Home Blog Page 201

अनुलोमने मिळवून दिली रुग्णाला एक लाखाची मदत

अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात अनुलोम ही संस्था सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रभर काम करते एक जुलै 2016 पासून या संस्थेने आपल्या कामाला सुरुवात केली आणि आज पर्यन्त साडेचार लाखापेक्षा जास्त लाभार्थीना सरकारी योजना मिळवून देण्यात अनुलोमला यश मिळाले आहे. याच बरोबरीने अनेक शासकीय योजनांमध्ये सरकारच्या मदतीला जनसहभागाची साथ देण्याचे मोलाचे काम अनुलोमने वेळोवेळी केले आहे.
इंदापूर तालुक्यातील नागनाथ नामदेव पवार हे सध्या कर्करोगाने ग्रस्त असून सोलापूर येथे उपचार घेत आहेत, उपचारासाठी लागणार खर्च अधिक असल्याने त्यांनी आपल्याला शासकीय योजनेतून मदत मिळावी या हेतूने अनुलोमचे इंदापूर तालुका प्रमुख गोरख माने यांच्याकडे आपली व्यथा मांडली, श्री माने यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पवार यांची कागदपत्रे गोळा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सोमवार दिनांक 5 डिसेंबर रोजी मंत्रालय मुंबई येथे अनुलोमच्या रचनेतून प्रकरण जमा केले व चारच दिवसात अर्थात 9 डिसेंबर रोजी रुग्णाला 1 लाख रुपयाची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून करण्यात आली.
शनिवार दिनांक 10 डिसेंबर रोजी इंदापूर येथे रुग्णाचे पुतणे श्री विशाल पवार यांचेकडे मदतीचे पत्र सुपूर्द करण्याचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमात नागनाथ पवार यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी अनुलोम (slim) चे महाराष्ट्राचे सोशल मीडिया प्रमुख श्री शैलेन्द्र ठकार, अनुलोमचे इंदापूर तालुका प्रमुख श्री गोरख माने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंदापूर तालुका कार्यवाह श्री नाना घळके सर, पत्रकार सुरेशराव जकाते, संदीपजी सुतार याच बरोबरीने अनुलोमचे वस्तीमित्र श्री प्रवीण सलगर, श्री देवरज दूटाळ, श्री मछिंद्र खरात, श्री शहाजी सरडे, श्री प्रेमकुमार जगताप, श्री मयूर कळसाईट व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाद पेटणार? महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात नो एंट्री कर्नाटक सरकारचे पत्र

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अजूनच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सीमा प्रश्नासाठी राज्यातील दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.हे दोन्ही मंत्री 6 डिसेंबरला कर्नाटकातील बेळगावला भेट देणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असे पत्र कर्नाटक सरकारने महाराष्ट्राला पाठवले आहे. त्यामुळे हा वाद अजूनच वाढण्याची शक्यता आहे.*

*👉🅾️👉कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्र सचिवांना मंत्र्यांना बेळगावात पाठवू नये, अशा आशयाचे पत्र पाठवले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे पत्र पाठवण्यात आले आहे. सध्या सीमावाद प्रश्नावर तणाव असल्याने येणे टाळावे, असे कर्नाटकने म्हटले आहे. याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली आहे. मात्र, महाराष्ट्राचे दोन मंत्री बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत.*

*👉🈲👉यावरच मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला याबाबत कुठलाही फॅक्स मिळाला नाही. मी 3 तारखेला जाणार होतो मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे बेळगावात खूप कार्यक्रम होतात, त्यामुळे मी सहा तारखेला जाणार आहे. मात्र, या तारखेलाही बरेच कार्यक्रम आहेत. त्यामुळे आम्ही चिथावणी नाही तर समन्वयाने भेटायला आणि बोलायला येत आहोत. असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.*

