Home Blog Page 304

इर्षा आणि मत्सराचे मूळ* डॉ. ल.म.आसबे

*इर्षा आणि मत्सराचे मूळ*


आपल्याला हवी असणारी गोष्ट, आपल्याला न मिळता दुसऱ्याला मिळाली, तर माणसाचे मन उगीचच अस्वस्थ होते. आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी अचूक आणि अथक प्रयत्न करणे गरजेचे असते. यात कुठेतरी आपण कमी पडलो, तर हवे ते मिळत नाही किंवा ते मिळणे लांबणीवर पडते.
आपल्या अगोदर दुसऱ्याला ते मिळाले, तर ते आपल्याला सहन करणे खूप अवघड जाते, ही *इर्षा* असते. इर्षा *मत्सराला* जन्म देते आणि *जीवनात आपल्याकडून होणारे वाद हे बहुतेक अशा आपणच निर्माण केलेल्या इर्षेतून जन्माला येतात.*
आपल्या जीवनात अन्यायाच्या विरोधात सतत आवाज उठत असतो, कधी तो व्यक्त असतो, तर कधी तो अव्यक्त असतो, पण अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला नाही असा एकही जीव नसतो. आपल्यावर झालेला अन्याय आपल्याला कधीच सहन होत नाही आणि तो दाबूनही ठेवता येत नाही, त्याचा उद्रेक आपल्या आचार, विचार आणि देहबोलीतून प्रगट होत असतो. अशी माणसे बंडखोर होतात आणि अशा बंडातून कधी चांगले, तर कधी वाईट, आपल्या वृत्तीनुसार आणि कृतीनुसार परिणाम दिसत असतात.
*इर्षा आणि मत्सर यातून निर्माण होणारे वाद, नेहमी द्वेष व कपट अशा विकारांनी भरलेले असतात, त्यामुळे अशा वादाचे परिणाम हे नेहमी भयानक असतात.* जीवनात शक्यतो हे वाद टाळणे आपल्या हिताचे असते. सर्वतोपरी प्रयत्न करून आपल्या अंतःकरणात इर्षा व मत्सर निर्माणच होणार नाहीत यासाठी माणसाने नेहमी दक्ष असावे.
*वास्तविक माणसाला जगण्यासाठीच्या गरजा खूप मर्यादित आहेत, परंतु त्याला वागण्यासाठीच्या गरजा अमर्याद आहेत.* या अमर्याद गरजाच माणसाच्या जीवनात इर्षा निर्माण करतात. जीवन जितके *बहिर्मुखी* असेल तितक्या आपल्या गरजा वाढत जातात, तितकीच आपली इर्षा आणि मत्सर वाढत जातो व हेच विकार आपल्या जीवनातील सुख-शांतीला संपवून टाकतात.
आपले जीवन *अंतर्मुख* असेल, तर आपल्या जीवनातील गरजा आपोआप मर्यादित होतात, खरेतर गरजच शिल्लक राहत नाहीत. जेथे गरज संपते, तेथे स्पर्धा, इर्षा, मत्सर आपोआप नाहीशी होतात. *अशा व्यक्तीच्या जीवनातील वाद कायमचा संपतो, उरतो तो फक्त संवाद !* या व्यक्तीसारखा सुखी- समाधानी आणि तृप्त जगात दुसरा माणूस असू शकत नाही. श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत सांगतात, हा माझा सर्वात आवडता भक्त आहे.
*सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः l मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ll*
*हवे ते मिळवण्यासाठी जीवाचे रान करणे, हा संसार आहे आणि मिळवण्याची हावच संपणे, हा परमार्थ आहे.* म्हणून तुलना केली असता संसारापेक्षा परमार्थ सोपा आहे, परंतु सहज आणि सोपे स्वीकारणे माणसाला आवडत नाही, अवघड आणि कठीणाच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावून, त्याची प्राप्ती करण्यात माणसाला का आवडते ? हे एक कधीच न उलगडलेले कोडे आहे.
*फलकट तो संसार l येथे सार भगवंत ll*
*ऐसे जागवितो मना l सरसे जनासहीत ll* डॉ आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.
मो.नं.9822292713.

पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज जी ने कुंभ को दुष्प्रचारित करने वाले टूल किट के विषय में दी अपनी प्रतिक्रिया।

पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज जी ने कुंभ को दुष्प्रचारित करने वाले टूल किट के विषय में दी अपनी प्रतिक्रिया।

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याने राबविलेल्या उपाययोजनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल

नमोन्यूजनेशन:- रामवर्मा आसबे

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याने राबविलेल्या उपाययोजनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल*

*जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याशी साधला दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद*

*अहमदनगर:* कोरोना प्रतिबंधासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. पंतप्रधान मोदी यांनी आज देशातील निवडक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे थेट संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक अंमलबजावणी आदींची माहिती पंतप्रधानांना दिली. त्यावेळी त्यांनीही समाधान व्यक्त केले.

पंतप्रधान श्री. मोदी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी तसेच मुंबईहून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. विविध राज्यातील निवडक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यावेळी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी, जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, जिल्हा प्रशासनासह पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तसेच इतर सर्व यंत्रणांच्या सहकार्य आणि समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, जिल्ह्यातील कोरोनाच्या पहिल्या लाटेत केलेले प्रयत्न आणि दुसरी लाट थोपविण्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली. पंतप्रधान श्री. मोदी यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे म्हणणे अतिशय मन:पूर्वक ऐकले.

केंद्र आणि राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशांची आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, ब्रेक दी चेन आदेशानुसार दैनंदिन जीवन विस्कळीत न होता बाधितांना शोधण्याची मोहिम याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली. कोरोना चाचणी, लसीकरण, खासगी डॉक्टर/हॉस्पिटल यांच्याकडून आकारले जाणारे शुल्क रुग्णांना परत करण्यासाठी अशा विविध बाबींसाठी नोडल अधिकारी नेमल्याने कामात गती आली. त्याचा सकारात्मक परिणाम यंत्रणेवर झाला. ग्रामपातळीवरील यंत्रणा कार्यरत झाल्याचे ते म्हणाले.

ऑक्सीजन उपलब्धता: जिल्ह्यातील ऑक्सीजन निर्मिती करणारे प्लान्ट, बाहेरुन आणण्यात येणारा ऑक्सीजन सुरक्षितरित्या पोहोचावा यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केली. प्रत्येक ऑक्सीजन प्लान्टवर स्वतंत्र उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी समन्वय अधिकारी म्हणून नेमला. खासगी हॉस्पीटलकडून ऑक्सिजनची मागणी नोंदवून तेथील रुग्णसंख्येप्रमाणे त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येऊ लागल्याने उपलब्ध ऑक्सिजन आणि मागणी हे बर्‍यापैकी स्थिर करण्यात प्रशासनाला यश आले. राज्य शासनाच्या ऑक्सिजन निर्मिती प्लान्टसाठी प्रोत्साहन देण्याच्या धोरणाची वेगाने अंमलबजावणी करुन जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्लान्टची उभारणी सुरु करण्यात आली असल्याचे त्यांनी पंतप्रधान श्री. मोदी यांना सांगितले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण पातळी वरील यंत्रणा अतिशय महत्वपूर्ण आहे. हे ओळखून ग्रामपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील या ग्रामस्तरीय अधिकार्‍यांशी थेट संवाद सुरु केला. याशिवाय तेथील सरपंचांनाही यात सामावून घेतले. आपला गाव आपली जबाबदारी ही संकल्पना मांडली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्याप्रमाणे ग्रामीण भागात बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करण्यापूर्वी विलगीकरण कक्षात भरती केले जायचे. ती पद्धत पुन्हा संपूर्ण जिल्ह्यात राबवली. तसेच दुसर्‍या लाटेत संसर्गाची गती पाहता बाधितांचे होम आयसोलेशन (गृह विलगीकरण) जिल्ह्यात बंद करण्यात आले. प्रत्येक बाधित व्यक्तीला थेट कोविड केअर सेंटर मध्ये भरती करण्याचे धोरण राबविले. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होत असल्याचे यावेळी डॉ. भोसले यांनी नमूद केले.

