Home Blog Page 198

दुःखद निधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन

संपादकिय:-

अहमदाबाद — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

याच वर्षी 18 जून रोजी हीराबेन यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
हीराबेन यांची तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. हीराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल यांचे प्रधान सचिव के. कैलासनाथन रुग्णालयात गेले होते.त्यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना भेटून हीराबेन यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. तसेच त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही अहमदाबादला आले होते. त्यांनी आपल्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच आईसोबत थोडावेळ घालवला होता.

हीराबेन यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र वृद्धापकाळ आणि आजारपण यामुळे हीराबेन यांची प्रकृती अधिकच खालावली. उपचाराला साथ न दिल्याने अखेर त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. आईच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: गांधीनगर येथे येणार असल्याचं वृत्त आहे.मोदी अंत्यसंस्काराला येणार असल्याने गांधी नगरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येत आहे.हीराबेन यांचा जन्म 18 जून 1923मध्ये झाला होता. या वर्षी त्यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता.आईच्या वाढदिवसासाठी स्वत: नरेंद्र मोदी गुजरातच्या गांधीनगरला आले होते. त्यांनी आईचे पाय धुवून आशीर्वादही घेतले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सात भाऊ बहीण आहेत. सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, बहीण वासंतीबेन, पंकजभाई मोदी आदी त्यांच्या भाऊ आणि बहिणींची नावे आहेत. त्यात मोदी तिसऱ्या क्रमांकाचे आहेत.मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी अहमदाबादमध्ये किराणा दुकान चालवतात. मोदींचे मोठे बंधू सोमभाई आरोग्य विभागात कामाला होते, आता ते निवृत्त झाले आहेत. ते आता अहमदाबादेत एक वृद्धाश्रम चालवतात. तसेच सामाजिक कार्यात व्यस्त असतात.

अमरुतभाई यांनी एका खासगी कंपनीत फिटर म्हणून काम केलं आहे. आता तेही निवृत्त झालेले आहेत. मोदी यांचे सर्वात लहान बंधू पंकज मोदी हे गुजरातच्या माहिती विभागात कामाला होते. तेही निवृत्त झाले आहेत. हीराबेन पंकजभाईंसोबतच गांधीनगरला राहत होत्या.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख अवघ्या सहा महिन्यात 2600 रुग्णांना 19 कोटी 43 लाखांची मदत

संपादकिय:-

मुंबई, दि. 3 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सहा महिन्यात कक्षाकडून 2600 रुग्णांना एकूण 19 कोटी 43 लाख रुपयांची मदत दिली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून रुग्णसेवेत झोकून दिले आहे. त्यामुळेच पहिल्याच जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाखांची तर डिसेंबर महिन्यात विक्रमी 8 कोटी 52 लाख रुपयांची वैद्यकीय मदत रुग्णांना देण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात रुग्णांना देण्यात आलेल्या विक्रमी मदतीबाबत बोलतांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे.

0000

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

img 20230101 wa0092
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा

शुभेच्छुक:- रामवर्मा आसबे

संपादक:- नमोन्यूजनेशन

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

img 20230101 wa0092
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा

शुभेच्छुक:- रामवर्मा आसबे

संपादक:- नमोन्यूजनेशन

पंतप्रधान मोदींच्या भावाच्या कारला भीषण अपघात

img 20221227 wa0136

*बंगळुरू:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला म्हैसूर येथे अपघात झाला. ते पत्नी, मुलगा आणि सून यांच्यासह म्हैसूरजवळील बांदीपुरा येथे जात होते.*

*👉🟥👉हा अपघात कडकोलाजवळ झाला, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी हे बंगळुरूहून बांदीपूरला जात असताना म्हैसूर तालुक्यातील कडकोलाजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. कारमधील प्रल्हाद मोदी यांचा मुलगा आणि सून जखमी झाले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच म्हैसूरच्या एसपी सीमा लाटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयालाही या अपघाताची माहिती कळवली आहे.*

कोरोनामुळे मरण पावलेल्या पत्रकारांसाठी उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येकी १० लाख रुपयांची केली मदत

कोरोनामुळे मरण पावलेल्या पत्रकारांसाठी उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येकी १० लाख रुपयांची केली मदत*

*👉🟣🟣👉कोरोनामुळे दगावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत दिली आहे. एकूण ५३ कुटुंबांना याचा लाभ झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही मदत देताना पत्रकारांच्या कर्तव्यदक्ष, धाडसी आणि सामाजिक योगदानाची प्रशंसा केली.*

