Home Blog Page 296

केंद्र सरकारकडून गव्हाची रेकॉर्डब्रेक खरेदी* *👉👉शेतकऱ्यांना 81,747.81 कोटी रुपये वर्ग*

केंद्र सरकारकडून गव्हाची रेकॉर्डब्रेक खरेदी*
*👉👉शेतकऱ्यांना 81,747.81 कोटी रुपये वर्ग*

*नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील गहू खरेदी सुरु करण्याचं काम सुरु आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, चंदीगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात आणि जम्मू काश्मीरमध्ये किमान आधारभूत किमतीला गव्हाची खरेदी केली जातेय.*

*👉4 जून 2021 पर्यंत किमान आधारभूत किमतीला 413.91 लाख मेट्रिक टन गहू शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला आहे. तर, 45 लाख 06 हजार शेतकऱ्यांकडून गव्हाची खरेदी करण्यात आलीय. शेतकऱ्यांना 81,747.81 कोटी रुपये देण्यात आले आहेत.*

*👉पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या गव्हाची विक्रमी खरेदी करण्यात आली आहे. पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर किमान आधारभूत किंमतीला गहू खरेदी करण्यात आला. मात्र, यावेळी एक राष्ट्र, एक एमएसपी आणि एक डीबीटी योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग होत आहेत.*

*👉धान उत्पादक शेतकऱ्यांकडून 4 जूनपर्यंत पर्यंत 805.21 लाख मेट्रीक टन धानाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये खरिप हंगामातील 706.93 लाख मेट्रीक टन तर रब्बी हंगामातील 98.28 लाख मेट्रीक टन धानाची खरेदी करण्यात आलीय. किमान आधारभूत किमतीला 119.42 लाख शेतकऱ्यांकडून 1 लाख 52 हजार 022 कोटी रुपयांच्या धानाची खरेदी करण्यात आली आहे.*

*👉सन 2020-21 च्या खरिप हंगामात उत्पादित झालेल्या डाळींची देखील विक्रमी खरेदी सरकारी खरेदी केंद्राद्वारे करण्यात आलीय. मूग, उडीद, तूर, चना, मसूर, भुईमूग,सोयाबीन इत्यादी डाळींची 7 लाख 51 हजार 279 मेट्रीक टन खरेदी करण्यात आली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, हरियाणा आणि राजस्थान मधील 4 लाख 43 हजार 928 शेतकऱ्यांकडून 3 हजार 928.39 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे.*

लहान मुलांचे आजार आणि उपचार–प्राध्यापक धनंजय देशमुख सर

*लहान मुलांचे आजार आणि उपचार—*
*१)सर्दी- पडसे (कफ)*
🕉 *ओम धन्वंतरैय् नम:*🕉.
*व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*
मार्गदर्शक
*ह.भ.प.बंडातात्या कराडकर*
प्रेरणा
*राष्ट्रबंधू शहीद राजीव दिक्षित*
🍉🏃‍♂️🍍🏃‍♀️🍑
*चळवळ आरोग्याची*
*भाग-३७*
( ४था रविवार फेब्रुवारी २०२१)
*सर्दी-पडसे*

