Home Blog Page 297

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, पत्रकारांचा स्तुत्य उपक्रम.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, पत्रकारांचा स्तुत्य उपक्रम.

इंदापूर :

सध्या सर्वत्र कोरोना संसर्गजन्य आजाराचा फैलाव आहे. या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस मोठ्या थाटात साजरा न करता, केक, पार्टीचे आयोजन न करता उद्भवलेल्या परिस्थितीचे भान ठेवून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनी अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक किराणा सामानाचे वाटप करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत समाजासमोर एक आदर्श ठेवला.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख काकासाहेब मांढरे, इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे खजिनदार अंगद तावरे तसेच सदस्य नानासाहेब घळके यांचा वाढदिवस होता. याचे औचित्य साधत माऊली अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष डाॅ. संदेश शहा, शहराध्यक्ष सुरेश जकाते, संपादक विलासराव गाढवे, सचिव धनंजय कळमकर तसेच अॅड. नारायण ढावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर येथील माऊली बालक अनाथाश्रमात जीवनावश्यक किराणा सामानाचे वाटप केले.

यावेळी समन्वयक दिपक खिलारे, सदस्य कैलास पवार, श्रेयश नलवडे, हमीद आतार, माऊली नाचण उपस्थित होते.

हिंदुस्थान के हिंद पुरुष उत्तर प्रदेश के योगी पुरुष मुख्य मंत्री मा.श्री योगी जी को जन्म दिन कि शुभकामना

हिंदुस्थान के हिंद पुरुष उत्तर प्रदेश के योगी पुरुष मुख्य मंत्री मा.श्री योगी जी को जन्म दिन कि शुभकामना
शुभेच्छुक:- रामवर्मा आसबे
नमोन्युजनेशन परिवार
सहसंपादक :- शिव-कल्याण न्युजनेटवर्क

क्रांती आणि शांती*डॉ. ल.म.आसबे (कामधेनु परीवार)