*👉🔴👉कर्नाटकने जत तालुक्याला पाणी सोडले:-*

*दरम्यान ,शिंदे सरकार म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण करण्यासाठी तातडीने निर्णय घेत आहे, तसेच पाणी प्रश्न सोडविण्यासाठी 2000 कोटींचे टेंडर काढणार असल्याची घोषणाही शिंदे सरकारने केली आहे. यासाठी सरकार बैठकाही घेणार आहे. तर याचवेळी कर्नाटकने तुबची-बबलेश्वर योजना सुरू करून जत तालुक्यात नैसर्गिक प्रवाहातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्नाटकच्या सीमेपासून तीन किलोमीटरवर असलेला तिकोंडी तलाव गुरुवारी भरून वाहू लागला आहे. कर्नाटकचे तिकोंडी गावाने समर्थन केल्यानंतर हे पाणी सोडून या परिसराला खुश करण्याचा कर्नाटकचा प्रयत्न असल्याचे आता म्हटले जात आहे.*

गुजरात विधानसभेचं आज पहिल्या टप्प्यातील मतदान 89 जागांसाठी 788 उमेदवार मैदानात

गुजरात विधानसभेचं आज पहिल्या टप्प्यातील मतदान; 👉🅾️👉89 जागांसाठी 788 उमेदवार मैदानात

*👉🟪👉गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात आज 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे.आज पहिल्या टप्प्यात एकूण 2,39,76,760 मतदार मतदान करणार आहेत. पहिल्या टप्प्यात 70 महिला उमेदवारांसह 788 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेस सर्व 89 जागांवर लढत आहेत. आम आदमी पक्षाने 88 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्षानेही 57 उमेदवारांना तिकीट दिले आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमने पहिल्या टप्प्यात केवळ 6 उमेदवार उभे केले आहेत.*

*👉🅾️👉दोन टप्प्यात मतदान -*

*गुजरातमध्ये मतदान दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यांत 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यांत 93 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच, 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान, भाजपसाठी दोन्ही विधानसभा निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत.*

*👉🟪👉2017ची निवडणूक झाली होती चुरशीची*

*मागच्या वेळच्या म्हणजेच 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरस पाहायला मिळाली होती. 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं होतं पण तरीही तो सामना चुरशीचा झाला होता. भाजपनं 99 जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसनं 80 जागांवर विजय मिळवला होता. 2017 ला बहुमत भाजपला मिळालं असलं तरी काँग्रेसनं भाजपला कडवी झुंज दिली होती, असं म्हणता येईल. गेली 25 वर्ष गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यंदाही भाजप सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्ताचं ठरणार आहे. यंदा भाजपसमोर काँग्रेससह आपनं देखील आव्हान उभं केलं आहे.*

*👉🅾️👉पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांचा रोड शो*

*पहिल्या टप्प्याचं मतदान दोत असताना पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये मेगा रोड शो आज होणार आहे. अहमदाबादमधील पाच विधानसभा मतदारसंघातून हा रोड शो जाणार आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 पर्यंत हा रोड शो असेल. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सानंदमध्ये सकाळी 10.30 वाजता रोड शो करतील.*

केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात सहभागी होत शहराविषयी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

पुणे, दि. २८: केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने देशातील २६४ शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी शहराबद्दल आपला अभिप्राय नोंदवण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले आहे. ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स-२०२२’ अंतर्गत हे नागरिक जाणीव सर्वेक्षण (सिटीझन पर्सेप्शन सर्व्हे- सीपीएस) २३ डिसेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार असून पुणे शहरातील नागरिकांनी ऑनलाईनरित्या या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी शहरी परिणाम फ्रेमवर्क २०२२ (अर्बन आऊटकम फ्रेमवर्क-युओएफ २०२२) चा शुभारंभ केला. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने २०१८ मध्ये १११ शहरांचा समावेश असणारा पहिला ‘राहणीमान सुलभता निर्देशांक’ जारी केला. त्यानंतर पाठोपाठ २०१९ मध्ये राहणीमान सुलभता निर्देशांक २.० आणि महानगरपालिका कामगिरीचा निर्देशांक जाहीर झाले. शहरांना परिणामावर आधारित नियोजन आणि शहरी व्यवस्थापनाकडे वाटचाल करण्यास मदत करणारा उपक्रम म्हणून याकडे पाहिले जाते.

