Home Blog Page 305

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार* मा.मंत्री बाळा भेगडे

*मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार* -बाळा भेगडे

भाजपाचे मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांची माहिती

मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्ली असल्याने आता आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यामध्ये भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल, अशी ग्वाही भाजपचे मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी सोमवारी एका निवेदनाद्वारे दिली.

आरक्षण हा राज्यातील मराठा समाजाच्या विकासाचा व समाजातील तरुणांच्या भवितव्याचा मुद्दा असतानाही महाविकास आघाडी सरकारने कायदेशीर लढाईत कुचराई केल्याचा आरोप मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी केला. फडणवीस सरकारने या मुद्द्यावर घटनात्मक कार्यवाही करून दिलेल्या आरक्षणाचादेखील आघाडी सरकारने मुडदा पाडला. त्यामुळे यापुढे आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या नावाने व नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजपा पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात होणाऱ्या आंदोलनांमध्ये भाजपचे कार्यकर्ते सहभागी होतील. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा भाजपचा निर्धार आहे, असेही श्री.मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकताच नसल्याने आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, हे सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र वाचल्यावर उघड होते. ठाकरे सरकारने ही फसवणूक थांबवावी व समाजास न्याय मिळावा यासाठी सरकारला जागे करणे गरजेचे आहे. त्यासाठी होणाऱ्या प्रत्येक राज्यव्यापी आंदोलनांत भाजपचा सक्रीय सहभाग राहील, असे ते म्हणाले. राज्यातील मागासवर्गीय आयोगाची मुदत संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यातही महाविकास आघाडी सरकार चालढकल करत असून त्यावरूनच आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची नकारात्मक मानसिकता स्पष्ट होत आहे, असा आरोपही श्री.मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी या पत्रकाद्वारे केला आहे. वेळकाढूपणा करून मराठा समाजाचा प्रक्षोभ शांत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

म्युकोरमायकोसिस( ब्लैक फंगस) म्हणजे काय?* *काळजी व उपचार*

“म्युकोरमायकोसिस( ब्लैक फंगस) म्हणजे काय?*
*काळजी व उपचार*

म्युकोर मायकोसिस
हा बुरशीजन्य रोग [ ब्लैक फंगस ] आहे.
हा रोग ‘म्युकोरेल्स’ या फंगस मुळे होतो.

कोविड च्या उपचारा नंतर काही रुग्णांना हा रोग दिसुन येत आहे. कोविड मुळे व मधुमेह किंवा इतर सहव्याधींमुळे, तसेच उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉइड मुळे ही रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते या संधीचा फायदा बुरशी [फंगस] घेते व
या रोगाला ला सुरुवात हाेते.

नाकाच्या मार्गे हि बुरशी नाकामागच्या सायनस मध्ये,
तोंडामध्ये विशेषत वरच्या जबड्यात व दातात,
डोळ्यापासून ते मेंदूपर्यंत पोहचते.

या बुरशीचा *पसराव अति वेगाने* असून
उपचारासाठी खुपच कमी वेळ मिळतो.

लवकर निदान झाले तर
औषोधोपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो पण उशीर झाला तर
शस्त्रक्रिया पण करण्याची वेळ येते.

*रिस्क फॅक्टर्स*-
कोरोना सोबत खालील रोग असल्यास
म्युकोर मायकोसिस ची लागण लवकर होते……
1. मधुमेह/डायबिटीज
2. HIV / AIDS .
3. जास्त वेळ व मात्रा मधे स्टेरॉइड्स चा वापर.
4. ब्लड प्रेशर
5. विविध कँसर
6. लिव्हर सिरोसिस
7. अति लट्ठपणा

*निदान करण्यासाठी लक्षणे*

*तोंड व दांत*
चेहर्‍यावर सज येणे,
तोंडातून दुर्गंधी येणे,
तोंडातून पु येणे,
हिरड्यांवर फोड़ किवा सूज येणे,
अचानक दात हालणे व पडणे,
दातांची जखम न भरणे.