राज्य शासनाने सुरु केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आल्याने कोरोना बाधित रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य झाले. प्रतिबंधात्मक आदेश डावलून विनाकारण सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांची अॅण्टीजेन चाचणी सुरु करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि संसर्गाचे प्रमाण पाहता महानगरपालिका प्रशासन, पोलीस यांच्या मदतीने विविध भागात मोहिम राबवून प्रतिबंधात्मक आदेशाचे भंग करणार्‍यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. वरिष्ठ अधिकार्‍यांसह महिन्यातून किमान दोन वेळा प्रत्येक तालुक्यांचा दौरा केला. यामुळे तालुकास्तरीय यंत्रणेलाही हुरुप आला. त्यांच्याशी केलेल्या संवादातून अधिकार्‍यांचे मनोबल उंचावले. त्याचा अपेक्षित परिणाम दिसू लागल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणाना उद्युक्त केले. ज्या गावांनी कोरोना संसर्ग रोखण्यात यश मिळविले, त्या गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांचे मनोबल बाढविले. आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष आणि हिवरेबाजार गावचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी त्यांचे गाव कोरोनामुक्त केले. त्यांना व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये बोलावून त्यांचे अनुभव इतर गावातील सरपंच आणि ग्रामस्तरीय अधिकारी यांना ऐकवले, त्याचाही सकारात्मक परिणाम गावागावात झाल्याची माहिती डॉ. भोसले यांनी यावेळी दिली.

*मुख्यमंत्री महोदयांकडून जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे कौतुक*

अहमदनगर जिल्ह्याने केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्याकडून त्यासंबंधितीची माहिती घेतली. व्हीडीओ कॉन्फरन्सनंतर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पालकसचिव आशीषकुमार सिंह यांच्यासह विविध मान्यवरांनी दूरध्वनी करुन डॉ. भोसले यांचे कौतुक केले. ***

जगायचं कुणासाठी…?

जगायचं कुणासाठी…?*

*☺️माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो. पण.. आयुष्य का जगतो?, कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो? याची मात्र काहीच कल्पना नसते…!!!*

*☺️पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो. पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान-सहान कामे करतो, अंगमेहनतिचीही कामे करतो. पूर्वी ६०/७० वर्षांचे आयुष्य जगायचा, आता ७०/८० वर्षे जगतो आणि मरून जातो..!!!.*

*☺️मेल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात. मेल्यानंतर पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचंच संपुष्टात येतं…आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त १५/२० दिवसांपुरतीच असते… कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच. मी, माझं कुटुंब एवढंच जग असतं आपलं…!!!*

*☺️सुंदर असा लेख आहे.सर्वांनी आवश्य वाचावा धन्यवाद🙏 मग… जगावं तरी कुणासाठी?…!!!*

*☺️तर…जगावं तर ते समाजासाठी… तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता? तुम्ही काय उभारता? तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का? यालाच तुमच करियर म्हणतात. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात… करियर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा… समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय…!!!*

*☺️खूप पैसा, गाडी, बंगला, दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो. पैसा, गाडी, बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत… यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. सोबत नेता ते तुमचं कर्म, तुमच्याप्रति असलेली समाजाची आपुलकी, आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हिच आयुष्यभराची कमाई असते…!!!*.

*☺️आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण कुणी कधी आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही… पण समाजासाठी झटणारे साधुसंत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत. कारण ते जगले होते समाजासाठी…!!!*

*☺️त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत. उदाहरण घ्यायचच झाल तर आताच काही दिवसांपूर्वी आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी केले ते संत गाडगेबाबा… काय होतं त्यांच्याकडे… फक्त हातात एक खराटा, डोक्यावर फुटलेल्या मडक्याच खापर आणि अंगावर फाटका सदरा… पैश्याचा तर विषयच नव्हता… चलनाचं एक नाणंसुद्धा खिशात नसायचं, अख्खे गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं. पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची. याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले…!!!*

*☺️आपणही समाजात असं काही करतो का? समाजाला काही देतो का? भले नसेल आपली महती साधुसंतांएवढी कि लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील. पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं कर्तुत्ववान व्हावं प्रत्येकाने एकमेकांचा राग, द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं रहायला शिका…!!!*

