. मंत्रमंडळाने त्यासंदर्भात देखील चर्चा केली आहे. शेवटच्या दिवशी नक्की १५ दिवस वाढवायचे किंवा किती वाढवायचे यावर निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाउनमध्ये नक्कीच वाढ होणार आहे आणि ती किमान १५ दिवसांची होईल असा माझा अंदाज आहे”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.*

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मतमोजणीला येताना आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्याचा रिपोर्ट बंधनकारक

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!*
*👉👉मतमोजणीला येताना आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्याचा रिपोर्ट लागणार..*

*२ मे रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालासंदर्भात निव़डणूक आयोगाने अजून एक नवा आदेश काढला आहे. या आदेशानुसार आता मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा लसीकरण पूर्ण झाल्याचा रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.*

*👉निवडणूक आयोगाने यासंदर्भात एक विशेष आदेश काढला आहे. २ मे रोजी पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पाँडिचेरी या पाच राज्यांमध्ये मतमोजणी आणि विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या अनुषंगाने काढलेल्या आदेशात निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्रावर गर्दी करण्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर मतमोजणी केंद्र पूर्णपणे सॅनिटाईझ करण्याचेही आदेश दिले आहेत.त्याबरोबर मतमोजणी अधिकाऱ्यांची बैठकव्यवस्था अशी असावी की दोन अधिकाऱ्यांच्या मधे एक अधिकारी पीपीई कीट घातलेला असेल. त्याचबरोबर जिंकणाऱ्या उमेदवारास दोनपेक्षा जास्त व्यक्तींना सोबत आणायला परवानगी नाही.*

*👉यापूर्वी निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला असून २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारे विजयी जल्लोष करता येणार नाही.राजकीय पक्षांना मोठ्या प्रचारसभा आयोजित करण्याची परवानगी देऊन निवडणूक आयोगाने करोनाच्या दुसऱ्या लाटेला मार्ग मोकळा करून दिला. करोनाच्या दुसऱ्या लाटेला आयोगालाच जबाबदार धरलं पाहिजे,असं मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी नमूद केलं.*

*👉निवडणूक आयोग ही सर्वाधिक बेजबाबदार संस्था आहे, अशी टिप्पणी करत न्यायालयाने २ मे रोजीची मतमोजणी थांबवण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा मद्रास हायकोर्टाने आयोगाला दिला होता.*

राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण*

*– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा*

*राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सर्वानुमते निर्णय*

राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरु आहे. आजतागायत ४५ च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे.

*लस पुरवठ्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम घोषित करणार*

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.

*जास्तीत जास्त लस मिळविण्याचे प्रयत्न*

सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल.

*उत्तम नियोजन करावे*

18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे

*कोविन एपवर नोंदणी करा*

या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल एपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये
लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री म्हणतात

आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा एक कोटी चा आमदार विकास निधी बाणेर येथील कोविड रुग्णालयासाठी*

*आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा एक कोटी चा आमदार विकास निधी बाणेर येथील कोविड रुग्णालयासाठी*

*आवश्यकतेनुसार उर्वरित 3 कोटी निधीचा विनियोग ही कोरोना रुग्णांसाठी खर्च करणार* *आ.चंद्रकांतदादांचा निर्धार*

भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपये हे कोथरूड मतदारसंघातील बाणेर येथील रुग्णालयासाठी विविध उपकारणे खरेदी करण्यासाठी खर्च करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले असून कोविड रुग्णांच्या उपचारासाठी याचा लाभ होईल. या निधीसह उर्वरित 3 कोटी चा विकास निधी देखील आवश्यकतेनुसार कोविड संसर्गावरील विविध उपाययोजनासाठी खर्च करणार असल्याचे आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. नेहमीच्या विकासकामांना फाटा देऊन यावेळेसचा निधी हा पूर्णपणे आरोग्यावर खर्च करणार असल्याचेही चंद्रकांतदादा म्हणाले.चंद्रकांतदादा यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारने सर्व आमदारांना कोवीड साठी दिलेल्या निधीतून बाणेर येथील रुग्णालयात 10 व्हेंटिलेटर, 10 मॉनिटर व अनुषंगिक साहित्य,2 एक्स रे मशीन प्रिंटर व व्युहर सह ( रेडिओग्राफी तंत्रज्ञान ) इ.सी जी मशीन, पी ए व सिसिटीव्ही व अन्य रुग्णोपयोगी साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. ( सोबत यादी जोडली आहे )
मा. जिल्हाधिकारी यांनी खरेदी प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करावी अशी अपेक्षा ही आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

18 वर्षे वरील व्याक्तीनी लस घेण्यासाठी नोंदणी कशी करावी..*

*१८ वर्षे वरील व्याक्तीनी लस घेण्यासाठी नोंदणी कशी करावी..*

Age group 18 Yrs and above can be Regisred Online from Date 28/04/2021 for covid vaccine.
पहिल्या किंवा दुसरा covid vaccine डोस साठी Register करा👇
Login site is
*www.cowin.gov.in*
*Google वर जाऊन
cowin.gov.in टाईप करा.
*Register/ Sign in yourself
मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
* OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो तेथे टाका व क्लिक करा.
*Vaccine Registraction form भरा.क्लिक करा
* तुम्ही vaccine साठी registraction केल्या मेसेज मोबाईलवर येईल
* schedule appointment वर क्लिक करा. नंतर
*पिन कोड टाका (उदा.411039)
*Sessaton निवडा- सकाळचे किंवा दुपारचे.
*Vaccin center व Date निवडा.
*Appointment book करुन ती coform करा.
*Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
*त्यमुळे vaccination center वर vaccine देणे सोपे होईल.
टिप- तुम्ही Appointment बदलु शकता.
*आपला*
*१८ वर्षे वरील व्याक्तीनी लस घेण्यासाठी नोंदणी कशी करावी..*

Age group 18 Yrs and above can be Regisred Online from Date 28/04/2021 for covid vaccine.
पहिल्या किंवा दुसरा covid vaccine डोस साठी Register करा👇
Login site is
*www.cowin.gov.in*
*Google वर जाऊन
cowin.gov.in टाईप करा.
*Register/ Sign in yourself
मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
* OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो तेथे टाका व क्लिक करा.
*Vaccine Registraction form भरा.क्लिक करा
* तुम्ही vaccine साठी registraction केल्या मेसेज मोबाईलवर येईल
* schedule appointment वर क्लिक करा. नंतर
*पिन कोड टाका (उदा.411039)
*Sessaton निवडा- सकाळचे किंवा दुपारचे.
*Vaccin center व Date निवडा.
*Appointment book करुन ती coform करा.
*Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
*त्यमुळे vaccination center वर vaccine देणे सोपे .
टिप- तुम्ही Appointment बदलु शकता.

रामवर्मा आसबे

नमोन्यूजनेशन

error: Content is protected !!