*नाक*
सर्दी असणे
नाक बंद असणे
साइनस च्या जागेत दुखणे
नाकातुन रक्त येणे
नाक दुखणे

*डोळे*
डोळे दुखणे व सुजणे
डोळ्यांनी कमी दिसणे/ न दिसणे

*मेंदू*
डोके दुखणे
मेंदूच्या नसांचा त्रास होणे

*निदान कसे करणार*

1. *बायोप्सी (Biopsy)*
बुरशी च्या जागेतुन तुकड़ा काढून टेस्टिंग करणे.

2.नाकातुन स्वॅब घेऊन तपासणी /fungal culture

3. *रेडियोलॉजिकल*
#CT Scan or MRI PNS & orbit or brain

*वरील लक्षणे आढळ्यास*
*खालील डॉक्टरांचा सल्ला घेणे व*
*वेळेवर ताबड़तोब उपचार करून घेणे.*

1. दंतरोग तज्ञ
2. नाक, कान, घसा तज्ञ
3. नेत्र रोग तज्ञ
4. मेंदु रोग तज्ञ
5. फिजिशियन

*उपचार कसा करावा*
म्युकोर मायकोसिस चे निदान झाल्यानंतर खालीलप्रमाणे उपचार करावे

1. मधुमेह (systemic problems or predisposing factors) व इतर रोगांचा उपचार करून नियंत्रण करावे

2 *शस्त्रक्रिया*
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताबड़तोब आवश्यकतेनुसार आपरेशन करून
खराब झालेले हाड़ व शरीराचा इतर भाग काढून घेणे.

3. *औषधोपचार*

#इंजेक्शन –
अँफोटेरीसिन बी
Amphotericin B
Plain /Lyposomal

#Tablet
इसावुकोनाझोल (Isavuconazole)
or
पोसैकोनझोल (Posaconazole)

*कोरोनाच्या संकटातुन बरे झाल्या नंतर म्युकोर मायकोसिस न हाेवो यासाठी घ्यावयाची काळजी*
1. शरीरातील साखरेची पातळी नियंत्रीत ठेवा.
2. स्टेरॉइड चा गरजे पेक्षा जास्त वापर नको.
3.अॅक्सिजन थेरपी साठी स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा वापर ह्युमिडीफायरसाठी करा.
4. रुग्णांनी नाक, डोळे, तोंडाची व शरीराची योग्य ती स्वच्छता ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
5. कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.
उपचारासाठी –
*राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात म्युकर मायकॉसिस वर मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्याच बरोबर महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत च्या रूग्णालयात ही हे उपचार मोफत होतील.*
*लवकर निदान होणे अत्यंत गरजेचे आहे*
*भिती नको काळजी हवी*

देश में कोरोना से लड़ने को मिला एक और हथियार, आज से मरीजों को मिलेगी DRDO की 2-डीजी दवा*

*देश में कोरोना से लड़ने को मिला एक और हथियार, आज से मरीजों को मिलेगी DRDO की 2-डीजी दवा*

नमोन्यूजनेशन:-

💊💊💊💊💊💊💊💊💊💊

*कोरोना संक्रमण के शिकार मरीजों के लिए राहत भरी खबर है। डीआरडीओ की एंटी कोविड दवा 2-डीजी आज से मरीजों को मिलनी शुरू हो जाएगी। रक्षा मंत्री राजनाथ सिंह सोमवार सुबह एंटी कोविड दवा के पहले बैच को जारी करेंगे। इसके बाद दिल्ली में इस दवा की दस हजार खुराक उपलब्ध हो जाएगी। कोरोना के खिलाफ लड़ाई में यह दवा मील का पत्थर साबित हो सकती है।*

*दवा को भारत के औषधि महानियंत्रक (डीसीजीआई) ने आठ मई को इमरजेंसी इस्तेमाल के लिए मंजूरी दे दी थी।* *डीआरडीओ की लैब इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन एंड एलाइड साइंसेज द्वारा एंटी-कोविड दवा* *2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज को हैदराबाद स्थित डॉक्टर रेड्डी लैब के साथ मिलकर तैयार किया गया है।*

