Home Blog Page 286

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित*

*मुंबई :-धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या पाच जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुका जुलैला घेण्यात येणार होत्या. परंतु कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि डेल्टा प्लसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली आहे. ही घोषणा निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी येथे केली.*

*👉मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 ला मतदान होणार होते.परंतु 7 जुलैला राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.*

*👉सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलैचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-19 बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्या आधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असे मदान यांनी सांगितले.*

साखर एक  शरिरातील विष :- रामवर्मा आसबे

साखर एक  शरिरातील विष

डॉ. म्हणतात लापरवाही वगळता कोणीही कर्करोगाने मरणार नाही. *सर्वप्रथम साखर खाणे कमी करावे शरीरात साखर नसल्यास, कर्करोगाच्या पेशीचा नैसर्गिक मृत्यू होतो.*
साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला.
“त्याआधी *भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते* आणि कधीही आजारी पडत नव्हते.”
*साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या…*
(१) साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये *गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला.!*
(२) गंधक हा अत्यंत जड धातू असून *एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही.*
(३) साखर ही कॉलेस्ट्रॉल वाढवते. *कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.*
(४) साखरेमुळे शरीराचे *वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो.*
(५) साखर ही *रक्तदाब वाढवते.*
(६) साखर ही *मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.*
(७) साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. *माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.*
(८) साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये *तेवीस हानीकारक रसायने वापरली जातात.*
(९) साखर ही *मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.*
(१०) साखर हे *पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.*
(११) साखर ही *शरीरातील ट्राइ ग्लिसराइड* वाढवते.
(१२) साखर हे *अर्धांगवायुचा किंवा पक्षाघात झटका* अथवा *लकवा* होण्याचे एक मुख्य कारण आहे.
(१३) *कृपया आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर आजच्या आज करणे सुरू करा.*
*आपण कितीही व्यस्त असलात तरी, कृपया हे वाचण्यासाठी वेळ काढलात त्या बद्दल धन्यवाद.*🙏🌹
*वरील हितकारक माहिती आपल्या ओळखीची लोकं, आपले मित्र, नातेवाईक आणि इतर गटांना अवश्य पाठवा.*🙏🌹🧘‍♀️🧘‍♂️😷🇮🇳

स्वप्निल लोणकरच्या मृत्यूचे राजकारण करणे ठाकरे सरकारला महागात पडेल”- आमदार गोपीचंद पडळकर

“स्वप्निल लोणकरच्या मृत्यूचे राजकारण करणे ठाकरे सरकारला महागात पडेल”- आमदार गोपीचंद पडळकर

मे.न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करुन आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्याचा दाखला देत ठाकरे सरकार स्वप्निल लोणकरच्या मृत्यूचे राजकारण करत आहेत.
हे सरकारला निश्चितपणे महागात पडणार आहे , असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.
एम.पी.एस.सी.च्या तयारी करणारा युवक स्वप्निल लोणकरचा मृत्यू सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि चुकीच्या धोरणामुळे झाला आहे. मात्र सरकार या मृत्यूचे भांडवल करत आहे.
मे.न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करून स्वप्निलची नियुक्ती एस.ई.बी.सी.चे आरक्षण स्थगित झाल्यामुळे थांबल्याचे सरकारने सभागृहात सांगितले.
वास्तविक स्वप्निल लोणकर आणि एस.ई.बी.सी. आरक्षण याचा काळीमात्र संबंध नाही.
एस.ई.बी.सी.चे आरक्षण सोडून इतर विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्याबाबत मे.न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिली नाही.
पण, स्वप्निल लोणकर हा बहुजनाचा मुलगा आहे
म्हणून त्याला हे सरकार न्याय देत नाही,
असा आरोप गोपीचंद पडळकर त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलै २०२१ पर्यंत एम.पी.एस.सी.च्या सर्व जागा आम्ही भरु,
असे सभागृहात सांगितले आणि सभागृहातून बाहेर पडल्यानंतर एम.पी.एस.सी. सदस्यांच्या रिक्त जागा भरणार असल्याचे सांगितेल. अशा प्रकारे जनतेची दिशाभूल करण्याचे काम हे सरकार करत आहे.
याबाबत मुख्यमंत्री दोन शब्द देखील बोलायला तयार नाहीत.
हे पळपुटे मुख्यमंत्री आहेत, असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

केंद्रात ४३ मंत्र्यांच्या नावाची घोषणा;* *👉नारायण राणेंसहीत महाराष्ट्रातील चार खासदार झाले मंत्री*

केंद्रात ४३ मंत्र्यांच्या नावाची घोषणा;*
*👉नारायण राणेंसहीत महाराष्ट्रातील चार खासदार झाले मंत्री*

*नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांची यादी जाहीर झाली आहे.महाराष्ट्रातील भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यासहीत राज्यातील एकूण चार खासदारांना मंत्रीपद मिळालं आहे. तसेच आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे, ‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख पशुपती पारस, ‘अपना दला’च्या अनुप्रिया पटेल यांचाही मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये समावेश करुन घेण्यात आला आहे. हे सर्व मंत्री आज सायंकाळी मंत्रीपदाची शपथ घेतील असं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.*

*👉संसदेचं पावसाळी अधिवेशन होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ही चर्चा खरी ठरली असून, अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्यासह काही कॅबिनेट आणि काही राज्यमंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर दुसरीकडे काही राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काही मंत्र्यांची बढती (प्रमोशन) करण्यात आलं आहे. यात हरदीप पुरी, अनुराग ठाकूर, जी. किशन रेड्डी, किरन रिजिजू, मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला यांना बढती मिळाली आहे. राज्यमंत्री असणाऱ्या या नेत्यांना कोणती नवीन जबाबदारी देण्यात येणार हे यादी जाहीर करताना स्पष्ट करण्यात आलेलं नाही.*