*☺️ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण, ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय… तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती राहिली नाही… म्हातारे झाल्यावर आई-बाप काम काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेवून ठेवलं जातं…!!!*

*☺️बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही. बालपणी लाड होतात तर म्हातारपणी हाल-अपेष्टाही सहन कराव्या लागतात. ज्या मुलांसाठी जगलो त्यांच्यासाठी जमेल तेवढे जास्तीत जास्त साधन संपत्ती करुन राखून ठेवली आहे, तीच मुले एका क्षणात परके करून जातील… या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो कि आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी?…!!!*

*☺️समाजासाठी जगा…*
*दान-धर्म करा, भुकेल्या माणसांना अन्न द्या. आनंदात जगून घ्या… फिरावंस वाटलं तर भरपूर फिरून घ्या. म्हातारपणी फिरावंस वाटल तरी तुमच शरीर मात्र साथ देणार नाही. येताना एकटे असलो तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा आहे…!!!*
.
*☺️आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो…..!!!*

*☺️आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी लोकांच्या अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा…!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*.

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

अमेरिकी सांसद ने की PM मोदी की तारीफ, कहा- भरोसा है भारतीय जीतेंगे

*अमेरिकी सांसद ने की PM मोदी की तारीफ, कहा- भरोसा है भारतीय जीतेंगे चुनौती*

नमोन्यूजनेशन:-संपादकीय,

अमेरिका के एक सांसद ने कोरोना संकट से निपटने के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के प्रयासों की सराहना की और विश्वास जताया कि भारतीय इस चुनौती से पार पा लेंगे. सांसद जो विल्सन ने कहा कि अमेरिका और भारत के बीच एक विशेष साझेदारी है. उन्होंने कहा कि वैश्विक महामारी से निपटने के लिए आवश्यक उपकरणों की भारत को आपूर्ति करने के कांग्रेस के प्रयासों का समर्थन करके वह कृतज्ञ महसूस कर रहे हैं.

विल्सन ने कहा, वैश्विक महामारी कोरोना वायरस से प्रभावित भारत के लोगों के साथ हमारी सहानुभूति है. इस पीड़ादायक संकट के दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के प्रयासों की मैं सराहना करता हूं. खास बात है कि भारत में कोरोना के मामलों के बढ़ने के साथ ऑक्सीजन, दवाओं जैसी मेडिकल सुविधाओं की किल्लत सामने आई थी. ऐसे में अमेरिका समेत दुनिया के कई देशों ने भारत की मदद के लिए हाथ आगे बढ़ाया था.

उन्होंने कहा, भारत के एक दोस्त के तौर पर और हाउस कॉकस ऑन इंडिया एंड इंडियन अमेरिकन्स के एक सदस्य के नाते इस समय भारत के लोगों के साथ मेरी सहानुभूति है और मुझे विश्वास है कि भारतीय इस चुनौती से पार पा लेंगे. सांसद ने एक बयान में कहा कि ऐसे समय जब भारत के लोगों को मदद की जरूरत है तो इस समय मदद करने वालों को पहचानना जरूरी है.

उन्होंने कहा, मैं ‘इंडियन-अमेरिकन इंटरनेशनल चैंबर ऑफ कॉमर्स का आभारी हूं, जिसका नेतृत्व सीईओ एवं अध्यक्ष केवी कुमार करते हैं. भारत में जारी संकट के मद्देनजर आईएआईसीसी ने डॉ. नरसिम्हुलु नीलगरु, राजदूत तरनजीत सिंह संधू और महावाणिज्य दूत डॉ. स्वाति कुलकर्णी तथा अमित कुमार के साथ मिलकर वैश्विक महामारी से निपटने में भारत की मदद के लिए एक विशेष कार्यबल की स्थापना की है. विल्सन ने बताया कि इसके सफल प्रयासों से भारतीय परिवारों के लिए चिकित्सा उपकरणों और अन्य आपूर्ति के लिए 20 लाख अमेरिकी डॉलर से अधिक राशि एकत्रित की गई है.