*दावा लेने के बाद मरीज की ऑक्सीजन पर निर्भरता कम होगी!!*
*पानी में घोलकर पीने वाली दवा एक सैशे में पाउडर के रूप में मिलेगी। इसे पानी में घोलकर कोरोना मरीजों को दिया जा सकता है। डीआरडीओ का दावा है कि ग्लूकोज़ पर आधारित इस 2-डीजी दवा के सेवन से कोरोना मरीजों को ऑक्सजीन पर ज्यादा निर्भर नहीं होना पड़ेगा। साथ ही वे जल्दी ठीक हो सकेंगे।*

*ऐसे काम करती है!!*
*2-डीजी दवा वायरस से प्रभावित सेल्स में जाकर जम जाती है और वायरस सिंथेसिस व एनर्जी प्रोडक्शन को रोककर वायरस को बढ़ने से रोकती है। डीआरडीओ ने बताया कि परीक्षण के दौरान जिन कोरोना मरीजों को ये दवाई दी गई थी, उनकी* *आरटीपीसीआर रिपोर्ट जल्द निगेटिव आई है। पिछले साल अप्रैल से इस दवा पर काम चल रहा था।*

*ढाई दिन पहले सही हो रहे थे मरीज*
*परीक्षण में पाया गया कि कोरोना मरीज 2-डीजी दवा लेने से ढाई दिन पहले ही सही हो रहे थे यानी कि मानक इलाज प्रक्रिया (एसओसी) के मुकाबले 2-डीजी से किए इलाज का अधिक असर दिखा। डीआरडीओ ने बताया है कि इसे बेहद आसानी से उत्पादित किया जा सकता है। इसलिए पूरे देश में यह दवा जल्द ही आसानी से उपलब्ध हो जाएगी। क्योंकि इसमें बेहद जेनेरिक मॉलिक्यूल हैं और ग्लूकोस जैसा ही है।*

💢💢♨️💢💢♨️💢💢♨️💢

सहवास कुणाचा हे महत्त्वाचं!!

*सहवास कुणाचा हे महत्त्वाचं!!*

*दहा मिनिटे बायको समोर बसा, आयुष्य किती अवघड व कष्टपूर्ण आहे हे कळेल.

*दहा मिनिटे बेवड्या समोर बसा, तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे हे समजेल.

*दहा मिनिटे साधुसंन्याशा सामोर बसा, आपल्या जवळील सर्व काही दान करून टाकावे असे वाटेल.

*दहा मिनिटे राजकारणी पुढाऱ्या समोर बसा,
आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे कळून येईल.

*दहा मिनिटे विमा एजंट समोर बसा,
जगण्या पेक्षा मेलेले केव्हाही बरे असे वाटेल.

*दहा मिनिटे व्यापाऱ्या समोर बसा,
तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे असे वाटेल.

*दहा मिनिटे शास्त्रज्ञा समोर बसा,
स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे हे समजेल.

*दहा मिनिटे चांगल्या शिक्षका समोर बसा,
पुन्हा विद्यार्थी व्हावे अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल.

*दहा मिनिटे शेतकरी/कामगार यांच्या समोर बसा,
त्यांच्या काबाडकष्टा समोर तुम्ही खूप हार्ड वर्क करता असा स्वतःबद्दलचा गैरसमज दूर होईल.

*दहा मिनिटे सैनिका समोर बसा,
तुम्ही करत असलेली सेवा, समर्पण, त्याग आणि त्यांची व्याख्या किती तोकडी आहे याचा साक्षात्कार होईल.

*दहा मिनिटे मित्र मैत्रिणी समोर बसा;
स्वर्ग, स्वर्ग ज्याला म्हणतात तो हाच असे तुम्हाला वाटेल.