*क्रांती आणि शांती*

अन्याय आणि अत्याचार करण्याची वृत्ती, घमेंड आणि अहंकारातून निर्माण होते. अशी माणसे नेहमी आपल्यापेक्षा कमजोर आणि दुबळ्या माणसांचा शोध घेत असतात. समाजामध्ये सगळेच सक्षम नसतात, त्यामुळे कमजोर आणि दुबळ्या माणसावर अन्याय करणारा घटक कोणत्या ना कोणत्या रूपाने नेहमी आपला दबाव टाकत असतो.
वास्तविक ही माणसे शूरही नसतात आणि वीरही नसतात, कारण *खरा शूरू वीर नेहमी अन्यायाच्या विरोधात लढत असतो, तो स्वतः कधीच अन्याय करत नाही आणि दुसऱ्याचा सहनही करत नाही.*
शूरत्व सर्वांच्या अंगीं नसते, अशा शूरत्व अंगीं नसलेल्या माणसाला नेहमी समाजातील शूरांचे आणि वीरांचे कवच तयार होत असते. अशा *आपल्या पेक्षा कमजोर आणि दुर्बल माणसाला जो संरक्षण देतो, इतरांच्या त्रासापासून वाचवतो त्यालाच क्षत्रिय म्हणतात, तेथे जातीचा आणि धर्माचा काहीच संबंध नाही.*
*क्षतात त्रायते इति क्षत्रिय l*
ही क्षत्रियांची खरी व्याख्या आहे.
आज समाज खऱ्या अर्थाने आशा गुणांनी क्षत्रिय नसलेल्या, स्वतः वीर व शूर नसलेल्या, घमेंडी आणि अहंकारी माणसापासून त्रस्त आहे. क्षेत्र कोणतेही असो हे दादागिरी करणारे लोक आहेतच.
काही लोक विनाकारण वाद नको, आपले त्याच्याशी काही देणेघेणे नाही, असे समजून दुर्लक्ष करतात, तर काही लोक आपल्याला कोणाचाही आधार नाही, म्हणून सहन करत असतात. त्यामुळे अशा लोकांचे साम्राज्य हळूहळू वाढत जाते. अशी *दादागिरी करणारी माणसे कितीही मोठी झाली, तरी त्यांना जनमान्यता कधीच मिळत नाही, एक विकृत माणूस म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते, त्याला कधीही कोणाच्याही खऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत नाहीत, मिळतात ते सर्व तळतळाटच.*
कोणत्याही दादागिरी करणाऱ्या माणसाचा शेवट, हा त्याच्यापेक्षा वरचढ होऊ पाहणाऱ्या माणसाकडूनच होत असतो. *आपण जेवढे एखाद्यावर विनाकारण अन्याय आणि अत्याचार करत असतो, त्यावेळी आपल्यावर सूड घेणाऱ्या वृत्तीला आपणच जन्म देत असतो, हे कधीच विसरू नये.* आपला वैरी या निमित्ताने आपणाच जन्माला घालत असतो.
निर्वैर जीवन खऱ्या अर्थाने सर्वात सुखी आणि समाधानी असते. अशा व्यक्तीला काही विकृत लोकांचा त्रास सहन करावा लागतो, हे निश्चित आहे, परंतु त्याची सहनशीलता हीच त्याची खरी ताकद असते आणि या सहनशीलतेतूनच त्याच्या जीवनातील शांती जन्म घेत असते. *वाद घालणारी माणसे कधीच शांत राहू शकत नाहीत, वाद टाळणारी माणसे नेहमी शांत असतात.*
जी शांत असतात, तीच स्थिर असतात आणि तीच खऱ्या अर्थाने समृद्ध होतात. आपण कोणत्याही क्षेत्रात असो आपल्यापेक्षा वरचढ होऊ पाहणारा किंवा असणारा हा आपल्याला त्रास देणार , आपल्या कमजोरीचा आणि दुबळेपणाचा गैरफायदा घेऊन आपल्यावर अन्याय करणारा असणारच आहे.
*वरचढ असेल तर शिवरायांचे सूत्र वापरावे, गनिमी काव्याने त्याला नेस्तनाबूत करावे किंवा संयमाने सहन करून त्याच्याशी वैर टाळावे, हे दोनच मार्ग आपल्या हातात असतात.*
दोन्हीकडेही आपल्याला यश येते, आपली जशी वृत्ती असेल तशी कृती आपल्या हातून होत असते. या दोन्ही मार्गात गैर काहीच नसते. आपल्याला क्रांती हवी असेल तर पहिला मार्ग योग्य आहे आणि आपल्याला शांती हवी असेल, तर दुसरा मार्ग योग्य आहे.
*क्रांती आणि शांती दोन्ही एका वेळेला कोणत्याच क्षेत्रात शक्य होत नाही.*
सहनशीलता आणि नम्रता यामध्येही प्रचंड ताकद आहे, हे कृतीशिवाय अनुभवता येत नाही.
*नम्र झाला भूता l त्याने कोंडिले अनंता ll*
*हेच शूरत्वाचे अंग l हारी आणिला श्रीरंग ll*
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.
मो.नं.9822292713.

आज राज्यात 14,152 नवे रुग्ण,👉तर 20,852 डिस्चार्ज,👉रिकव्हरी रेट 95 टक्क्यांच्या जवळ*

आज राज्यात 14,152 नवे रुग्ण,👉तर 20,852 डिस्चार्ज,👉रिकव्हरी रेट 95 टक्क्यांच्या जवळ*

*मुंबई – राज्यात आज तर 14,152 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 20,852 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 289 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे. राज्यात आज एकूण 1,96,894 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 55,07,058 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.86% टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 14,75,476 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,430 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.*

