Home Blog Page 293

अज्ञानाची कबुली* डॉ. ल.म.आसबे ( कामधेनु परिवार)

*अज्ञानाची कबुली*

_*आपल्याला काही कळत नाही, हे ज्याला मनापासून मान्य असते*, त्यालाच जीवनात अपेक्षित असलेले ज्ञान सहज प्राप्त होते_.
ज्ञान मिळवण्यासाठी
हाच खरा मूलभूत अधिकार आहे.
*माणूस स्वतःच्या अज्ञानाला जेवढा घाबरत नाही, त्याच्यापेक्षा जास्त _आपले अज्ञान लोकांना कळेल_ यासाठी घाबरत असतो.*
जीवनातील कोणतेही अज्ञान हानीकारकच असते, म्हणून माणसाने शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानी होण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
समाजामध्ये _सर्वज्ञ_ असणारी माणसे
अतिशय विरळ असतात,
_अल्पज्ञानी_ काही प्रमाणात असतात आणि
_अज्ञानी_ सर्वात जास्त असतात. हे _एकदा आपल्या मनाने समजून घेतले, तर_
_आपल्याला आपल्या अज्ञानाची लाज वाटत नाही_
↘️ज्याला समजत नाही,
त्यालाच समजावून सांगितले जाते,
↘️ज्याला कळत नाही,
त्यालाच जाणते केले जाते. त्यामुळे
_ज्याच्याकडून आपल्याला ज्ञान मिळणार आहे, अशा गुरुसमोर आपण नेहमी आपले अज्ञान कबूल करावे_.
👤माणसे आपला स्वतःचा प्रभाव (इम्प्रेशन) पाडण्यासाठी, आपले अज्ञान लपवून आपण ज्ञानी असल्याचा आव आणत असतात.
🎓आपल्याला शिकवणारा गुरु
त्या क्षेत्रातला बाप असतो.
त्याला आपल्यातील कमीपणा, न्यूनत्व,अज्ञान स्पष्ट दिसत आणि समजत असते.
आपले ढोंगही त्याला समजत असते.
🎓अशा वेळी गुरु मौन धारण करतात आणि
आपल्यालाच बोलू देतात.
_समोरचा मौन धारण करून आपल्याला ऐकतोय, याचा अर्थ आपण त्यांना जिंकले असे होत नाही, तर ते त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून आपल्याला समजून घेत असतात आणि आपण जसे आहोत तसे आपल्याला स्वीकारत असतात_.
याला सुधारण्याची आणि ज्ञानी होण्याची
वेळ अजून आलेली नाही,
असे समजून ते शांत राहतात.
*आपल्या जीवनातील*
*हा सर्वात तोट्याचा काळ असतो.*
अज्ञानी असुनही आपण खूप शहाणे आहोत, हे पटविण्यासाठी असा तोटा आपण जीवनामध्ये खूपवेळा केलेला असतो आणि करत असतो, म्हणूनच _आपण ज्ञानी होण्यासाठीचा राजमार्ग आपल्यासाठी बिकट करून ठेवलेला असतो किंवा बंद केलेला असतो._
जगात ज्ञान क्षणोक्षणी, पदोपदी देणारे
गुरु आपल्याला भेटत असतात.
त्यात काही जड असतात, तर
काही चेतन असतात.
⛳ब्रम्हमुर्ती असलेल्या श्री दत्तात्रयांनी चोवीस गुरु केले. त्यात जड आणि चेतन असे सर्वच प्रकार आहेत.
_भगवंताचा अवतार असून, प्रत्यक्ष परब्रम्ह असूनही श्री दत्तात्रयांना चोवीस गुरुंची गरज का भासली_⁉️
या प्रश्नाचे चिंतन केले, तर
आपल्या लक्षात येईल की
आपल्याला ज्ञानाची गरज शेवटपर्यंत आहे.
प्रत्यक्ष परब्रम्हाला चोवीस गुरूंची गरज लागली,
⁉️आपल्याला किती गुरूंची गरज लागेल⁉️
याचा विचार करा आणि
मनापासून आपण अज्ञानी आहोत,
हे क बू ल क रा.
⛳⛳⛳
*ॐ नमो ज्ञानेश्वरा l करूणा करा दयाळा ll*
*तुमचा अनुग्रह लाधलो l पावन झालो चराचरी ll*
*मी कळाकुसरी काहीच नसे l*
*बोलतो वचने अतिभावीके ll*
*एका जनार्दनी तुमचा दास l*
*त्याची आस पुरवावी ll*
_शांतीब्रम्ह असलेले नाथमहाराज, विश्व माऊली ज्ञानदेवांसमोर आपले अज्ञान कबूल करतात,_ मग
आपल्याला ज्ञानी होण्यासाठी
प्रवासाचा किती पल्ला गाठायचा आहे⁉️
याची कल्पना येते.
🛕🛕🛕
*वाचावी ज्ञानेश्वरी l डोळा पहावी पंढरी ll*
*ज्ञान होय अज्ञानासी l ऐसा वर या टीकेसी ll*
*ज्ञानू होय मूढा l अतिमूर्ख त्या दगडा ll*
*वाचेल जो कोणी l जनी त्यासी लोटांगणी ll*
🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ *डॉ. आसबे ल.म.*✒️
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
🎓🎓🎓🎓🎓🎓
📞मो.नं.9822292713.📞