*सहवास कुणाचा हे महत्त्वाचं!!*
*रामकृष्णहरी…..!*

सोलापुरात भाजप च्या खासदार,आमदारावर गुन्हे दाखल

सोलापुरात भाजप च्या खासदार,आमदारावर गुन्हे दाखल

सोलापूर जिल्ह्यावर रेमडेसिविर व लसीच्या वितरणामध्ये होत असलेल्या अन्याया विरुद्ध व ते पुरेशा प्रमाणात मिळण्याकरिता आंदोलन केले प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार व आठ आमदारांसह इतर कार्यकर्त्यावर सोलापूर शहरातील सदर बाझार पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या मध्ये सोलापूरचे खासदार डॉ जयसिधेश्र्वर महस्वमी, माढा लोकसभा खासदार रणजित निंबाळकर नाईक,बार्शी चे आमदार राजेंद्र राऊत,सोलापूर चे आमदार सुभाष देशमुख, विजयसिंह देशमुख,विधान परिषद चे आमदार प्रशांत परिचारक, रणितसिंह मोहिते पाटील, अक्कलकोट चे आमदार सचिन कलशेट्टी, माळशिरस चे आमदार राम सातपुते,पंढरपूर मंगळवेढा चे आमदार समाधान अवताडे या लोकप्रतिनधीं चा समवेश आहे.

यांच्या विरुध्द भादवि कलम 143,188,269,366 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51(बी)आणि भारतीय साथ रोग अधिनियम 1897चेकलम3सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135प्रमाणे या लोकप्रिनिधींनीवर गुन्हे दाखल केले आहेत.

फक्त सल्ले नकोत साथ द्या

एकदा एक पक्षी चोचीने समुद्रातील पाणी बाहेर काढत होता.
दुसऱ्या पक्षाने विचारलं – भाऊ तू हे काय करतो आहेस ?
पहिला पक्षी बोलला- या समुद्राने माझी पिल्लं बुडवलीत. आता तर मी या समुद्राला सुकवूनच टाकतो.‌

हे ऐकून दुसरा पक्षी बोलला- अरे भावड्या तुझ्याकडनं कसा काय सुकेल समुद्र ? तू एवढासा जीव अन् समुद्र एवढा विशाल. तुझं तर संपूर्ण आयुष्य अपूरे पडेल यासाठी.

तर पहिला पक्षी बोलला – दादा! द्यायची तर साथ दे, फक्त सल्ले नकोत.

हे ऐकून दुसरा पक्षी पण साथ द्यायला लागला. असे हजारो पक्षी येत गेले व दुसऱ्यांना सांगत गेले की , सल्ले नकोत साथ पाहिजे.

हे पाहून विष्णुदेवाचं वाहन गरुड पण ह्या कामासाठी जायला निघाला.

विष्णु देव म्हणाले अरे तू कुठे चाललास ? तू गेलास तर माझं काम खोळंबेल. अन् तसंही तुम्हा सर्व पक्ष्यांकडून समुद्र काही सुकला पण जाणार नाहीये.

गरुड बोलला – देवा सल्ला नको साथ द्या.

मग काय, हे ऐकून विष्णुदेव पण समुद्र सुकवायसाठी पुढे आले. विष्णु देवाला पाहून समुद्र घाबरला आणि त्याने त्या पक्षाची पिल्लं परत केली.

ह्या संकट समयी आपल्या देशाला देखील आपला सल्ला नको साथ हवी आहे.

आज रोजी सरकारवर नुसती टीका करणारे नकोत तर समाजासोबत उभे राहून त्यांची सेवा करणाऱ्या लोकांची गरज आहे.

त्यामुळे दीदी आणि दादांनो , सल्ले नकोत साथ द्या. 🙏

जेव्हा साथ देईल संपूर्ण भारत,
तेव्हा पुन्हा आनंदी होईल भारत…. 🌷

इंदापूर तालुक्यातील आजची कोरोनाची आकडेवारी.

इंदापूर तालुक्यातील आजची कोरोनाची आकडेवारी…!

नमोन्यूजनेशन

आज दिनांक १५ मे रोजी इंदापूर तालुक्यात कोरोनाचे २२६ रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील २०३ रूग्ण आढळले असून , शहरी भागात २३ रूग्ण आढळून आले असल्याची माहिती इंदापूरचे तहशिलदार अनिल ठोंबरे यांनी दिली .

त्यापैकी ग्रामीण भागातील १६१ व शहरी भागातील ३८ असे एकूण १९९ रूग्ण बरे होऊन घरी आले आहेत.

तर ग्रामीण भागातील ३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे .

तालुक्यातील जनतेने शासकीय नियमांचे कडक पालन करून सुरक्षित रहाण्याचे आवाहन तहशिलदार ठोंबरे यांनी केले.

error: Content is protected !!