अमेरिकी सांसद ने की PM मोदी की तारीफ, कहा- भरोसा है भारतीय जीतेंगे

*अमेरिकी सांसद ने की PM मोदी की तारीफ, कहा- भरोसा है भारतीय जीतेंगे चुनौती*

नमोन्यूजनेशन:-संपादकीय,

अमेरिका के एक सांसद ने कोरोना संकट से निपटने के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के प्रयासों की सराहना की और विश्वास जताया कि भारतीय इस चुनौती से पार पा लेंगे. सांसद जो विल्सन ने कहा कि अमेरिका और भारत के बीच एक विशेष साझेदारी है. उन्होंने कहा कि वैश्विक महामारी से निपटने के लिए आवश्यक उपकरणों की भारत को आपूर्ति करने के कांग्रेस के प्रयासों का समर्थन करके वह कृतज्ञ महसूस कर रहे हैं.

विल्सन ने कहा, वैश्विक महामारी कोरोना वायरस से प्रभावित भारत के लोगों के साथ हमारी सहानुभूति है. इस पीड़ादायक संकट के दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के प्रयासों की मैं सराहना करता हूं. खास बात है कि भारत में कोरोना के मामलों के बढ़ने के साथ ऑक्सीजन, दवाओं जैसी मेडिकल सुविधाओं की किल्लत सामने आई थी. ऐसे में अमेरिका समेत दुनिया के कई देशों ने भारत की मदद के लिए हाथ आगे बढ़ाया था.

उन्होंने कहा, भारत के एक दोस्त के तौर पर और हाउस कॉकस ऑन इंडिया एंड इंडियन अमेरिकन्स के एक सदस्य के नाते इस समय भारत के लोगों के साथ मेरी सहानुभूति है और मुझे विश्वास है कि भारतीय इस चुनौती से पार पा लेंगे. सांसद ने एक बयान में कहा कि ऐसे समय जब भारत के लोगों को मदद की जरूरत है तो इस समय मदद करने वालों को पहचानना जरूरी है.

उन्होंने कहा, मैं ‘इंडियन-अमेरिकन इंटरनेशनल चैंबर ऑफ कॉमर्स का आभारी हूं, जिसका नेतृत्व सीईओ एवं अध्यक्ष केवी कुमार करते हैं. भारत में जारी संकट के मद्देनजर आईएआईसीसी ने डॉ. नरसिम्हुलु नीलगरु, राजदूत तरनजीत सिंह संधू और महावाणिज्य दूत डॉ. स्वाति कुलकर्णी तथा अमित कुमार के साथ मिलकर वैश्विक महामारी से निपटने में भारत की मदद के लिए एक विशेष कार्यबल की स्थापना की है. विल्सन ने बताया कि इसके सफल प्रयासों से भारतीय परिवारों के लिए चिकित्सा उपकरणों और अन्य आपूर्ति के लिए 20 लाख अमेरिकी डॉलर से अधिक राशि एकत्रित की गई है.

रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान जाहिर

रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान जाहिर

बारामती दि. 19 :- कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंध घातले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी 1500 रूपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती कार्यालयातील संगणकीय अभिलेखानुसार वाहन 4.0 या प्रणालीवर जवळपास 1809 नोंदणीकृत रिक्षा परवानाधारक असल्याचे दिसून येत आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील जवळपास 1809 रिक्षा परवाना धारकांना शासनाच्या सानुग्रह अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. संबंधितांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने रक्कम जमा करण्याबाबतची माहिती परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in.1035/home या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याकरीता रिक्षा परवानाधारकांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे.
सर्व रिक्षा परवानाधारकांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे, जेणेकरुन सानुग्रह अनुदानाची रक्कम त्यांना वेळेवर अदा करता येईल. त्याच प्रमाणे सदर प्रणाली तयार झाल्यानंतर उपरोक्त संकेतस्थळावर त्याची माहिती प्रदर्शित करण्यात येईल, जेणेकरुन सर्व रिक्षा बांधवांना त्याचा फायदा घेणे शक्य होईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांनी केले आहे.