कर्तृत्वाला लागलेली कीड अहंकार डॉ. ल.म.आसबे (कामधेनु परिवार )

कर्तृत्वाला लागलेली कीड*
▶️ *_अहंकार_*
🪐🪐🪐🪐🪐🪐🪐🪐

अहंकाराचा जन्म आपल्या
कर्तृत्वातूनच होत असतो.
_जन्माला आल्यानंतर आपले *अस्तित्व, कर्तृत्व आणि अमरत्व* सिद्ध झालेच पाहिजे, हाच *खरा पुरुषार्थ* आहे, परंतु हे सर्व करत असताना, *ते अहंकारविरहीत होणे, हा प र म पु रु षा र्थ* आहे._
💬💬💬
आपली स्वयंम निर्मिती आपले
▶️ *अस्तित्व* सिद्ध करत असते.
आपल्या स्वतःला वजा करून,
जे उरत असते, ते आपले
▶️ *कर्तृत्व* असते आणि
आपल्या कर्तुत्वाचा जो भाग जगाला दिशा देण्यासाठी अनंत काळपर्यंत उपयोगी पडत असतो, ते आपले
▶️ *अमरत्व* असते.
आपल्या आयुष्यामध्ये आपण ✊🏾स्वकर्तुत्वाने जे मिळवत असतो, त्याचा नाश आपल्याच अहंकाराने आपण स्वतः करत असतो.
_जोपर्यंत कर्म फळाची अपेक्षा आहे, तोपर्यंत कर्माचा अहंकार निर्माण होण्याची पार्श्वभूमी आपल्या अंतःकरणात तयार होत असते_. याचा अर्थ
_*अहंकारविरहीत होण्यासाठी*_
जीवनातील पहिल्यांदा
▶️ *आशा आणि अपेक्षा*
संपविल्या पाहिजेत.
या संपल्याशिवाय आपल्या जीवनात कोणतेही
▶️ *वैराग्य* शक्य नाही आणि
वैराग्याशिवाय जीवनात मनापासून
▶️ खरा *त्याग* घडत नाही.
ज्याठिकाणी त्याग आहे, त्या ठिकाणी
▶️ *अहंकाराचा नाश* आहे.
त्यागी वृत्ती अंतःकरणात निर्माण होण्यासाठी
▶️ *सत्याचा परिचय* आपल्याला व्हावा लागतो.
सत्य आणि असत्य यातला भेद
▶️ विवेकाने कळतो आणि
_विवेक/wisdom हा सत्संगतीने, ग्रंथसंगतीने, चिंतनाने आणि साधनेने जीवनात तयार होत असतो_.
ज्या व्यक्तीच्या जीवनात या गोष्टी कधी येतच नाहीत, त्यांना आपण अहंकारी आहोत, हेच समजत नाही आणि जे समजतच नाही ते कधीच मान्य होत नाही. *अशा लोकांचा अहंकार मरेपर्यंत जात नाही.*
🔲🎭🔲
आपल्या जीवनातील
*अहंकारविरहीत अवस्था*
ओळखण्याची एकच निकष आहे
आणि तो म्हणजे *नम्रता*.
🙏🏻जीवनातील अहंकार गेल्याशिवाय आपल्या कोणालाही नम्र होता येत नाही.
🙏🏻नम्रता ही अहंकारापेक्षा अतिशय
बलवान असते. नम्रतेची ताकद
🛕 तुकोबाराय वर्णन करतात,
*नम्र झाला भूता l त्याने कोंडिले अनंता ll*
*हेच शूरत्वाचे अंग l हरि आणिला श्रीरंग ll*
🙏🏻नम्रता आपल्याला
बलवान बनवत असते आणि
अहंकार आपल्याला
मानसिक रोगी बनवत असतो.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

