प्रभु महावीर स्वामी जन्म कल्याण महोत्सव की आप सभी को बहुत-बहुत शुभकामनाएं सादर जय जिनेंद्र जय महावीर:💐🙏🙏👏👏🌹🌹
रामवर्मा आसबे
नमोन्यूजनेशन
*होम क्वारंटाईन कोवीड-१९ पेशंट ठरत आहेत सुपर स्प्रेडर..!*
प्रशासनाच्या नियमानुसार *होम क्वारंटाईन* केलेली *कोवीड-१९ पेशंट* हे *१४ ते १७ दिवस* सामान्य लोकांच्या संपर्कात नाही आली पाहिजे. परंतू *होम क्वारंटाईन* केलेले कोवीड-१९ पेशंट *५ ते ७ दिवसात* बाहेर पडुन *सुपर स्प्रेडर* ठरत आहेत. हे *सुपर स्प्रेडर* स्वतःच्या *परिवारासाठी* आणि *समाजासाठी* सुध्दा *घातक* होत चालले आहेत.
*कोवीड-१९ पाॅजीटिव्ह* पेशंट हा *१२ ते १४ दिवस सामान्य निरोगी व्यक्तीस संसर्ग* पसरवु शकतो. असे असून देखील बरेचसे कोवीड-१९ पेशंट हे,
▪️मला काही लक्षणं नाहीत
▪️मी आता बरा आहे
▪️मला काहीच त्रास नाही होत
▪️मला दम पण नाही लागत
▪️माझं सॅच्युरेशन (ऑक्सिजन पातळी) ही नाॅर्मल आहे
अशी कारणं सांगत *५ ते ७ दिवसात घराच्या बाहेर* पडुन प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावरबसवून *सुपरस्प्रेडर* बनत आहेत.
*प्रशासनाला, सरकारला दोष देत* बसण्यापेक्षा आपण *प्रशासनाला काय* *मदत करु शकतो* हा विचार करा. *सरकार, प्रशासन* त्याच्या पातळीवर पुर्ण पणे काम करतंय, आपण *सुजान नागरिक* म्हणून प्रशासनाच्या पुर्ण पणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे.
*होम क्वारंटाईन कोवीड-१९ पाॅजीटिव्ह* असलेल्या प्रत्येक *व्यक्तीने* आपली *सामाजिक जबाबदारी* व *प्रशासनाला मदत* म्हणुन खारीचा वाटा उचलत आपला *१४ ते १७* दिवसांचा *होम क्वारंटाईन* कालावधी *घरात राहुन पुर्ण* केला पाहीजे, जेणेकरून तुम्ही *सुपर स्प्रेडर* ठरणार नाही.
🙏🏼 *जनहितार्थ जारी*🙏🏼
नमोन्यूजनेशन
रामवर्मा आसबे
तुम्हाला माहिती आहे का कि आपला प्युरिफायर व्यवस्थित काम करत आहे…!
नाही…?
तर मग घरपोच सेवा साठी तुरंत खालील दिलेल्या नंबर वर कॉल करा
9960355463
8208610653
आमचे एक्स्पर्ट तुमच्या प्युरिफायर ची तपासणी करून त्याची गरज असेल तर सर्व्हिस करतील व प्युरिफायर पिण्यायोग्य शुद्ध पाणी साठी तयार करतील |
चेक-अप साठी आजच कॉल करा
*अथर्व, इलेक्ट्रिक & इलेक्ट्रॉनिक,*
*इंदापुर* .
Mo.9960355463 8208610653
तसेच आटा चक्कि( गिरन ), LED TV, एयर कूलर, फॅन, मिक्सर , गीजर इ वस्तु होलसेल किमतीत मिळतील.
*मास्क,सॅनिटायझर,आणि सुरक्षित अंतराचे पालन हाच प्रभावी उपाय*
रामनवमी चे औचित्य साधून बाभूळगाव येथे वृक्षारोपण.
इंदापूर : प्रतिनिधी
बाभूळगाव (ता.इंदापूर ) येथे वृक्षारोपण ही काळाची गरज लक्षात घेऊन प्रभू श्रीराम (रामनवमी) चे औचित्य साधून युवानेते प्रेमकुमार जगताप मित्र परिवाराच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
वाढत्या कोरोनामुळे रामनवमी उत्सव सर्वत्रच अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. तरी पण या सर्व रामभक्तांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपणाचा स्तुत्य असा उपक्रम घेऊन युवकांच्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे.
या उपक्रमासाठी युवा नेते प्रेमकुमार जगताप, वैभव देवकर, भरत आसबे, दीपक जमदाडे, अवधूत बाचल आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
*जिल्हाधिका-यांच्या नावाने सोशल मीडियामध्ये फिरणारा ‘तो’ संदेश खोटा*
*- प्रभारी उपसंचालक युवराज पाटील*
पुणे, दि. 22 : ‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने पुण्यासह पुणे विभागातील काही जिल्हयात व्हॉटसॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोडसाळ प्रवृत्तीचे लोक पसरवत आहेत. या संदशामध्ये दैनदिन जिवनावश्यक वस्तू हाताळणीसह वृत्तपत्रे बंद करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. अशी कोणतीही माहिती वा संदेश पुणे विभागातील जिल्ह्याकडून काढण्यात आला नाही. हा संदेश खोटा असून अशा बनावट मेसेजमधील आवाहनाला कोणीही बळी पडू नये असे आवाहन प्रभारी उपसंचालक युवराज पाटील यांनी केले आहे. अशा आपत्तीच्या काळात लोकांची दिशाभूल होईल असा कोणताही मजकूर जिल्हा माहिती कार्यालयाचे नाव टाकून खोडसाळपणे पसरविणाऱ्या संबंधितावर यापुढे कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.
शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाउनचा वापर करावा तर मायक्रो-कंटेंट झोनवर लक्ष केंद्रित करा👉राज्यांना केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनंती*
*👉👉मोदींच्या भाषणातील मुद्दे👉 वाचा काय म्हटलेय त्यांनी लॉकडाऊन व कोरोना परिस्थितीबाबत*
*नवी दिल्ली:-पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या भारतीयांशी संवाद साधत आहेत. या लाईव व्हिडिओ संवादातून ते देशातील कोरोना संकट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीवर आपले विचार व्यक्त करीत आहेत.*
*💫💫पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे असे ::-*
*👉👉देश पुन्हा कोरोनाविरूद्ध एक फार मोठी लढाई लढत आहे. काही आठवड्यांपूर्वी परिस्थिती स्थिर झाली होती. मात्र, नंतर कोरोनाची दुसरी लाट आली. मला माहित आहे की आपण कोणत्या वेदना सहन करीत आहात.*
*👉👉ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्याबाबत सर्व देशवासियांच्यावतीने मी शोक व्यक्त करतो. कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी तुमच्या दु: खामध्ये सामील आहे. आव्हान मोठे आहे परंतु आपण आपल्या निर्धाराने, धैर्याने आणि तयारीने यावर मात केली पाहिजे.*
*👉👉कोरोना संकटात देशाच्या बर्याच भागात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. या विषयावर वेगवान आणि संपूर्ण संवेदनशीलतेसह काम केले जात आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारे, खाजगी क्षेत्रातील सर्वजण प्रत्येक गरजूंना ऑक्सिजन मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहेत.*
*👉👉ऑक्सिजन उत्पादन आणि पुरवठा वाढविण्यासाठी अनेक स्तरांवर उपाययोजनाही केल्या जात आहेत. राज्यात नवीन ऑक्सिजन प्लांट्स असावेत, एक लाख नवीन सिलिंडर वितरित करावेत, औद्योगिक युनिटमध्ये वापरलेला ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वापरावा, ऑक्सिजन रेल्वे यासह सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.*
*👉👉आपल्या शास्त्रज्ञांनी दिवस आणि रात्र अतिशय कमी वेळात देशवासीयांसाठी लसी तयार केल्या आहेत. आज जगात सर्वात स्वस्त लस भारतात आहे. आमच्याकडे भारताच्या कोल्ड चेन सिस्टम याचा एक आधार आहेत.*
*👉👉भारताने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली. ज्यामध्ये दोन मेड इन इंडिया लसी तयार केल्या गेल्या. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याच्या वेगाने, ही लस जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत जास्तीत जास्त भागात पोचविली जावी यावर जोर देण्यात आला.*
*👉👉आपल्या सर्वांचा प्रयत्न केवळ जीव वाचवण्यासाठी नाही तर आर्थिक परिस्थिती आणि जीवनावर कमीतकमी परिणाम याकडेही लक्ष द्यावे लागेल. 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण केल्याने कामगारांना ही लस जलद गतीने उपलब्ध होईल.*
*👉👉माझी विनंती आहे की, राज्य प्रशासनावर कामगारांनी विश्वास कायम ठेवावा. आपण जिथे आहात तिथेच रहावे. पुढील काही दिवसांमध्ये लसीकरण केले जाईल आणि त्यांचे काम थांबणार नाही.*
*👉👉तरुणांना विनंती आहे की त्यांनी समाजात, अपार्टमेंटमध्ये लहान समित्या बनवून कोविडबाबत शिस्त लावण्यास मदत करावी. जर आपण हे केले तर सरकारांना कंटेनमेंट झोन तयार करण्याची आवश्यकता नाही, ना कर्फ्यू किंवा लॉकडाउनची गरज पडेल.*
*👉👉आजच्या परिस्थितीत आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचे आहे. शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाउनचा वापर करावा अशी मी राज्यांना विनंती करतो. लॉकडाउन टाळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. आणि मायक्रो-कंटेंट झोनवर लक्ष केंद्रित करा.*
*👉एकूणच लॉकडाऊन लागू न करता देशाची आर्थिक गती कायम ठेऊन कोरोना परिस्थितीवर मात करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदींना वाटत आहे.त्यांनी याबाबत स्पष्ट भाष्य केलेले आहे. मात्र, परिस्थिती बिकट झाल्यावर मग अशावेळी राज्यांनी निर्णय घेण्याचेही सुतोवाच मोदींनी केले आहेत*