शहरी परिणाम फ्रेमवर्क २०२२ चा उद्देश हा विकासाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती उपलब्ध करून देऊन शाश्वत विकास आणि सामाजिक-आर्थिक प्रगती साध्य करण्याची प्रक्रिया सुलभ करणे हा आहे. जनसांख्यिकी, आर्थिक, शिक्षण, ऊर्जा, वित्त, पर्यावरण, प्रशासन आणि माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, आरोग्य, गृहनिर्माण, गतिशीलता, नियोजन, सुरक्षितता आणि सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन, पाणी व सार्वजनिक स्वच्छता यांसारख्या क्षेत्रांमध्ये संपूर्ण शहरातील परिणामांवर आधारित पारदर्शक व सर्वसमावेशक माहितीसंग्रह विकसित करण्याचा हा उपक्रम आहे.

या फ्रेमवर्कमध्ये विविध क्षेत्रांमधील एकूण ४५० पेक्षा अधिक निर्देशांकांचा समावेश असून १४ क्षेत्रांमधील माहिती सुव्यवस्थित केली जाईल. माहिती संकलनावर अधिकाधिक लक्ष केंद्रित केले जाईल जेणेकरुन विस्कळीत माहितीचे विश्लेषण केले जाऊ शकते. तसेच संकलित माहितीसंग्रह विषय तज्ज्ञांद्वारे मानांकनासाठी वापरला जाऊ शकेल.

सिटीझन पर्सेप्शन सर्व्हे अंतर्गत https://eol2022.org/CitizenFeedback या लिंकवर अधिकाधिक नागरिकांनी आपला शहराबद्दलचा अभिप्राय नोंदवावा तसेच क्यूआर कोडचाही उपयोग करावा, असे आवाहन पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी केले आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्योजक मेळाव्याचे उदघाटन

पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र परिसरातील लघुउद्योगांच्या समस्या तातडीने सोडविणार-उद्योगमंत्री उदय सामंत*

पुणे दि.१९- उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेतर्फे मोशी येथे आयोजित उद्योजक मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र परिसरातील लघुउद्योजगांच्या समस्या तातडीने सोडविण्यात येतील अशी ग्वाही श्री. सामंत यांनी यावेळी दिली

कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेकर, संस्थापक अध्यक्ष तात्या सपकाळ, सुरेश म्हेत्रे, जयंत कड, अजय भोसले, लघुउद्योजक उपस्थित होते.

उद्योगमंत्री सामंत म्हणाले, छोटा उद्योग हा मोठ्या उद्योगांचा पाया आहे. त्यामुळे मोठ्या उद्योगांप्रमाणे लहान उद्योगांनाही महत्व देण्यात येईल. स्थानिक नागरिकांना उद्योजकांनी रोजगार द्यावेत यासाठी त्यांच्याशी लवकरच चर्चा करण्यात येईल. पिंपरी चिंचवड लघू उद्योजकांच्या मागण्यांवर लवकरच विविध विभागांच्या प्रमुखांची विस्तृत बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्यात येईल.

पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील अनधिकृत भंगार व स्क्रॅपची दुकाने हटविण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महावितरणने उद्योगांची वीज वारंवार खंडित करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लघु उद्योजकांची सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यांना चांगल्या सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस ८ लाख ७६ हजार ७०३ रुपयांचा धनादेश उद्योग मंत्री श्री. सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

आमदार महेश लांडगे यांनीही यावेळी पिंपरी चिंचवड परिसरातील लघू उद्योजकांच्या समस्या मांडल्या.

error: Content is protected !!