वातावरणातील बदलामुळे मुलांमध्ये सर्दी आणि कफ याचा त्रास होतो. डॉक्टरांकडे जाऊन औषध घेणे हा त्यावरील उपाय आहेच. वारंवार कफ सिरप आणि औषधं घेणे योग्य नाही. काही वेळा घरगुती उपायांनीदेखील सर्दी बरी होऊ शकते. किंवा औषधांसोबत हे उपाय केल्यास लवकर आराम मिळू शकतो. घरच्या घरी आपण पुढील उपाय करु शकतो
*उपचार*😄✔️
👉काळे मनुके १० रात्री फुलपात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी कुस्करून त्यामध्ये त्रिफळा (हिरडा१-बेहडा२-आवळा३ भाग) १/२ चमचा चूर्ण टाकून पिणे त्यामुळे पित्तदोषसह रक्तदोषही दूर होतो.
👉 रात्री १/२ चमचा हिरडा चूर्ण १फुलपात्रभर कोमट पाण्यात मिसळून पिणे.
👉 एक चमचा तुळशीच्या पानांचा रस व १चमचा आल्याचा रस घेऊन त्यात १चमचा मध मिसळून दिवसातून २वेळा घ्यावा.
👉रात्री झोपण्यापूर्वी १तास अगोदर एक ग्लास कोमट पाणी प्यावे नंतर झोपण्यापूर्वी १०मिनिटे अगोदर अंदाजे १००ग्रँम गुळ खावा त्यानंतर पाणी पिऊ नये फक्त चूळ भरावी.
👉 रोज सकाळी १० तुळशीची पाने व २/३काळी मिरी याचा काढा घेतल्याने कधीच सर्दी होत नाही.
👉लहान बाळांना सर्दी व खोकला झाला असेल तर १ छोटा कांदा (मिळाल्यास पांढरा) बारीक चिरून घ्यावा. तोच कांदा ३ कप पाण्यात उकळत ठेवा. तो काढा उकळून अर्धा झाल्यावर त्याला पिवळा रंग येईल. त्यात थोडी चवीपुरती साखर/गुळ घालून तो काढा दिवसातून ३-४ वेळा गरम किंवा कोमट करून बाळाला पाजावा. ह्या काढ्यामुळे छातीत साठलेला कफ उलटी होऊन किंवा शौचावाटे बाहेर पडतो. छातीतून येणारा आवाज बंद होतो.
👉 तुळशीची ४/५ पाने, ३ लवंगा, २ वेलदोडे, आल, दालचिनीचे छोटे तुकडे, थोडासा गवती चहा, ४ कप पाण्यात उकळा. पाण्याचा रंग बदलला की त्यात गुळ घाला आणि हा काढा प्यायला द्या. ( हा काढा २ वर्षावरील मुलांना अर्धा कप ह्या प्रमाणात दिवसातून २ वेळा प्यायला द्या.)
👉 डोक्यात सर्दी भरलेली असेल आणि डोके दुखत असेल तर वेखंड पूड थोडयाशा पाण्यात कालवून कपाळावर लावावी. सर्दी उतरण्यास मदत होते.
👉 सर्दीमुळे छातीत कफ साठत असेल तर रात्री १ग्लासभर पाण्यात देशी झेंडूची फुले सुट्टी करुन टाकावी सकाळी ते पाणी गाळून प्यावे कफ शौचावाटे बाहेर पडतो.
👉लहान बाळांच्या छातीत कफ साठून त्रास होत असेल तर २ कप पाण्यात १ चमचा जवस कुटून घालावा. या काढ्यात खडीसाखर/गुळ घालून उकळून हा काढा कोमट करून ३/४ वेळा बाळांना द्यावा. याने कफ बाहेर पडतो.
👉कोरडया खोकल्यासाठी जेष्ठ-मधाची बारीक पूड आणि साजूक तूप हे एकत्र करून त्याच्या छोटया गोळ्या करून उबळ आल्यानंतर चघळण्यासाठी देऊ शकतो. (४ वर्षाखालील मुलांना द्यावा)
👉 ओवा गरम तव्यावर टाकून त्याची धूरी मिनिटे नाका तोंडावाटे घ्यावी.
👉 रात्रीच्या वेळी नियमितपणे देशी गाईचे तूप किंवा पंचगव्य नस्य १/२थेंब नाकात टाकणे.
👉 वारंवार सर्दी होत असेल तर रात्री झोपताना मोहरीचे तेलाचे २/४थेंब नाभीमध्ये टाकणे तसेच शौचाच्या जागेवर लावणे.