आई-वडिलांच्या नजरेतील* *आ प ला मि त्र*

*आई-वडिलांच्या नजरेतील*
*आ प ला मि त्र*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आपल्या जीवनात मित्राचे स्थान अनन्यसाधारण आहे, परंतु _जिवाभावाचे मित्र_ संख्येने फार कमी असतात, कदाचित यासाठी भाग्य असावे लागते.
*जीवाभावाचे* या शब्दातच
त्या मित्रांची उंची सामावलेली आहे.
*जिवाचा मित्र* याचा अर्थ
जो जिवाशी जोडलेला आहे, देहासी नाही.
↘️ _जो जिवाचा आहे_, तो आपल्यासाठी स्वतःचा जीवही द्यायला तयार असतो आणि आपणही त्याच्यासाठी आपला जीव द्यायला तयार होतो, हा जीवाचा मित्र आहे.
↘️ *भावाचा* म्हणजे अंतःकरणातील मित्रत्व भावाने जोडलेला दोस्त.
↘️यामध्ये दो म्हणजे दोन शरीरांचा
अस्त होऊन भावनेने एकरूप झालेला,
↘️आपल्याशी अद्वैत साधलेला, जो
आपला असतो, तोच दोस्त असतो, म्हणून
*जीवनामध्ये जिवाभावाचा जो असतो,*
*तोच आपला खरा मित्र असतो.*
बाकीचे सगळे मित्र
गरजेपोटी, स्वार्थापोटी, लाचारीपोटी
आपले मित्र झालेले असतात.
_अशा मैत्रीचे सोंग घेतलेल्या मित्रांमध्ये आणि जीवाभावाचे मित्रांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो._
*हा फरक वेळीच ज्यांच्या लक्षात येत नाही, त्यांच्या जीवनात _मैत्रीइतका तोटा आणि धोका_ कशातच होत नाही.*
अशा बेसावध व्यक्तींचा गळा
नेहमी मित्राकडूनच कापला जातो,
मग ते क्षेत्र कोणतेही असो.
अशा बेसावध व्यक्तींचा घात
मित्राकडून ठरलेलाच असतो.
⛳विश्व माऊली ज्ञानदेव म्हणतात,
*जववरी रे तववरी मैत्रत्व संवाद l*
*जव अर्थेसी संबंध घडला नाही बाप ll*
🦩
अशा घातकी मित्रांचा डाव नेहमी आपल्या आईवडिलांच्या लक्षात येत असतो, परंतु 😓मुले आपल्या मित्रांविषयी आई-वडिलांकडून एकही अपशब्द ऐकायच्या मानसिकतेत नसतात.
आपल्या जीवनाचे हीत प्रामाणिकपणाने पाहणारे फक्त आई-वडील असतात.
*शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलाला धोक्यापासून वाचवण्याचा प्रयत्न फक्त आई-वडील करत असतात,* परंतु दुर्दैवाने मित्राच्या बाबतीत अशा बेसावध मुलांना ते कधीच खरे वाटत नाही.
🛕🛕🛕
*लेकुराचे हीत वाहे माऊलीचे चित्त ।*
*ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती ।।*
👤मित्रापासून असलेला धोका,👤
आई-वडिलांच्या लक्षात आला, तर
आई-वडील पदोपदी आपल्या मुलांना त्यापासून सावध करत असतात, धोक्याची जाणीव करून देत असतात, परंतु
मित्रप्रेमाने आंधळी झालेली मुले, “आई-वडिलांना माझा मित्र समजलाच नाही किंवा त्यांना ते समजतच नाही,” असा गैरसमज करून घेतात आणि सावध करणाऱ्या आई-वडिलांना हळूहळू अशी मुले आपल्या मित्रांच्या संबंधीची कोणतीही गोष्ट सांगायचेच टाळू लातात.
हा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा मुर्खपणा असतो, कारण _आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेत आपले सुख शोधणारे फक्त आई-वडील असतात._
त्यामुळे मुलांनी निःसंकोचपणे
आपल्या आई-वडिलांशी
प्रत्येक विषयाची चर्चा करायला हवी.
⚔️शिवरायांच्या जीवनात माँसाहेब जिजाऊंशी चर्चा केल्याशिवाय त्यांचे एक पाऊलही पुढे पडत नव्हते.
⚔️शिवरायांचे युगपुरुष होण्याच्या मागे मातृभक्त हा गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पाया आहे.
*_आई-वडिलांनी सावध केलेल्या आणि सल्ला दिलेल्या कोणत्याच गोष्टी दुर्लक्षित करण्यासारख्या नसतात_, हे मुलांनी आयुष्यभर लक्षात ठेवावे.*
🙏🏻ज्या दिवशी त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष होईल, त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने आपल्या भोवती असलेले _सुरक्षा कवच_ फेकून दिलेले असते आणि तेथून पुढचा काळ आपण सर्वात जास्त असुरक्षित झालेलो असतो.
जगाचा इतिहास पहा, तुम्हाला हेच चित्र दिसेल की _जगातील अनेक शूरांचे वीरांचे घात त्यांच्या जवळच्या गद्दार आणि ढोंगी मित्रांनीच केलेले आहेत किंवा अशा मित्रांमुळेच शत्रूला ते करता आलेले आहेत_.
ज्यांना आपण शत्रू समजतो अशा
शत्रूपासून आपण नेहमी सावध असतो,
परंतु ढोंगी मित्रांपासून आपण
नेहमी बेसावध असतो.
🦩
*शत्रु समोरुन वार करतो, परंतु घातकी मित्र पाठीमागून वार करतो आणि तो आपल्यासाठी निर्णायक असतो.*
आपण त्यातून कधीच स्वतःला सावरू शकत नाही आणि त्यातून पुन्हा उभारी घेऊ शकत नाही.
_ज्याला जिवाभावाचा मित्र आणि ढोंगी मित्र, यातला फरक समजत नाही, त्याने फक्त *आई-वडिलांचा सल्ला मनापासून स्वीकारावा आणि कृतीत आणावा*, जीवनात कधीही धोका होणार नाही._
जिवाभावाचा मित्र आणि ढोंगी मित्र,
यातला फरक आपल्यापेक्षा आपल्या
आई-वडिलांना अनुभवाने जास्त कळत असतो.
*जगातील कोणतेही आई-वडील आपल्या पासून आपल्या जिवाभावाच्या मित्राला कधीच तोडत नाहीत, _त्यांना तोडायचे असते, ते फक्त ढोंगी आणि घातकी मित्रांनाच_.* म्हणूनच
उपनिषदे या दोघांना नमस्कार करतात.
*मा तृ दे वो भ व ।*
*पि तृ दे वो भ व ।*
🎓🎓🎓🎓🎓🎓
*डॉ. आ स बे ल. म.*