००००००

*दान* _charity/ALMS_ डॉ ल.म.आसबे

📍📍📍📍📍
💎 *दान* _charity/ALMS_

डॉक्टर :- ल.म.आसबे

कामधेनु परिवार💎
📍📍📍📍📍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आपल्या अंतःकरणात दया उत्पन्न झाल्याशिवाय आपल्या हातून दान घडत नाही.
*दयेविना झालेले दान मोबदल्याची अपेक्षा करते, अशा अवस्थेत केलेले दान शुद्ध रहात नाही.*
आपले मूळ स्वरूप हे परिपूर्ण आहे, त्यामुळे आपल्या अंतःकरणात दया उत्पन्न होत असते, परंतु _ती कृतीत उतरण्यापूर्वी आपला स्वार्थ जागा होतो_ आणि तो एवढा मोठा असतो की त्यामुळे उत्पन्न झालेली दया धुळीस मिळते.
स्वार्थ निर्माण झाला की
आपल्या स्वरूपावर त्याचे आवरण चढते,
त्यामुळे मूळ स्वरूप झाकले जाते आणि
आपण स्वतःला अपूर्ण समजू लागतो.
*हे _अपूर्णत्व_ जोपर्यंत शिल्लक आहे, म्हणजेच _अज्ञान_ शिल्लक आहे, तोपर्यंत आपण _दान_ करण्याचा विचारही करू शकत नाही.*
आज जागतिक महामारीच्या काळात
अनेक लोक दान करत आहेत.
⛳ *श्रीमद्भगवद्गीता सांगते,*
*देश, काळ आणि पात्र पाहून दान करावे.*
आज या तिन्ही गोष्टी आपल्या देशात अनुकूल आहेत, त्यामुळे दान करण्याची ही आपल्या जीवनातील अतिशय योग्य वेळ आणि काळ आहे.
⛳ धर्मशास्त्रात दानाचे तीन प्रकार सांगितले आहेत, _तामस दान, राजस दान आणि सात्विक दान._

◼️◼️ *तामस दान* ◼️◼️
_आपल्याकडे जी वस्तू, आपल्या उपयोगाची नाही किंवा आपल्या दृष्टीने निरुपयोगी आहे, तिचे दान करणे_, हे |ता|म|स| दान आहे.
आज गरजूंना मदत करत असताना
आपण असे तरी करत नाही का⁉️
याचा तपास स्वतः करावा.
◼️◼️ *राजस दान* ◼️◼️
_या दानाच्या प्रकारांमध्ये माणूस दान करत असतो, परंतु त्याला त्याच्या प्रसिद्धीची अपेक्षा असते_.
आज कोरोनाच्या काळात, हेच दान
बहुतेक ठिकाणी केल्याचे दिसून येत आहे.
आजच्या काळात या दानालाही हरकत घेण्याचे काहीच कारण नाही. एखाद्या व्यक्तीला दानशूर म्हणून गरजूंना मदत होत असेल, तर _अशा दानशूर उपाधीची अपेक्षा करणाऱ्या माणसाला प्रसिद्धी द्यायला काही हरकत नाही_.
*⛳धर्मशास्त्रात या दानाला कवडीमोल किंमत आहे, परंतु आजच्या 🤑व्यवहार शास्त्रात यालाही किंमत आहे.*
◼️◼️ *सात्विक दान* ◼️◼️
हे दान अतिशय कठीण आहे,
☑️ आपण दान करतोय ,
याचे भानही अशा व्यक्तीला नसते.
☑️ आपण काय देतोय हेही
अशा दात्यांना समजत नाही आणि
☑️ आपण कधी दान केलेले आहे,
हेही ज्यांच्या लक्षात रहात नाही,
ते खरे |सा|त्वि|क| दान आहे.
*आयुष्यात एक क्षणतरी अशा सात्विक दानाचा आपल्याला अनुभवता आला, तर _जीवन कृतार्थ झाले_, असे समजावे.*
धर्मशास्त्रात या दानाला,
सर्वोच्च दान समजले आहे, परंतु
हे करताना सुद्धा *देश काळ आणि पात्र* यांची अट धर्मशास्त्राने घालून दिलेली आहे.
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*_माझ्याकडे काय आहे_ ? या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत _काहीच नाही !_ असे येत आहे, तोपर्यंत दानाचा विषय आपल्या मनातही येत नाही.*
_माझ्याकडे जगाला अर्पण करण्यासाठी_
🖇️ माझी कला आहे, 🖇️ज्ञान आहे,
🖇️शारीरिक शक्ती आहे, 🖇️विचार आहे,
🖇️वेळ आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे
🖇️ज्याचे कधीच कोणीही मूल्य करू शकत नाही,
असे |अ|मू|ल्य| |प्रे|म| माझ्याकडे आहे,
याचे दान मी भरभरून करू शकतो,
⛳ *फक्त भगवंता !*⛳
*हे दान करत असताना*
*मला सात्विक वृत्तीने करण्याची*
*बुद्धी आणि बळ दे !*
कारण ही गोष्ट माझ्या आवाक्यातील नाही.
⛳ *दया तिचे नाव l*
*भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे ll*
*धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार l*
*निवडीले सार असार ते ll*

🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ _*डॉ. आसबे ल.म.*_✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं. 9822292712.📞

शरीराचे अवयव* व त्याला *निष्काळजीपणामुळे होणारे आजार.

नमोन्यूजनेशन :- शरीराचे अवयव* व त्याला *निष्काळजीपणामुळे होणारे आजार…*

🩺 *१) पोट :-* केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही…….

🩺 *२) मूत्रपिंड :-* केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही……

🩺 *३) पित्ताशय :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही……..

🩺 *४) लहान आतडे :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता…….

🩺 *५) मोठे आतडे :-* केव्हा बिघडते,जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता…….

🩺 *६) फुफ्फुसे :-* केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता……..

🩺 *७) यकृत :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता……

🩺 *८) हृदय :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त तसेच रिफाइंड तेल अशा प्रकारचा आहार घेता…….

🩺 *९) स्वादुपिंड :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता……

🩺 *१०) “डोळे” :-* केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता……

🩺 *११) “मेंदू” :-* केव्हा बिघडतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता…….

🙏 *निसर्गाने “माेफत” मध्ये दिलेल्या शरीराच्या “अवयवाची” योग्य “काळजी” घ्या आणि त्यांना “बिघडवू” देऊ नका शरीर “स्वस्थ” तरच आपण “मस्त”…….*

💔 कारण,,,,,,,,,,,,,,,

*”शरीराचे” कोणते ही”अवयव” हे बाजारा मध्ये मिळत नाहीत आणि चुकून मिळाले तरी खूप महाग आणि आपल्या शरीरात योग्य पद्धतीने बसतीलच असे नाही म्हणून आपल्या “शरीराची” नेहमी काळजी घ्या……..*

