Home Blog Page 314

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, आस्मानाच्या सुलतानीला, जवाब देती जीभा.. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक:- नमोन्यूजनेशन

रामवर्मा आसबे

आमचे मित्र श्री. रामदास शेठ लालगुडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मावळ तालुक्यातील सामाजिक क्षेत्रांतील एक गोड व्यक्तीमत्व…
आमचे मित्र श्री. रामदास शेठ
लालगुडे यांना उदंड आयुष्य लाभो व यांच्या हातून समाजकार्य घडो हीच प्रार्थना आपणास प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
शुभेछुक ‌:रामवर्मा आसबेे

नमोन्यूजनेशन

लोककलावंतांच्या मागण्या शासनदरबारी मांडून त्या सोडवण्यास प्रयत्न करणार : मा.श्री.महादेव मिसाळ.

लोककलावंतांच्या मागण्या शासनदरबारी मांडून त्या सोडवण्यास प्रयत्न करणार : महादेव मिसाळ.

कोविड १९ च्या महामारीमध्ये महाराष्ट्रातील लोककलावंत तसेच इतर कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याकरीता भारतीय दलित संसद महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व लोककलावंतांचा सर्वे करुन त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडून कलावंतांना न्याय देणार असल्याची माहिती भारतीय दलित संसदचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष महादेव मिसाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील लोककला जिवंत ठेवण्यासाठी कलावंतांनी आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी कलेची पिढ्यांनपिढ्यांची नाळ जोडून त्या लोककलेचे जतन आणि ‌संवर्धन करुन प्रसंगी उपासपोटी राहून आपली कला जोपासली आहे.

हे लोककलावंत तसेच इतर कलाकार हे गेली दोन वर्षे झाले हालाकीचे जीवन जगत आहेत याचे भान ठेवून भारतीय दलीत संसद या महाराष्ट्रव्यापी संघटनेच्या वतीने या कलाकारांचे दैनंदिन जीवन जगणे सुसह्य व्हावे. यासाठी न्यायमार्गाने कलाकारांच्या मागण्या शासनदरबारी मांडून त्या मागण्या मंजूर करुन कलाकारांना एक शाश्वत हमी देण्यासाठी संघटनेच्या वतीने एक निर्धार पाऊल उचलले असून कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी इंदापूर तालुक्याबरोबरच, पुणे जिल्ह्यांसह, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा, विदर्भ अशा अखंड महाराष्ट्रातून कलाकारांचा सर्वे करणार असल्याचे मिसाळ यांनी यावेळी सांगितले.

या सर्वे करीता कलाकारांनी आपले नाव, गाव, कलेचा प्रकार, कायमचा पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक यांची संपूर्ण माहिती तमाशाकलावंत कुमार साठे मो.नं.7798233278, सदाशिव मोरे मो.नं. 9763874040, संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय गायकवाड.मो.नं. 9130929229 यांच्याकडे द्यावीत असे मिसाळ यांनी म्हटले आहे.

====================================

कोरोना संकट गंभीर; पंतप्रधान मोदींनी बोलावली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक

कोरोना संकट गंभीर; पंतप्रधान मोदींनी बोलावली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक*

*👉देशातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रुग्णावाढीबरोबर मृतांचा आकडाही वेगाने वाढत असून, अनेक ठिकाणी स्मशानभूमीच्या बाहेर पार्थिवांच्या रांगा लागताना दिसत आहे. दररोज बेड, ऑक्सिजन आणि औषधांची ओरड होत असून, लस टंचाईने डोकं वर काढलं आहे. देशातील परिस्थितीवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारलं असून, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.*

*👉कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात अभुतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडून मदतीसाठीचे टाहो ऐकायला मिळत असून, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरअभावी दररोज अनेक रुग्णांचे प्राण जात आहे. देशातील परिस्थितीची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने करोनासंदर्भातील राष्ट्रीय धोरणाबद्दलही केंद्राकडे विचारणा केली होती. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३० एप्रिल) महत्त्वाची बैठक बोलावली आहे.*

*👉या बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांसह स्वतंत्र पदभार असलेले आणि राज्यमंत्रीही सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत विविध राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. रुग्णालयातील उपलब्ध बेड,ऑक्सिजनची स्थिती, लसीकरणाची प्रगती आणि औषधींचा साठा या मुद्द्यावर चर्चा केली जाणार असल्याचं वृत्त आहे.*

*👉दुसऱ्या लाटेमुळे कोरोना संसर्गाचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यात भर म्हणजे मृतांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे भीतीदायक दृश्य देशात निर्माण झालं आहे. रुग्णांसह नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहे. या विषयावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कान उघाडणी केली होती. केंद्राने राष्ट्रीय कृती कार्यक्रम तयार करण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले होते. त्यावर सरकारनंही १०२ पानी प्रतिज्ञा पत्र दाखल करत भूमिका मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह हे देशातील ऑक्सिजन पुरवठ्यावर नजर ठेवून असल्याचं केंद्राने म्हटलं होतं. त्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. बैठकीत करोना संसर्गाचं प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी तसेच लस टंचाई दूर करण्यात संदर्भात काही निर्णय घेतला जाणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.*