*👉मुंबईत गेल्या 24 तासात 973 कोरोनाबाधितांची नोंद*

*राज्यात आणि विशेषकरुन मुंबईत कोरोनानं प्रकोप केला होता. यात मुंबईमध्ये तर कोरोनानं सर्वात जास्त कहर केला होता. आता मुंबईतील आकडा गेल्या काही दिवसांपासून एक हजारांच्या देखील येत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 973 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1207 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,76,400 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16,347 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 515 दिवसांवर पोहोचला आहे.*

*👉धारावीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी फक्त एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद*

*आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील धारावीमध्ये फक्त एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेनं माहिती दिली आहे. धारावीत सध्या एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 20 असल्याचं बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने घातलेले निर्बंध आणि उपाययोजनांमुळं धारावीसारख्या हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी आज दुसऱ्या दिवशी केवळ एका रुग्णाची नोंद झाली आहे. धारावीत आजवर एकूण 6830 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज दादरमध्ये 10 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. दादरमध्ये आतापर्यंत 9476 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर आज माहिममध्ये 10 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. माहिममध्ये आतापर्यंत 9812 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.*

*👉पुणे शहरात 349 नवीन रुग्णांची नोंद*

*पुणे शहरात आज नव्याने 349 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 71 हजार 577 इतकी झाली आहे. शहरातील 699 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 58 हजार 374 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 7 हजार 872 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 25 लाख 26 हजार 221 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 4 हजार 842 रुग्णांपैकी 721 रुग्ण गंभीर तर 1372 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.पुणे महापालिका हद्दीत नव्याने 21 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 361 इतकी झाली आहे.*

ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात* *👉👉सर्वोच्च न्यायालयाने सर्व पुनर्विचार याचिका फेटाळल्या*

ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात*
*👉👉सर्वोच्च न्यायालयाने सर्व पुनर्विचार याचिका फेटाळल्या*

*नागपूर :-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्याच्या कलम १२ (२)(सी) आणि राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनांनुसार आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असेल तर ते अवैध आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या आदेशावर राज्य सरकार व इतरांनी पुनर्विचार याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व याचिकांवर सुनावणी घेऊन मूळ आदेश कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या.*

*👉या आदेशामुळे वाशीम, अकोला, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये अतिरिक्त आरक्षित जागांवर निवडून आलेल्या सदस्यांची निवडणूक अवैध ठरवून व इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित जागांवरील निवडणूक अवैध ठरवून नव्याने निवडणूक घेण्यात यावी. अतिरिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घ्यावी व त्याकरिता दोन आठवड्यात प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या आदेशाचा फटका २७ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) सदस्यांना बसला आहे.*

*👉महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्याचे कलम १२ (२)(सी) अंतर्गत विविध प्रवर्गांना आरक्षण जाहीर करण्यात आले. त्याकरिता २७ जुलै २०१८ आणि १४ फेब्रुवारी २०२० ला राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यानुसार वाशीम, अकोला, नागपूर, गोंदिया आणि भंडारा येथील जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत होते. काही जिल्ह्यात पंचायत समिती व ग्रामपंचायतींमध्येही अतिरिक्त आरक्षण ठरले. त्यामुळे अनेकांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांतील आरक्षणाला आव्हान दिले होते. याप्रकरणी न्या. ए. एम. खानविलकर, न्या. इंदू मल्होत्रा आणि न्या. अजय रस्तोगी यांनी ४ मार्च २०२१ ला ५० टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण रद्द केले होते. त्या आदेशाला राज्य सरकारसह दहा जणांनी पुनर्विचार याचिकेद्वारा आव्हान दिले. न्यायालयाने मूळ आदेशावर कोणतेही मत व्यक्त करण्यास नकार देऊन सर्व पुनर्विचार याचिका फेटाळल्या.*