😄✔ *पथ्य(खावे)*
मूग,नारळ पाणी,तांदुळसा भाजी, गाजर,पालक,मेथीची भाजी,लसूण,कांदा, हळद आल,मध,कारले, दुधी भोपळा, डाळिंब, पपई,मुळा,द्राक्षे,नारळाचे पाणी, मनुका, खारीक,अंजीर सफरचंद, मोसंबी, आवळा,मध व कोमट पाणी उत्तम ,गुळ, खडीसाखर,सैंधव मीठ,घाण्याचे तेल
😡❌ *अपथ्ये(खाऊ नये)*
दुध,ताक,कैरी,सिताफळ, केळी, लिंबू,खरबूज, पेरू, आंबट पदार्थ चहा,काँफी,पेप्सी, कोकाकोला सारखे थंड पेय.मैदा व त्याचे पदार्थ. फ्रीजमधील पदार्थ.तळलेले पदार्थ,रिफाईंड तेल.साखर व त्याचे पदार्थ.

*प्रा धनंजय शामराव देशमुख*
अकलूज(वडापुरी ता.इंदापूर)
*श्री श्री योग व निसर्गोपचार केंद्र अकलूज*📞९२६०७१०७१०
deshmukhvyasanmukti@gmail.com
🙏👇🌹🙏👇🌹🙏👇

मी_उजनी_धरण_बोलतोय.

मी_उजनी_धरण_बोलतोय….

होय मी उजनी धरणच बोलतोय ! आज जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या तोंडी माझे नाव ऐकलं म्हणून बोलावं म्हणलं मी पण जरा. मला सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखले जाते, पण अनेकदा जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या वादाचे केंद्रबिंदूही मीच राहिलो आहे.

७ मार्च १९६६,
मला आजही तो दिवस आठवतो जेंव्हा सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या भीमेच्या (चंद्रभागा) पात्रावरील माझं भूमिपूजन सुरु होतं. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू होता. नाईक यांनी नारळ वाढवला आणि यशवंतराव चव्हाण कुदळ मारण्यासाठी पुढे झाले अन त्यांच्या डोळ्यात पाणी आले. धोतराचा सोगा डाव्या हाताने उचलून धरत त्यांनी कुदळ खाली टाकली. थोडेसे पुढे सरसावले. नदीपात्राच्या दिशेने दोन्ही हात जोडून ते उभे राहिले. गदगदलेल्या आवाजात ते बोलले, “विठ्ठला मला माफ कर बाबा, मी औचित्यभंग करतोय. तुझी चंद्रभागा मी अडवलीय मला पदरात घे !” त्यांच्या कृपा दृष्टीमुळेच आज माझे अस्तित्व आहे. खरंतर दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची महाराष्ट्राला कधीच वाणवा नाही; परंतु आजच्या साठमारीच्या राजकारणात ‘दूरदृष्टी’ या शब्दाला महत्व राहिले आहे का तुम्हीच सांगा.

१९८० साली माझे बांधकाम पूर्ण झाले. मला स्वत:चे पाणलोट क्षेत्र नाही. मात्र, पुणे जिल्ह्यातील जवळपास १८ धरणांतून सोडलेले पाणी पुढे माझ्या पोटात जमा होते. सोलापूर जिल्ह्यातली अनेक मुलं पुण्यात शिक्षणासाठी आहेत. त्यांना आई- बाबा पुण्यात पाऊस पडला का म्हणून विचारतात. कारण याच पावसावर माझं आणि पर्यायाने तुम्हा सर्वांचं भवितव्य आहे. सुरवातीला पूर्ण क्षमतेने भरणारा माझा जलाशय आणि त्यातून या भागात बळीराजाच्या पाटात खळकळून वाहणारे पाणी पाहून माझ्या निर्मितीचे सार्थक झाल्याचे समाधान लाभायचे. कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा सोलापूर जिल्हा पुढे सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागल्याचा आजही मला गर्व आहे.

मुळात माझी निर्मितीच शेतकऱ्यांच्या डोळ्याचं पाणी पुसण्यासाठी झाली. पण माझ्या निर्मितीसाठी कैक जणांचे संसार उद्धवस्त झाले होते ते ही तितकेच खरे म्हणा !