महाराष्ट्रातील जनतेस कळकळीची विनंती

नमोन्यूजनेशन

मी महाराष्ट्रातील तमाम जनतेस जाहिर आवाहन करतो की

आपण जगात आलेल्या कोरोणा महामारी मुळे नियमांचे पालन करावे व शासकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे आपले मित्र पोलिस बांधव असतील आपले मित्र डॉक्टर सिस्टर्स असतील असतील सफाई कर्मचारी असतील महानगरपालिका कर्मचारी असतील नगर पालिका कर्मचारी असतील नगरसेवक नगराध्यक्ष असतील महापौर असतील ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामपंचायत सरपंच असतील पोलीस पाटील असतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांना आपण सर्वांनी सहकार्य करावे ते आज आपल्यासाठी देवदूता प्रमाणे कार्य करत आहेत त्यांच्याशी कोणीही वाद घालू नये व नियमांचे पालन करावे ते आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी 24 तास कार्य करत आहेत प्रामाणिकपणे आतल्या तळमळीने निस्वार्थ बुद्धीने काम करत आहेत. ही राष्ट्र निर्माणाची तपस्या असुन ती खंडलेली नाही भंगलेली नाही.ती तपश्चर्या अशीच चालु राहील त्यासाठी आपण सर्वांनी कोविड पॉझिटिव्ह पेशंट ला धीर द्यावा. प्लाजमा ग्रुप तयार करा. प्रत्येक गावामध्ये वेळोवेळी पॉझिटिव्ह पेशंट च्या योग्य त्या याद्या मोबाईल नंबर सह तयार करून घ्या . तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असताना असताना आपण ब्लड डोनर उपलब्ध करून द्या व कोविड झालेल्या जनतेस मित्रास परिवारातील सदस्य यांना पॉझिटिव्ह एनर्जी द्या. पॉझिटिव्ह विचाराने आपण सर्वांनी कोविडला हरवण्यासाठी प्रयत्न करा व सर्वांनी लस घ्या. लस घेताना प्रत्येकाने शिस्तीत सोशल डिस्टंसिंग ठेवून आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा. कुठल्याही प्रकारचा वाद घालू नये.ते आपल्यासाठी देवदूत बनून 24 तास कार्यरत आहेत .पुन्हा एकदा विनंती करतो की कोरोना पॉझिटिव्ह असतील त्यांचे ब्लड ग्रुप सहित याद्या तयार करा.
प्रत्येकाने या कार्यास सहकार्य करा ही सर्वांना नम्र विनंती. तुम्हीही वाचा दुसऱ्यालाही वाचवा.आपल्या दैनंदिन जीवनासाठी लागणारा किराणा बाजार असेल इतर अत्यावश्यक गोष्टी असतील त्या योग्य प्रमाणात खरेदी करून घ्या .परत परत त्या गोष्टींसाठी बाहेर फिरू नका. व सहकार्य करा. आपणही देशाचे देणे लागतो. मी तुम्हा सर्वांना नम्र विनंती करतो की थोडेही सिम्टम्स दिसू लागल्या बरोबर त्वरित उपचार करून घ्या. घरात बसून अंगावर काढू नका. मी या कार्यात स्वतःला 24 तास वाहून दिले आहे. समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य करत आहे. आशा करतो की कोरोनाला हरवण्यास तुम्ही सहकार्य कराल🙏🙏🙏🙏🙏.
जय हिंद जय महाराष्ट्र 💪🇮🇳

मौजे *बाभुळगाव* मधील सर्व ग्रामस्थांना नम्र आवाहन

मौजे *बाभुळगाव* मधील सर्व ग्रामस्थांना नम्र आवाहन

मौजे *बाभुळगाव* मधील सर्व ग्रामस्थांना नम्र आवाहन  येते की सध्या देशा मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. वैधकिय साधनांचा व सेवा साधनांचा तुटवडा निर्माण झाला आहे.सर्व यंत्रणा हतबल झाली आहे प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. कोरोना बाबत फाजील आत्मविश्वास बाळगू नये.आपल्या गावामध्ये या दहा दिवसांमध्ये वाईकर,देवकर,भोसले, गुरगुडे या परिवार मधील व्यक्ती वैद्धकिय सुविधांच्या तुटवड्या मुळे जीव गमवावे लागले आहेत.तरी गावामधील सर्व ग्रामस्थांना नम्र आवाहन करण्यात येत की कोरोना बाबत घाबरु नका.व परंतु निष्काळजीपणे राहू नका व प्रशासनास सहकार्य करा.
आपले नम्र.
*ग्रामपंचायत बाभुळगाव*
ता.इंदापूर जी.पुणे
ग्रामसेवक, सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन घाबरुन थेट रुग्णालयांमध्ये जाऊन गर्दी करण्याची गरज नाही अनेक रुग्ण घरीच बरे होऊ शकतात.