कामगार उपायुक्त कार्यालयाच्या जनजागृतीपर चित्ररथाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ*

कामगार उपायुक्त कार्यालयाच्या जनजागृतीपर चित्ररथाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ*

राज्यातून बालकामगार प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने समाजाच्या विविध घटकांमध्ये या प्रथेविषयी जनजागृती करण्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयामार्फ़त जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त कामगार उपायुक्त कार्यालयाच्या जनजागृतीपर चित्ररथाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पुणे विभागाचे कामगार आयुक्त शैलेश पोळ, कामगार उपायुक्त अभय गिते, सहायक कामगार आयुक्त निखील वाळके, मु.अ.मुजावर, विशाल घोडके, सरकारी कामगार अधिकारी दत्तात्रय पवार, श्रीमती अत्तार उपस्थितीत होते.
जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर चित्ररथ पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात फ़िरवून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच विविध आस्थापना मालक, औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी, हॉटेल असोसिएशनचे प्रतिनिधी, मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्सचे प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी यांची झूम मिटींग आयोजित करून बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधि. १९८६ यांच्या तरतूदी विषयी माहिती देण्यात आली. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर बालकामगार प्रथेविरूद्ध जास्तीत जास्त डिजिटल माध्यमातून प्रसार व जनजागृती करण्यावर भर देण्यात येत असल्याचे कामगार आयुक्त शैलेश पोळ यांनी सांगितले.

