Home Blog Page 199

राज्यातील मंदिरांमध्ये मास्कची एन्ट्री!* *चीनमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे खबरदारी

संपादकिय:-
ख्रिसमस आणि नवीन वर्षातील सलगच्या सुट्ट्यांचं निमित्त साधून भाविक महाराष्ट्रातल्या मोठ्या मंदिरांमध्ये गर्दी करण्याची शक्यता आहे.त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातल्या महत्त्वाच्या मंदिर प्रशासनांनी मास्क संदर्भात निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.*

*👉🟣👉परदेशातील कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचे साईबाबा संस्थान सतर्क झालं आहे. दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवाहन केलंय.तिकडे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात मास्क संदर्भातला निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे..तिकडे मुंबईतील मुंबा देवी मंदिरातील कर्मचा-यांना मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्यात. शिवाय भाविकांनाही मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येतं आहे.*

*👉🟣🟣👉मास्क वापरण्याचं आवाहन -*

*कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचे साईबाबा संस्थान सतर्क झालं आहे. दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्क वापरावा, असे आवाहन मंदिरामार्फत करण्यात आले आहे. सोशल डिस्टनसिंगसह सॅनिटायझरचा वापर करावा, ज्यांनी बूस्टर डोस घेतलेले नसतील त्यांनी ते घ्यावेत. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन साई संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.*

*👉🅾️👉अंबाबाई मंदिरात मास्कशिवाय कर्मचाऱ्यांना प्रवेश नाही -*

*करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, भाविकांसाठी अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. जगभरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना उद्यापासून मास्क सक्तीचा होणार आहे.*

*👉🟥👉दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानाचा काय निर्णय?*

*पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थान मध्ये दर्शनाला निघाला असाल तर आधी मास्क घालावा लागणार आहे. गणेशभक्तांनी दर्शनासाठी येताना मास्क वापरण्याचे आवाहन मंदीर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तातडीने गणेशभक्तासांठी पाच हजार मास्क खरेदी करण्यात येणार आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.*

*👉🅾️👉मंदीर प्रशासनाच्यावतीने ज्या भाविकांकडे मास्क नाहीत अशांना मास्क मोफत वाटले जाणार आहेत. मास्क वापरा असे सूचना फलकावर लावून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.*

मास्कसक्ती होणार? स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच मास्क घालून दिले संकेत

संपादकिय:-
*नवी दिल्ली :- चीनसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत.कोविडच्या वाढत्या भीतीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सज्ज झाले आहे. बुधवारी, नीती आयोगाने गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क घालण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक खासदार मास्क घालून संसदेत पोहोचले. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर मास्क सक्ती होण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे.*

*👉🔴👉भारतात ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारांची चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात कोरोनाचा वाढता धोका पाहता पंतप्रधान मोदींनी गुरुवारी एक महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीत पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशिवाय अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक बडे अधिकारीही सहभागी होणार आहेत. गेल्या काही महिन्यांत देशातील विविध राज्यांमध्ये ओमिक्रॉनच्या नवीन सब-व्हेरियंट BF.7 ची प्रकरणे सापडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ही बैठक बोलावली आहे. बैठकीनंतर, राज्यांना एक नोट जारी केली जाण्याची शक्यता आहे. यात त्यांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग भर देण्याची शक्यता आहे. तसेच, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान गर्दी टाळता येईल.*

*👉🟣🟣👉सरकारने आधीच परदेशातून येणाऱ्यांची चाचणी सुरू केली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की क्वारंटाइन आणि चाचणीसाठी पायाभूत सुविधा येत्या 7 दिवसांत पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. जुलै, सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये BF.7 प्रकाराची दोन प्रकरणे गुजरातमध्ये आणि दोन ओडिशामध्ये नोंदवली गेली आहेत. काल आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर केंद्राने मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.*

*👉🔴👉दरम्यान, मागील 24 तासांत देशात 129 नवीन संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 3,408 आहे. तेथे एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. चीन, यूएसए, यूके, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन देशांमध्ये BF.7 प्रकरणांवर सतर्कतेवर असल्याने विविध राज्ये त्यांचे स्वतःचे कोविड प्रोटोकॉल तयार करत आहेत.*

उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महत्त्वाच्या सूचना; राज्यांना दिले आदेश

नवी दिल्ली:-कोरोना अजून संपलेला नाही हे पुन्हा सिध्द झाल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळे व इतर ठिकाणी दक्षता वाढवावी. राज्यांनी कोरोना आरोग्य निर्देश लागू करण्यासह जीनोम सिक्वेन्सिंग आणि चाचण्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे, सर्वांनी मास्क आवर्जून वापरावा व ज्येष्ठ नागरिकांच्या बूस्टर लसीकरणावर विशेष भर द्यावा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठकीत दिल्या.