*👉जुना आदेश काय?*

*अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) यांचे एकूण आरक्षण मिळून ५० टक्क्यांपेक्षा अधिक नसावे. पण, कायद्यातील तरतूद व निवडणूक आयोगाच्या अधिसूचनांनुसार ओबीसीला २७ टक्के आरक्षण लागू केल्यास एकूण जागांतील आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत आहे. कायद्यानुसार आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत असावे, असे असताना हे अधिक होत असल्याने ओबीसी प्रवर्गातील सदस्यांची निवडणूक अवैध ठरवून नव्याने निवडणूक घ्यावी. अतिरिक्त जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित कराव्यात व प्रक्रिया दोन आठवड्यात पूर्ण करावी, असे न्यायालयाच्या ४ मार्चच्या आदेशात नमूद आहे.*

मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे, 👉देवेंद्र फडणवीस संतापले*

मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे, 👉देवेंद्र फडणवीस संतापले*

*👉राज्यात अनलॉकसंबंधी झालेल्या गोंधळावरुन राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. मंत्र्यांनी धोरणात्मक निर्णय विचार करुन जाहीर करावेत असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.*

*👉लॉकडाउनवरुन गोंधळ*

*“ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडून कोणतंही वक्तव्य येत नाही आणि त्याआधी पाच मंत्री बोलतात. प्रत्येत मंत्री जाहीर करतो आणि ही घोषणा मुख्यमंत्री करतील असं सांगतो. प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम करुन तरी ते श्रेय घ्यावं. त्यामुळे कालचा गोंधळ जरा जास्तच झाला आहे. याआधीही अनेकदा गोंधळ झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. बोलण्यावर बंधनं आणू नये पण किमान मोठ्या धोरणात्मक निर्णयावर सरकारचं म्हणणं आहे ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे,” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.*

*👉“गोंधळ इतका निर्माण झाला आहे की, लॉकडाउन आहे की नाही यासंदर्भात अनेकांचे फोन आले. आमच्याकडेही त्याचं उत्तर नव्हतं. मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने नंतर प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं. लॉकडाउनमुळे सध्या लोकांमध्ये संभ्रम, उत्कंठा, निराशा आहे. त्यामुळे काल घोषणा झाल्यानंतर लोकांना वाटलं झालं सुटलो. छोट्या दुकानदारांना निर्बंध संपले असं वाटलं. अनेक दुकानदारांचा ७ ते २ या वेळेला विरोध असून ९ ते ४ करावी अशी मागणी आहे. त्यामुळे अनेकांची निराशा या माध्यमातून झाली. सरकारनं या बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.*

*👉मागासवर्गीय आयोगाची स्थापना हे उशीरा आलेलं शहाणपण आहे. राज्य सरकारला आरक्षण द्यायचंच नाही असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. “कायदा करायचा अधिकार राज्याचाच आहे. राज्य सरकारला मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल मंजूर करून तो केंद्राच्या मागासवर्गीय आयोगाकडे पाठवायला लागतो. तुम्ही लोकांना संमत करू शकत नसाल तर गोंधळ निर्माण करा… या तत्त्वावर हे सरकार चालतं. वेळेवर आयोग स्थापन न झाल्यामुळे सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलं,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.*

स्तु ती चा झ ट का* डॉ. ल.म.आसबे (कामधेनु परीवार)