*👉मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये समावेश करण्यात आलेल्या नेत्यांची यादी खालील प्रमाणे.*

१) नारायण राणे
२) कपिल पाटील
३) सर्वानंद सोनोवाल, (आसामचे माजी मुख्यमंत्री )
४) ज्योतिरादित्य शिंदे, (काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार)
५) रामचंद्र प्रसाद सिंघ
६) अश्विनी वैष्णव
७) पशुपती पारस (‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख)
८) किरन रिजिजू
९) राज कुमार सिंघ
१०) हरदीप पुरी
११) मनसुख मांडविया
१२) भुपेंद्र यादव
१३) पुरुषोत्तम रुपाला
१४) जी. किशन रेड्डी
१५) अनुराग ठाकूर
१६) पंकज चौधरी
१७) अनुप्रिया पटेल
१८) सत्यपाल सिंघ बाघेल
१९) रजीव चंद्रशेखर
२०) शोभा करंदलाजे
२१) भानू प्रताप सिंघ वर्मा
२२) दर्शना विक्रम जारदोश
२३) मिनाक्षी लेखी
२४) अन्नपुर्णा देवी
२५) ए. नारायणस्वामी
२६) कौशल किशोरे
२७) अजय भट्ट
२८) बी. एल वर्मा
२९) अजय कुमार
३०) चौहान दिव्यांशू
३१) भागवंत खुंबा
३२) प्रतिमा भौमिक
३३) सुहास सरकार
३४) भागवत कृष्णाराव कराड
३५) राजकुमार राजन सिंघ
३६) भारती प्रवीण पवार
३७) बिश्वेश्वर तूडू
३८) सुशांतू ठाकूर
३९) डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
४०) जॉन बिरला
४१) डॉ. एल मुरगन
४२) निशित प्रमाणिक
४३) डॉ. विरेंद्र कुमार

स्वप्नील लोणकर आत्महत्येच्या निषेधार्थ इंदापूर अभाविपची निदर्शने.*

*स्वप्नील लोणकर आत्महत्येच्या निषेधार्थ इंदापूर अभाविपची निदर्शने.*

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इंदापूर यांच्या वतीने स्वप्निल लोणकर या तरुणाच्या आत्महत्येच्या निषेधार्थ आय कॉलेज इंदापूर च्या समोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
स्वप्नील लोणकर हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता, पण सरकारच्या नाकर्तेपणामुळे व कुचकामी धोरणामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाचा बळी गेला आणि या सर्व प्रकाराला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे ,असा घणाघात अभाविप इंदापूर शहरमंत्री अजय चव्हाण यांनी केला. यापुढे तरी कोणत्याही विद्यार्थ्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून सरकारला जागे करण्यासाठी
अभाविप सहमंत्री अवधूत बाचल यांनी घोषणाबाजी करून राज्यसरकार वरती निशाना साधून तीव्र निषेध व्यक्त केला.
या वेळी अभाविप इंदापूर सहमंत्री भरत आसबे, दीपक जमदाडे व चैतन्य माळशिकारे इ.उपस्थित होते.

शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री, नारायण राणेंचं केंद्रीय मंत्रीपद निश्चित*

*👉👉सौ.निलमताई राणे,आमदार नितेश राणे व निलेश राणे देखील दिल्लीत दाखल*

*मुंबई, ०७ जुलै:-शिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करून आता भाजपात स्थिरावलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे. नारायण राणे यांचा एक शाखाप्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी सायंकाळी विस्तार करण्यात येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्या नावाची मंत्री पदासाठी वर्णी लागणार असल्याचे निश्चित समजले जात आहे.*

*👉शिवसेनेने मुख्यमंत्री केले:-*

*महाराष्ट्रात घडलेल्या 1991 च्या राजकीय नाट्यानंतर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि विधिमंडळातल्या विरोधीपक्ष नेतेपदाची संधी आमदार नारायण राणेंकडे चालून आली. त्यानंतर शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये राणे 1996 ला महसूल मंत्री झाले. या सरकारच्या शेवटच्या टप्यात मनोहर जोशी यांचा राजीनामा घेऊन 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या काळात राणेंना मुख्यमंत्री पदावर बसविण्यात आले.*

*👉शिवसेनाला सोडचिठ्ठी, आघाडीमध्ये महसूलमंत्री:-*

*1999 मध्ये राज्यात सत्तांतर झाले. काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडी सरकार आले. यावेळी राणे विरोधी पक्षनेते झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी 2003 साली महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड केली. त्यावेळी नारायण राणे प्रचंड दुखावले गेले. 2004 साली त्यांनी शिवसेना सोडत काँग्रेस मध्ये प्रवेश केला. मालवण विधानसभा मतदारसंघातून ते यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून विक्रमी मताने निवडून आले. त्यांची आघाडी सरकारमध्ये महसूलमंत्री पदी वर्णी लागली.*

*👉महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निशाण फडकावले:-*

*2009 मध्ये आघाडी सरकारमध्ये नारायण राणे यांच्याकडे उद्योग खातं देण्यात आलं. राणेंची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रिपदाची होती त्यामुळे ते काँग्रसमध्येही स्वस्थ नव्हते. शेवटी राणेंनी काँग्रेस सोडली आणि 2018 मध्ये स्वतःचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ काढला. याच दरम्यान नारायण राणे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर गेले. नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष सुद्धा भाजपमध्ये विलीन झाला. ऑक्टोबर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा विलिनीकरण सोहळा पार पडला.*

error: Content is protected !!