माझी राज्यात सर्वाधिक ११७ टीएमसी एवढी प्रचंड पाणी साठवण क्षमता. गेल्या ४० वर्षांत माझ्या पोटातुन पाण्याचा पुरेपूर वापर तुम्ही सर्वांनी केला. पण गेल्या चाळीस वर्षात त्या पाण्यासोबत आलेला किती गाळ माझ्या पोटात साचला असेल? जलतज्ज्ञांच्या मते माझ्या पोटात ४२ टीएमसीचा गाळ जमा झाला आहे. माझ्या नाका तोंडात गाळ जाऊन मी गुदमरतोय. माझा श्वास कोंडतोयच पण तुम्हा सर्वांचा श्वास ज्यावर चालू आहे त्या पाण्याची साठवण क्षमता सुमारे ४२ ते ४३ टीएमसी एवढी कमी झाली आहे हे खूप चिंताजनक आहे. पावसाळ्यात माझा पाणीसाठा शंभर टक्‍क्‍यांवर भरूनही उन्हाळ्यात पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ तुम्हा सर्वांवर येते. तसेच माझी ११७ टीएमसी पाणी क्षमता असली तरी, माझ्या पोटात आतापर्यंत ४० ते ४२ टीएमसी एवढा गाळ जमा झालेला आहे, असे गृहीत धरून तेवढ्या क्षमतेचे पाणीही त्यात मोजले जाते. पुणे शहराला दोन वर्षे पाणी पुरेल इतकी जागा गाळाने माझ्या पोटात व्यापली आहे.

६० टक्के वाळू व ४० टक्के माती अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या साह्य़ाने धरणात पाणी असतानादेखील काढता येऊ शकते असे तज्ञाचे म्हणणे आहे. त्याचा विचार करता माझ्या पोटातील वाळूमिश्रित गाळ एकाचवेळी काढता येणे शक्य नाही तर दरवर्षी टप्प्या-टप्प्याने चार-पाच वर्षांत हा वाळूमिश्रित गाळ काढता येईल. यात दरवर्षी हजारो कोटींचा महसूल शासनाज्या तिजोरीत जमा होईल.

माझ्या पाणीवाटपाचे नियोजन तर सातत्याने वादग्रस्त ठरत आहे. याला कारणीभूत ठरत आहे, प्रत्येक वर्षी निर्माण होणारी अवर्षणग्रस्त स्थिती आणि पाण्याची वाढती मागणी. मात्र या सर्व घडामोडींमध्ये माझे संवर्धन करण्यासाठी काहीच उपाययोजना होताना दिसत नाही. माझ्याकडून पाण्याची मागणी प्रत्येक वर्षी वाढत आहे. त्यामुळे माझ्याकडील पाण्याचा एकेक थेंब आज महत्त्वाचा ठरत आहे. अशा स्थितीमध्ये गाळ काढल्यानंतर वाढणाऱ्या पाण्याचे महत्त्व लक्षात येणार आहे. माझा उपयुक्त साठा ५३.५७ टीएमसी असताना पाणी वाटपाचे नियोजन मात्र ८३.९४ टीएमसीचे होते.

म्हणूनच आज तुम्हा सर्वांशी बोलावे वाटले. मला सोलापूर काय, इंदापूर काय किंवा मराठवाडा काय सर्वजण सारखेच. पण मला माफ करा, इथून पुढे मी तुम्हा सर्वांची तहान भागवू शकेन असे मला वाटत नाही. एकतर गाळाने माझा श्वास कोंडत चालला आहे, आणि दुसरे म्हणजे सर्वांची तहान भागवण्यासाठी माझ्या पोटात अजून जास्तीचे पाणी येणे गरजेचे आहे. कृष्णा-कोयनेचे वाहून जाणारे पाणी जर तुम्ही मला दिले तर इथून पुढे कोणालाच रस्त्यावर उतरू देण्याची वेळ मी येऊ देणार नाही. लेकरांनो आज माझ्या नावाने तुम्ही पाणी वाचवण्यासाठी संघर्ष समिती काढली ! तसं मला वाचवण्यासाठी एखादी समिती काढता आली तर बघा एवढंच माझं म्हणणं तुम्हाला आज सांगायचं होतं !