स्पर्धा स्वतःशी डॉ. ल.म.आसबे(कामधेनु परीवार)

*स्पर्धा स्वतःशी*

आपण इतरांशी स्पर्धा करण्याऐवजी नेहमी स्वतःशीच स्पर्धा करावी, याचा निश्चित आपल्याला फायदा झाल्याशिवाय रहात नाही. दुसऱ्याबरोबर स्पर्धा करण्याला मर्यादा आहेत, समोरचा जसा आहे, त्याच्यापेक्षा आपण चांगले झालो, की त्याच्याबरोबरची स्पर्धा संपते, परंतु स्वतःबरोबरची स्पर्धा शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवता येते.
आज आपण जसे आहोत किंवा या क्षणाला जसे आहोत, त्याच्यापेक्षा जास्त चांगले, पुढच्या क्षणाला करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतः स्वतःशी स्पर्धा करणे आहे.
माणसाचा भूतकाळ आणि इतिहास हा नेहमी अशा स्वतःशी स्पर्धा करणाऱ्या माणसाला मार्गदर्शक ठरतो, गुरु ठरतो. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांविषयी पश्चाताप करून घेण्याऐवजी त्यांना आपला अनुभव म्हणून स्वीकारला, तर घडून गेलेल्या प्रत्येक घटनेतून आपल्याला शहाणपण येत गेलेले असते.
*अनुभवातून येते ते खरे शहाणपण असते आणि या शहाणपणातूनच आपला व्यक्तिमत्व विकास होत असतो.*
व्यक्तिमत्व विकास, ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे, परंतु ती क्रियाशील व्यक्तीच्या जीवनातच चालू असते, निष्क्रिय माणसांना विकासाची किंमतच नसते.
आपली स्पर्धा आपल्याशीच सुरू करायची असेल किंवा सुरू ठेवायची असेल, तर दररोज स्वतःला तपासले पाहिजे, म्हणजे आत्मनिरीक्षण आणि परीक्षण केले पाहिजे. आपली या क्षणाची अवस्था, त्याशिवाय आपल्याला समजत नाही. या क्षणाला आपल्यात जी कमजोरी आहे, जे दोष आहेत, ते दिसले तरच दूर करता येतील आणि हे स्वतःला तपासल्याशिवाय समजत नाहीत. पुढच्या क्षणाला मी सक्षम आणि निर्दोष असेल याच्यासाठी अखंड प्रयत्नशील राहण्याची वृत्तीच माणसाला स्वतःशी स्पर्धा करायला भाग पाडते.
आपल्या जीवनातील व्यक्तिमत्व विकास दुसऱ्याकडे पाहून आपण करत असू, ठरवत असू, याचा अर्थ बहिर्मुख होऊन ठरवत असू, तर तो कधीही तपासून पहा, अपूर्णच असणार. आपला व्यक्तिमत्वविकास हा आपल्या स्वतःकडे पाहून, तपासून, अंतर्मुख होऊन, आपण करत आणि ठरवत असू, तर तो खऱ्या अर्थाने परिपूर्ण व्यक्तिमत्व विकास असतो कारण *आपल्यातील कमजोरी आणि दोष आपल्याइतके कोणालाच माहीत नसतात.*
दुसऱ्याचा आदर्श घ्यायला हरकत नाही, परंतु स्पर्धा मात्र स्वतःशीच असावी. दुसऱ्याशी स्पर्धा केली तर मत्सर, ईर्षा, द्वेष हे दोष निर्माण होतात, खरे तर हा व्यक्तिमत्वाचा विकास नसतो, तर ती अधोगतीच असते. आपण स्वतःशी स्पर्धा सुरू ठेवली, तर आपल्या अंतःकरणातील षड्विकारांचा आणि दोषांचा नाश होतो, आपले चित्त शुद्ध होते आणि ही खरी जीवनातील प्रगती असते.
*चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती l व्याघ्रही न खाती सर्प तया ll*
*विष ते अमृत आघात ते हीत l अकर्तव्य नीत होय त्यासी ll*
हा खरा व्यक्तिमत्व विकास आहे आणि तो स्वतःशी स्पर्धा करूनच प्राप्य आहे.
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.
मो.नं.9822292713.