📍📍📍📍📍📍📍
*स्तु ती चा झ ट का*
📍📍📍📍📍📍📍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माणूस स्वभावतः स्तुतीप्रिय आहे.
आपली केलेली किंवा झालेली स्तुती आवडत नाही, असा माणूस फार विरळ आहे.
*स्तुती ऐकायला गोड वाटत असली,*
*तरी धोकादायक असते.*
त्यामुळे ज्या ठिकाणी आपली स्तुती होते,
त्या ठिकाणी आपण
सतर्क आणि सावधान व्हायला हवे.
🏛️🏛️🏛️🏛️🏛️
👤स्तुती ऐकणारा माणूस पूर्णपणे मानसिकदृष्ट्या, स्तुती करणाऱ्याच्या आहारी जातो.
👤स्तुती करणाऱ्याला एकदा याची खात्री पटली, की स्तुती ऐकणाऱ्याला तो बळीचा बकरा करतो.
*या जगात निर्हेतुक आणि निःस्वार्थी स्तुती फक्त _आई_ आपल्या लेकराची करत असते,*
_ते तिचे *मातृप्रेम* असते, *मातृत्व* असते आणि *तेच देवत्व असते*._
⛳उपनिषदांनी मातृत्वाला
देवत्व संबोधून नमस्कार केला आहे.
*मा तृ दे वो भ व !*
याचा अर्थ निःस्वार्थी आणि निर्हेतुक स्तुती
एखाद्या व्यक्तीची करण्यासाठी
*आपल्या अंगी देवत्व यावे लागते*.
त्याशिवाय हे शक्य नाही.
💎💎💎💎💎
🎭 स्तुती आवडणारा
सामान्य मानव आहे .
🎭स्तुती न आवडणारा
विरक्त आणि वैरागी आहे.
🎯निर्हेतुक आणि निःस्वार्थी स्तुती करणारा
देव आहे.
🎭आपले स्वतःचे आत्मपरीक्षण केले असता,
आपल्याला हेच दिसून येते, की
*आपण स्वार्थाशिवाय आजपर्यंत*
*कोणाचीही स्तुती केलेली नाही.*
😇प्रसंगानुसार स्तुती करणे,
📍एक तर आपला नाईलाज असतो
📍किंवा ते अपरिहार्य असते
📍किंवा आपला निव्वळ तो स्वार्थ असतो.
⛳ _पारमार्थिक जीवनामध्ये त्यामुळेच स्वतःची स्तुती स्वतः आपल्या कानाने ऐकणे निषिद्ध समजलेले आहे_.
स्वतःची स्तुती स्वतः करणे
मूर्ख लक्षण समजले आहे.
*आपण आज पर्यंत असा मूर्खपणा बऱ्याच वेळेस केलेला आहे.*
💦💦💦💦💦💦
⁉️ स्तुती किती घातक असते⁉️
याचे ऐतिहासिक उदाहरण म्हणजे अफजलखान.
⛓️शिवरायांचे वकील अफजलखानाला भेटायला गेलेल्या पहिल्या भेटीपासून ते शिवरायांच्या भेटीपर्यंत त्याची स्तुतीच करत होते.
⛓️ स्तुती ऐकून ऐकून अफजलखान बेभान झाला, त्याचा विवेक संपला आणि शिवरायांच्या वकिलाच्या तो मानसिकदृष्ट्या पूर्ण कब्जात गेला.
⛓️प्रतापगडावर एकट्याने शिवाजीराजांना भेटायला यायला तो कबूल झाला आणि
⛓️शिवरायांनी चातुर्याने या स्तुतिसुमनांचा धूर्तपणे वापर करून, त्याला आपल्याला ज्या प्रमाणे, ज्या स्थळी पाहिजे, तसा फिरविला आणि आपला कार्यभाग पार पाडला.
_स्तुती न दिसणारे शस्त्र आहे, परंतु ते तलवारीपेक्षा जास्त परिणामकारक आणि घातक आहे._
आपला शत्रू आपल्यापेक्षा वरचढ असेल, तर त्याला _गनिमी कावा_ म्हणून हे वापरता येते आणि _स्वतःसाठी आत्मघातकी शस्त्र_ समजून कायमचे दूरही ठेवता येते.
आपल्या धूर्तपणावर आणि वापरावर
याचा परिणाम अवलंबून आहे.
⛳ *अनेकांची स्तुती आम्हा ब्रम्हहत्या l*
*एका वाचुनी त्या पांडुरंगा ll*
*आम्हा विष्णुदासा एकविध भाव l*
*न म्हणो त्या देव आणिकासी ll*

◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
✒️ *डॉ. आसबे ल.म.*✒️
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं.9822292713.📞

error: Content is protected !!