*👉🔴👉दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. कोरोनाच्या साथीत मरण पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी एकूण ५ कोटी ३० लाख रुपयांची मदत देण्यात आली. गेल्या वर्षी ५० पत्रकारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये अशी मदत देण्यात आली होती.*

भारत धावला चीनच्या मदतीला मोदी सरकारने दिली औषध पाठवण्याची परवानगी

संपादकिय:- रामवर्मा आसबे

*नवी दिल्ली :-कोरोनाची आतापर्यंतची सर्वात घातक लाट चीनमध्ये आली आहे. दररोज लाखो नवे रुग्ण येत असल्याने रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीये, तसेच औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. लोक औषधांशिवाय त्रस्त आहेत.आपला शेजारी संकटात सापडलेला पाहून भारत पुन्हा एकदा समोर आला आहे.*

*👉🅾️👉भारताने चीनला औषधे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या औषध निर्यात संस्थेच्या अध्यक्षांनी गुरुवारी (२२ डिसेंबर) सांगितले की, ‘जगातील सर्वात मोठ्या औषध उत्पादकांपैकी एक असलेल्या भारताने कोरोनाशी लढा देणाऱ्या चीनला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत चीनला तापाची औषधे देण्यास तयार आहे.’ चीनमध्ये कोरोनाच्या लाटेमुळे औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी औषध कंपन्यांमध्ये ओव्हरटाईम केला जात आहे. ताप, अंगदुखी आणि डोकेदुखीवर मोफत औषधे देण्याची घोषणा चीन सरकारने केली आहे.*

*👉🔴👉दरम्यान, तापावरील औषधे चीनला पाठवण्यासही भारताने परवानगी दिली आहे. फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाचे (फार्मेक्सिल) अध्यक्ष साहिल मुंजाल यांनी रॉयटर्सला सांगितले की, “आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉल औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना चीनकडून ऑर्डर मिळत आहेत.”भारत सरकारने औषध पाठवण्याची परवानगी दिली“आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉलची सध्या चीनमध्ये जास्त मागणी आहे, जिथे लोकांना या औषधांचा तुटवडा जाणवत आहे,” त्याचवेळी भारत चीनला मदत करण्यास तयार असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “आम्ही चीनमधील कोविड परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.” चीनला औषध पाठवण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, “जगातील फार्मसी म्हणून आम्ही इतर देशांना नेहमीच मदत केली आहे.”*

राज्यातील मंदिरांमध्ये मास्कची एन्ट्री!* *चीनमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे खबरदारी

संपादकिय:-
ख्रिसमस आणि नवीन वर्षातील सलगच्या सुट्ट्यांचं निमित्त साधून भाविक महाराष्ट्रातल्या मोठ्या मंदिरांमध्ये गर्दी करण्याची शक्यता आहे.त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातल्या महत्त्वाच्या मंदिर प्रशासनांनी मास्क संदर्भात निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.*

*👉🟣👉परदेशातील कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचे साईबाबा संस्थान सतर्क झालं आहे. दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवाहन केलंय.तिकडे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात मास्क संदर्भातला निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे..तिकडे मुंबईतील मुंबा देवी मंदिरातील कर्मचा-यांना मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्यात. शिवाय भाविकांनाही मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येतं आहे.*

*👉🟣🟣👉मास्क वापरण्याचं आवाहन -*

*कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचे साईबाबा संस्थान सतर्क झालं आहे. दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्क वापरावा, असे आवाहन मंदिरामार्फत करण्यात आले आहे. सोशल डिस्टनसिंगसह सॅनिटायझरचा वापर करावा, ज्यांनी बूस्टर डोस घेतलेले नसतील त्यांनी ते घ्यावेत. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन साई संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.*

*👉🅾️👉अंबाबाई मंदिरात मास्कशिवाय कर्मचाऱ्यांना प्रवेश नाही -*

*करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, भाविकांसाठी अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. जगभरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना उद्यापासून मास्क सक्तीचा होणार आहे.*

*👉🟥👉दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानाचा काय निर्णय?*

*पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थान मध्ये दर्शनाला निघाला असाल तर आधी मास्क घालावा लागणार आहे. गणेशभक्तांनी दर्शनासाठी येताना मास्क वापरण्याचे आवाहन मंदीर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तातडीने गणेशभक्तासांठी पाच हजार मास्क खरेदी करण्यात येणार आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.*

*👉🅾️👉मंदीर प्रशासनाच्यावतीने ज्या भाविकांकडे मास्क नाहीत अशांना मास्क मोफत वाटले जाणार आहेत. मास्क वापरा असे सूचना फलकावर लावून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.*

error: Content is protected !!