या अनुषंगाने बोलू वाटते की नावापुरते शेतकरी आणि शेतीविषयक प्रश्नांचे राजकारण करून सत्तेत येणे हा अलीकडील काळात राजधर्म होऊ पाहतोय. अशा प्रसंगी बहुपेडी व्यक्तिमत्वाच्या आणि लोककल्याणाची खरी तळमळ असणाऱ्या, माझ्या जलाशयात पाणी आणण्याची, पोटातील गाळ काढण्याची दूरदृष्टी ठेवणाऱ्यांनी एकत्र या आणि मला वाचवा !

तुमचाच *यशवंतसागर जलाशय* !
उजनी धरण !!

(लिखान copy)

ब्रिटनमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी Pfizer च्या लशीला मंजूरी*

*👉कोरोनाने जगात कहर केला आहे.अनेक देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहे. या लाटेत लहान मुले सर्वाधिक बाधित होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लशीकरणाचा देखील विचार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी Pfizer लशीला मंजूरी मिळाली आहे.ब्रिटनने १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी Pfizer-BioNTech द्वारे बनवलेल्या कोरोना लस वापरण्यास मान्यता दिली आहे.*

*👉ब्रिटनच्या ड्रग रेग्युलेटरने शुक्रवारी सांगितले की, सखोल आढावा घेतल्यानंतर असे आढळले की Pfizer-BioNTech ची लस १२-१५ वर्षांच्या किशोरवयीन मुलांसाठी सुरक्षित आहे.अमेरिकेने आणि युरोपियन संघानेही फायझरच्या लशीसाठी असेच मूल्यांकन केले होते.मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीचे प्रमुख जून रेने म्हणाले, “आम्ही १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमधील क्लिनिकल चाचण्यांविषयीच्या डेटाचे काळजीपूर्वक परीक्षण केले आणि Pfizer-BioNTech सुरक्षित तसेच उपयुक्त असल्याचे आम्हाला आढळले. या व्यतिरिक्त या लसीचे बरेच फायदे आहेत आणि कोणताही धोका नाही.”भारतामधील करोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेप्रमाणेच अधिक घातक असू शकते.तिसऱ्या लाटेचे देशावर गंभीर परिणाम होतील अशी शक्यता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआयने) नुकत्याच जारी केलेल्या आपल्या अहवालामध्ये व्यक्त केलीय. इतर देशांमध्ये तिसऱ्या लाटेत काय घडलं याचा संदर्भ देत भारतामधील यंत्रणांना या अहवालामधून सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. इकोरॅप नावाच्या या अहवालामध्ये कोरोना कालावधीत अर्थव्यवस्थेने कशी कामगिरी केली यासंदर्भातही भाष्य करण्यात आलं आहे.*

*👉एसबीआयच्या या अहावालामध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्या मोठ्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट १०८ दिवसांपर्यंत होती त्या देशांमध्ये तिसरी लाट सरासरी ९८ दिवसांपर्यंत टीकली. तसेच इतर देशांमधील ट्रेण्ड पाहिल्यास तिसऱ्या लाटेमध्ये दुसऱ्या लाटेपेक्षा १.८ पट अधिक रुग्ण आढळून येतील. जागतिक स्तरावर दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या लाटेपेक्षा ५.२ पट अधिक रुग्ण आढळून आले होते. भारतामध्ये मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ४.२ टक्के अधिक रुग्ण आढळून आलेले. ही सराकरी जागतिक सरासरीपेक्षा कमी होती.*

error: Content is protected !!