👉🔴👉कोरोनाचे व्हेरियंटच्या बीएफ -७ या उप-व्हेरियंटचे चार रूग्ण गुजरातसह तीन राज्यांत आढळून आल्यावर देशभरात आरोग्य दिशानिर्देशांचे पालन करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ही उच्चस्तरीय बैठक घेतली.या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया तसेच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची उपस्थिती होती. बैठीकमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत चर्चा झाली.आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन येणाऱ्या प्रवाशांची योग्य त्या तपासण्या, ऑक्सिजन सिलेंडर, पीएसए प्लांट, व्हेंटिलेटर, रुग्णालयातील मनुष्यबळ, पायाभूत सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना पंतप्रधानांनी राज्यांना दिल्या आहेत.

👉🔴👉दरम्यान, मागील २४ तासांत देशात १२९ नवीन रूग्ण आढळले असून सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३४०८ आहे. एका कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूची नोंद झाली आहे.केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत विशेष मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी कोविडच्या मुकाबल्यासाठी पूर्णपणे तयार राहा. कोरोना अजून संपलेला नाही, अशा शब्दांत आरोग्य यंत्रणांना दक्षतेच्या सूचना दिल्या. राज्य प्रशासनांनी ऑक्सिजन सिलिंडर, आॅक्सीजन प्लांट, व्हेंटिलेटर आणि पायाभूत सुविधांची तयारी सुनिश्चित करण्यासाठी ऑडिट तपासणी करण्याचा सल्लाही पंतप्रधानांनी दिला.

👉🟣🟣👉विशेषतः ज्येष्ठ नागरीक आणि आजारी लोकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन करताना पंतप्रधानांनी कोरोना आघाडीवीर व कोरोना योद्ध्यांच्या निस्वार्थ सेवेचेही कौतुक केले. या बैठकीनंतर राज्यांना नवीन दिशानिर्देश जारी केली जाण्याची शक्यता आहे. मास्क आणि सामाजिक अंतरावर भर द्यावा आणि ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान गर्दी रोखण्यासाठी यात विशेष खबरदारीचा सल्ला पंतप्रधानांनी दिला.

Covid-19 कोरोनाचा नवा अवतार… अशी लक्षणे दिसल्यास सावधान…

Covid-19*
*कोरोनाचा नवा अवतार…
अशी लक्षणे दिसल्यास सावधान…

*👉🅾️👉चीनमधे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा तणाव वाढला आहे. जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचे नवे रूप भारतातही आले आहे. चीनमधून पसरलेल्या या प्रकारामुळे जपान आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे. अर्जेंटिना, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये प्रकरणे वाढू लागली आहेत. भारतातही ऑमिक्रोन BF.7 प्रकाराची चार प्रकरणे आढळून आली आहेत.पंतप्रधान मोदींनी आज दुपारी कोरोनासंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. भारत सरकार अलर्ट मोडमध्ये आले आहे. दिल्लीत कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर केजरीवाल सरकार एक्शन मोडवर आले आहे.*

*👉🟥👉कोरोना विषाणू बदलत आहे. अशा परिस्थितीत ते थांबवणे कठीण होत आहे. लसीकरण झालेल्या लोकांना पुन्हा कोरोनाची लागण होत आहे. वास्तविक, अशी अनेक लक्षणे आहेत ज्यांना कोणीही सामान्य मानून दुर्लक्ष करतात, परंतु ती लक्षणे कोरोनाची देखील असू शकतात. Express.co.uk च्या मते, ZOE अॅप महामारीच्या सुरुवातीपासून कोविडच्या लक्षणांबद्दल ही माहिती सतत देत आहे. या प्रकाराची लक्षणे काय आहेत ते सविस्तर वाचा..*

*👉🟥🟥🟥👉कोरोनाच्या नवीन प्रकाराची लक्षणे*

*ताप, डोकेदुखी, नाक वाहणे, शिंका येणे, खोकला, घसा खवखवणे, अस्पष्ट बोलणे, वास कमी होणे, स्नायू दुखणे, धाप लागणे, अतिसार वास न येने आणि श्वास लागणे ही कोविड-19 च्या BF-7 प्रकाराची सामान्य लक्षणे आहेत. कोरोनाच्या इतर प्रकारांमध्येही हे सर्वात सामान्य लक्षण होते. अहवालानुसार, एक रुग्ण पाच लोकांमध्ये विषाणू पसरवू शकतो.*

*👉🅾️👉याआधी देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, काही देशांमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता त्यांनी आज तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला. कोविड अजून संपलेले नाही. मी सर्व संबंधितांना सतर्क राहण्याचे आणि दक्षता मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही कोणतीही परिस्थिती हाताळण्यास तयार आहोत.*