भेद* डॉ. ल.म.आसबे(कामधेनु परीवार)

*भेद*
अंतःकरणात भेद आहे, तोपर्यंत
↘️तुलना, भीती आणि लाज निर्माण होते.
जेथे तुलना आहे, तेथे
↘️मत्सर आहे, स्पर्धा आहे, दंभ
आणि अहंकार आहे.
*आपण कोणापेक्षा तरी*
*कमी असतो किंवा जास्त असतो*,
_कमी असलो तर *मत्सर* निर्माण होतो_ आणि
_जास्त असलो तर *दंभ व अहंकार* निर्माण होतो._

_आपल्या सुखाचा, शांतीचा आणि समाधानाचा सर्वात मोठा शत्रू जर कोण असेल⁉️ तर ते *भय/Fear* आहे._
अंतःकरणात भय असेल, तर आपण प्राप्त असलेल्या कोणत्याही गोष्टीतला आनंद मनापासून आणि संपूर्णपणे घेऊ शकत नाही, मग देवाने आपल्याला आनंद देऊन सुद्धा तो आपल्यासाठी निरुपयोगी ठरतो.
◼️ *अं तः क र णा ती ल भय*
*अज्ञानामुळे निर्माण होत असते*, त्याचबरोबर
*स्वतःचे स्वरूप न कळल्यामुळे होत असते.*
◼️लाज निर्माण होण्यासाठी
भेदच कारणीभूत असतो.
⛓️स्त्री-पुरुष भेद, ⛓️उंच-नीच भेद,
⛓️गरीब-श्रीमंत भेद, ⛓️सौंदर्य-कुरूप भेद,
⛓️ज्ञानी आणि अज्ञानी यातील भेद,
या सर्व भेदाच्या ठिकाणी
आपली न्यूनता असेल, तर लाज निर्माण होते.
◼️लाजणारा माणूस, आपल्या जवळ सर्व प्रकारची क्षमता असूनही, स्वतःला कमजोर समजतो आणि त्याच्या जीवनातील शौर्याला प्रगट होण्यापासून परावृत्त होतो.
_तुलना, भय आणि लाज या तिन्ही गोष्टी आपल्या प्रगतीला आणि समृद्धतेला हानिकारक आहेत._
भौतिक, संसारिक आणि व्यवहारिक पातळीवरून यांना आपण कधीच संपवू शकत नाही.
जोपर्यंत आपण यांना संपवत नाहीत, तोपर्यंत _विकाररहित_ होऊ शकत नाही आणि
जोपर्यंत विकार आहेत तोपर्यंत
आपण _समतेत_ येऊ शकत नाही.
_जेथे समता नाही, तेथे भेद आहे. यामुळे कितीही मोठा संसार आणि प्रपंच केला तरी माणूस सुखी होऊ शकत नाही._
🛕🛕🛕
*संसाराचे अंगी अवघीच व्यसने l*
*आम्ही या कीर्तने शुद्ध झालो ll*
*आता हे सोहळे झाले त्रिभुवन l*
*विषम धोवोनि सांडियेले ll*
विषमता म्हणजेच भेद गेल्याशिवाय आपल्याला शुद्ध आणि पवित्र होता येत नाही. याचा अर्थ
*भेद म्हणजे विषमता,*
*हा जीवनातील खरा विटाळ आहे* आणि
*समता हेच जीवनातील खरे सोवळे आहे*
अंतःकरणातून भेद म्हणजेच
वि|ष|म|ता,
ही फक्त परमार्थिक उपायाने,
सा|ध|ने|ने संपविता येते.
समतेत येण्यासाठी
आ|त्मि|क पातळीवर यावे लागते
आणि आत्मिक पातळी
अ|ध्या|त्मा|शिवाय शक्य नाही, म्हणूनच
_परमार्थात सुख आहे आणि आत्मिक पातळीवर सर्व सुख आहे, असे म्हटले जाते._
🛕🛕🛕
*ऐसा ज्याचा अनुभव l विश्वदेव सत्यत्वे ll*
*देव तया जवळी असे l पाप नासे दर्शने ll*
*कामाक्रोधा नाही चाली l भूती झाली समता ll*
*तुका म्हणे भेदाभेद l गेला वाद खंडोनि ll*

🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ _*डॉ. आसबे ल.म.*_✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार_.
📞 मो.नं.9822292713.📞

error: Content is protected !!