*तूच आहेस तुझ्या शरिराचा  वालि…..*

धोकादायक मन* 📍डॉ.ल.म.आसबे

◼️◼️◼️◼️◼️◼️
📍 *धोकादायक मन* 📍
◼️◼️◼️◼️◼️◼️
गुंतलेले मन बाहेर काढणे
खूप अवघड असते,
आपण यातून बाहेर पडावे असे किती जरी वाटत असले, तरी शरीर त्यातून बाहेर निघते पण मन निघता निघत नाही.
असे *गुंतलेले मन शरीराचे काही चालू देत नाही त्यापेक्षाही शरीराचे ते काहीच ऐकत नाही*, म्हणून
मनाला मोकळे सोडणे
धोक्याचे असते.
*मनो मार्गे गेला l तो येथे मुकला ll*
*हरिपाठी स्थिरावला l तोचि धन्य ll*
⛳विश्व माऊली ज्ञानदेवांनी _मनाच्या मार्गाने जाणार्‍या माणसाला अशा पद्धतीने त्याच्या जीवनाच्या लाभाच्या ठिकाणी, तो मुकला_, असे संबोधले आहे.
आज आपल्या सगळ्यांचे मन
मोकळे आणि स्वैर आहे.
💀लॉकडाउनच्या काळामध्ये बसून बसून
शरीर कंटाळले आहे, त्यापेक्षा
मन अतिशय चंचल झालेले आहे.
🎭 त्याला किती आवरायचा प्रयत्न केला,
तरी ते आवरेनासे झाले आहे.
🎭हे कमालीचे अस्वस्थ झालेले मन
काय करून ठेवेल ? याचा भरवसा नाही, म्हणून *शरीराला काम नसले तरी*
*मनाला काम लावले पाहिजे.*
मनाला काम लावायचे असेल, तर
*चिंतन, लिखाण, वाचन, खेळ, छंद*
अशा ठिकाणी त्याला गुंतवले पाहिजे, अन्यथा
*बाहेर रोगाचा धोका आहे* आणि
*घरात चंचल मनाचा धोका निश्चित आहे.*
2️⃣0️⃣2️⃣1️⃣😷2️⃣0️⃣2️⃣1️⃣
☑️ध्यानाने मन
स्थिर होते, शुद्ध होते.
☑️असे शुद्ध झालेले स्थिर मन,
आपल्या जीवनात अनोखी क्रांती करून जाते,
☑️ परंतु साधनेनंतर शुद्ध झालेले मन
मोकळे असले की ते विषयाकडे ओढ घेते.
मनाला कोणता विषय कधी आवडेल⁉️
याचा अंदाज सुद्धा आपण करू शकत नाही.
_मनाला देहबुद्धी सोडण्याची सवय लावली,_
_तर हा धोका टाळता येतो._
दुर्दैवाने *देह मनाचे ऐकतो, परंतु*
*मन देहाचे कधीच ऐकत नाही.*
😓दारुड्याची पावले दारूच्या दुकानाकडे मनच घेऊन जाते, शरीरिने कितीही आवर घातला तरी मन ताब्यात रहात नाही.
😓सत्पुरुष म्हणून ख्याती पावलेले अनेक महात्मे, वाममार्गाला जाऊन आपला सर्वनाश करून घेतात, ते केवळ या ताब्यात नसलेल्या मनामुळेच.
🖇️ *मन वढाय वढाय l उभ्या पिकातलं ढोरं ll*
*किती हाकला हाकला l फिरी येतं पिकावरं ll*
संत वृत्ती असलेल्या कवयत्री बहिणाबाई चौधरी, यांनी आपल्या मनाची अवस्था या प्रकारे व्यक्त केलेली आहे. यावरून
निश्चित लक्षात येते की
मन आवरणे किती अवघड आहे⁉️
संसारात आणि नात्यात गुंतलेले मन
शरीराला ढोरासारखे राबवून घेते.
आपले कुटुंब, सगेसोयरे, नातलग यांच्यासाठी जिवाचे रान करूनही शेवटी हाती काहीच लागत नाही, अशावेळी पश्चातापाशिवाय काहीच उरलेले नसते.
_पश्चात्ताप होऊन वैराग्य आले, तर_
कदाचित फायदा होऊ शकतो, परंतु
_जर पश्चाताप होऊन वैताग आला,_
तर मात्र प्रचंड नुकसान होते.
‌. *धोबी का कुत्ता l न घर का ना घाटका l*
अशी अवस्था होऊन बसते.
एखाद्या व्यक्तीत अडकलेले मन त्या माणसाला,
माणूस राहू देत नाही.
ती व्यक्ती सोडून त्याला दुसरे काहीही
सुचत, दिसत आणि आठवत नाही.
😷तुळसिदासासारखा महात्मा, महापूर आलेली नदी ओलांडून कसा गेला, हे त्याला कळलेच नव्हते, कारण
*व्यक्तीत अडकलेले मन,*
*त्या व्यक्तीला बेभान करत असते.*
अशी अडकलेली माणसे आपले
वैभव, प्रतिष्ठा, कला, ज्ञान
या सगळ्यावर पाणी सोडून
⁉️ भिकारी का होतात ⁉️
🖇️याचे उत्तर *व्यक्तीत अडकलेले मन, बाहेर काढणे निव्वळ अशक्य आहे !* असंच आहे.
💀लॉकडाऊनच्या काळात💀
🤑आर्थिक दृष्ट्या आपण
भिकारी होत चाललो आहोत,
हे दारिद्रय तात्पुरते आहे, परंतु
_चुकून जर आपण मन एखाद्या ठिकाणी गुंतवून, घाण ठेवून मानसिकदृष्ट्या दरिद्री झालो, तर हे दारिद्र्य कायमचे असते_ आणि
ते शरीराला भिकारी
केल्याशिवाय राहणार नाही.

🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ *_डॉ. आसबे ल.म._*✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं.9822292713.📞

error: Content is protected !!