*👉🔴👉कोविडवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीनंतर,निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले की, विमान वाहतुकीच्या बाबतीत सध्या कोणताही बदल झालेला नाही. तुम्ही गर्दीच्या ठिकाणी, घरामध्ये किंवा घराबाहेर असाल तर मास्क वापरा. ज्यांना कॉमोरबिडीटी आहे किंवा जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी हे अधिक महत्वाचे आहे.*

शाळा, महाविद्यालय परिसरांत लवकरच ‘सीसीटीव्ही अश्लील चित्रफीतींचा मुलांवरील प्रभाव चिंताजनक देवेंद्र फडणवीस

संपादकिय:- रामवर्मा आसबे

*नागपूर :-शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील चित्रफीत वा तत्सम चित्रीकरणांच्या प्रभावामुळे विकृत दृष्टिकोन निर्माण होणे व त्यातून लैंगिक अत्याचार अथवा हिंसेच्या घटना घडू नयेत यासाठी परिसरात ‘सीसीटीव्ही’ लावण्यासह इतरही प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.*

*👉🔴🔴👉मुंबईतील माटुंगा येथील महापालिकेच्या शाळेतील तेरा वर्षीय विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत उमा खापरे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले.*

*👉🟥👉कोरोनाकाळात मुलांच्या हाती दिवसभर मोबाइल राहात होते.या काळात अनेक मुले अश्लील चित्रफिती त्यावर पाहात होते. त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होऊन काही ठिकाणी खुनासारख्या गंभीर घटना घडल्या. यावर सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,’माटुंगा येथील घटना चिंताजनक आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. अशा विकृतींना आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे.सायबर गुन्ह्यांबाबत संबंधित प्राप्त तक्रारीची तांत्रिक तपासणी करण्यासाठी राज्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांमध्ये अश्लील चित्रीकरणाच्या प्रभावामुळे विकृती वाढतेय. ही चिंताजनक बाब आहे. लैंगिक अत्याचारासंबंधी व्हिडीओ व अन्य मजकूर याबाबतची माहिती मिळाल्यावर समाजमाध्यम व संकेतस्थळावरून हटवण्यासंबंधी त्वरित कारवाई करण्यात येत आहे. तसेच राज्यामध्ये इंटरनेटवरील अशा प्रकारच्या मजकुरावर आणि संकेतस्थळांवरील प्रतिबंध घालण्याचे काम सुरू आहे. राज्यातील सायबर गुन्ह्यांबाबत सायबर इंटेलिजन्स युनिट प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहे. या माध्यमातून सायबर गुन्हेगारीवर वचक ठेवता येईल’.राज्यातील काही मोठय़ा शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘सीसीटीव्ही’ बसवण्यात आले आहेत. मात्र, काही साधारण शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘सीसीटीव्ही’ बसवण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी टप्प्याटप्प्याने ‘सीसीटीव्ही’ बसवण्यासंदर्भात सूचना देण्यात येतील.*

*👉🔴👉विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..*

*शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासंदर्भात चांगला, वाईट स्पर्श याबाबत मार्गदर्शनपर प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. शाळा, महाविद्यालय परिसरातील ‘कॅफेटेरिया’ व अन्य सुविधा यांचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आणि गृह विभागाच्या सचिवांची समिती नेमून एक स्वतंत्र धोरण ठरविण्यात येईल”, असे फडणवीस म्हणाले.*

राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांची भरती करणार;👉👉 वैद्यकीय मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांची भरती करणार;👉👉 वैद्यकीय मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा*

*👉🟣👉विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला आज सुरुवात झाली. यावेळी भाजप नेते तथा राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर, तंत्रज्ञांच्याच्या भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली.राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांवर भरती करण्यात येणार असून ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार असल्याचे मंत्री महाजन यांनी म्हंटले.*

*👉🔺🔺👉नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून या अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. यावेळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर, तंत्रज्ञांच्या पदांच्या भरतीसंदर्भात माहिती देत घोषणा केली. यावेळी महाजन म्हणाले, आम्ही MPSC च्या माध्यमातून 300 डॉक्टर भरले आहेत. सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत. या संदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करण्यात येईल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.*

*👉🟣👉एमपीएससी मार्फत जागा भरण्यास वेळ लागतो. आत्तापर्यंत 10 टक्के हॉस्पिटल आणि 90 टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी होती, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलत आहोत. आता 30 टक्के हॉस्पिटल आणि 70 टक्के हाफकिन अशी औषधं खरेदी केली जाईल.*

error: Content is protected !!