घाबरुन थेट रुग्णालयांमध्ये जाऊन गर्दी करण्याची गरज नाही अनेक रुग्ण घरीच बरे होऊ शकतात👉केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन*

*नवी दिल्ली, २९ एप्रिल:-जगातील कित्येक देशांमध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, जगात गेल्या चोवीस तासांत 8 लाख 85 हजार 604 नवीन रुग्ण आढळले असून यामध्ये 15 हजार 284 लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील 17 देशांमध्ये भारतीय विषाणूचा स्ट्रेन आढळून आला असल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएचओने याला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ (VOI) घोषित केले असून B.1.617 या डबल म्यूटेंट व्हेरिएंटमुळेच भारतात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत असल्याचा दावा केला आहे.*

*👉तर भारताबाबत चिंताजनक वृत्त म्हणजे बुधवारी 3 लाख 79 हजार 164 नवीन रुग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या नवीन रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 27 एप्रिलला सर्वात जास्त 3.62 लाख रुग्ण समोर आले होते. या व्यतिरिक्त 24 तासांच्या आत 3,646 संक्रमितांचा मृत्यूही झाला आहे.हा सलग दुसरा दिवस होता जेव्हा तीन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मंगलवारी 3,286 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती.दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी लोकांनी घाबरुन जाण्याचं कारण नसल्याचं सांगत घरी बसूनही अनेकजण बरे झाल्याचं म्हटलं आहे. ऑक्सिजन पुरवठा केला जात असला तरी ऑक्सिनसंदर्भातील योग्य माहिती असणंही गरजेचं आहे असंही आरोग्यमंत्री म्हणाले आहेत. घाबरुन थेट रुग्णालयांमध्ये जाऊन गर्दी करण्याची गरज नाही. ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांना तो मिळालाच पाहिजे. मात्र पुरेशी माहिती नसल्याने एखाद्याने ऑक्सिजन मिळालाच पाहिजे असं म्हणणं किंवा वाटणं चुकीचं आहे, असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.तर“घाबरुन उगाच इकडे तिकडे पळापळ करु नका. बहुतांश रुग्ण हे डॉक्टरांच्या संपर्कात राहून घरीच बरे होऊ शकतात. मी हे केवळ आरोग्यमंत्री म्हणून नाही तर एक डॉक्टर म्हणून ही सांगत आहे,” असंही हर्ष वर्धन म्हणाले आहेत.*

*👉लसींच्या तुटवड्यासंदर्भातही हर्ष वर्धन यांनी भाष्य केलं असून राज्यांच्या कामगिरीप्रमाणे त्यांना लसी पुरवण्यात आल्याची माहिती दिली आहे. “लसीकरणामध्ये राज्यांनी केलेल्या कामगिरीच्या आधारे आम्ही लसींचा पुरवठा केलाय. आम्ही राज्यांना १६ कोटी लसींचे डोस दिलेत. त्यापैकी १५ कोटी लसी देण्यात आल्या आहेत,” असं आरोग्यमंत्री म्हणाले.*

राज्यात 15 मे पर्यंत संचारबंदी*

नमोन्यूजनेशन
राज्यात 15 मे पर्यंत संचारबंदी*
राज्यातला लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला,कडकडीत बंद होणार,निर्बंधांमध्ये वाढ*

*मुंबईः-राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मे पर्यंत संचारबंदी राहणार आहे. प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे.👉सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलीय. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असेल.*

*👉👉खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी*

*सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत. लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आलाय. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.*

*👉👉अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार,*

*यापूर्वी लग्न समारंभासाठी 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती 100 वर नेण्यात आली होती. आता मात्र अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकंच नव्हे, तर अवघ्या 2 तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावे लागणार आहेत. या नियमांचं पालन झालं नाही तर तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.*

*👉👉नियमावलीत नेमके नियम कोणते?*

*1. 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन*
*2. 15 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन*
*3. सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद*
*4. सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद*
*5. राज्यात जिल्हा बंदी लागू*
*6. अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद*
*7. सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी*
*8. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी*
*9. सार्वजनिक वाहतूक 50% क्षमतेनं चालणार*
*10. एसटी बस वाहतूक 50% क्षमतेनं सुरू राहणार*
*11. अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा*
*12. खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास 10 हजार दंड*
*13. सरकारी कार्यालयांमध्ये 15% उपस्थिती*
*14. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयं 15% हजेरीनं चालणार*
*15. लग्न समारंभासाठी 25 जणांना फक्त 2 तासांसाठी परवानगी*
*16. लग्नाचे नियम मोडल्यास 50 हजार दंड भरावा लागणार*
*17. बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार*
*18. होम क्वॉरंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक*
*19. कोरोना संक्रमीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार*
*20. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार*

error: Content is protected !!